Friday, 24 August 2012

अनुभव, नियोजनातून केली कलिंगडाची यशस्वी शेती


महागाई व मजुरांअभावी शेती व्यवसाय करणे अवघड झाले आहे. जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कलिंगडाची शेती या पिकातील अनुभवी दांपत्याला बटाईने करण्यास दिली. योग्य निर्णय, शेतीचे योग्य नियोजन व व्यवस्थापन यातून कलिंगडाची शेती यशस्वी होऊन उत्पादन व उत्पन्नही चांगले मिळाले. तुकाराम शिंदे
शेती व्यवसायात पीकबदल किंवा पीकविविधता ठेवून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असले तरी वातावरणाच्या बदलामुळे व नियोजनाच्या अभावी काही वेळा नियोजन फसू शकते. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी मिळते. त्यातच महागाई व मजुरांअभावी शेती व्यवसाय करणे अवघड झाले आहे. अशा वेळी योग्य नियोजन व व्यवस्थापनावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे. जालना जिल्ह्यातील शेतकरी कापूस, ऊस, मोसंबी या पिकांची लागवड करतात. या पिकांना दोन-तीन वर्षांतून एकदा तरी पाणी, हवामान, दुष्काळसदृश परिस्थिती यांच्याशी सामना करावा लागतो. हमीभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या आणखी वाढतात, त्यामुळे कमी दिवसांत जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे दिसतात. जिल्ह्यातील तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथील ज्ञानोबा श्रीपतराव चिमणे यांनी कलिंगडाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. ते करताना या पिकाचा अनुभव, मजुरांची अडचण निर्माण होणार होती. नियोजन चुकू नये या हेतूने गोदाकाठचे रहिवासी असलेले दत्ता देवचंद लिंबोरे व सौ. अंजना दत्ता लिंबोरे या दांपत्याला बटाईने (अर्धा हिस्सा) कलिंगड लागवड करण्यासाठी एक हेक्‍टर क्षेत्र दिले. लिंबोरे दांपत्याने आपल्या अनुभवातून या पिकाची योग्य पद्धतीने लागवड करून चांगले उत्पादन घेतले. कमी खर्चात सुमारे 80 दिवसांत दोन लाख 79 हजार शंभर रुपयाचे उत्पन्नही मिळविले.

या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड करून मोठ्या प्रमाणात खर्च केला; परंतु वातावरणाच्या बदलामुळे व नियोजनाच्या अभावी पाहिजे तसे उत्पादन घेता आले नाही. अनेकांनी लागवडीच्या वेळेत बदल केल्यामुळे वेळेवर पीक घेता आले नाही, तर काहींना पिकाचे व्यवस्थापन करता आले नसल्याने पिकाची वाढ मिळविता आली नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कलिंगडाचे प्लॉट या वर्षी फायदेशीर ठरले नसल्याचे शेतकरी सांगतात; परंतु याला अपवाद ज्ञानोबा चिमणे हे ठरले.

कलिंगड लागवडीचे नियोजन कलिंगड लागवडीसाठी चिमणे यांनी एक हेक्‍टर हलक्‍या स्वरूपाच्या जमिनीची आडवी - उभी नांगरट व रोटाव्हेटरच्या साह्याने मशागत केली. शेतीची मशागत केल्यानंतर सात फूट अंतराची सरी तयार केली. या एका हेक्‍टरमधील सरीमध्ये सहा ट्रॅक्‍टर ट्रॉली शेणखत, 10:26:26 या रासायनिक खताच्या पाच बॅग खत सरीत टाकून खासगी कंपनीच्या संकरित जातीच्या कलिंगडाची लागवड ठिबक सिंचनाच्या नळीच्या दोन्ही बाजूने 18 जानेवारीच्या सुमारास केली. लागवडीनंतर पिकाला लगेच पाणी दिले. लागवडीनंतर आठ दिवसाने दुसरे पाणी ठिबक संचाद्वारे देण्यात आले. तिसरे पाणी लागवडीनंतर सुमारे अठ्ठावीस दिवसांनी देण्यात आले. पाण्याचे नियोजन लिंबोरे दांपत्याने अनुभवातून केल्यामुळे पिकाची वाढ चांगल्या प्रकारे झाली. पिकाची उगवण क्षमता चांगली झाल्याने पिकाला आठ दिवसांच्या अंतराने पाणी नियमित देण्यात आले असून, त्यानंतर एकूण सात ते आठ पाणी पाळ्या झाल्या.

व्यवस्थापन कलिंगड लागवडीच्या अगोदर उभी - आडवी नांगरट केल्यामुळे तणाचे प्रमाण कमी राहिले; परंतु लागवडीनंतर कलिंगडाची उगवण सुरू झाल्यामुळे, तसेच थोड्याफार प्रमाणात तण उगवल्यामुळे लिंबोरे दांपत्याने मजूर न लावता स्वतःच खुरपणी केली. ठिबक संचाद्वारे पाणी देण्यात आल्यामुळे तणांचे प्रमाण कमी राहिल्यामुळे दुसरी खुरपणी या दांपत्याने लागवडीनंतर महिन्याने केली, त्यामुळे तणांचे प्रमाण अत्यंत कमी राहिले.

कलिंगड लागवडीचा अनुभव लिंबोरे यांना होताच. त्यामुळे आवश्‍यकतेनुसार खताची मात्रा देण्यात आली. ठिबक सिंचनाद्वारे खते देण्यावर भर राहिला. लागवडीनंतर एका महिन्याने रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी इमिडाक्‍लोप्रिड या कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली. काही दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी केली. किडी - रोग नियंत्रणासाठी योग्य वेळी काळजी घेतल्यामुळे फायदा झाला. पिकाचे पाणी, खत व कीडनाशकांचे नियोजन वेळेवर केले. फवारण्यांची संख्याही कमी केली. साहजिकच खर्चात बचत झाली.

सध्या शेतीत मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. महागाई वाढल्याने मजुरांचे भाव सांगायचे तर महिला मजुरांना प्रती दिन एकशे पन्नास रुपये द्यावे लागतात. कलिंगड पिकातील खुरपणी त्यांच्याकडून करून घ्यावयाची तर हेक्‍टरी किमान तीन ते चार हजार रुपये लागले असते; परंतु लिंबोरे दांपत्याने घरच्या घरी खुरपणी केल्यामुळे खर्चात बचत होऊन वेळेवर पिकाची मशागत झाली, त्यामुळे उत्पादनवाढीला फायदा झाला. एकूण नियोजनातून फळांचे वजन किमान दोन किलो व जास्तीत जास्त आठ किलोपर्यंत मिळाले. एका हेक्‍टरमध्ये एकूण उत्पादन 57 टनांपर्यंत मिळाले.

उत्पादनाचा ताळेबंद एकूण खर्च (रु.)
नांगरट, रोटाव्हेटर - 4000
शेणखत सहा ट्रॉली, प्रति ट्रॉली 3500 रु. प्रमाणे एकूण - 21,000
रासायनिक खते - 5460
कीडनाशके - 775 रु.
खूरपण, लागवड मजुरी खर्च : घरच्या सदस्यांनी हे काम केल्याने त्यात बचत
कलिंगड काढणी खर्च - 8,475 रु.
अन्य - 500 रु.
एकूण खर्च - 40,210 रु.

उत्पादन
एकूण लागवड : एक हेक्‍टर
एकूण बियाणे : एका हेक्‍टरसाठी, एक किलो दोनशे पन्नास ग्रॅम
उत्पादन : एकूण 57 टन
भाव : व्यापाऱ्याला विक्री केलेले 47 टन
भाव 5300 रु. प्रति टन - एकूण = 2,49,100 रु.
स्वतःही स्थानिक बाजारपेठेत विक्री : 10 टन,
भाव 3000 रु. प्रति टनाने एकूण = 30,000
एकूण उत्पादन 57 टन मिळाले एकूण रु. : = 2,79,100
एकूण झालेले खर्च : = 40,210
खर्च वजा जाता निव्वळ नफा : =2,38,890 रु.

ज्ञानोबा श्रीपतराव चिमणे - 8806620979
पो. तीर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना
2) दत्ता देवचंद लिंबोरे - 9823073892

आले पिकाने दिला सुधारित तंत्रातून फायदा

सातारा जिल्ह्यातील रायगाव (ता. जावली) येथील जितेंद्र मारुती कदम यांनी 25 गुंठ्यांत आले व आंतरपीक कलिंगडाच्या पिकातून उत्पन्नवाढ साधण्याचा प्रयत्न केला आहे. प्रयोगात गादीवाफ्यावरील लागवडीबरोबर तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर त्यांना फायदेशीर ठरला. सुधारित पद्धतीचा अवलंब व शेतीत योग्य बदल करून तसे नियोजन केले, तर शेती व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो याचा प्रत्यय कदम यांच्या प्रयोगातून दिसला आहे.
अमोल जाधव
पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्‍यापासून साताऱ्याकडे जाताना रायगाव फाटा लागतो. तेथून दोन किलोमीटर अंतरावर जितेंद्र कदम यांची शेती व घर आहे. त्यांची वडिलोपार्जित तीन एकर शेती. शेताच्या शेजारून धोम धरणाचा उजवा कालवा गेला आहे. मात्र जमिनीपासून कालवा उंचावर असल्याने शेतीला पाणी मिळत नाही. तीन वर्षांपूर्वी शेतीसाठी बोअर व विहिरीद्वारे पाण्याची उपलब्धता केली. त्यानंतर ऊस, आले व टोमॅटो ही नगदी पिके घेण्यास सुरवात केली. टप्प्याटप्प्याने शेती ओलीताखाली आणली. गेल्या 15 वर्षांपासून कदम शेतीचे व्यवस्थापन सांभाळत आहेत. चार वर्षे त्यांनी पूरक रेशीम व्यवसाय केला. 60 गुंठ्यांतील तुती लागवडीद्वारे ते प्रति लॉट 250 अंडीपुंज्यापासून सरासरी 180 ते 200 किलोपर्यंत कोष उत्पादन घ्यायचे. खंडाने घेतलेली 30 गुंठे व स्वतःकडील 30 गुंठे क्षेत्रावर तुती लागवड होती. दोन टप्प्यांत लागवड केल्यामुळे वर्षाकाठी 9 ते 10 लॉटमधून रेशीम कोषांचे उत्पादन त्यांना मिळायचे. सुरवातीची दोन- अडीच वर्षे कोष विक्री वाई येथील शासनाच्या खरेदी केंद्राकडे केली. त्यास प्रति किलो सरासरी 150 ते 170 रुपये दर मिळाला. सात ते आठ लॉटमधील कोषांची विक्री बंगळूर बाजारपेठेत केल्याने तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यांच्या या यशापासून प्रेरणा घेत गाव परिसरातील तरुणांनी हा व्यवसाय पत्करला. रेशीम व्यवसायातील यशस्वी कामगिरीबद्दल जावली येथील कृषी प्रदर्शनात कदम यांचा गौरवही झाला. रेशीम व्यवसायातून चार वर्षे प्रतिमहा खर्च वजा जाता 18 ते 20 हजारांचे उत्पन्न त्यांना मिळाले. खंडाची शेती सुटल्यानंतर उर्वरित 30 गुंठ्यांत व्यवसाय सांभाळणे कठीण बनल्याने कदम यांनी गेल्या वर्षी सुधारित पद्धतीने आले लागवड केली.

शेतीत या आधी सरी पद्धतीने आले घेतले जायचे. त्याचबरोबर हळद, भुईमूग, ज्वारी, घेवडा ही पारंपरिक पीक पद्धत. याआधी आले पिकाचे समाधानकारक उत्पादन मिळत नव्हते. गेल्या वर्षी सुधारित पद्धत वापरताना गादीवाफा पद्धत, बीजप्रक्रिया, तुषार सिंचन, पीक वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर खतांचे सुयोग्य व्यवस्थापन केल्याने 25 गुंठ्यांत सुमारे -----महिन्यांमध्ये आले पिकाचे 137 क्विंटल उत्पादन त्यांना मिळवता आले.

लागवड व्यवस्थापन
कदम यांची मुरमाड जमीन आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात साधारण नऊ इंचाने नांगरट केली. त्यानंतर 15 दिवसांनी रोटरने मशागत केली. प्रति ट्रॉली तीन हजार रुपयांनी शेणखत विकत घेऊन ते शेतात मिसळून उभ्या व आडव्या फणपाळीने मेहनत केली. मे महिन्यात साडेचार फुटांचे गादीवाफे तयार केले. गादीवाफ्यावर 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची मात्रा वापरली. त्यानंतर तीन दिवस शेत उन्हात तापवले. मेच्या पंधरवड्यात लागवडीस सुरवात केली. लागवडीआधी साधारण 45 दिवस बियाणे ढेपण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या प्रक्रियेबाबत कदम म्हणाले, की गावातील शेतकऱ्यांकडून 675 किलो बेणे आणले. ते कौलारू घराच्या कोपऱ्यात कुडीला कुडी थर लावून ढेपले. (ढेपणे म्हणजे बियाणे सुप्तावस्थेत ठेवणे). ढेपणीत प्रत्येक थरामध्ये एक फुटाचे अंतर ठेवले. संपूर्ण बियाणे ढेपल्यानंतर त्यावर गोणपाट लावून बेणे शेणकाला व मातीच्या मिश्रणाने लेप लावून झाकले. सुमारे 45 दिवसांनंतर सुमारे दोन ते अडीच इंचाचे कोंब आल्याचे पाहून लागवडीचे नियोजन सुरू केले. या प्रक्रियेमुळे बियाण्यातील आर्द्रता कमी झाल्याने बेण्यात 25 किलो घट आली.

बेण्याच्या प्रत्येक कुडीवर तीन ते चार डोळे पाहून 30 ते 35 ग्रॅम वजनाचे तुकडे केले. निवडलेल्या कुडींची बीजप्रक्रियेसाठी निवड केली. कार्बेन्डाझिम व क्‍लोरपायरिफॉसच्या द्रावणाने बेणेप्रक्रिया केली. प्रत्येक चार तुकड्यांमध्ये आठ इंच अंतर ठेवून सुमारे 400 फूट लांबी असलेल्या गादीवाफ्यांवर कुड्यांची लावण केली. लावणीनंतर पूर्णवेळ 12 तास तुषार सिंचन सुरू ठेवून पाणी दिले. त्या वेळी उन्हाळा असल्याने तेथून पुढे दिवसाकाठी तीन तास तुषार सिंचन सुरू ठेवले. यामुळे उन्हाळ्यातील तापमान नियंत्रित करणे शक्‍य झाले. लावण केल्यापासून सुमारे तीन आठवड्यांनंतर कुडीस कोंब दिसू लागले. त्या वेळी शेतात तण उगवले होते. कुडीला इजा होऊ नये, म्हणून भांगलण न करता उगवलेले तण हाताने उचलून घेतले.

पाऊस सुरू झाल्यानंतर जमिनीतील हुमणी व कंदमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फोरेटचा वापर जमिनीतून केला. त्यानंतर दीड महिन्याने शंभर किलो निंबोळी पेंड, एक टन गांडूळ खत यांचा वापर केला. त्याचवेळी ठिबक सिंचन जोडले. त्यातून विद्राव्य खते दिली. तीन महिन्यांनंतर पानांवर करप्याचा प्रादुर्भाव दिसू लागल्यानंतर तीन ते चार फवारण्या घेतल्या. चार महिन्यांनंतर 50 किलो निंबोळी पेंड, दहा किलो झिंक सल्फेट एकत्रित घेऊन पिकाला विस्कटून दिले व पुन्हा भर लावली. फेब्रुवारी अखेरीस आले पिकातील बांड सुकण्यास सुरवात झाल्यानंतर पिकास गारवा राहावा यासाठी कलिंगड पिकाची आच्छादनासाठी लागवड केली. कलिंगडाचे सुमारे दीड महिन्यानंतर उत्पादन सुरू झाले. रंग व गोडी चांगली असल्याने फळांची जागेवर विक्री झाली. प्रति फळास किमान 20 रुपये व जास्तीत जास्त 25 रुपये दर मिळाला. यातून सुमारे 18 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

कलिंगडाच्या काढणीनंतर आल्याचे व्यवस्थापन सुरू असताना दररोज दोन तास ठिबक सुरू ठेवले. बाजारपेठेतील दर पाहून प्रति किलो 15 रुपये 40 पैसे या प्रमाणे व्यापाऱ्याची दरनिश्‍चित करून त्याला जागेवरच माल विकला. काढणीपश्‍चात 137 क्विंटल माल उत्पादित झाला.

पूर्वमशागत, बियाणे, शेणखत, लावण, मजुरी, रासायनिक खते, जिवाणू खते, गांडूळ खत, रासायनिक कीडनाशके, पिकास भर लावणी, भांगलण आदी मिळून सुमारे 76 हजार रुपये खर्च झाला. खर्च वजा जाता सुमारे एक लाख 33 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. गणेश चतुर्थीचा हंगाम पकडून आले काढलेल्या क्षेत्रावर झेंडूची लागवड केली आहे. त्याबरोबर चार गुंठ्यांत स्ट्रॉबेरी रोपांची नर्सरी आहे. त्यापासून 30 हजार रोपे तयार झाली आहेत. स्वतःकडील 35 गुंठ्यांवर लागवड करून उरलेल्या रोपांची विक्री करणार आहे. सध्या स्ट्रॉबेरीच्या प्रति रोपास सरासरी 20 रुपये इतका दर आहे.

पाच गुंठ्यांत कदम यांनी शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेतून 50 हजार रोपांची रोपवाटिका केली आहे. त्यामध्ये 20 प्रकारची फुले व फळझाडे आहेत. त्यांच्या शेतावर तापमापक यंत्रही कार्यरत आहे. कदम यांच्या शेतालगतच्या घरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी भाडेतत्त्वावर राहतात. त्यांच्याकडून घरातील संगणकावर ते इंटरनेटच्या माध्यमातून शेतीविषयक माहिती घेतात. तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार, मंडल कृषी अधिकारी शेखर गुजर, कृषी सहायक अशोक घोरपडे, राम डंगारे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन त्यांना मिळते.

जितेंद्र कदम, 9423803746

केसर फळांनी दिले सोनेरी उत्पन्न


आयटीच्या उच्च शिक्षणानंतर डोळे विस्फारणारे पॅकेज मिळत असतानाही लिंगनूरच्या प्रवीण वृषभनाथ नाईक यांनी शेतीत लक्ष केंद्रित केले. बांधावर लावलेल्या आंब्याकडे "घरी खाण्यापुरते' अशी दृष्टी न ठेवता त्याला व्यावसायिक रूप दिले. बागेची शास्त्रशुद्ध जोपासना केली. या वर्षी त्यांना समाधानकारक उत्पादन व उत्पन्नही मिळाले. तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी त्यांची बाग प्रेरणादायी ठरली आहे.
संतोष भिसे

मिरज शहरापासून (जि. सांगली) सुमारे बावीस किलोमीटरवरील लिंगनूर हे सात - आठ हजार लोकवस्तीचे गाव. शेतीला पावसाचा आधार. नाही म्हणायला गावालगतचा पाटबंधारे तलाव सुमारे पंचवीस टक्के शेतीला पाणी देणारा. गेल्या दोन - तीन वर्षांपासून कृष्णा - कोयना सिंचन प्रकल्पाच्या पाण्याचा वाहता प्रवाह. या गावातील "आयटी'चे शिक्षण झालेले प्रवीण नाईक यांची लिंगनुरात ठिकठिकाणी सुमारे वीस एकर शेती आहे. वडील वृषभनाथ यांनी 1991-92 मध्ये वेगळा प्रयोग म्हणून केसर आंब्याची 80 कलमे लावली, त्याकडे व्यावसायिक उत्पादन म्हणून पाहिले नाही. लागवड घरखर्चापुरता पैसा देत गेली. प्रवीण यांनी शेतीत लक्ष घातल्यानंतर आंब्यात व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला. या रोपांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले तर चांगला पैसा मिळू शकतो हे ध्यानी आले. त्यातून 2008 मध्ये दोन एकरांत केसर आंब्याची लागवड वाढवली.

लागवडीचे नियोजन
नाईक यांची जमीन माळरान, खडकाळ आहे. त्यात 3 बाय 15 फूट अंतर ठेवून एकूण एक हजार 920 झाडे लावली. दक्षिणोत्तर तीन बाय तीन फुटांचा चर काढून त्यात पाच पोती सिंगल सुपर फॉस्फेट टाकले. शेणखत व माती घालून चरी भरून घेतल्या. प्रत्येक कलमाला जमिनीच्यावर सुमारे चार फूट उंचीवर बांबूचा आधार दिला. संपूर्ण बागेत ठिबक सिंचन केले. कलमांची वाढ सुरू झाली तसा साडेचार फूट उंचीवर शेंडा खुडला, परिणामी झाड उंचीला न वाढता ते पसरत गेले. मुख्य खतांसोबत सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापरही ठिबकद्वारे महिन्यातून चार वेळा केला. कीडनाशकांची फवारणी दर पंधरवड्याला गरजेनुसार केली. पुढील वर्षी (2009)च्या जुलैमध्ये पॅक्‍लोब्युट्राझोल वाढनियंत्रकाचा वापर केला. याच हंगामात प्रत्येक झाडामागे ............दोन ते पाच फळांचे उत्पादन मिळाले. वर्षभराच्या नियोजनबद्ध देखभालीची ही मधुर फळे होती. सन 2010च्या जुलैमध्येही असेच नियोजन केले. सन 2011 मध्ये बाग चांगलीच बहरली. प्रत्येक झाडाला 15 ते 20 फळे लागली. यंदाचा 2012 चा हंगाम मात्र हमखास उत्पन्नाचा ठरला.

असा मिळाला दर या वर्षी एकूण बागेतून प्रति दोन किलोच्या दीड हजार पेट्या निघाल्या. प्रति किलो 125 रुपये दर मिळाला. त्याद्वारे तीन लाख 75 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. प्रतवारीनुसार कमी आकाराच्या आंब्याच्या दोन किलोच्या एक हजार पेट्या निघाल्या. त्यांना प्रति किलो 98 रुपये दर मिळाला. त्यातून एक लाख 96 हजारांचे उत्पन्न मिळाले. तिसऱ्या प्रतीच्या आंब्याच्या दोन किलोच्या दीड हजार पेट्या निघाल्या, त्यांना 60 रुपये प्रति किलो दर मिळाला व त्यातून एक लाख 80 हजार रुपये मिळाले. कलम काडीचीही विक्री केली. हंगामात एकूण आठ लाख एक हजार रुपयांचे घसघशीत उत्पन्न हाती पडले. वर्षभरात मशागत, कीडनाशके व अन्य देखभालीसाठी सुमारे एक लाख 35 हजार रुपये खर्च झाले. निव्वळ नफा सहा लाख 66 हजार रुपये हाती पडला. वडिलांनी लावलेल्या जुन्या बागेनेही यंदा सहा टन आंबे दिले, त्यातून तीन लाख रुपये मिळाले.

दुबईला निर्यात
नाईक यांनी आंब्यासाठी स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून न राहता दुबईलाही पहिल्यांदाच निर्यात साधली. मिरजेतील प्रमुख फळ निर्यातदार चॉंद फ्रूट कंपनीने विविध प्रतवारीनुसार हा माल निर्यात केला. त्यासाठी सरासरी 350 ग्रॅम वजनाची फळे निवडली.

लवकर उतरण, लवकर छाटण्या
हंगाम तेजीत येण्यापूर्वीच उतरण आणि हंगाम संपण्यापूर्वीच छाटण्या हे सूत्र नाईक यांनी वापरले. वाढनियंत्रकाच्या वापरामुळे फळधारणा लवकर होत गेली. परिणामी हे सूत्र विस्कळित झाले नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उतरण पूर्ण झाली. सुरवातीला काही अंतर राखून लावण केलेल्या कलमांचा विस्तार झाल्यानंतर मात्र बाग गच्च भरून गेली. परिणामी वादळाचा आणि त्यामुळे मोहोर व फळगळतीचा विशेष त्रास झाला नाही. कलमे लहान असताना त्यात काकडीचे आंतरपीकही घेतले. मशागतीचा किरकोळ खर्च काकडीच्या नगदी पैशांतून भागवला.

आम का आम, काडीचेही पैसे प्रवीण यांचे यश पाहून परिसरातील सलगरे, बेळंकी, खटाव, आरग येथील पंधरा ते वीस शेतकऱ्यांनीही आंबा लागवड सुरू केली आहे. नाईक यांनी छाटण्या सुरू करताच काडी नेण्यासाठी त्यांनी गर्दी केली. पंधरा रुपयांना एक याप्रमाणे त्यांची विक्री करून पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. मिरज तालुक्‍याचा पट्टा द्राक्षबाग, ऊस आणि पानमळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या हंगामात तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी द्राक्ष व बेदाण्यातून सुमारे 321 कोटी रुपये मिळवले; मात्र पाणीटंचाई, लहरी हवामान आणि बेदाण्याचे दर पडण्याचे संकट यामुळे द्राक्षशेती धोक्‍याची ठरत आहे. या शेतकऱ्यांना केसराचे सोनेरी उत्पन्न मोहवते आहे.

कृषी खात्याचे साहाय्य
तालुक्‍यात आंब्याची व्यावसायिक लागवड अत्यल्प आहे, त्यामुळे नाईक यांच्या या वेगळ्या प्रयोगाला कृषी खात्यानेही चांगलाच हात दिला. 30 बाय 30 बाय 3 मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांचे, तर ठिबक सिंचनासाठी 25 हजार रुपयांचे अनुदान दिले. मंडल कृषी अधिकारी रमाकांत भजनावळे, कृषी सहायक राजेश बुरुटे, राजगौंडा पाटील यांनी नाईक यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. सांगलीतील धान्य महोत्सवातही त्यांनी स्थानिक आंब्याची विक्री केली. जिल्हाधिकारी श्‍याम वर्धने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांनीही स्टॉलला भेट देऊन या प्रयोगाची दखल घेतली.

संपर्क - प्रवीण नाईक - 9689891798
रमाकांत भजनावळे (मंडल कृषी अधिकारी) - 9403963611

Thursday, 23 August 2012

खेड्यात वसलेले ध्येयवेडे !'खेड्याकडे चला' अशी हाक महात्मा गांधींनी एकेकाळी दिली होती. ही हाक देशाला उद्देशून असली तरी ती सगळ्यांपर्यंत पोचलीच, असे नाही. आज गांधीजींना जाऊन साठहून अधिक वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, मनात जगावेगळे वेड घेऊन वेगळ्या वाटेने जाऊ इच्छिणाऱ्या काही तरुणांच्या कानी ही हाक आजही पडते आणि झपाटून जाऊन ते शहरातील सुखासीन, सुविधापूर्ण आयुष्य सोडून खेड्याकडे कूच करतात. तेथे राबून पंचक्रोशीच्या कायापालटाची आस बाळगतात...गांधीजींच्या या हाकेला ओ देऊन खेड्यात जाऊन वसलेल्या अशाच काही ध्येयवेड्यांची ही यशोगाथा.
कार्डिफमधून एरंडोलकडे...स तराशे लोकसंख्या असलेले गाव...कुटुंबांची गुजराण शेतीवर, गावात अस्वच्छता, यामुळे नित्याची रोगराई, गावात शासकीय, खासगी वैद्यकीय सेवा नाही, वैद्यकीय उपचारासाठी पाचोरा, एरंडोल नाही; तर जळगावला जाणे... वेळेवर उपचार न मिळाल्याने आप्तस्वकीयांसह अनेकांचे डोळ्यासमोर बघितलेले मृत्यू... अशी स्थिती... ती सुधारण्यासाठी ध्येयवेडा तरुण...प्राथमिक शिक्षण गावात झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी येतो. पुढील शिक्षण पुण्यात घेतो. यात समाजवादी विचारसणीचा त्याच्यावर प्रभाव पडतो अन्‌ डोळ्यासमोर आदर्श उभे राहतात. तो आंतरजातीय विवाह करतो. पुढे परदेशयोग येतो. परदेशात भरपूर पैसा कमावून तो परततो...येतो पुन्हा आपल्या ग्रामीण भागात आणि सुरू करतो आरोग्यसेवा... ही कहाणी आहे दहिगाव (ता. पाचोरा) येथील रहिवासी व एरंडोल (जि. जळगाव) येथील आरोग्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक पस्तीसवर्षीय डॉ. संग्राम पाटील यांची...
दहिगाव हे 1700 लोकसंख्या असलेले गाव. या गावात अस्वच्छता, कुठलीही शासनाची योजना नाही. हे चित्र बदलायला हवं, असं संग्रामला राहून राहून वाटत असतं. वडील गोकुळसिंग एकच सांगतात, "बेटा, तू डॉक्‍टर हो. म्हणजे तू हे चित्र निश्‍चितपणे बदलू शकशील.' संग्राम डॉक्‍टर होतो. प्राथमिक शिक्षण गावात घेऊन एरंडोल येथे माध्यमिक शिक्षणासाठी "रा. ति. काबरे विद्यालया'त प्रवेश घेतो. या ठिकाणी त्याच्या विचारांना पाठबळ मिळते ते ताडे (ता. एरंडोल) येथील राजेश पाटील (सध्या ओरिसात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत) या तरुणाचे. पुढे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ध्येय डोळ्यासमोर असल्याने इंटर्नशिप केली ती मेळघाटातील चिखलदऱ्यात. यात गडचिरोलीला डॉ. अभय बंग यांच्याशी भेट झाली. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण घेत असताना नूपुर या तरुणीशी मैत्री झाली. अनेक अडथळ्यांनंतर विवाह झाला. आर्थिक पाठबळ नसल्याने वैद्यकीय सेवा कशी सुरू करावी, या विचारात असताना ब्रिटनला जाण्याची संधी 2003 मध्ये मिळाली. 2004 ते 2010 अशी सहा वर्षे तिथे नोकरी केली. इमर्जन्सी व जनरल फिजिशियन इंटेन्सिव्ह, ऍनास्थेटिस्ट म्हणून लौकिक मिळविला. मायदेशाची ओढ लागली. मलेरिया, कुपोषण, बालमृत्यू, शेतकरी आत्महत्या यावर काम करावे, असे वाटू लागले. मग डॉ. संग्राम व डॉ. नूपुर कनिष्क व वसिष्क या मुलांसोबत एप्रिल 2009 मध्ये एरंडोलला आले. लग्नानंतर दुरावलेले कुटुंब पुन्हा जवळ आले. संग्रामच्या विचारांना साथ मिळाली, ती लहान भाऊ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. राहुल व वहिनी डॉ. स्नेहल पाटील यांची. या भावंडांनी एरंडोल येथे आरोग्य मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले. गेल्या दीड वर्षात या भावंडांनी तब्बल 90 णांचे प्राण वाचविले. ही वाटचाल करीत असताना आरोग्य, स्त्रीभ्रुणहत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आदी विषयांवर ते जनजागृती करतात.
- प्रशांत कोतकर, जळगाव

आदिवासींची रौप्यमहोत्सवी सेवा!
ए मबीबीएस, एमडी डॉक्‍टर म्हटलं की, साधारणतः एखादा प्रशस्त अत्याधुनिक दवाखाना, 24 तास सेवा देणारं हायटेक क्रिटिकल युनिट, इंजेक्‍शनपासून व्हेंटिलेटरपर्यंतच्या सर्व वैद्यकीय सोई-सुविधांनी सज्ज असा दवाखाना, रुग्णांची ये-जा आणि डॉक्‍टर-परिचारिकांचा सातत्यानं वावर असंच चित्र कुणाच्याही डोळ्यांपुढं उभं राहील; पण मेळघाटातल्या बैरागड इथं एका एमबीबीएस, एमडी डॉक्‍टरकडे दवाखाना आहे, 24 तास सेवा आहे, वैद्यकीय उपचारही आहे. मात्र, या सर्व वैद्यकीय सुविधा देण्याकरिता त्याच्याकडे आहे ती केवळ एक झोपडी! एका लहानशा झोपडीतच वैद्यकीय सेवा-सुविधा पुरविल्या जातात. डॉ. रवींद्र कोल्हे असं या ध्येयवेड्या डॉक्‍टरचं नाव. 1982 मध्ये वैद्यकीय शाखेतून डिग्री मिळविल्यानंतर नागपुरातील डांबरी रस्त्यावरून कोल्हे यांचे पाय वळले ते थेट मेळघाटातल्या एका लहानशा आदिवासी गावाकडे. वैद्यकीय शाखेतून एमडीसारखी पदव्युत्तर पदवी मिळविणाऱ्या एखाद्या डॉक्‍टरनं शहरातच दवाखाना थाटून पैसे कमावले असते. वयाच्या 22 व्या वर्षी कोण मेळघाटातल्या दुर्गम गावात जाऊन आदिवासींची सेवा करणार? छे! असले उपदेश दुसऱ्यांना सांगण्याकरिता किंवा वाचण्यापुरतेच ठीक आहे. प्रत्यक्षात मात्र कोण हे विचार अमलात आणणार? पण डॉ. कोल्हे यांनी हे सर्व केले. मेळघाटातल्या धारणीपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या बैरागड या आदिवासी गावात एका झोपडीत डॉ. कोल्हे यांनी दवाखाना सुरू केला. सुरवातीला 1985 ला त्यांना आदिवासी गावांचा विरोध झाला; पण त्यांनी सर्व संकटांवर मात केली व दुर्गम गावातील आदिवासींना वैद्यकीय सुविधा पुरविल्या. एवढेच नव्हे तर, रात्री-अपरात्री आदिवासींच्या मदतीला ते धावून गेले. कालांतरानं लग्न झाल्यानंतर पत्नी स्मिता कोल्हे यांनीही मेळघाटात पतीच्या खांद्याला खांदा लावून वैद्यकीय समाजसेवा सुरू केली. स्मिता यांनी विधी शाखेची पदवी घेतल्यानंतर डीएचएमएस ही वैद्यकीय शाखेतील पदवी मिळविली आणि त्यांनीही आदिवासींना वैद्यकीय सेवा देण्यास सुरवात केली. गेली 26 वर्षे कोल्हे दांपत्य मेळघाटातल्या आदिवासींची सेवा करत आहे. कोल्हे यांनी आपले कार्यक्षेत्र केवळ वैद्यकीय सेवेपुरतेच मर्यादित ठेवले नाही, तर मेळघाटातल्या आदिवासींना स्वस्त दरातील सरकारी धान्य मिळत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी सरकारी स्वस्त धान्याचं दुकानही तिथं सुरू केलं आणि डॉक्‍टरीबरोबरच आदिवासींना चांगल्या दर्जाचं धान्य कसं मिळेल, यात त्यांनी लक्ष घातलं. ज्या मेळघाटात आजही सरकारी रुग्णालयांमध्ये नोकरीकरिता एकही एमबीबीएस डॉक्‍टर जायला तयार होत नाही, त्या मेळघाटातल्या दुर्गम गावात 26 वर्षांपूर्वी डॉ. कोल्हे यांच्या लावलेल्या समाजसेवेच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. या समाजसेवेची प्रचीती बैरागडला जाऊन घ्यायलाच हवी.
- संजय पाखोडे, अमरावती

खरेखुरे "निसर्गगामी' कुटुंब!ध नंजय वैद्य या आर्किटेक्‍ट तरुणाची गोष्टच वेगळी. दुर्गाबाई भागवत यांचं "ऋतुचक्र' त्यानं वाचलं निहा एकेक ऋतू अनुभवायलाच हवा आणि तोही निसर्गाच्या अगदी निकट जाऊन, असं त्याच्या मनानं घेतलं. त्यासाठी त्यानं काय करावं? तो चक्क जंगलात जाऊन राहिला, कुटी बांधून! त्याची बायको पल्लवी, तीही "शहाणी'च! काही कारणांनी तीन ऋतूंचं "प्रॉमिस' एका ऋतूवर भागवावं लागलं; पण तेवढ्याही काळात ही आर्किटेक्‍चर कॉलेजची "स्टुडियस क्वीन' छानपैकी "गॉंव की गोरी' होऊन राहिली; पण जंगलात हुंदडायचं म्हणजे काही नुसतं निसर्गपर्यटन का? नाही! शेतकरी, वनवासी, आदिवासी यांच्या जीवनशैलीचा अभ्यास आणि त्यांच्या जीवनमानात-निसर्गाची नि त्यांची ताटातूट होऊ न देताही- काही बदल घडवून आणता येईल, हा त्याचा ध्यास.
आत्ताही गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ धनंजय हा प्रकाश आमटे यांच्या हेमलकशात काम करत होता, भामरागड, गडचिरोलीतल्या त्यांच्या आदिवासी प्रकल्पावर. धनंजयचा जन्म रत्नागिरीचा असला तरी आई-बाबांच्या नोकरीनिमित्त तो कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्‍याच्या ठिकाणी राहिला. वाढला. शिकला. पुढे कोल्हापूरच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चरमध्ये त्याने प्रवेश घेतला खरा; पण आजूबाजूला जे काही चाललंय, त्यानं त्याचं मन अस्वस्थ होत होतं. जे बोललं जातंय तसं केलं जात नाही आणि जे केलं जातंय त्यातून वेगळेच प्रॉब्लेम्स निर्माण होताहेत, हे जाणवत होतं. एक साधीशी गोष्ट. भारतात इतकी आर्किटेक्‍चरल कॉलेजे आहेत आणि इतके विद्यार्थी. दरवर्षी प्रत्येक बॅचला डिझायनिंगसाठी काही प्रोजेक्‍ट्‌स दिले जातात. आजवर कोणत्याही कॉलेजने "शेतकऱ्याच्या घराचं डिझाईन करा' असा प्रोजेक्‍ट आपल्या विद्यार्थ्यांना दिला नाही. धनंजयला या गोष्टीनं अस्वस्थ केलं. त्यानं सरांशी भांडून हा विषय घेतला आणि एका नवख्या प्रोजेक्‍टला पहिल्याच प्रयत्नात सुंदर पर्यायही मिळाला.परिस्थितीला "पर्याय देणं' हे धनंजय महत्त्वाचं मानतो आणि हा पर्याय "निसर्गाकडे जाणारा' हवा, यासाठी आग्रही प्रयत्नशील राहतो.
मध्यंतरी कुडाळच्या "भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान'चे डॉ. देवधर यांच्याबरोबर तो "निर्धूर ग्राम' प्रकल्पावर काम करत होता. दरवर्षी अडीचशे ते तीनशे गोबरगॅस बांधण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. खरं तर गोबरगॅस ही काही निसर्गाच्या दृष्टीने परिपूर्ण व्यवस्था नाही, हे धनंजयचं अभ्यासाअंती बनलेलं मत. गोबरगॅस प्रणाली तर आपण मोडीत काढू शकत नाही, पण मग या प्रणालीतलं निसर्गावरचं बर्डन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कमी करू शकेल, असं आपण आणखी काय करू शकू, यादृष्टीनं त्याने अभ्यास सुरू केला. त्याच्या प्रयत्नांचा "फोकस' अखेर स्टीलवर खिळून राहिला. गोबरगॅसच्या बांधकामात डोमसाठी साधारणपणे 35 किलो लोखंडी सळई वापरावी लागते. ही सळई कमी केली तर?... धनंजयच्या तळमळीच्या प्रयत्नांना यश आलं आणि आता 35 किलोऐवजी केवळ सव्वा ते दीड किलो सळीमध्ये गोबगरगॅस डोम उभारणीचा प्रयोग यशस्वी झाला. वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळे "निसर्गगामी' पर्याय शोधू पाहणाऱ्या धनंजयच्या आजवरच्या वाटचालीतला हा सर्वात यशस्वी प्रयोग! निसर्गाला अनुसरून, म्हणूनच, "निसर्गगामी' असे "पर्याय' शोधू पाहणारी म्हणून "निसर्गगामी पर्याय' या नावाची संस्थाच त्यानं स्थापन केलीय. कोणत्याही समस्येवर "निसर्गगामी पर्याय' हा जो त्याच्या चळवळीमागचा हेतू आहे, तो साध्य करण्यासाठी मात्र तो वेगवेगळ्या "प्लॅटफॉर्म्स'वर कधी एकटा, बरेचदा बायकोसह, तर कधी इतरांबरोबरही प्रयत्नशील असतो. बांधकाम हा तर त्याचा पेशाच; पण ते करताना त्याला गुरुस्थानी असणाऱ्या लॅरी बेकर यांचा आदर्श आणि त्यांच्या शिकवणीचं विस्मरण तो होऊ देत नाही.
गांधीजींनी खेड्यांना स्वयंपूर्णता कशी येईल यावर बराच विचार केला होता; पण आज तो विचार आपण बराच मागे टाकला आहे. धनंजय जीवनशैलीच्या अंगाने स्वतःच्याच कुटुंबांवर स्वयंपूर्णतेचे प्रयोग करून पाहतो आहे. आधुनिक जीवनशैलीत चुलीला स्थान उरलं नसलं तरी "थर्मोडायनॅमिक्‍स' म्हणजे ऊर्जाशास्त्रानुसार गॅसपेक्षा चूल, सेंद्रिय शेती, आरोग्यासाठी निसर्गाचं सान्निध्य, औषधोपचारात आजीबाईंचा बटवा अशा सगळ्या गोष्टी किती उपयुक्त आहेत, तो प्रयोगाअंती सिद्ध करून दाखवतो आहे.
केवळ लॅपटॉप, मोबाईल आणि "सीएफएल'चे दोन बल्ब इतकाच दैनंदिन विजेचा वापर करणाऱ्या धनंजयच्या घराचं घरमालकांसह संयुक्त वीजबील येतं तीन महिन्याला अवघे 200 रुपये! शिवाय खाणं-पिणं, कपडे, अभ्यास-पुस्तकं यांसह या चार माणसांच्या कुटुंबांचं महिना 5 हजार रुपयांतही अगदी छान भागतं. आर्किटेक्‍चर कॉलेजमधली त्याची क्‍लासमेट असणारी मूळची नाशिकची पल्लवी गेली सोळा वर्षे या "फिरस्त्या'चा संसार लीलया पेलते नि फुलवते आहे, अगदी समरसून आणि त्याच्या कामात आनंदाने सहभागी होऊन. कारण धनंजयइतकीच तीही निसर्ग आणि माणसांविषयी विलक्षण संवेदनशील आहे. 12 वर्षांचा मनजित आणि 6 वर्षांचा सारंग... अशा या कुटुंबातल्या कोणाचीच या "लाईफस्टाईल'बद्दल तक्रार नाही. हे अख्खं कुटुंबच निसर्गात रमलंय!
- सुरेखा पवार, कोल्हापूर

फुलशेतीतून साधला गावाचा विकास
हरातील नोकरी सोडून वडिलोपार्जित जमिनीत फुलशेती करण्याची वेगळी वाट सुगाव (ता. चाकूर, जि.लातूर) येथील गोपाळ तुकाराम मेखले या तरुणाने चोखाळली आहे. एका एकरातील आधुनिक पद्धतीच्या फुलशेतीतून रोज नऊ हजार रुपये उत्पन्न त्याला मिळते.
सुगाव या छोट्याशा गावातील गोपाळ लहानपणापासून शिक्षणासाठी बाहेरगावी होता. पुण्यात राहून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पदवी मिळवून तो खासगी कंपनीत नोकरी करीत होता. तेथे त्याला दरमहा 40 हजार रुपये पगार होता; परंतु शहरी संस्कृतीत रमायचे नसल्याने तो गावाकडे परतला. स्वतःचा व गावातील तरुण शेतकऱ्यांचा विकास साधण्याचाही हेतू यामागे होता.
गोपाळ एकुलता एक असल्याने घरची वडिलोपार्जित 35 एकर जमीन त्याला सांभाळायची होती. पहिल्या वर्षी शेतीत लक्ष देऊन चार लाख रुपयांचे उत्पन्न त्याने घेतले. दुसऱ्या वर्षी त्यात वाढ होऊन दहा लाखांचे उत्पन्न त्याला मिळाले.
फुलांची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याने फुलशेतीच करण्याचा निर्णय घेतला. इतर ठिकाणी असलेल्या फुलशेतीची पाहणी त्यासाठी त्याने केली. तळेगाव दाभाडे येथील हॉर्टिकल्चर सेंटरमध्ये त्याने आठवड्याचे प्रशिक्षण घेतले. स्वतःजवळील पैसे व बॅंकेच्या सहकार्याने पॉली हाऊस तयार केले. पुणे येथील "कुमार फ्लॉवरिंग' या कंपनीकडून खरेदी केलेल्या जर्बेराच्या 28 हजार रोपांची लागवड त्याने केली. या रोपांना एका दिवसाआड खत व फवारणी आवश्‍यक आहे. गोपाळ रोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत ही कामे करतो. लागवडीनंतर 90 दिवसांत या फुलापासून उत्पन्न सुरू झाले असून, यात लाल, पिवळा, नारंगी, पांढरा अशी 16 रंगांची फुले आहेत. 26 हजार रोपट्यांतून रोज तीन हजार फुलांचे उत्पादन सध्या होत आहे. हैदराबाद, दिल्ली बाजारपेठेत ही फुले पाठविली जातात. एका फुलाला तीन रुपये किंमत मिळते. बाहेरदेशांत निर्यात होण्यासारखी ही फुले आहेत; परंतु निर्यातीसाठी तीन हजारांपेक्षा जास्त फुलांची आवश्‍यकता असल्यामुळे अडचण येत आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉली हाऊस उभारून फुलशेती करण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. शेतकऱ्यांना वर्षातून खरीप व रब्बी या दोनच हंगामातून उत्पन्न मिळते; मात्र फुलशेतीतून दररोज तीन वर्षे उत्पन्न घेता येते. यासाठी पाणीही कमी लागते. अनेक अडचणींवर मात करीत गोपाळने शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे बैलगाडीने फुले गावापर्यंत आणून पुढे टेम्पोने ती बाजारपेठेपर्यंत पोचवली. गोपाळची फुलशेती तरुणांनी दिशा देणारी असून, यातून 20 जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गोपाळने गावातील 13 शेतकऱ्यांचा गट करून दोन लाखांचे भांडवल जमा केले आहे. त्यातून प्रत्येक शेतकऱ्याला मदतही करण्यात येते.
"तरुणांनी फुलशेतीकडे वळावे', असे आवाहन गोपाळ आवर्जून करतो.
- प्रशांत शेटे, चाकूर

'नेक्‍स्ट जनरेशन'साठी...स माजातील गोरगरीब आणि होतकरू मुलांना शिक्षणाचा आधार देत त्यांच्यामध्ये राष्ट्रसेवा हीच ईश्‍वरसेवा हे तत्त्व रुजवावे या हेतूने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्‍यात असलेल्या देवरुखसारख्या गावात सामाजिक कार्यकर्ते सदानंद भागवत यांनी 20 वर्षांपूर्वी "नेक्‍स्ट जनरेशन फाउंडेशन' नावाने संस्था सुरू केली. अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून आपल्या गावी येत शिक्षणाचे काम करण्याचा ध्यास घेतलेल्या भागवत यांनी या संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब मुलांचे भवितव्य घडविले आहे. देवरुखसारख्या गावात असे अवघड कार्य करताना त्यांना मिळालेली समाजाची साथही मोलाची ठरली आहे. भागवत हे सध्या देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांच्याच प्रेरणेने देवरुखमध्ये (कै.) अरुंधती पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलचीही उभारणी झाली असून या शाळेत आज 200 विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेत आहेत.
"राष्ट्र सर्वप्रथम' हा मंत्र भावी पिढीवर; विशेषतः लहान मुलांवर संस्कारांच्या माध्यमातून बिंबवून भ्रष्टाचारमुक्‍त पिढी घडविण्यासाठी भागवत हे प्रयत्न करीत आहेत. याच फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील 25 मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. या मुलांच्या उच्च शिक्षणासह संपूर्ण खर्चाचा भार या संस्थेकडून उचलला जाणार आहे. त्यातून घडणाऱ्या भावी पिढीने भ्रष्टाचारमुक्‍त सेवा करावी आणि भ्रष्टाचाराला विरोध करावा, या माफक भावनेतूनच हे कार्य सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रसेवा हीच ईश्‍वरसेवा या तत्त्वाने या फाउंडेशनच्या माध्यमातून आपद्‌ग्रस्तांच्या मदतीसाठी भागवत प्रयत्नशील आहेत. अनाथ मुलांचे भवितव्य घडविण्याचे कार्य करणाऱ्या संस्थांनाही भागवत नेहमीच मदतीचा हात देतात. खेड्यापाड्यातील प्राथमिक शाळांमधील मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे आणि त्यांना स्वच्छतागृहांची सोय मिळावी यासाठी भागवत यांनी गावोगावचे ग्रामस्थ, निवृत्त शिक्षक, पालकवर्ग आणि जिल्हा परिषद यांना एकत्र आणून 25 ठिकाणी चांगली स्वच्छतागृहे आणि पाण्याची सोय निर्माण केली आहे. दातांपासून संपूर्ण शरीराच्या सुदृढ आरोग्यासाठी भागवत यांनी खास परदेशस्थ तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक मेडिकल क्‍लबच्या सहकार्याने मुलांसाठी विशेष शिबिरे यशस्वी केली आहेत. भागवत यांनी मदतीचा हात दिलेले सुमारे 40 तरुण आज उच्चविद्याविभूषित असून ते मोठ्या पगाराच्या नोकरीवर देशात तर काहीजण अमेरिकेत कार्यरत आहेत.
- संदेश सप्रे, देवरुख

झगमगत्या दुनियेतून गावाच्या मातीत...
क रिअरसाठी गाव सोडून थेट मुंबई गाठलेल्या संतोष जोशी यांनी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांच्या झगमगत्या दुनियेत काही वर्षे घालविली. तेथे स्थिरस्थावर होत असतानाच गावकडच्या ओढीने ते पुन्हा परत फिरले व त्यांनी अथक परिश्रमातून गावाचा कायापालट केला. ग्रामविकासाच्या ध्यासाने झपाटलेल्या जोशी यांनी उपसरपंचपद, सरपंचपद भूषवीत लोकसहभागातून गोळेगावला (ता. खुलताबाद) आकार देण्याची किमया साधली आहे. औरंगाबाद व पुणे येथे वाणिज्य शाखेत पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर 1990 ला चार्टर्ड अकाउंटंटची प्रॅक्‍टिस व पुढील शिक्षणासाठी जोशी मुंबईला गेले होते; मात्र तेथे आकडेमोडीत त्यांचे मन रमले नाही. त्यांच्यातील कलावंताने त्यांना चित्रपट व मालिकांच्या जगात आणून सोडले.
सह्याद्री वाहिनीचा "साथसंगत' मालिकेसाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कारही त्यांना मिळाला. त्यांनी दिग्दर्शित केलेली "दिसतं तसं नसतं' ही मालिका दर गुरुवारी व शुक्रवारी सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होत आहे. 1990 मध्ये गोळेगावातील 15 सुशिक्षित बेरोजगारांना ते मुंबईत घेऊन गेले. भाड्याने घेतलेल्या दहा बाय दहाच्या खोलीत त्यांना राहण्यास जागा दिली. प्रत्येकाला काम मिळवून दिले. नंतर मुंबई सोडून ते गावाकडे आले. कोणतेही पद नसताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा ध्यास त्यांनी घेतला. ग्रामस्थांना एकत्र आणून श्रमदानातून, लोकवर्गणीतून पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रस्ताव मांडला. शासनाची कोणतीही मदत न घेता 2001 मध्ये लोकसहभागातून नवीन विहीर खोदली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला. 2005 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी जोशी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला बहुमतात निवडून दिले. सरपंचपदी निवड झाल्यानंतर गावात संत गाडगेबाबा स्वच्छता मोहीम, पाणंदमुक्तीची चळवळ सुरू केली. अनेकांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागेची व आर्थिक अडचण आली. जोशी यांनी ग्रामपंचायतीमार्फत जागेबाबत; तसेच आर्थिक तडजोड करून शासनाचे गवंडी आणून घरोघरी स्वच्छतागृहे बांधून घेतली. स्वतः झाडू घेऊन तरुणांकडून गावस्वच्छतेचा उपक्रम राबविला. नाट्यमंडळाचीही स्थापना केली. जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन इमारत बांधून घेतली. बचतगटांना बळकटी येण्यासाठी नाबार्ड व बॅंकांचे मेळावे घेतले. गावाला 2007 मध्ये निर्मलग्राम, ग्रामस्वच्छता अभियान, कुटुंबकल्याण कार्यक्रम व स्वच्छ-सुंदर अंगणवाडी अभियानात जिल्हा स्तरावर तृतीय पुरस्कार मिळाला. स्वच्छ-सुंदर शाळा, स्वच्छता अभियान, दलित विकास अभियानात तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहेत. ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शीपणा आणून भ्रष्टाचारमुक्त कारभार चालविला. इच्छा असेल तर अडचणींतून मार्ग काढता येतो, असे जोशी यांनी सांगितले. तालुक्‍यातील प्रत्येक गावातून तरुणांचा गट तयार करून त्या गावाचा कायापालट करण्याचा त्यांचा मानस आहे. पाच वर्षांचा सरपंचपदाचा कालावधी संपल्यानंतर जोशी 2010 च्या निवडणुकीत पुन्हा बहुमताने पॅनेलसह निवडून आले. सध्या ते उपसरपंच आहेत.
- जगन्नाथ चव्हाण, गदाना

खडकाळ जमिनीत कोट्यवधींचे डाळींब

अल्प किंमतीत विकत घेतलेल्या अत्यंत खडकाळ जमिनीत मेहनतीने व सयंमाने पेरलेल्या डाळींबाने चिखलीच्या गुप्ता परिवाराला यंदा कोट्यवधी रुपयाचे भरघोस उत्पन्न दिले आहे. या डाळिंबांची आखात आणि बांगलादेशात निर्यात होत आहेत. सतिश व जोत्स्ना गुप्ता परिवाराने डाळींब शेतीत हे जे यश प्राप्त केले आहे. ते विदर्भाच्या आत्महत्या ग्रस्त भागासाठी यशाची एक नवी दिशाच ठरावी असे आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावातील ज्योत्स्ना गुप्ता आणि  त्यांचे पती सतिश गुप्ता यांनी ही किमया करून दाखवली आहे. सतिश गुप्ता चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष आहे. ज्योत्सनाताईंना शेतीची आवड होतीच पण फार माहिती नव्हती. सासरी त्यांना शेती कळायला लागली. सासरेबुवांमुळं शेतीतले बारकावे समजले. पती बँकेच्या कामात व्यस्त होते. मग त्यांनी स्वत: शेतीत उतरायचं ठरवलं.
dalimb
dalimb
पती सतिश गुप्तांनी त्यांना २००० साली चिखली जवळ साडेसतरा एकर शेती घेऊन दिली.  जमीन खडकाळ होती. त्यात काही वर्ष त्यांनी इतर पिकं घेतली, पण त्यात फार यश आलं नाही. शेवटी डाळिंब लावायचा निर्णय झाला. २००७ साली त्यांनी १२ एकरात भगवा जातीची डाळींब लागवड केली. घरच्या सधन असल्यानं यासाठी लागणारं सर्व भांडवल ज्योत्स्नाताईंना त्यांच्या पतीनं दिलं. ज्योत्सना गुप्ता यांनी दोन बाय दोनच्या खड्ड्यात डाळींबाची लागवड केली. त्याआधी प्रत्येक रोपाला १० किलो कोंबडीखत, ५० किलो शेणखत आणि निंबोळी भुकटी, ५०० ग्रॅम डीएपी, १०० ग्रॅम सुपर फॉस्फेट , १०० ग्रॅम 4-8 आणि १०० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट टाकलं. त्यानंतर आठ बाय १२ फूट अंतरावर रोपांची लागवड केली. दोन वर्षांनी त्यांनी पहिली छाटणी केली. सेंद्रीय खतांवर जास्त भर दिला. लागवडीनंतर २६ महिन्यांनी उत्पादनाला सुरुवात झाली. झाडं मजबूत  व्हावीत म्हणून पहिल्या वर्षी त्यांनी फारसं उत्पादन घेतलं नाही. प्रति झाड २० ते २५ किलो फळं घेतली. सुरुवातीला व्यवस्थापनासाठी ज्योत्सना ताईंना अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करत त्यांनी बाग जगवली.
एकरी ४०० झाडं याप्रमाणे १२ एकरात चार हजार ८०० झाडं आहेत. य़ोग्य खत आणि फवारणीच्या नियोजनामुळे  प्रत्येक फळ ५०० ग्रॅम पेक्षा जास्त वजनाचं आहे. सध्या प्रत्येक झाडाला साठ किलोंपर्यंत फळं लागलेय. दर्जा चांगला असल्यामुळे ज्योत्सना गुप्तांना डाळिंब निर्यात करणं शक्य झालं. यंदा पहिल्यांदाच त्या आपल्या बागेतली डाळिंब निर्यात करत आहे, लागवडीनंतर हेच त्यांचं खरं उत्पादन आहे. आखाती देश आणि बांगलादेशात त्यांच्या डाळिंबाला मागणी आहे. व्यापाऱ्यांना त्यांनी
प्रति किलो ६० रुपये दरानी फळं विकलीय. त्यानंतर व्यापारी डाळिंबाची निर्यात करणार आहे. प्रति झाड ३६०० रुपये त्यांना उत्पन्न मिळणार आहे. म्हणजेच १२ एकरातून त्यांना साधारण एक कोटी ७२ लाख रुपये उत्पन्न मिळणार आहेत. प्रति झाड व्यवस्थापनासाठी त्यांना ८०० रुपये असा ३८ लाख रुपये उत्पादन खर्च आला. हा खर्च वजा करता यंदा त्यांना एक कोटी ३५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळणार आहे.
ठिबक, खतं आणि पाणी व्यवस्थापन, वातावरणातील बदलानुसार फवारणीचं नियोजन ज्योत्स्नाताईं करतात. त्यांना कीड-रोगांबद्दल माहीती नसल्यास त्या तज्ञांचा सल्ला घेतात. याच प्रकारे त्यांनी आपली बाग जपलीय. आणि विदर्भाच्या खडकाळ जमिनीत एकरी ११ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न घेऊन दाखवलं. महिलांना व्यवस्थापन चांगलं जमते.
ज्योत्स्नाताईही आपलं व्यवस्थापन कौशल्य शेतीत वापरलं. म्हणूनच त्यांनी आपल्या घरच्या नियोजनासोबतच शेतीचंही चांगलं नियोजन केलं आणि इतर महिलांसमोर एक आदर्श निर्माण करुन दिला.

मिरची बुरशी

मिरचीरोगाचे/किडीचे नाव : 
अँन्थ्रोक्नोज

रोगाचे कारण : 
बुरशी

कारणीभूत घटक : 
1) तुडतुड्यांचे व्यवस्थापन एकात्मीक पध्दधतीने करावे.
2) धसकटे व काड्या मुळापासून उपटून जाळून नष्ट करावेत.
3) रोपवाटीकेत बि टाकल्यानंतर 15 दिवसांनी 10 टक्के फोरेट किंवा 3 टक्के कार्बोक्युरॉन दोन ओळीमध्ये टाकून मातीने झाकून पाणी द्यावे. 

प्रतिबंधात्मक उपाय : 
1)शिफारशीप्रमाणे लागवड अंतर ठेवणे.
2)गरजेप्रमाणे नेमके पाणी देणे. शिफारशीप्रमाणे खते द्यावीत.
3)इतर झाडांची पिकावर सावली येऊ देऊ नये.
4)रोगट पाने, फळे वेळीच काढून टाकावीत. 

नियंत्रणात्मक उपाय : 
१)फवारणीसाठी ब्ल्यु कॉपर 25 ग्रॅम किंवा बावीस्टीन 10 ग्रॅम किंवा डायथेन एम 45 हे 25 ग्रॅम किंवा एन्ट्राकॉल 20 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम डायथेन झेड प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावे.
२)फवारणी द्रावणात 5 मिली सेवर प्रती 10 लिटर पाणी प्रमाणे मिसळून फवारावे.
३)फवारणी बारीक तुषारांच्या साह्याने करावी. 

रोगाचे/किडीचे नाव : 
अँन्थ्रोक्नोज

रोगाचे कारण : 
बुरशी

कारणीभूत घटक : 
1) तुडतुड्यांचे व्यवस्थापन एकात्मीक पध्दधतीने करावे.
2) धसकटे व काड्या मुळापासून उपटून जाळून नष्ट करावेत.
3) रोपवाटीकेत बि टाकल्यानंतर 15 दिवसांनी 10 टक्के फोरेट किंवा 3 टक्के कार्बोक्युरॉन दोन ओळीमध्ये टाकून मातीने झाकून पाणी द्यावे. 

प्रतिबंधात्मक उपाय : 
1)शिफारशीप्रमाणे लागवड अंतर ठेवणे.
2)गरजेप्रमाणे नेमके पाणी देणे. शिफारशीप्रमाणे खते द्यावीत.
3)इतर झाडांची पिकावर सावली येऊ देऊ नये.
4)रोगट पाने, फळे वेळीच काढून टाकावीत. 

नियंत्रणात्मक उपाय : 
१)फवारणीसाठी ब्ल्यु कॉपर 25 ग्रॅम किंवा बावीस्टीन 10 ग्रॅम किंवा डायथेन एम 45 हे 25 ग्रॅम किंवा एन्ट्राकॉल 20 ग्रॅम किंवा 20 ग्रॅम डायथेन झेड प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावे.
२)फवारणी द्रावणात 5 मिली सेवर प्रती 10 लिटर पाणी प्रमाणे मिसळून फवारावे.
३)फवारणी बारीक तुषारांच्या साह्याने करावी. 

सोयाबिन :

सोयाबिन :


सोयाबिन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधान्य पिक आहे. या पिकाची खरीप 2003 च्या हंगामात सुमारे 18 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. उत्पातकतेच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य भारतात प्रथम क्रमांकावर आहे. तथापि सोयाबिन उत्पादन करणा-या अमेरीका, ब्राझील, चीन या देशांच्या तुलनेत भारताची उत्पादकता फारच कमी आहे. कमी उत्पादकतेला असणा-या अनेक कारणांपैकी या पिकावर येणा-या कीडी व रोग हेही एक प्रमुख कारण आहे. देशात घेण्यात आलेल्या प्रयोगांच्या निष्कर्षानुसार किडीमुळे सर्वाधिक 52 टक्के उत्पादनात घट होऊ शकते. रोगाचे नियंत्रण केले असता 12.5 टक्के तर किडींचे नियंत्रण केले असता 32 टक्के उत्पादनात वाढ होते असे आढळून आले आहे. यावरून किडी व रोगाच्या नियंत्रणाचे उत्पादनवाढीसाठी असणारे महत्व लक्षात येते.


किडी व रोगांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन ( Integrated Management) पध्दती विकसीत करण्यात आली आहे. या पध्दतीचा अवलंब केल्याने किड व रोग नियंत्रणाचा खर्च कमी होऊन रसायनाच्या अयोग्य वापरामुळे होणारी निसर्गाची हानीटी टाळता येते. प्रस्तुत लेखात दिलेल्या पध्दतीचा अवलंब करून शेतकरी बंधुंनी उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा.


एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाची मुलतत्वे – 
1) शेताची नांगरट - उन्हाळ्यात शेताची खोल नांगरट केल्याने जमिनीतील किडींच्या सुप्त अळ्या व कोषांचा नाश होतो. तसेच बुरशीजन्य रोगांच्या बुरशीचा नाश होतो.
2) फेरपालटीची पिके – खरीप हंगामात सोयाबीन पिकानंतर रब्बी अगर उन्हाळी हंगामात सोयाबीनचे पीक घेऊ नये. कारण तसे केले असता किडी व रोगांच्या जीवनक्रमात खंड पडत नाही व पुढील पिकावर त्यांचा प्रादुर्भाव होतो. त्या दृष्टीने सोयाबिन-ऊस, सोयाबिन-गहू असा पिकांचा क्रम योग्य ठरतो.
3) आंतरपिके घेणे – सोयाबिन पिकांत मक्याचे आंतरपिक घेतले असता पांढरी माशी, इतर कीडी व रोगांचे प्रमाण कमी होते असे आढळून आले आहे. ऊस व कपाशीमध्ये सोयाबिनचे आंतरपीक फायदेशीर असल्याचे प्रयोगाअंती आढळून आले आहे.
4) एकाच वेळी पेरणी करणे – सोयाबीनची एका शेतामध्ये तसेच आजूबाजूच्या शेतक-यांनी एकाच वेळी पेरणी करावी. म्हणजे किडी व रोगांचे नियंत्रण करणे शक्य होते. उशिरा पेरलेल्या पिकांवर किडी व रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर भागात उशिरा पेरलेल्या पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो.
5) रोग – किडग्रस्त झाडे व किडी नष्ट करणे – शेतामध्ये वेळोवेळी लक्ष देऊन रोग व किडग्रस्त झाडे काढून नष्ट करावीत. तसेच किडींच्या अंडी, अळी या अवस्था अल्पप्रमाणात आढळून आल्यास त्या गोळा करून त्यांचा राँकेल अगर कीटकनाशक मिश्रीत पाण्यात टाकून नाटनाट करावा. विशेषतः लष्करी अळी या किडीच्या अंड्यांचे पुंजके, बिहार सुरवंट या किडींच्या अळ्या यांचे या पध्दतीने नियंत्रण परिणामकारक ठरते.
6) खतांची योग्य मात्रा देणे – सोयाबिन पिकाला ते द्वीदलवर्गीय असल्याने नत्रखताची अल्प म्हणजे 20 किलो प्रती हेक्टर एवढीच आवश्यकता असते. अत्यंत सुपिक जमिनी असल्यास व भरपूर शेणखत वापरले असल्यास रासायनिक नत्र खत अत्यल्प लागते. नत्रखताची मात्रा जास्त झाल्यास पीक माजते व पाने खाणा-या अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
7) शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी जागा ( Bird Perches) करणे – किडीच्या अळ्या, पिल्ले व पुर्ण वाढ झालेले किटक हे पक्ष्यांचे नैसर्गीक खाद्य असते. शेतात ठरावीक अंतरावर अंदाजे हेक्टरी 100 ठीकाणी पक्ष्यांना बसण्यासाठी 10-15 फूट उंचीच्या जागा केल्यास किडींचे परीणामकारकरित्या नियंत्रण होते व रासायनिक कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचतो.
8) प्रकाश सापळा वापरणे – रात्रीच्या वेळी शेतात 200 वँटचा दिवा लावून त्याखाली राँकेल मिश्रीत पाण्याचे घमेले ठेवल्यास रात्रीच्या वेळी दिव्याकडे आकर्षिच होणारे कीटक मरतात. मेलेल्या किटकांमध्ये हानीकारक किटकांच्या संख्येवरून त्यांच्या प्रादूर्भावाचे भाकीत करता येते व वेळीच उपाययोजना करता येते.
9) कामगंध सापळा वापरणे – सोयाबिन पिकावरील लष्करी अळी व शेंगा पोखरणारी अळी या कीडीसाठी बाजारात कामगंध सापळे उपलब्ध आहेत. या सापळ्यात वरील किडींचे नरपतंग आकर्षित होतात व ते नष्ट करता येतात. किडींच्या जीवनक्रमात यामुळे असमतोल निर्माण झाल्याने कीड आटोक्यात येते. या सापळ्यांचा उपयोग किडींच्या प्रादुर्भावाचे भाकीत करण्यासाठी देखिल होतो.
10) रोगमुक्त बियाण्याचा वापर – पेरणीसाठी रोगमुक्त शेतात अगर उत्तमरीतीने रोग नियंत्रण केलेल्या शेतात तयार झालेले बियाणे वापरावे.
11) कीड व रोगप्रतिकारक जातींचा वापर – कीड व रोगप्रतीकारक जातींचे बियाणे पेरणीसाठी वापरणे हा बचतीचा व सर्वात परिणामकारक उपाय आहे. परंतु अशा जास्त उत्पादन देणा-या आहेत, याची खात्री करून मगच पेराव्यात.
12) परोपजीवी कीटक ( Predators and Parasites ) - यामध्ये घातूक लशी (Viruses) परोपजीवी बुरशी, परोपजीवी कीटक व जिवाणू (Fungi and Bacteria) यांच्या वापराचा समावेश होतो. सोयाबीनच्या शेंगा पोखरणारी अळी या कीडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा हे अंड्यावरील परोपजीवी कीटक व घातूक लस, लष्करी अळीवरील घातूक लस, पाने खाणा-या अळ्यांवर बँसिलस थुरीजिएन्सीस व बॅव्हेरीआ बँसिआना या जिवाणुची किटकनाशके बाजारात उपलब्ध असल्याने त्यांचा वापर करणे शक्य झाले आहे. सध्या त्यांची किंमत रासायनिक कीटकनाशकांपेक्षा जास्त असली तरी त्यांचा वापर परीणामकारक ठरतो. रोग नियंत्रणासाठी देखिल ट्रायकोडर्मा विरीडी व स्युडोमोनास फ्लोरेसेन्स यांचा वापर असल्याचे प्रयोगाअंती सिध्द झाले आहे.
13) पीक व्यवस्थापन पध्दतींचा सुयोग्य वापर – यामध्ये पिकासाठी लागणा-या अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा, जमिनीचा योग्य सामू (पी.एच. 6 ते 7) हेक्टरी झाडांची संख्या (4 ते 5 लाख प्रति हेक्टर) योग्यवेळी पाण्याची पाळी देणे, ओळीमधील व झाडांमधील योग्य अंतर, पेरणीची योग्य वेळ या सर्व बाबी किडी व रोगांमुळे होणारे नुकसान कमी करण्यास सहाय्य होतात.
14) रासायनिक कीटकनाशकांचा व बुरशीनाशकांचा समतोल वापर - वरील सर्व गोष्टींचा अवलंब करून देखील किडी व रोगांना अनुकुल हवामान मिळाल्यास त्यांचा पिकांवर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो. अशावेळी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी रसायनांचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात व योग्य पध्दतीने वापर करणे शहाणपणाचे ठरते. हानीकारक कीटकांची संख्या व त्यांचामुळे होणारी हानी यांचे प्रमाण ठरावीक पातळीपेक्षा जास्त झाल्यास नियंत्रणाचे उपाय योजावे लागतात. निरनिराळ्या किडीसाठी संशोधन करून या पातळ्या निश्चित केल्या आहेत. उदा. खोडमाशीसाठी 26 टक्के खोड पोखरलेली लांबी एकूण झाडाच्या उंचीचा प्रमाणात असणे, उंट अळीसाठी एक मीटर लांबीच्या ओळीत 1-2 पेक्षा जास्त अळ्या आढळणे इ. तांबेरा रोगासाठी पीक फुलावर असतांना बुरशीनाशकाची एक प्रतीबंधात्मक फवारणी करणे सांगली व कोल्हापूर भागात आवश्यक ठरते.
वरील सर्व बाबींचा विचार करून काटेकोरपणे रोग व किडींच्या
नियंत्रणासाठी नियोजन करणे यालाच त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन (Integrated Management ) असे म्हणतात. महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर आढळून येणा-या महत्वाच्या किडी व रोगांची माहिती व त्यांच्या नियंत्रणाचे उपाय पुढे दिले आहेत.

महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर आढळणा-या प्रमुख किडी 
1) खोडमाशी – ही सोयाबीन पिकावरील महत्वाची कीड असून जवळजवळ सर्व भारतात या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. खोडमाशीची मादी सोयोबीनच्या पानावरील शीरेजवळ अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर येऊन शीरेतून देठात व देठातून खोडात पोखरत जाते. पिकांच्या सुरवातीच्या काळात या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास रोप मरते. उशिरा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन फुले व शेंगाचे प्रमाण कमी होते.
2) तंबाखुवरील पाने खाणारी अळी – अनुकुल हवामान मिळाल्यास या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊ शकतो. किडीचा मादी पतंग पानाच्या मागील बाजूस पुंजक्याने अंडी घालतो. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या सुरवातीला समुहाने एकाच झाडाची पाने कुरतडतात. नंतर त्या सर्व शेतात पसरतात. कोवळ्या शेंगा असताना प्रादुर्भाव झाल्यास अळ्या शेंगा कुरतडून आतील दाणे खातात. अशावेळी पिकाचे उत्पादन 70 टक्क्यपेक्षा जास्त घटते.
3) बिहार सुरवंट – ही किड भारतात सर्वत्र आढळते. सुरवातीस अळ्या एकाच झाडावर पुजक्याने राहतात व पानांचे हरीतद्रव्य खाऊन टाकतात. त्यामुळे पाने जाळीदार होतात. त्यानंतर अळ्या सर्व शेतात पसरतात व पुर्ण पाने खातात. किडीच्या अळ्या केसाळ असून प्रथम त्यांचा रंग पिवळा असतो व नंतर तो राखाडी होतो.
4) पाने पोखरणारी अळी – कमी पाऊस व कोरडे हवामान असल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीच्या अळ्या पानाच्या वरील बाजूस नागमोडी आकारात पाने पोखरत जातात व वाढ पुर्ण झाल्यावर तेथेच कोषावस्थेत जातात. एका पानावर एकापेक्षा जास्त अळ्यांचा हल्ला झाल्यास पान वाकडे तिकडे द्रोणाकार होते व नंतर सुकून गळून पडते.
5) पाने गुंडाळणारी अळी – सतत पाऊस व ढगाळ हवामान राहिल्यास या किडीचा उपद्रव वाढतो. किडीची अळी चकचकीत हिरव्या रंगाची असते व हात लावताच लांब उडून पडते. एक किंवा अधिक पाने एकमेकांना जोडून कडा पिवळ्या पडतात व पाने आकसली जातात.
6) मावा – ढगाळ व पावसाळी हवामानात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कीड पानाच्या मागील बाजूस व खोडावर राहून रस शोषते. या किडीच्या अंगातून साखरेसारखा चिकट द्रव स्त्रवतो. त्यामुळे झाडावर काळी बुरशी वाढते. सोयोबीनवरील मावा किडीचा रंग पिवळा किंवा हिरवा असतो.
7) शेंगा पोखरणारी अळी – ही प्रामुख्याने कपाशी, तूर, हरबरा या पिकांवरील कीड असून गेल्या काही वर्षात सोयाबीन पिकावर जास्त प्रमाणात दिसून येऊ लागली आहे कीडीच्या अळ्या सुरवातीच्या काळात पाने खातात. शेंगा भरण्याच्या काळात शेगा पोखरून आतील दाणे कुरतडतात.
8) हिरवे तुडतुडे – या किडीची पिल्ले व पुर्ण वाढ झालेले कीटक पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषतात. त्यामुळे पानांच्या कडा पिवळ्या पडतात व पाने आकसली जातात.
9) शेंगा पोखरणारी सुक्ष्म अळी – सांगली, कोल्हापूर या भागात तसेच कर्नाटक राज्यात या किडीच्या प्रादुर्भाव आढळून येतो. पिकाच्या दाणे भरण्याच्या काळात किडीची मादी शेंगावर अंडी घालते. किडीच्या अळ्या शेंगा पोखरून आतील दाणे खातात. शेंगा वरून निरोगी दिसतात परंतु अळ्या आतील दाणे खाऊन टाकतात. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव ओळखणे अवघड जाते.
10) हिरवा ढेकूण – ही कीड पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषते. सोयोबीन पिकाच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारास ही कीड मदत करते.
11) हुमणी – ही अनेक पिकांवर पडणारी कीड असून किडीच्या अळ्या जमिनीत राहून रोपांची मुळे खातात. त्यामुळे पिकाच्या सुरवातीच्या काळात रोपे सुकतात व मरतात. अळीचे कोष सुप्तावस्थेत जमिनीत राहतात. पावसाळ्याच्या सुरवातीस अनुकूल हवामान झाल्यावर भुंगेरे कोषातून बाहेर पडतात. हे भुंगेरे कडुनिंब व बाभळीची पाने खातात व शेणखतात अंडी घालतात. शेणखताद्वारे सर्व शेतात पसरते. 
याखेरीज महाराष्ट्रात सोयोबीन पिकावर लाल मखमली अळी, उंट अळी, पांढरा भुंगेरा, करदोटा भुंगेरा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येतो.
12) पांढरी माशी – ही कीड पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषते. सोयाबीन पिकाच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारास ही कीड मदत करते.
कीडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकांच्या वापर – 
1) खोडमाशीच्या नियंत्रणासाठी 10 टक्के दाणेदार फोरेट प्रती हेक्टरी 10 किलो या प्रमाणात पेरणीपुर्वी जमिनीत मिसळावे. थोयोमेथोक्झाम या किटकनाशकाची 3 ग्रँम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रीया देखील परिणामकारक आढळून आली आहे. पाने खाणा-या, पाने पोखरणा-या व गुंडाळणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी क्विनॉलफॉस 25 इ.सी. 1.5 लीटर किंवा क्लोरोपायरीफॉस 20 इ.सी. 1.5 लिटर किंवा इथोफेनप्राँक्स 10 इ.सी. 1 लिटर किंवा ट्रायझोफॉस 40 इ.सी. 800 मि.ली किंवा एन्डोसल्फान 35 इ.सी. 1.5 लिटर किंवा इथिऑन 50 इ.सी. 1.5 लीटर किंवा मेथोमिल 40 एस.पी. 1 किलो 1 किलो या किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. वरील कीटकनाशकांचा भुकटीच्या देखील हेक्टरी 20-25 कीलो या प्रमाणात धुरळणीसाठी वापर करावा.
2) रस शोषणा-या किडींच्या नियंत्रणासाठी मिथिल डिमेटाँन (0.03 टक्के) किंवा फॉस्फोमिडाँन (0.03 टक्के) किंवा डायमेथोएट (0.03 टक्के) या किटकनाशकांची फवारणी करावी.
3) हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी शेणखतात ते शेतात पसरण्यापुर्वी 10 टक्के लिंडेन किंवा 2 टक्के मॅलेथिऑन भुकटी मिसळावी. शेतात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळल्यास 60 किलो प्रती हेक्टरी 5 टक्के क्लोरडेन किंवा हेप्टाक्लोर भुकटी जमिनीत मिसळावी. पावसाळ्याच्या सुरुवातीस भुंगेरे बाहेर पडल्यावर कडू निंबाच्या व बाभळीच्या झाडावर किटकनाशकाची फवारणी करून ते नष्ट करावेत.
महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर आढळणारे प्रमुख रोग व त्यांचे नियंत्रण –
1) तांबेरा – सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा व तिच्या उपनद्यांच्या काठावरील प्रदेशात या रोगाचा उद्रेक प्रथम 1994 साली आढळून आला. त्यानंतर दरवर्षी या भागात हा रोग दिसून येतो. सतत पाऊस व ढगाळ हवामान अशी अनुकूल परिस्थिती राहिल्यास या रोगाचा इतर भागात प्रसार होतो. या रोगामुळे पानांच्या मागील बाजूस लालसर, तपकीरी रंगाचे पुरळ दिसून येतात. पिकाची वाढ मंदावते व पाने गळतात. उशिरा पेरलेल्या सोयाबिन पिकाचे जास्त नुकसान होत असल्याने या भागातील शेतकरी 15 जुनपुर्वी पेरणी करतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पीक फुलावर असताना हेक्झाकोनँझोल 0.1 टक्के या रसायनांचा फवारा आवश्यक ठरतो.
2) खोडाचा राखी करपा – पिकाच्या उगवणीनंतर कोरडे व उष्ण हवामान असल्यास यो रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. रोपाची वाढ थांबून रोपे मरतात. खोडाच्या जमिनीलगतच्या भागावर काळ्या रंगाचे चट्टे दिसतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम 3-4 ग्रँम प्रती किलो किंवा कार्बेन्डँझिम 2-2.5 ग्रँम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रीया करावी. तसेच ट्रायकोडर्मा विरीडी या बुरशीपासून तयार केलेल्या बुरशीनाशकाची बीजप्रक्रीया उपयुक्त ठऱते
3) करपा – या रोगाच्या प्रादुर्भाव झालेली रोपे कोलमडून पडतात व मरतात. जमिनीजवळ खोडावर पांढरी बुरशी आढळून येते. शेतातील बुरशीग्रस्त भाग हा रोगाचे प्रमाण वाढविण्यास कारणीभूत ठरतो. अशा भागाला प्रति हेक्टरी 20 किलो क्लोरबेनच्या द्रावणाने भिजवून प्रक्रीया करावी.
4) सुक्ष्म जिवाणूंचे पुरळ – रोगजनक जिवाणुमुळे पानावर लालसर तपकीरी रंगाचे फुगलेले ठीपके आढळून येतात. पावसाळी हवामानात रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. या रोगाचे नियंत्रण बीजप्रक्रीयेद्वारे किंवा कार्बोक्झीन (0.2 टक्के) च्या फवारणीने करता येते.
5) पानावरील ठीपके – बुरशीच्या निरनिराळ्या रोगजनक प्रजातीमुळे पानांवर पिवळे, लालसर, तपकीरी, बेडकाच्या डोळ्याच्या आकाराचे ठीपके आढळून येतात. बुरशीनाशकांच्या फवारणीने त्यांचे नियंत्रण करता येते. त्यासाठी कार्बेन्डँझिम, डायथेन एम – 45, डायथेन झेड – 78 व ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
6) बियांवरील जांभळे डाग – पिकाच्या काढणीच्या वेळी सतत पाऊस असल्यास या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. असे रोगग्रस्त बियाणे पेरणीसाठी वापरू नये. तसेच पेरणीपुर्वी बीजप्रक्रीया करावी.रोगाचे/किडीचे नाव : 
खोडकुज
( चारकोल रॉट )

रोगाचे कारण : 
मॅक्रोफोमीया कॉस्फोमीलिना या बुरशीमुळे


कारणीभूत घटक : 
1) शेताची अस्च्छता
2) सतत एकसारख्या पिकांची लागवड एकाच शेतात करणे
3) प्रमाणीत बियाण्यांचा कमी वापर 
4) रोगास बळी पडणा-या जातींचा वापर 

प्रतिबंधात्मक उपाय : 
1) या रोगाला प्रतिकारक्षम जातींची लागवड करावी.
2) पीक फेरपालट करावी.
3) प्रमाणीत बियाण्याचा वापर करावा.
4) शेतात स्वच्छता ठेवावी.
5) पेरणीपुर्वी थायरम 3 ते 4 ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रीया करावी. 

नियंत्रणात्मक उपाय : 
फवारणीसाठी 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम-45 किंवा 20 मिली झायरम किंवा 10 ग्रॅम बाविस्टीन मिसळून आलटून पालटून फवारावे.

टोमॅटो पिकावरील करपा

टोमॅटो पिकावरील करपाटोमॅटो 

रोगाचे/किडीचे नाव : 
करपा
( लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाईट))

रोगाचे कारण : 
अल्टरनेरीया सोलॅनी या रोगकारक बुरशीमुळे

कारणीभूत घटक : 
1)फळधारणेचा सुरुवातीचा काळात हा रोग जास्त दिसून येतो.
2)पाऊस पडल्यावर निर्माण होणारी आर्द्रता व नंतर येणा-या ऊष्ण आणि कोरड्या काळात मोठ्या प्रमाणावर पसरतो.
3)कमकुवत झाडे लवकर बळी पडतात.
4)कोरड्या हवामानात रोगाच्या प्रादुर्भाव जास्त होत नाहीप्रतिबंधात्मक उपाय : 
टोमॅटोचे शेत स्वच्छ ठेवावे. चांगले बियाणे वापरावे, बियाण्यास प्रक्रीया करावी. शेतात पाणी साठू देऊ नये

नियंत्रणात्मक उपाय : 
1)लागवडीनंतर एका महिन्यात पहिल्या फवारणीने सुरुवात करावी.
2)पिक वाढीच्या कालावधीत 10 ते 15 दिवसांचा अंतराने सतत फवारणी द्यावी.
3)10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम-45 किंवा ब्लायटॉक्स अथवा 25 ग्रॅम बाविस्टीन ईत्यादी बुरशी नाशके आलटून पालटून फवारल्यास प्रभावी रोग नियंत्रण होते.

अवलिया कृषी सेवा केंद्र वाशीम. मोब. 9822933702

किडीचे नाव : उंटअळी

सोयाबीन आणी इतर पिकावर येणारी 

रोगाचे/किडीचे नाव : 
उंटअळी

कारणीभूत घटक : 
1) शेतातील अस्वच्छता, तणे इत्यादीचा प्रादूर्भाव.
2) शेजारील शेतात एरंडी सारखे पीकाची लागवड.
3) एकपिक पध्दती.
4) खताच्या असंतूलीत वापर ई.

रोगांचे /किडीचे वर्णन : 
या किडीचा पतंग मजबूत बांध्याचा असून पुढच्या पंखाचा रंग तपकीरी दिसतो व मागील पंख गर्द तपकीरी असते व त्यावर मधोमध आडवे पांढरे पट्टे असतात आणि मागच्या कडेला ३-४ ठीपके असतात. अंडी हिरवट असतात, अळी लांब असते, रंग करडा किंवा काळसर असतो. कोष तपकीरी रंगाचे असतात. नुकसानीच्या प्रकार – या किडीची अळी अनेक पिकावर येते ऊदा. डाळींब, गुलाब, कापूस, ई. अळी पुर्ण पाने खाऊन टाकते, प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानाच्या फक्त शिरा शिल्लक राहतात
जिवनक्रम – या किडीची मादी पतंग पानाच्या खालच्या बाजूस एक-एक अशी अंडी घालते. अंडी ३-४ दिवसात उबतात व अळी बाहेर येते अळी अवस्था १५ दिवस राहते व पुर्ण वाढ झाल्यास ती कोषात जाते, कोष वाळलेल्या पानात आढळतात, हि कोषावस्था ११ ते २७ दिवसात पुर्ण होऊन पतंग बाहेर येतो.

नियंत्रणात्मक उपाय : 
या किडीचे नियंत्रणासाठी एन्डोसल्फान २० मिली प्रती १० लीटर पाण्यातून फवारणी करावी किंवा फॉलीडॉल पावडर ८ किलो प्रती एकर प्रमाणे धुरळणी करावी.

अधिक माहिती करिता संपर्क :-
अवलिया कृषी सेवा केंद्र वाशीम. मोब. 9822933702

Wednesday, 22 August 2012

गांडूळपाणी तयार करण्याच्या पध्दती

गांडूळ पाणी (स्त्राव ) (वर्मी वाँश )
गांडूळाच्या शरीरातून पाझरणा-या सिलोमिक फ्युइडला व मुत्राला "गांडूळपाणी " अथवा वर्मी असे म्हणतात .
गांडूळखत करतांना सुध्दा आपण गांडूळ पाणी काढू शकतो .
गांडूळपाणी तयार करण्याच्या पध्दती :-
१) एकात एक जाणारी दोन भांडी घ्यावी .आतील भांड्याच्या तळाजवळ एका बाजूने तोटीची सोय केलेली असावी .आतील १२ ते १६ लिटरच्या भांड्यात शेण मिश्नीत अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ भरावे .त्यामध्ये १ ते २ कि .ग्रँ .गांडूळे सोडावी .सेंद्रिय पदार्थ जलद कुजण्यासाठी पुरेसे पाणी या पदार्थावर फवारावे .गांडूळे जसजशी सेंद्रिय पदार्थाचे सेवन करतात तसतसे त्याचे गांडूळ खतात रुपांतर होते .या गांडूळखतावर थोडे अधिक पाणी काही कालांतराने फवारावे ,त्यामुळे आतील भांड्यामधुन बाहेरच्या भांड्यात जाडसर रंगीत द्रव तोटीद्वारे बाहेर पडून बाहेराच्या भांड्यात साचतो .हा द्रव रबरी तोटीने ओढून बाटलीत गोळा केला जाती यालाच "गांडूळ पाणी " असे म्हणतात . २) गांडूळ पाणी तयार करण्यासाठी चांगली पूर्ण वाढलेली १ कि.ग्रँ वजनाची गांडूळ गोळा करावीत .त्याची कात बाजूला वेगळी करावी .नंतर १५ ते २० मिनीट त्यांना एका प्लास्टिकच्या पसरट भांड्यात ठेवून त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारे टाकाऊ सेंद्रिय पदार्थ वेगळे करून गांडूळे स्वच्छ करुन घ्यावीत .नंतर प्लास्टिकच्या भांड्यात ५०० मिली .कोमट पाणी घेऊन ही गांडूळे ३ मिनीट या पाण्यात सोडून ती चांगली ढवळून घ्यावीत ,नंतर दुस-या भांड्यात ५०० मि .ली . थंड पाणी घेऊन त्यामध्ये दोन मिनीट ढवळून घ्यावीत .ही गांडूळे पुन्हा गांडूळ खत निर्मितीसाठी वापरता येतात .आता दोन्ही भांड्यातील द्रावण एकत्र मिसळून पिकांवर फवारण्यासाठी वापरावे .

Monday, 20 August 2012

सॉफ्टवेअर आर्किटेक्‍टचा "हॅंगिंग स्टॉबेरी'चा प्रयोगगणेश कोरे
पुणे - पॉलिहाऊसमध्ये टांगत्या पद्धतीने (हॅंगिंग) स्टॉबेरीचे उत्पादन घेऊन गुणवत्तेत 40 टक्के तर उत्पादनात चार पटींनी वाढ करण्यात येथिल सॉफ्टवेअर आर्किटेक्‍ट अतुल मधुकर कळसकर यांनी यश मिळविले आहे. हॅंगिंग पद्धतीमुळे स्टॉबेरीपासून वर्षाला एकरी 50 लाख रुपये नफा मिळेल, असा त्यांचा दावा आहे.

श्री. कळसकर यांनी अमेरीकेत एमबीए (आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थापन) शिक्षण घेतले. काही काळ अमेरीकेत नोकरी केल्यानंतर 1997 मध्ये ते भारतात आले. गेली 12 वर्षे ते पुण्यातून अमेरीकन कंपन्यांसाठी काम करत होते. दरम्यान, सॉफ्टवेअर व्यवसायातून बाहेर पडून नैसर्गिक साधनसामग्रीच्या वापरातून नवीन व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. इंटरनेटवर शोध घेतल्यानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्टॉबेरीचे उत्पादन घेण्याचा पर्याय त्यांनी स्विकारला. उत्पादन व गुणवत्ता वाढविण्यासाठी वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यातुनच हॉट्रीकल्चर ट्रेनिंग सेंटरचे संचालक डॉ. धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हॉर्टीकल्चर सेंटरमध्ये 1 गुठे क्षेत्रावरील ग्लास हाऊसमध्ये हॅंगिंग स्टॉबेरीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर हे हॅंगिग पद्धतीचे वैशिष्य आहे. कळसकर यांनी स्ट्रॉबेरीची लागवड आडव्या साडेपाच फुट उंचीच्या मांडवावर प्लॅस्टीकचे चौकोनी बॉक्‍स ठेवले. त्यामध्ये मातीएैवजी कोकोपीट आणि थर्माकोलच्या साबुदाण्याच्या आकाराच्या दाण्यांचे मिश्रण भरले. बॉक्‍सला छिद्रे पाडुन त्यामध्ये रोपे लावली. परंपारीक पद्धतीत एकरी 25 हजार रोपे बसून एकरी आठ ते दहा टन उत्पादन होते. हॅंगिंग पद्धतीत एकरी 80 हजार रोपे बसून 40 टन उत्पादन मिळते. शिवाय या पद्धतीने वर्षभर उत्पादन घेता येणे शक्‍य होते.

ते म्हणाले, ""हॅंगिग पद्धतीने उत्पादन घेण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. आता याच पद्धतीने तळेगाव फ्लॉरिकल्चर पार्कमध्ये एक एकर पॉलिहाऊसमध्ये येत्या मे महिन्यात लागवड करणार आहोत. यासाठी स्पेन व केलिफोर्नियातून रोपे आयात करणार आहे. देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच युरोपीय देशांमध्ये विक्रीचे नियोजन आहे. देशातील पंचतरांकीत हॉटेल, मॉल व आय. टी. कंपन्यांना वर्षेभर स्ट्रॉबेरीचा पुरविण्यात येईल. लागवडीपासून काढणीपर्यंतची (खते, औषधे, किटकनाशके वापर इ.) सर्व माहीती ग्राहकाला देण्यात येईल.''

Saturday, 18 August 2012

म्हशींच्या जाती

म्हशींच्या जाती
मुर्रहा
 • मुख्यतः हरियाना, दिल्ली आणि पंजाब राज्यात आढळतात
 • दूध उत्पन्न – १५६० किलो
 • दररोज सरासरी ८ ते १० लिटर दूध देवू शकते याशिवाय संकरित मुर्रहा ६ ते ८ लिटर दूध देवू शकते.
 • या जातींना सागरी किनारपट्टी आणि किंचीत थंड हवामान चांगले मानवते.

सुर्ती
 • गुजरात
 • १७०० – २५०० किलो

जाफराबादी:
 • गुजरातचा काठीयावाड जिल्हा
 • १८००-२७०० किलो

नागपुरी
 • महाराष्ट्राचे नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्हे.
 • दूध उत्पन्न – १०३० ते १५०० किलो
दुभत्या जाती निवडीची सामान्य पद्धत
दुभत्या गायींची निवड
बाजारात गुरांची किंवा वासरांची निवड ही एक कला आहे. एक उत्तम गवळी आपला कळप कळपातील पैदाशीने ऊभा करतो. खालील मार्गदर्शक सूचना दुभत्या गायींच्या निवडीसाठी उपयुक्त आहेत.
 • जनावर खरेदी करतांना विशेषतः त्याची जात आणि दुग्ध क्षमतेवर निवडावे.
 • पुर्ववृत पत्रक किंवा वंशावळ तक्ता जे उच्च व्यवस्थापित दुग्ध शाळेत जोपासली जातात त्यावरून जनावरांचा इतिहास मिळतो.
 • दुधाचे सर्वाधिक उत्तपन्न हे पहिल्या पांच वेतांमध्ये मिळते. म्हणून निवड करतांना पहिल्या किंवा दुस-या वेतांची गुरे निवडावी आणि वेतांच्या एक महिन्यानंतरची असावी.
 • गायींचे लागोपाठ दोन वेळा दोहन करावे. त्याची सरासरी जनावराच्या दूध उत्पादनाचा पुसट अंदाज दर्शविते.
 • गाय शांत आणि कोणालाही दोहन करु देणारी असावी.
 • शक्यतो आक्टोबर किंवा नोव्हेंबर  महिन्यात गुरे खरेदी करावी.
 • दुधाचे सर्वाधिक उत्पादन वेताच्या ९० दिवसांनंतर मिळते.
उत्पादनक्षम गायींच्या जातींची लक्षणे
 • शांत स्वभावासोबत सुडौल बांधा, शक्तिवान, शरीराची नेटकी बांधणी आणि चांगली आकर्षक चाल असावी.
 • जनावराच्या शरीराचा आकार पाचरीसारखा(मागील बाजुस रूंद आणि पु़ढे निमुळता) असावी.
 • जनावराचे डोळे चमकदार आणि मान बारीक असावी.
 • कास पोटाला व्यवस्थित घट्ट चिकटलेली असावी.
 • कासेच्या त्वचेवर शिरांचे चांगले जाळे असावे.
 • कासेचे चारही कप्पे पूर्ण विकसीत असावे तसेच सडांची ठेवण नेटकी असावी.
व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात जातींची निवड - सूचना
 • भारतीय परिस्थीतीमध्ये  व्यापारक्षम दुग्ध शाळेमध्ये किमान २० गुरं  (१० गायी, १० म्हशीं) असणे आवश्यक आहे. ही संख्या सहज १०० गुरांपर्यंत जाऊ शकते. १०० गुरं ५०:५० किंवा  ४०:६० च्या प्रमाणात. यानंतर तुम्हाला भांडवल आणि बाजारक्षमतेनुसार पुढील व्यवसायवृद्धिचा विचार करावा लागेल.
 • आरोग्यभिमुख मध्यमवर्गिय भारतिय कुटुंब कमी स्निग्ध पदार्थ असलेले दूध पिण्यासाठी पसंत करतात. गुरांच्या मिश्र जाती दुग्ध शाळेत असणे अधिक चांगले. (संकरित, गायी आणि म्हशीं एकाच आश्रयाखाली वेगळ्या दावणीला)
 • तुमच्या नजिकच्या बाजारपेठेची पूर्ण माहिती घ्या, जेथे विक्रीचा विचार आहे. तुम्ही वेगवेगळ्या दोन्ही प्रकारच्या जनावरांचे दूध एकत्रित किंवा मागणीनुसार विकू शकतात. हाँटेल आणि  काही सामान्य ग्राहक (३०% पर्यंत) म्हशींचे दूध पसंत करतात. दवाखाने आणि इतर ठिकाणी गायींचे दूध लागते.
दुग्ध शाळेसाठी गायीं/म्हशींची निवड

 • चांगल्या प्रतिच्या गायी बाजारात उपलब्ध आहेत आणि  किंमत सुमारे रू.१२०० ते रू.१५०० प्रति लिटर प्रति दिन  दूध  उत्पादन. (उदा. १० लिटर दूध प्रति दिन गायीची किंमत रू.१२, ००० ते रू.१५, ००० असेल).
 • उत्तम व्यवस्थापनात १३ ते १४ महिन्याच्या  अंतरात गाय हमखास एक वासरू देते.
 • गायी स्वभावाने शांत आणि हाताळण्यासाठी सोयींच्या असतात. अधिक दूध देणा-या संकरित जातींना (होलस्टिन  आणि जर्सि संकर) भारतीय हवामान पोषक आहे.
 • गायींच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थ ३ ते ५.५ टक्के असते जे म्हशींच्या दुधापेक्षा कमी आहे.
म्हशीं
 • भारतात आपल्याकडे चांगल्या म्हशींच्या जाती (उदा.मुर्हा आणि मेहसाना) व्यापारक्षम दुग्ध शाळेसाठी उपयुक्त आहेत.
 • म्हशीं दुधामध्ये गायींपेक्षा अधिक स्निग्ध पदार्थ असतात म्हणून त्याला लोणी  आणि तुपासाठी  अधिक मागणी असते. म्हशींचे दूध चहा आणि इतर भारतीय पेयांमध्ये अधिक वापरले जाते.
 • म्हशीं तंतुमय पिकांच्या ताटांवरसुद्धा जगवल्या जावू शकतात, म्हणून चा-याचा खर्च कमी होतो.
 • म्हशीं उशिरा वयांत येतात आणि त्यांचे दोन वेतांमधील अंतर १६ ते १८ महिने असते. म्हशीं नर पाडसाची बाजारात कमी किंमत येते.
 • म्हशींना थंडाव्याची गरज असते.(उदा. पाण्याचे टाके किंवा तुषार पंखे)
स्त्रोत : तामिळनाडु पशुवैद्यकिय आणि पशु विज्ञान विद्यापीठ, चेन्नई आणि बिएआएएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, पुणे

दुभत्या जाती

दुभत्या जाती
सहिवाल
 • मुख्यतः पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश, दिल्ली, बिहार आणि मध्यप्रदेशात आढळतात.
 • दूध उत्पन्न – खेडेगावात:१३५०किलो
- व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात: २१०० किलो
 • पहिल्या वेताचे वय - ३२ ते ३६ महिने
 • दोन वेतांमधील अंतर – १५ महिने

गिर
 • मुख्यतः दक्षिण काठीयावाडच्या गिर जगंलां मध्ये आढळतात.
 • दूध उत्पन्न – खेडेगावात : ९०० किलो kgs
                –  व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात: १६०० किलो
gir.JPG

थारपारकर
 • मुख्यतः जोधपुर, कच्छ आणि जेसलमेरमध्ये आढळतात.
 • दूध उत्पन्न – खेडेगावात :१६६० किलो
                 –  व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात: २५०० किलो

कॅरन फ्राई जातीची गाय
राजस्थानमधील थरपक्कर जातीची गाय उष्ण आणि दमट हवामानातही सशक्त राहू शकते. पण ही जात दुधासाठी मात्र सर्वसाधारण अशीच समजली जाते. या थरपक्कर जातीचा आणि होस्टन फ्रिशिअन जातीच्या कृत्रिम संकर करून कॅरन फ्राई या नव्या संकरीत गायीचा विकास करण्यात आला आहे.
 • या संकरीत गायीची वैशिष्ट्ये
 • ह्या जातींच्या गाईंच्या अंगावर, कपाळावर आणि शेपटीच्या गोंड्यावर काळे-पांढरे ठिपके डाग असतात. आचळे गडद रंगाची असतात व दुधाच्या शिरा ठळकपणे दिसतात.
 • कॅरन फ्राई जात स्वभावाने अतिशय शांत असतात. गोर्ह्यां पेक्षा गाय लवकर वयात येते व वयाच्या साधारण 32-34 व्या महिन्यामध्ये गाभण राहू शकते..
 • गर्भार काळ 280 दिवसांचा असू शकतो. पहिल्यांदा वासरू दिल्यानंतर पुन्हा 3-4 महिन्यांतच या गायी पुन्हा गाभण राहू शकतात. त्यामुळे स्थानिक जातींच्या तुलनेने हे ही संकरीत जात फायदेशीर पडते. कारण स्थानिक जातीच्या गाई पुन्हा गाभण राहण्यासाठी 5-6 महिने जावे लागतात.
 • दुधाचे उत्पन्न : कॅरन फ्राई जातीची गाय वर्षाकाठी सुमारे तीन ते साडेतीन हजार लिटर्स दूध देतात. एका प्रयोगात या जातीच्या गायीने साधारणतः तीन हजार सातशे लिटर्स दूध दिल्याची नोंद आहे. ह्या दुधामधील स्निग्धांश-फॅटचे प्रमाण 4.2 टक्के आहे व लॅक्टेशन दूध देण्याचा कालावधी तीनशे वीस दिवसांचा आहे.
 • भरपूर हिरवा चारा व इतर संतुलित आहार मिळाल्यास ह्या जातीच्या गायी समाधानी राहतात आणि दिवसाला साधारण पंधरा ते वीस लिटर दूध देतात. वासराच्या जन्मानंतरच्या तीन चार महिन्यांत दुधाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे दिवसाला पंचवीस ते पस्तीस लिटरपर्यंत जाते.
 • दूध देण्याची क्षमता जास्त असल्यामुळे या गायीच्या आचळांची काळजी घ्यावी लागते. त्यांना जंतुसंसर्ग (मॅस्टिटिस) होऊ नये व त्यांच्या दुधामधील विशिष्ट खनिजांचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी वेळीच लक्ष द्यावे लागते. त्यामुळे लगेच उपायही करता येतात.
याबाबतची अधिक माहिती खालील पत्त्यावर मिळू शकते.
विभाग प्रमुख,
दुग्धपशूसंवर्धन विभाग,
राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरयाना, 132001, दुरध्वनी - 0184-2259092. किंवा
डेअरी कॅटल ब्रीडिंग डिव्हिजन, नॅशनल डेअरी रिसर्च इंस्टिट्यूट, कर्नाल, हरियाणा- 132001. दूरभाष: 0184-2259092.
लाल सिंधी
 • मुख्यतः पंजाब, हरियाना, कनार्टक, तामिळनाडु, केरळ आणि ओरिसामध्ये आहेत.
 • दूध उत्पन्न – खेडेगावात:११०० किलो
                – व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात: १९०० किलो
दुभत्या आणि भाकड जाती
ओंगल
 • मुख्यतः आंध्रप्रदेशच्या नेल्लोर, कृष्णा, गोदावरी आणि गुंटूर जिल्हयात आढळतात.
 • दुध उत्पन्न –१५०० किलो
 • बैलगाडी ओढण्यासाठी आणि नांगरणीसाठी सक्षम आसतात.

हरियाना
 • मुख्यतः हरियानाच्या करनाल, हिसार आणि गुडगाव जिल्हयात , दिल्ली आणि पश्चिम मध्यप्रदेशात आढळतात .
 • दूध उत्पन्न –११४० -४५०० किलो.
 • बैल वाहतुकीच्या आणि नांगरणीसाठी उपयुक्त.

कांकरेज
 • मुख्यतः गुजरातमध्ये आढळतात
 • दूध उत्पन्न – खेडेगावात:१३०० किलो
                 – व्यापारक्षम दुग्ध व्यवसायात : ३६०० किलो
 • पहिल्या वेताचे वय-३६ ते ४२ महिने
 • दोन वेतांमधील अंतर– १५ ते १६ महिने.
 • बैल वेगवान, चपळ आणि भक्कम. नांगरणी आणि वाहतुकीसाठी उपयुक्त.
            
देवनि
 • मुख्यतः आंध्रप्रदेशच्या ईशान्य आणि पश्चिम भागात आढळतात.
 • गायी भरपुर दुभत्या आणि बैलकामासाठी उपयुक्त आहेत.

भाकड जाती
अमृतमहाल
 • मुख्यतः कनार्टक मध्ये आढळतात.
 • नांगरणी आणि वाहतुकीसाठी चांगले.

हल्लिकार
 • मुख्यतः कनार्टकच्या टुमकुर, हासन आणि म्हैसुर जिल्हयात आढळतात .

खिल्लार
कांगाय
 • मुख्यतः तामिळनाडुच्या कोईंबतुर, इरोड, नमक्कल, करूर आणि दिंडीगुल जिल्हयात आढळतात.
 • नांगरणी आणि वाहतुकीसाठी उपयुक्त. या जाती काटक असतात.

विदेशी दुभत्या जाती
जर्सी
 • पहिल्या वेताचे वय: २६ ते ३० महिने
 • दोन वेतांमधील अंतर – १३ ते १४ महिने
 • दूध उत्पन्न – ५०००-८००० किलो
 • दुधाचे उत्पन्न सुमारे २० लिटर आणि संकरित गायी दररोज ८ ते १० लिटर दूध देतात.
 • भारतात या जातींना उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते.
 

होलस्टिन फि्रजियन
 • मूळ जात हाँलडची आहे.
 • दूध उत्पन्न - ७२०० ते ९००० किलो
 • विदेशी दुधाळ जातीमध्ये दूध उत्पन्नात ही सर्वोत्तम आहे. दररोज सरासरी ही २५ लिटर दूध देवू शकते आणि संकरित होलस्टिन फि्रजियन गायी १० ते १५ लिटर दूध देवू शकतात.
 • सागरी किनारपट्टी आणि पठार भाग यांना अनुकूल आहे.