Wednesday, 28 November 2012

स्थानिक सेंद्रिय शेतीची मानके

१) सेंद्रिय कूषी पध्दतीत रासायनिक व जैविक प्रक्रिय केलेल्या पदार्थाचा वापर करु नये .सेंद्रिय शेती व शेतमाल याचे प्रमाणिकरण करण्याकरीत शेती सलग तीन वर्षापूर्वी पासून रसायन मुक्त असावी .
२) बी-बियाणे, वाण (धनधान्यांचे ,पशुपक्षांचे ) शक्यतो गावरानच वापरावे .असे वाण रोग व कीड प्रतिकारक असतात .शिवाय कोणत्याही वातावरणात उत्तम प्रकारे वाढू शकतात बि -बियाणे सेंद्रिय शेतीतीलच वापरावे .असे न मिळाल्यास आपल्या शेतीत पूर्वी तयार केलेले वापरावे .
३) पिकांची फेरपालट करुन जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढवावे आणि कीड व रोगांचे नियंत्रण करावे.
४) जमिनीची सुपिकता व जिवंतपणा वाढविण्यासाठी शेतीत व परिसरात उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ ,हिरवळीची खते ,कंपोस्ट खत ,गाडूळ खत ,खोल मूळे जाणा-या वनस्पती इत्यादी वापराव्यात शिवाय द्विदल पिकांची लागवड करणे आवश्यक आहे.
५) बीज प्रक्रियेसाठी नैसर्गिक व पारंपारिक पध्दतीचा वापर करावा उदा. जीवाणू खते ,राख ,गोमूत्र इत्यादी
६) पिकांचे संरक्षण करताना रासायनिक कीटक ,बुरशी व तण -नाशकांच्या जागी निबोळी अर्क ,सापळा पीके,मित्र पीके,लसून -मिरची -ताक मिश्नण, परोपकारी जीवजंतु व कीटकांचा वापर करावा .पिकांची फॆरपालट करावी
७) पिकांची वाढ व विकास होण्याकरिता रासायनिक वाढ नियंत्रकांचा संप्रेरकांचा उपयोग सेंद्रिय शेतीत करु नये त्याऎवजी शेती व परिसरातील वनस्पती,प्राणी सुक्ष्मजीवजंतुपासून पारंपारिक पध्दतीने तयार केलेली कीड व रोग निय़ंत्रके वापरावीत .
८) शेजारच्या शेतीतून सेंद्रिय शेतात रासायनिक कीटकनाशके रोग नाशके इत्यादी शिवाय रासायनिक येणारे नाहीत याची काळजी घ्यावी .
९) सेंद्रिय शेतीकरीत वापरण्यात येणारे पाणी प्रदुषणमुक्त असावे .या करीत पाण्याच्या उगमाची जसे विहीर ,नदी ,नाला ,ऒढा ,तलाव इत्यादीचे प्रदुषणापासून संरक्षण करावे ,शिवाय पाण्याचा योग्य वापर व संवर्धन करावे . जमिनीची धुप होणार नाही याची काळजी घ्यावी .
१०) शेत जमिनीवर व बांधावरील विविध वनस्पती ,लगवड केलेली झाडे ,गिरीपुष्प ,शेवगा ,कडुनिंब व इतर नैसर्गिक वनस्पती यांचे संरक्षण करावे .
११) सेंद्रिय शेतातील पाळीव प्राणी ,पक्षी यांचे संगोपन करीत असतांना त्याचा आहार सेंद्रिय असावा व त्यांच्या आरोग्याचे नैसर्गिक पध्दतीने संरक्षण करावे .आणीबाणीच्या वेळी जीव रक्षणासाठी प्रचलित औषधोपचार करावे.
१२) सेंद्रिय शेती पध्दतीने करण्याचे ध्येय असावे. अन्यथा शेतीचा सेंद्रिय व असेंद्रिय भाग याचे व्यवस्थापन स्पष्टपणे वेगवेगळे असावे.
१३) साठवणुकीकरिता नैसर्गिक ,पारंपारिक ,घरगुती उपाय योजना करावी .उदा .कडुनिबांचा पाला ,राख इत्यादीचा उपयोग वाहतुक व साठवणुकीत सेंद्रिय व असेंद्रिय शेतमाल एकमेकात मिसळणार नाही याकरिता उपाय योजना करावी .सेंद्रिय उत्पादनावर प्रक्रिया करताना त्याच्या मुळाच्या गुणधर्मावर व प्रतीवारीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी .
१४) सेंद्रिय शेतक-याने दैनंदिन नोदवहीत शेतीसंबंधी सर्व कामाची नोद करणे आवश्यक आहे .खरेदी-विक्रिचे कागदपत्र जपून ठेवणॆ आवश्यक आहे
टिप :-
वरील सर्व मानके कूषी अधिकारी ,शास्त्रज्ञ ,तज्ञ तसेच सेंद्रिय शेतकरी यांच्या उपस्थितीत दि .२८ जानेवारी २००५ बिडकीन ,औरंगाबाद येथे सेंद्रिय शेती संबंधीत दुस-या राष्ट्रीय परिषदेअमध्ये सर्वमान्य झालेले आहेत .
भूईमूग शेंगा तोडणी यंत्र


Thursday, 19 May 2011 15:20 उन्हाळी हंगामात भुईमूग आणि सूर्यफुलासारखी पीके काढणीसाठी एकाच वेळी येतात. ही पीके काढल्यानंतर त्याच्या शेंगा वेगळ्या करताना मजुरांची मोठी टंचाई भासते. यावर मात करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कृष्णा चरापले यांनी भुईमूगाच्या शेंगा तोडणारे आणि सुर्यफुलाची मळणी करणारे यंत्र बनवले आहे. या यंत्रामुळे त्यांचे भुईमूग आणि सूर्यफुलाच्या काढणीचे काम सोपे झाले आहे.

रसायनशास्त्राचे पदवीधर असलेले कृष्णाभाऊ चरापले हे भोगावती हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत. पंचक्रोशीत ते के बी या नावाने प्रसिद्ध आहेत. विज्ञान शिक्षकाचा पिंड आणि हाडाचा शेतकरी यामुळे शेतात काम करताना येणाऱ्या अडचणींकडे बघण्याची वेगळी दृष्टी त्यांना लाभली होती. त्यांच्या भागात उन्हाळी भुईमूग आणि सूर्यफुलाची शेती केली जाते. काढणीला मजुर न मिळणे हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले. के.बी यांनी यावर उपाय शोधायचे ठरवले. त्यांनी २००५मध्ये सायकलचे भाग वापरून शेंगा तोडणारे यंत्र बनवले. यामधील अडचणींची सुधारणा करत २००८ मध्ये पॅडलवर चालणारे शेंगा फोडणी यंत्र तयार झाले.

या यंत्राला जाळीचा अडीच फूट लांब आणि एक फूट व्यास असणारा ड्रम बसवला आहे. या ड्रमवर एक बाय एक इंचाची जाळी बसवण्यात आली आहे. या जाळीवर आडव्या पट्ट्या बसवण्यात आल्या आहेत. यावरच भूईमूगाच्या शेंगा किंवा सोयाबीनची मळणी केली जाते. हा ड्रम एका स्टँन्डवर फिट करण्यात आला आहे. याला नऊ आणि दिड इंची गिअर बसवण्यात आलेत. पायडल दाबून शाप्टद्वारे गिअरला गती मिळते आणि ड्रम वेगाने फिरतो. या फिरणाऱ्या ड्रमवरच्या जाळीत अडकून शेंगा वेगळ्या होतात. एका एकरातील शेंगा तोडायचे काम तीन मजूर चार दिवसांत पूर्ण करू शकतात.

तीन मजूर एका दिवसात या यंत्राच्या सहाय्याने २५० ते ३०० किलो शेंगा तोडण्याचे काम सहज करतात. हेच काम हाताने करायचे झाल्यास एक मजुर दिवसात ३० ते ५० किलो शेंगा तोडू शकतो. या यंत्राच्या सहाय्याने सूर्यफुलाची मळणी करायची असल्यास ३ मजूर ४ दिवसांत एक एकरातल्या सुर्यफूलाची मळणी करु शकतात. याउलट मजुरांनी या यंत्राशिवाय हाताने एक एकरातल्या सुर्यफूलाची मळणी करायचे झाल्यास ३ मजुरांना १० दिवसांचा कालावधी लागतो. या यंत्रामुळे शेतकऱ्यांचे एकरी १.५ ते २ हजार रुपयांची बचत होते. शिवाय वेळ आणि कष्टांची सगळ्यात जास्त बचत होते.

या भूईमूग तोडणी यंत्रामुळे कृष्णा चरापले यांना गेल्यावर्षी नॅशनल इनोव्हेशन फौंडेशन संस्थेने नवसंशोधनाचे प्रमाणपत्र दिले. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनीही एका प्रदर्शनात त्यांचे कौतुक केले. चपराले यांनी परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी या मशिनची निर्मिती केली. त्याची विक्री ते अवघ्या पाच हजार रूपयांत करतात. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचे कष्ट, वेळ आणि पैसै वाचण्यात मदत झाली आहे. त्यांनी केलेल्या संशोधनाला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळायला हवे. यामुळे के. बी. यांच्यासारखे असंख्य संशोधक देशातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांचे श्रम कमी करतील हे नक्की...

देशी तूप विक्रीतून साधली उन्नती


सांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) येथील तरुण शेतकरी सुहास प्रभाकर पाटील यांनी औदुंबर येथे आदर्श देशी गाईपालन आणि देशी तूप विक्रीतून आपली ठळक ओळख तयार केली आहे. देशी गाईच्या तुपाच्या दर्जेदार उत्पादनामुळे त्यांच्या तुपाला पुणे, मुंबईसह परिसरातून मोठी मागणी आहे. प्रति किलो 1800 रुपये दराने त्याची विक्री होते. केवळ व्यवसाय हा आपला उद्देश नसून, शाश्‍वत व आरोग्यदायी शेती व जीवन हे आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.
श्‍यामराव गावडे

सेंद्रिय पद्धतीच्या शेतीवर भर देणाऱ्या अंकलखोप येथील सुहास पाटील या युवकाने देशी गायपालनाची वाट चोखाळली आहे. भविष्यात मनुष्याचे जीवन आरोग्यदायी, सुखमय व्हायचे असेल, तर देशी गाईच्या तुपाला पर्याय नसल्याचे त्यांचे ठाम मत आहे. आयुर्वेद, अध्यात्म, मानवी जीवन यात देशी गाईच्या तुपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलीकडे धवलक्रांतीमुळे संकरित गाईंचे प्रमाण वाढले, गावोगावी दूध संस्थांचे जाळे वाढले; परंतु कष्ट, वाढता उत्पादन खर्च यांच्या तुलनेत दूध उत्पादकांना समाधानकारक मोबदला मिळत नसल्याचे चित्र आहे, असे सुहास म्हणतात. अनेक ठिकाणी दूध व्यवसायात भेसळीचे प्रमाण मोठे आहे. शुद्ध, चांगले दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळणे दुरापास्त झाले आहे. दर्जेदार उत्पादनाला अधिक किंमत देऊनही ते खरेदी करणारा वर्ग आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सुहास यांनी अधिकाधिक शुद्धता व ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे तूप तयार करून आपला ग्राहकवर्ग तयार केला आहे.

...अशी झाली सुरवात
सुहास हे पूर्वी छायाचित्रकार होते. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. बारा वर्षांपूर्वी अंकलखोप येथे सेंद्रिय शेतीचे एक व्याख्यान आयोजित केले होते. त्या ठिकाणी छायाचित्रे काढण्यासाठी गेले असता सेंद्रिय शेतीविषयीच्या त्या कार्यक्रमातील भाषणाने ते प्रभावित झाले. त्यांना देशी गाईचे संगोपन हा मुद्दा भावला. कार्यक्रमातून ते घरी आले, ते या गाईच्या संगोपनाची प्रेरणा घेऊनच.

चार गाईंवर सुरवात
देशी गाई संगोपनाचा निर्णय पक्का झाल्यानंतर त्यांनी सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातून चार देशी खिलार गाई आणल्या. अनेक ठिकाणी भ्रमंती करून देशी गाईंच्या विविध जातींचा अभ्यास केला. गुजरात राज्यातील जुनागढमधूनही त्यांनी पाच गीर गाई खरेदी केल्या. त्यांचे तूप तयार करून ते विकण्यास सुरवात केली. हळूहळू या तुपाचे महत्त्व व त्याच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्ये विश्‍वास वाढू लागल्याने वेगळा ग्राहक वर्ग तयार झाला. पुणे, मुंबईबरोबर सांगली, कोल्हापूर परिसरात तुपाला मागणी येऊ लागली. मात्र, मागणीएवढा पुरवठा शक्‍य नव्हता, त्यासाठी गाईंची संख्या वाढवली.

मुक्त संचार गोठा पद्धत गाईंची संख्या वाढल्याने मुक्त संचार गोठा पद्धती अवलंबली. एका बाजूला खाद्य व वैरण देण्यासाठी गोठा बांधला. गाईंना पाणी पिण्यासाठी दोन ते तीन ठिकाणी सोय केली. सध्या त्यांच्याकडे लहान वासरांसह 45 ते 50 जनावरे आहेत. पैकी 12 ते 13 गाई दूध देण्यात सक्षम असून, उर्वरित गाभण व विण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मूळच्या अंगभूत वैशिष्ट्यांमुळे गाईंची शारीरिक ठेवण मजबूत आहे.

चारा व्यवस्थापन
संख्येने अधिक असलेल्या गाईंसाठी सुहास यांनी आपल्या शेतात चाऱ्यासाठी हत्तीगवताची लागवड केली आहे. त्याची कुट्टी करून दिली जाते. गाईंचे व्यवस्थापन पाहण्यासाठी दोन मजूर आहेत. यंत्राचा वापर न करता हातानेच धारा काढल्या जातात. गाईंच्या संगोपनात माज ओळखणे व त्या भरवणे हे काम महत्त्वाचे असते. सुहास यांनी गीर जातीचा वळू पाळला आहे. शिफारशीप्रमाणे लसीकरण केले जाते.

तूप निर्मिती
साधारणपणे 30 लिटर दुधापासून एक किलो तुपाचे उत्पादन होते. सुहास यांनी शेतातच प्रक्रिया युनिट तयार केले आहे. एका भांड्यात पारंपरिक जळणावर तासभर दूध उकळले जाते. उकळून थंड केलेल्या दुधाचे रात्री विरजण लावले जाते. रवी घुसळण्याच्या प्रक्रियेला विद्युत मोटारीची गती देऊन ते घुसळले जाते. अर्ध्या तासात लोणी जमा होण्यास सुरवात होते. ते स्वच्छ भांड्यात जमा केले जाते. पुन्हा दुसऱ्या स्वच्छ भांड्यात घेऊन चुलीवर चांगल्या पद्धतीने कडवले जाते. या सर्व संस्कारानंतर शुद्ध तुपाची निर्मिती होते. ते थंड झाल्यानंतर शंभर ग्रॅमपासून एक किलोपर्यंतच्या छोट्या काचेच्या बरण्यांमध्ये ते भरले जाते व त्याची विक्री केली जाते.

उत्पादन व उत्पन्न
उर्वरित ताकाची लग्नसमारंभ किंवा अन्य कार्यक्रमांमधून मठ्ठा तयार करण्यासाठी विक्री केली जाते.
एका वेतातील तूपनिर्मितीचा ताळेबंद सांगायचा तर गाय एका वेतात सुमारे 1000 लिटर दूध देते. त्यातून 40 किलो तुपाची निर्मिती होते. प्रति किलो 1800 रुपये दराने विक्री होत आहे. 72 हजार रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळते. त्यासाठी वैरण, पशुखाद्य, पाणी, जळण, वीज, व्यवस्थापन व अन्य मिळून उत्पन्नाच्या सुमारे 60 टक्के खर्च येतो. गाईच्या शेणखताची प्रति वडी तीन रुपयांप्रमाणे विक्री केली जाते. गोमूत्र प्रति लिटर 20 रुपये दराने विकले जाते. हे अतिरिक्त उत्पन्न मिळते. जोडीला पंचगव्य, दशपर्णी अर्काची निर्मितीही केली जाते. दशपर्णी अर्क प्रति लिटर दीडशे रुपयेप्रमाणे विकला जातो.

जोडीला सेंद्रिय शेती गोठ्याच्या ठिकाणी सुहास यांची सहा एकर शेती आहे. गाईपासूनचे शेणखत सुहास आपल्या जमिनीत वापरतात. रासायनिक खते न वापरता शाळू, गहू, केळी, मोहरी अशी पिके ते घेतात. मोहरी 80 रुपये, शाळू 45 रुपये, गहू 30 रुपये, केळी 20 रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री केल्याचे त्यांनी सांगितले. सेंद्रिय शेती व देशी गाई यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सुहास यांनी आपल्या जीवनशैलीतही बदल केला आहे. ते पूर्ण शाकाहारी असून, चहा, कॉफी, शीतपेये यांचे सेवन करीत नाहीत.

सुहास यांच्या तूपविक्री व्यवसायाबाबत 1) तुपाची विक्री किलोला 1800 रुपयांप्रमाणे, वर्षभर उत्पादन सुरू.
2) केवळ सधन किंवा उच्च उत्पन्न गटातील ग्राहकच हे तूप या किमतीत घेऊन जातात हा गैरसमज असल्याचे सुहास म्हणतात. परिसरातील तसेच मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील सर्वसामान्य ग्राहकही येथे येऊन तूप खरेदी करतो.
काही वेळा त्याठिकाणी जाऊनही माल दिला जातो.
3) गेल्या पंधरा वर्षांत केवळ "माऊथ पब्लिसिटी'द्वारे तुपाचा ग्राहकवर्ग तयार झाला.
4) तूपविक्रीसाठी परवाना, ट्रेडमार्क आहे.
5) पारंपरिक जळणाच्या माध्यमातून, तसेच आयुर्वेदिक संस्कारातून तूपनिर्मिती. शुद्ध व स्वच्छ तूपनिर्मितीवर भर. त्यामुळे जुने ग्राहक राखून ठेवले आहेतच, शिवाय नवे ग्राहकही तयार होत आहेत.
6) शंभर ग्रॅम, पाव किलो, अर्धा किलो, एक किलो पॅकिंगमधून विक्री

संपर्क - सुहास पाटील - 9960195262

आकाशभरारी...किशोर गोरे (अमेरिका)

आपल्या मातीतून बाहेर पडून नव्या मातीत रुजण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं, अशा मराठीजनांची ही 'आकाशभरारी'...या मातीत ते केवळ रुजलेच नाहीत; तर छान बहरले. इतरांनाही आधार बनले. मराठीची ही 'आकाशभरारी' दर गुरूवारी ई सकाळवर प्रसिद्ध होत आहे.मी मुळचा अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव या छोट्याशा गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. मूळ गावी फारसे कधी राहणे  झाले नाही कारण माझे वडील साखर कारखान्यामध्ये नोकरीला होते. आई गृहीणी होती. आम्ही दोघे भाऊ आणि एक बहीण असा परिवार. आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. तुमचा मुलगा चांगल्यापैकी हुशार आहे असे शाळेतील शिक्षकांनी सांगितल्याने आईने मला निरनिराळ्या स्पर्धात्मक परीक्षांना बसविले. त्यावेळच्या त्यांच्या परिस्थितीमुळे आईवडिलांना फार जास्त शिकता आले नाही तरी पण आम्हा भावंडाना त्यांनी जिद्दीने उच्च शिक्षण घेण्यास सर्व प्रकारची मदत केली.

पब्लिक स्कूलचा मोठा वाटा
मी लवकरच महाराष्ट्र शासनाच्या नाशिक येथील शासकीय विद्यानिकेतन (पब्लिक स्कूल) मध्ये दाखल झालो. पैशाअभावी ग्रामीण भागातील हुशार मुलांचे शिक्षण थांबता कामा नये या उद्दात्त हेतूने व दूरदृष्टीने कै. मधुकरराव चौधरी, माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट राज्य यांनी ही पब्लिक स्कू्ल्स सुरु केली होती. नाशिक (आता धुळे), चिखलदरा, औरंगाबाद आणि सातारा ही अशी चार पब्लिक स्कूल्स आहेत की जिथे ग्रामीण भागातील हुशार मुलांना गुणवत्तेवर आधारित प्रवेश देऊन अक्षरश: घडवले जाते. पब्लिक स्कूलची कडक शिस्त, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास होईल असे पोषक वातावरण, विविध प्रकारच्या सोयीसवलती, खेळांचा पुरस्कार करणारे शिक्षक आणि भेदभावरहित वातावरण या सर्वांमुळे पुढे आयुष्यामध्ये मित्र जोडताना मला कसलीही अडचण आली नाही. जेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, अ. वा. वर्टी यांच्या घरीही आम्ही तेव्हा जात असू. या सगळ्याचा सहवास, चांगल्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद नाशिकच्या पवित्र तीर्थक्षेत्री मला बालपणीच लाभले. माझ्या आयुष्याच्या आजवरच्या जडणघडणीमध्ये आईवडिलांच्या चांगल्या संस्कारांबरोबरच पब्लिक स्कूलचा फार मोठा वाटा आहे.

सौमय्या ट्रस्टची शिष्यवृत्ती
पब्लिक स्कूलला असताना दहावीपर्यंत कधीही पहिला नंबर सोडला नाही. बोर्ड परीक्षेमध्ये हिंदी विषयात राज्यात दुसरा आलो. पण पुन्हा आर्थिक परिस्थिती शिक्षणासाठी आडवी येते काय असे वाटू लागले. गुणवत्ता यादीत आलेलो असल्याने, वृत्तपत्रांत फोटो आले असल्याने,  त्यावेळेचे श्रीरामपूरचे आमदार गोविंदरावजी आदिक यांचे पत्र घेउन मुंबईला उद्योगपती कै. श्री. करामशीभाई सोमैय्या शेठजींना वडिलांसह भेटलो. अहमदनगर जिल्यातील त्यांचे साखर कारखाने तेव्हा चांगले चालत होते. ते काही मदत करतील अशी अशा होती, आणि ती अत्यंत खरी ठरली. काही रोख पैशांची आर्थिक मदत देण्याऐवजी त्यांनी उदार मनाने सोमैय्या ट्रस्टची शिष्यवृत्ती देऊन माझ्या शिक्षणाची, राहण्या-खाण्याची संपूर्ण व्यवस्था केली.

प्राध्यापकी आणि स्पर्धा परीक्षा
परदेशी जाणे, वेगळे आणि चांगले काही तरी करणे हे लहानपणापासूनचे स्वप्न मनात तर होतेच. त्यामुळे बारावीनंतर नेहमीच्याच इंजिनियरिंगच्या वाटेने न जाता त्या वेळेला नुकतीच ५-६ वर्ष सुरु झालेल्या कृषी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. पुढे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत दाखल झालो. जुन्नर येथे जागतिक बँकेच्या मदतीने चाललेल्या कुकडी जल वापर प्रकल्पावर (जि. पुणे) काम केले. तेथे मन खरं तर रमत नव्हते. रोजचे वर्तमानपत्रदेखील बरेचदा वाचायला मिळणे अवघड व्हायचे. शेवटी कंटाळून लौकिकार्थाने चांगल्या अशा पाटबंधारे  खात्याचा मी राजीनामा दिला आणि कृषिभूषण डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या सल्ल्यानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सहायक प्राध्यापक, कृषी अभियांत्रिकी पदावर कोल्हापूरला रुजू झालो. तेथे असतांना नोकरीशिवाय फावल्यावेळेमध्ये मग वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या. अवर सचिव, मंत्रालय, वन सेवा व इतर पदांसाठीही निवड झाली. कृषी अभियांत्रिकी पदवीधरांमध्ये महाराष्ट्र किंवा भारतीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देऊन निवड होणारा मी पहिला. मला अभिमान वाटतो की मी या स्पर्धा परीक्षांचा मार्ग दाखवून दिला व त्या नंतर आज बरेच जण यशस्वीरीत्या विविध परीक्षा उत्तीर्ण होउन उच्च पदांवर महाराष्ट्र किंवा केंद्र सरकारच्या सेवेत आहेत.

नोकरी सोडून थायलंडला
चांगल्या सरकारी नोकर्‍या हाती असतानाच मला ऑस्ट्रेलियन सरकारची 'एशियन इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, बँकॉक, थायलंड' येथे मास्टर्स (Masters in Engineering) शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती मिळाली. मी आणि कुटूंबातील सर्व जण आता काय करावे अशा द्विधा मन:स्थितीत होतो. मास्टर्सनंतर फार मोठे काय करणार, चांगली नोकरी सोडून जाताय, पुढे कोठे नोकरी करणार, हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे कशाला लागताय, अशा विविध प्रतिक्रिया आल्या! शेवटी सरकारी नोकरीत बांधून घेऊन चाकोरीबद्ध जीवन जगण्यापेक्षा थोड्या वेगळ्या वळणाने जाऊयात, नवीन जग बघायला मिळेल, नवीन अनुभव येतील आणि कुणी सांगावे आयुष्य कसे, कोठे आणि काय नवीन वळण घेईल हा विचार करून सगळ्यांचे आशिर्वाद घेऊन मी थायलंडला गेलो. त्यावेळी शेवटच्या क्षणी कृषी विद्यापीठाच्या नोकरीतून राजीनामा देऊन जाण्यासाठी व होती ती जबाबदारी इतर कोणाकडे सुपूर्द करण्यासाठी तत्कालीन कुलगुरू कै. डॉ. दत्ताजीराव साळुंखे आणि शिवाजीराव शेंडे यांची फार मोठी मदत झाली.

जिमी कार्टर यांच्याकडून कौतुकाची थाप
बँकॉकच्या संस्थेने दोन वर्षांच्या सर्व शिष्यवृत्ती सोबतच प्रवासाचे तिकिटही दिले होते; त्यामुळे जाणे फार सोपे झाले. जाण्याअगोदरच माझ्या नावाने बँकेत पैसेही जमा झाले होते. हा फार वेगळा अनुभव होता. बँकॉकच्या संस्थेचा परिसर फारच विस्तीर्ण होता, अद्ययावत सोई सुविधा, नवीन मित्रमंडळी आणि मलेशिया, सिंगापूर येथील भटकंती यामुळे ही दोन वर्षे अभ्यासाबरोबरच राजेशाही थाटात गेली. त्यावेळी आपल्याकडे बँकॉकमध्ये होते तसे मोठे रुंद वा चकचकीत रस्ते, मोठी शॉपिंगची दुकाने असे काही नव्हते त्यामुळे थायलंडही खूप पुढारलेला देश वाटायचा. थायलंडमध्ये असताना मी प्रयत्नपूर्वक थाई भाषा शिकलो. मित्र परिवार वाढला, संबध वाढले. त्यामुळे मी केवळ एक भारतीय विद्यार्थी असूनही तेथील लष्करी आणि राजकीय उच्चपदस्थांपर्यंत माझे संबंध पोहोचू शकले. थायलंडच्या ग्रामीण जीवनाशी संबंध आल्यावर तेथील शेंगदाणा उत्पादक शेतकर्‍यांची दुर्दशा कळली. गरीब शेतकर्‍याला राबवून मधले दलाल मात्र गब्बर होत होते. मास्टर्स थिसिस अंतर्गत अभ्यासात मग मी एक असे यंत्र विकसित केले की जेणेकरुन भुईमुगाच्या शेंगापासून प्रतवारी केलेल्या शेंगदाण्यापर्यंतची प्रक्रिया शेतकरी स्वतः सहज करु शकले. स्वतःच शेंगदाणेही विकू लागल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारली. स्थानिक वृत्तपत्रे आणि प्रसिद्धीमाध्यमांनी याची खूप प्रशंसा केली. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जिमी कार्टर 'हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी' तर्फे आशियायी विकसनशील देशात गरीबांना घरे बांधून देण्याचा कार्यक्रम राबवतात. ते मुळचे अमेरीकेतील जॉर्जिया राज्यातील मोठे शेंगदाणा उत्पादक शेतकरी आहेत. त्यामुळेच त्यांना 'पीनट प्रेसिडेंट' अशी उपाधी आहे! त्यांच्या थायलंड भेटीत त्यांना माझ्या यंत्राबद्दल समजल्यावर त्यांनी आवर्जून आमच्या संस्थेला भेट देऊन मी विकसित केलेल्या यंत्राबद्दल माहिती घेतली व माझे कौतूक केले. जवळपास अर्धा तास मी राष्ट्रपती जिमी कार्टर वा सौ. कार्टर यांच्याशी सवांद करत होतो. आयुष्यातला मोठा आनंदाचा आणि गौरवाचा क्षण होता तो. आज मागे वळून बघता मानाची सरकारी नोकरी करण्यापेक्षा थायलंडला मास्टर्ससाठी जाणे हा आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा ठरला.

अपघाताची जखम
दोन वर्षे बाहेर राहून मनात आता घरची ओढ लागली होती. त्यानुसार शिक्षण संपवून मी परत भारतात आलो तेव्हा मला अत्यंत धक्कादायक बातमी कळाली. दोन वर्षांपूर्वी मला बँकॉकला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर निरोप देऊन परत घरी जात असताना माझ्या कुटुंबीयांची गाडी प्रवरा हॉस्पिटल, लोणी जवळच्या परिसरात एका झाडावर आदळल्याने कुटुंबातील बरेच जण जखमी झाले. माझी प्रेमळ आजी आम्हाला सोडून गेली. वडिलांनाही भरपूर मार लागला, दोन महिने खूप त्रास झाला; पण मला ही गोष्ट दोन वर्षे कोणी कळू दिली नाही. मी दूर असल्याने व शिक्षणावर परिणाम होईल म्हणून ही बाब माझ्यापासून लपवून ठेवली. मी जेव्हा शिक्षण पूर्ण करुन दोन वर्षांनी परत गेलो तेव्हाच मला ही दु:खद बातमी कळाली. वडिलांनी वा एकूणच कुटुंबामधीमल सगळ्यांनी दाखवलेल्या धैर्याने माझे मन हेलावून गेले आणि मी पुन्हा परदेशी न जाता भारतातच नोकरी करण्याचा निर्णय घेतला.

जैन इरिगेशनमधील उपयोगी अनुभव
लवकरच 'जैन इरिगेशन' चे अध्यक्ष पद्मश्री डॉ. भंवरलालजी जैन (भाऊ) यांच्या प्रेमळ आग्रहाखातर जळगाव येथे नोकरी सुरु केली. संशोधन व विस्तार, मोठे प्रोजेक्ट्स, महाराष्ट्र मार्केटिंग, अखिल भारतीय मार्केटिंग व शेवटी एक्सपोर्ट विभाग या अशा वेगवेगळ्या क्षेत्रात जबाबदारीने कामे केली. 'जैन इरिगेशन'च्या सुरुवातीच्या काळात आणि नंतरही भाऊंच्या खांद्याला खांदा लावून प्रत्यक्ष फिल्डवर कामे केले. तेथे असताना कोठल्याही कामाला नाही म्हणालो नाही. काम करत गेलो, वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेलो, आणि भाऊंच्या आशिर्वादाने प्रगती करत गेलो. त्या चार वर्षांच्या काळात भारतात आणि जगात भरपूर फिरलो, बरेच काही बघितले, अनुभवले, चांगल्या लोकांशी सबंध आले आणि महत्वाचे म्हणजे त्या काळात असे खूप काही शिकलो की जे आजही आयुष्यात अत्यंत उपयोगी पडत आहे.

अमेरिकेला प्रयाण
तेथे असतानाच सौ. अंजलीशी लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसातच तिला रोटरी फौंडेशन अमेरिकेची शिष्यवृत्ती मिळाली. एकट्या मुलीला कोठे अमेरिकेला पाठवतात काय, लग्न झाले आणि बायकोला एकटीलाच पाठवताय अमेरिकेला, या आणि अशा अनेक प्रतिक्रिया. आमच्या आईवडिलांचे आचार-विचार हे ते राहत असलेल्या सामाजिक वातावरणापेक्षा नेहमीच वेगळे आणि आधुनिक वा पुरोगामी राहिले आहेत. शिक्षणाला आमच्या घरात फार महत्व. तेव्हा भावनिक निर्णय न घेता, सर्व कुटुंबियांच्या संमतीने अंजलीने युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया, फिलाडेल्फिया, अमेरिकेला प्रयाण केले. पुढच्या वर्षी मीही रोटरी फौंडेशन अमेरिकेची 'रोटरी अ‍ॅम्बेसिडोरियल स्कॉलर' ही शिष्यवृत्ती घेउन कॅलिफोर्नियामध्ये गेलो. अंजली अमेरिकेच्या पूर्वेला फिलाडेल्फियात तर मी पश्चिमेला कॅलीफोर्नियायाच्या फ्रेस्नो या ठिकाणी. वर्षातून फक्त दोनदा भेट झाली. फ्रेस्नोच्या 'सेंटर ऑफ इरिगेशन टेक्नॉलॉजी' या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये वर्षभर  'व्हिजिटिंग स्कॉलर' म्हणून काम केले. भविष्यकाळात कॉम्प्यूटर क्षेत्रात काम करायचे हे नक्की करुन त्या संदर्भात माहिती आणि प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. सोबतच वेगवेगळ्या रोटरी क्लब मध्ये जाऊन भारतीय संस्कृती व भारतातील इरिगेशन याबद्दल मी सेमिनार्स दिले. अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो, अमेरिकन कुटुंबात राहिलो व अमेरिकन संस्कृतीचा जवळून परिचय घेतला व भारतात परतलो.

दोन मास्टर्स डिग्रींचे यश
तिकडे अंजली अमेरिकेत मास्टर्स करत होती आणि शिवाय आमची मोठी मुलगी अंकिता हीच्यावेळी गरोदर होती. तिला सोबत पाहिजे आणिमला अमेरिकत जायला काही तरी रीतसर कारण पाहिजे. कसे करायचे? धडपड केली, जॉर्जीया  युनिव्हर्सिटीने पीएचडीसाठी प्रवेशा सोबत शिष्यवृत्ती दिली. अमेरिकत परतलो! आमच्या पहिल्या मुलीचा - अंकिताचा - अथेन्स, जॉर्जिया येथे जन्म झाला. तिचा पायगुण, लवकरच जागतिक बँकेने मला दोन वर्षांच्या शिक्षणासाठी पूर्ण शिष्यवृत्ती दिली. दोन वर्षांत मास्टर्स पूर्ण करायची अट होती. आमची दुसरी मुलगी - अदिती - हिचा जन्म मास्टर्स करत असतानाच Glendale, Arizona येथे झाला. तिचाही पायगुण की मी एकाऐवजी दोन म्हणजे MBA बरोबरच MIM -Masters of International Business Management  (Thunderbird School) अशा दोन मास्टर्स यशस्वी पूर्ण केल्या. शिष्यवृत्तीची अट वेळेतच पूर्ण करून भारतीय विद्यार्थी काय चीज असतात हे जागतिक बँकेला दाखवून दिले. दरम्यान अंजलीने युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया या आयव्ही लीग (Ivy League) युनिव्हर्सिटीमधून तिची दुसरी मास्टर्सही पूर्ण केली होतीच. तेव्हापासून ते आजतागायत मी अमेरिकेत  "Rubbermaid, Lucent Technology, Rhone Polenc Pharma, Philp Morris, Wyeth Pharma, Johnson & Johnson, Comcast, Pfizer अशा निरनिराळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामे केलीत आणि करत आहे. तर सौ. अंजली IBM, Georgia Pacific व इतर कंपन्यासाठी काम करुन सध्या फिलिप्स लायटिंग कंपनीत काम करतेय. अमेरिकन कंपन्यांना त्यांनी त्यांचा व्यवसाय चांगला कसा करावा, झटपट निर्णय घेता कसे घेता यावेत या सगळ्यांचे संगणक प्रणालीचा वापर करून व्यवस्थित अ‍ॅनॅलिसिस कसे करावे, त्याचा उपयोग कसा करावा आणि त्याद्वारे कंपनीची एकूणच गुणवत्ता कशी वाढेल याविषयीचे मार्गदर्शन करतो. 

'मस्तानी' आईस्क्रीम
कोकणातील हापूस आंबा अमेरिकेत आणून 'मस्तानी' आईस्क्रीम अमेरिकेत बनवण्याचा उद्योग श्री. राजीव घोरपडे यांनी नवीनच सुरु केला व लगेच मला मदतीला घेतले. अल्पावधीतच आम्ही यात चांगले यश मिळवले. अमेरिकेत कनेक्टीकट राज्यात आमचे उत्पादन केंद्र आहे. अमेरिकेतील तेरा राज्यांमध्ये शंभराच्या वर दुकानांमध्ये आमचे 'मस्तानी' ब्रॅन्ड (www.mastani.com) हे आईस्क्रीम  विकले जाते. 'मस्तानी' या नावाने आंबा, फालुदा कुल्फी, साफ्फ्रोन पिश्ताशिओ, ऑरेंज पैनाप्पाल, सिताफळ असे स्वाद वेगवेगळ्या आकारात व वजनात बाजारात उपलब्ध आहेत. सोबतच अमेरिकन, भारतीय आणि आशियायी समाजातील विविध लहान मोठ्या कार्यक्रमांमध्ये, लग्न पार्ट्यांमध्ये व हॉटेल्सना आम्ही २०-२५ प्रकारची आईसक्रीम (मोठे डबे) पुरवतो. बाजारात विकल्या जाणारया इतर आईस्क्रीमपेक्षा उच्च दर्जाचे आणि चांगल्या चवीचे आईसक्रीम अशी मस्तानी आईस्क्रीमची ख्याती आहे. आमच्यापेक्षा आमचे समाधानी ग्राहकच याबद्दल चांगले सांगतील. 'समाधानी ग्राहक' एकदा चव समजल्यावर परत परत आईसक्रीम घेतात, आनंदाने इतरांनाही आवर्जून सांगतात. आमची कंपनी तशी फारच छोटी आहे. रेडिओ, वृत्तपत्रे वा मासिकांमध्ये जाहिराती देणे आम्हाला परवडत नाही म्हणण्यापेक्षा त्याचा तसा फारसा उपयोगही होत नाही. आईस्क्रीमची चव घेऊन बघणे हाच उत्तम मार्ग. त्यामुळे मस्तानी आईसक्रीमची चव घेतलेला 'समाधानी ग्राहक' हीच आमची सर्वात मोठी जाहिरात आहे, आमच्यासाठी फार मोठी पावती आहे. एक गोष्ट प्रामाणिकपणे नमूद केली पाहिजे की मस्तानी आईस्क्रीमचे नाव येथे अमेरिकेत घरोघरी पोहोचविण्यासाठी आम्हाला विविध भारतीय  भाषिक असोशिएशनची, मंडळांची, आणि विशेषतः विविध शहरातल्या मराठी मंडळांची व बृहन्महाराष्ट्र मंडळाची फार मोठी मोलाची मदत झाली आहे.

रिटेल चेन उभारण्याचा विचार
यापुढे अनेक फळांच्या स्वादांची लस्सी बाजारात आणण्याचा विचार आहे. फ्रोजन, रेडी टु इट, विविध बेव्हरेजेस, व 'हॉट अ‍ॅन्ड कोल्ड' संकल्पनेच्या प्रकारात रिटेल चेन्स उभारण्याचा मानस आहे. आमची धडपड आणिमिळालेले यश पाहुन अनेक सहकारी/मित्र व अन्य लोकही या व्यावसायिक योजनेमध्ये सहभागी व्हायला तयार आहेत. तसेच मध्य पूर्व आखाती देश व युरोपीय देशांमधून विचारणा होत आहेत. खरे तर आमची डिलर्सची चांगली यंत्रणा येथे अमेरिकेत तयार असल्यामुळे कोणताही नवीन माल वा पदार्थ मार्केटिंग करणे वा त्याचे वितरण करणे तसे फार अवघड नाही. ज्यांना आपल्या चांगल्या मालाबद्दल खात्री आहे आणि परदेशात विकला जावा अशी तीव्र मनीषा आहे अशा महाराष्ट्रातील, विशेषतः लहान मोठ्या व्यावसायिकांना वा उद्योगाना या तयार यंत्रणेचा चांगला उपयोग होऊ शकेल. अमेरिकेपेक्षा भारतातच सध्या गुंतवणुकीसाठी आशादायक वातावरण आहे. तेंव्हा  भारतात/महाराष्ट्रात छोटे मोठे प्रोजेक्ट सुरु करण्याची वा त्यात गुंतवणूक करण्यासाठी आम्ही आणि आमची येथील बरीचशी मित्र मंडळीही तयार आहे, प्रोजेक्ट संकल्पना फक्त चांगली पाहिजे. अशा व्यावसायिकांशी वा उद्योगांशी तशा स्वरुपाची व्यावसायिक बोलणी करण्यासाठी आम्ही उत्सुक राहू.

संधीशी सांगड हवी
अशाच प्रकारचे किंवा याहूनही वेगळे असे उपक्रम भारतातही राबवण्यासाठी पाहणी सुरु आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेची सद्य परिस्थिती लक्षात घेता अमेरिकन सरकार निर्यात करणाऱ्या कंपन्यांना मोठ्या सवलती देण्याच्या विचारात आहेत. येथील बरेचसे उद्योग त्यांच्या क्षमते एवढे चालत नाहीत. असे उद्योग लीजने किंवा विकत घेऊन उत्पादन करता येऊ शकेल. भारतासह विविध देशातील निर्यातीच्या संधी यांची योग्य सांगड घातल्यास येथे अमेरिकेतच किंवा भारतामध्ये उद्योग उभारणे लाभदायक राहिल असा अंदाज आहे. त्या दिशेने प्रयत्न चालू आहेत. 

मन रेंगाळते भारतात...
गेली १५-१६ वर्षे अमेरिकेत स्थायिक आहे. व्यवसाय, नोकरी व्यवस्थित चालू आहे. जमेल तसे बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्थानिक मराठी मंडळ तसेच विविध भारतीय असोशिएशनच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतो. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या २००९ च्या फिलाडेल्फिया अधिवेशनात चांगला सहभाग घेतला होता. इतके दिवस येथे राहूनही अमेरिकन म्हणून कधी रुळलो नाही. मन तिकडे भारतात रेंगाळते, म्हणुनच भारतात व्यावसायिक आणि सामाजिक कामांमध्ये मला भाग घ्यायचा आहे. जानेवारी २००८ मध्ये भारतात आलो तेव्हा भंवरलालजी जैन यांचा अध्यक्षतेखाली जळगांवला ' सज्जनशक्ती' या संकल्पनेवर चर्चा झाली. तिथेच 'ग्रंथाली वाचक चळवळी' चे श्री दिनकर गांगल, पोलीस आयुक्त डॉ. सुरेश खोपडे (आय. पी. एस.) यांच्या सोबत 'स्वदेश' या डॉ. भुषण केळकर  संपादित पुस्तकातील उद्योजक वा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांचा परिचय झाला.  अभय पाटील (पुणे, शैक्षणिक आणि सामाजिक), अमर देसाई (उद्योजक), केदार टुमणे (उद्योजक, पुणे), सदानंद भागवत (रत्नागिरी, शैक्षणिक), डॉ. भारत करडक (नगर, संशोधन आणि सामाजिक), चेतन देशमुख (अ‍ॅनिमेशन आणि थ्री डी फिल्म तंत्रज्ञान क्षेत्र) यांसारखे मित्र मिळाले व २५ हुन अधिक तरुणांशी संपर्क होऊ शकला. अजूनही अखंडपणे नवीन लोकांशी संपर्क होतोच आहे.  भारतात, येथे अमेरिकेत व जगभरच्या शालेय, महाविद्यालयीन आणि इतर सहकारी मित्रांशी, तरुणांशी माझा नेहमीच संपर्क असतो. खरं तर चांगला जनसंपर्क, चाकोरीबद्ध जीवनाच्या बाहेर जाऊन मनाला पटेल तसे करण्याची वृत्ती व अखंड धडपड, आणि सामान्य व्यक्तीपेक्षा चांगली स्मरणशक्ती या माझ्या जमेच्या बाजू आहेत असे बरेच मित्र म्हणतात.

डॉ. श्रीकांत जिचकार यांची आठवण
तरुणांबाबत बोलताना या ठिकाणी मला डॉ. श्रीकांत जिचकार (श्रीकांतदादा) यांची खूप तीव्रतेने आठवण होतेय. ते माझे मित्र पण, मला मोठ्या भावासारखे होते. इतकी उच्च शिक्षित व्यक्ती पण कधी मोठेपणाचा वा कशाचाही अहंकार नाही. न्यूयार्कला यायचे तेव्हा भेट व्हायचीच, आवर्जून घरी यायचे. एके वेळी तर त्यांच्या मित्राकडे राहत असताना मला आवडते म्हणून स्वतः सकाळी लवकर उठून वांग्याची भाजी व साबुदाणा खिचडी करुन ठेवलेली. आम्ही दिवस भर बाहेरून फिरून आलो तर कोठे बाहेर जेवायला जाण्याऐवजी घरीच जेऊया, जेवण तयार आहे असे सहजच सांगितले. आम्हाला वाटले दादा गम्मत करताहेत, पण नाही. त्यांनी हे सगळे कधी केले याचा कोणालाही पत्ताही नव्हता. न्यूजर्सीच्या स्थानिक मित्रमंडळात आम्ही त्यांचे सेमिनार आयोजित केले होते. त्या वेळेला महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची १०-१२ वी नंतरच्या करियर बद्दलची सेमिनार्स/भाषणे खूप गाजत होती. विध्यार्थांच्या बरोबरच त्यांच्या पालकांचीही खूप मोठी गर्दी असायची. त्यांच्याकडे १२-१३ हजार विद्यार्थ्यांचे/तरुणांचे ईमेल होते. ऑफिसमध्ये ३-४  जण तर त्यांना आलेल्या पत्रांना आणि ई मेलना उत्तरे देण्याचीच कामे करायचे. त्यांच्या या कार्याला हातभार म्हणून पुढे आम्ही त्याच्या नावाने (www.shrikantjichkar.com) वेबसाईट तयार केली. ही वेबसाईट महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या शहरांपासून ते लहान खेडे गावापर्यंतच्या तरुणांसाठी एक चांगले व्यासपीठ व्हावे, त्यातून विचारांची देवघेवाण व्हावी, दर आठवड्याला एक न्यूजलेटर प्रसिद्ध व्हावे की ज्यात वेगवेगळ्या करियर बद्दल माहिती असावी, त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर लेख असावेत अशा एक ना अनेक कल्पना होत्या श्रीकांतदादांच्या. पण नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. जून २००४ मध्ये त्यांच्या आकस्मिक निधनाने हे सर्व ठप्प झाले. त्यांच्या आदरापोटी आणि स्मृतीसाठी आम्ही ही वेबसाईट फक्त चालू ठेवलीय. त्यामध्ये बदल काही होत नाहीत. परंतु, या वेबसाईटचा श्रीकांतदादानी मनात योजिलेल्या कार्यासाठी एक माध्यम होणे, त्याचा योग्य वापर होणे आणि ते करण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांनी पुढे येणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, आज त्याची अत्यंत गरज आहे.

न्यूनगंड नका बाळगू
आयुष्यात बरेचदा निराश व्हायला झाले. चांगली सरकारी नोकरी सोडून जाणे चांगले का? मास्टर्स करून काय मोठे दिवे लावणार? जागतिक बँकेची शिष्यवृत्ती काय कोणालाही मिळते काय? अमेरिकेला जाणे सोपे आहे का? कशाला प्रयत्न करता? अशी बोलणी वेळी ऐकावी लागली. पण इच्छा असेल तर मार्ग दिसेल याप्रमाणे प्रामाणिकपणे कायम प्रयत्न  करत गेलो, नवीन वाटा धुंडाळल्या. आपण एका लहानशा खेड्यातून आलो, आर्थिक परिस्थिती चांगली नाही किंवा मराठी माध्यमाच्या शाळेतच फक्त शिक्षण घेता आले असा कोणत्याही प्रकारचा न्युनगंड कधी मनात बाळगला नाही. आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढताना आपण कोठून आलो, कोणत्या कौटुंबिक पातळीतून आलो यापेक्षा कोठे जायचेय (destination) याचाच नेहमी विचार केला. वेळोवेळी चार-चौघांचा सल्ला घेतला, परंतु काही ठराविक ध्येय पुढे ठेवून स्वतःला, मनाला पटले तसे प्रयत्न करत गेलो आणि प्रयत्नांती परमेश्वर या उक्ती प्रमाणे यशही मिळत गेले. ऑस्ट्रेलियन सरकारची एआयटी शिष्यवृत्ती, नंतर रोटरी फौंडेशन अमेरिकेची 'रोटरी अ‍ॅम्बेसिडोरियल स्कॉलर' ही दुसरी, तर जागतिक बँकेची तिसरी, अशा तीन आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती माझ्यासारख्या एका खेड्यातल्या, सामान्य घरातल्या मुलाला मिळाल्या/मिळविता आल्या. लहानपणापासून ते इंजिनिअरिंग व मॅनेजमेंटच्या तीन मास्टर्सपर्यंतचे सगळे उच्च शिक्षण हे केवळ वेगवेगळ्या शिष्यवृत्ती मिळत गेल्यानेच होऊ शकले.

कुटुंबाविषयी थोडेसे...अमेरिकेत शिकून नोकरीत चांगली प्रगती करता आली, तसेच  थोडी व्यावसायिक प्रगती करता आली. दिसायला हे सगळे चांगले होत असताना वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या. कामानिमित्त अंजलीला आणि मला अमेरिकेतच वेगवेगळ्या ठिकाणी बरीच वर्षे एकएकटे राहायला लागले. महिन्यातून एक-दोनदाच भेटी व्हायच्या. या दरम्यान आमच्या मुली पुण्याला होत्या. येथे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते की इंग्रजीमध्ये जसे 'Blessings in disguise' म्हणतात तसेच इथे आमच्याबाबतीत म्हणजे मुलींच्या बाबतीत झाले. पुण्याला त्यांच्या मामा-मामी आणि आजीकडे तसेच काही काळ महाडला मोठ्या, संयुक्त कुटुंबात वाढल्यामुळे लहानपणातच त्यांना सर्व नाती-गोती, आपले वेगवेगळे सणवार व एकूणच मराठी/भारतीय संस्कृतीची चांगली ओळख झाली. त्या सर्वांनी मुलींवर फार चांगले संस्कार केले. मुली आज उत्तम मराठी बोलतात व काही अंशी वाचातातही. त्यांच्याकडून तेथे वैदिक गणित पद्धतीचा अभ्यास करवून घेतला गेल्यामुळे अमेरिकेत आल्यावर त्यांना गणित आणि सायन्स विषय तसे सोपे गेले व अजून वाटतातही. मोठी मुलगी अंकिताने तर शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त सायन्स ऑलिम्पियाडच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन संपूर्ण अमेरिकतील पन्नास राज्यांमधून येणाऱ्या मुलांमध्ये सलग दोन वर्षी ओळीने सुवर्ण आणि रौप्य पदके मिळविली.  येथील चिन्मया मिशन संस्कार वर्गामध्येही भाग घेऊन दोघींनीही गीता पाठांतराची अनेक बक्षिसे मिळविली आहेत. मला जीवनात आतापर्यंत आईवडील, मेहुणे-बहिण-भाऊ, पत्नी-मुली व जवळच्या नातेवाईकांसह अनेक मित्रांच्या आणि अनामिक लोकांच्या सदिच्छांचा लाभ झाला आहे. त्या सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठीही अगदी फार मोठे नाही तरी काही करायचे आहे. तरुणांशी संवाद करून त्यांना थोडे फार काही सांगू शकलो, त्यांच्या मदतीने काही रचानात्मक आणि विधायक कामे करू शकलो, तर तीही करायची आहेत. झालेच तर भारतातून अमेरिकेत वा इतर देशांमध्ये आयात-निर्यात व्यापार करण्याची इच्छा असणाऱ्या  परंतु योग्य मार्ग माहिती नसलेल्या तरुणांना, छोट्या उद्योगांना मदत करण्याचीही इच्छा आहे...

संपर्क:
किशोर गोरे (प्रिन्स्टन, न्यू जर्सी, अमेरिका)
संपर्कः kgore2001@yahoo.com
मोबाईल फोन नंबर: ६०९-७२१-२३०८

('आकाशभरारी' मालिकेतील यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी 'ई सकाळ'च्या सर्च बॉक्समध्ये टाईप करा akashbharari)

सेंद्रीय शेती-प्रमाणीकरण आणि नियमावली

सेंद्रीय शेती सद्या सुमारे ११० देशामध्ये केली जात असून शेत जमिनीतील तीचा हिस्सा वाढतो आहे.

सेंद्रीय अन्नाच्या बाजारपेठा - युनायटेड स्टेटस, . युरोपियन युनियन (जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम, युनायटेड किंगडम) आणि जपान या सेंद्रीय अन्नाच्या उत्पादनासाठी मुख्य बाजारपेठा आहेत.सेंद्रीय उत्पादनाची निर्मिती करणारे आशियातील प्रमुख देश आहेत, चीन, युक्रेन, भारत, इंडोनेशिया आणि इस्त्राईल.

सेंद्रीय बाजारपेठ स्थिर गतीने वाढत असताना त्यासंबधी सेंद्रीय प्रमाणीकरण (सर्टीफिकेशन) आणि नियमावली अधिकाधिक कठोर आणि अनिवार्य होत आहे. सेंद्रीय प्रमाणीकरण हि सेंद्रीय अन्नाच्या आणि इतर सेंद्रीय कृषि उत्पादनाच्या उत्पादकासाठी एक प्रमाणीकरण प्रक्रिया आहे. सर्वसाधारणप्रमाणे, सेंद्रीय अन्नाच्या उत्पादनाशी थेट संबध असलेल्या कोणत्याही व्यवसायाला, उदाहरनार्थ, बियाण्याचे पुरवठादार, शेतकरी, अन्न प्रक्रियादार, रिटेलर्स आणि रेस्टोरन्टन्सला प्रमाणपत्र मिळू शकते. प्रत्येक देशानुसार त्यासाठी असलेल्या आवश्यतेनुसार मध्ये बदल होतो आणि सर्वसाधारणतः त्यामध्ये पिकविणे, साठविणे, प्रक्रिया करणे, पॅकेजिंग करणे आणि वाहतुक करणे इत्यादी बाबतच्या उत्पादन मानकांचा समावेश असतो.त्याचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.

कृत्रिम रासायनिक निविष्ठा (उदा ऱासायनिक खते, किटकनाशक, प्रती जैविके, अन्नपुरके वगैरे) आणि जनुकीय दृष्टया बदल केलेले सजिव टाळणे.
  • जी जमीन रसायनापासून अनेक वर्षे (बहुधा तीन) मुक्त आहेत अशा जमिनीचा वापर
  • उत्पादनाच्या आणि विक्रीच्या तपशिलवार नोंदी ठेवणे. (लेखा परिक्षा नोंदी)
  • सेंद्रीय उत्पादने  अप्रमाणीत उत्पादनापासून काटेकोरपणे वेगळी ठेवणे.
  • ठराविक कालावधीने उत्पादनाच्या जागेवरच तपासणी करवून घेणे.
प्रमाणीकरणाचा हेतु
जगभरात सेंद्रीय अन्नालाअसलेल्या वाढत्या मागणीमुळे प्रमाणपत्री करणाची आवश्यकता भासत असून सेंद्रीय व्यापारातील गुणवत्ता आश्र्वासित करण्यासाठी आणि फसवणूक आळणे व त्यामागील हेतु आहे. ग्राहकांसाठी प्रमाणीत सेंद्रीय हा शिक्का उत्पादनाच्या दर्जाची खात्री देतो. प्रमाणपत्रीकरण हे वस्तुतः एक विपणन साधन असून त्याचा उद्देश  सेंद्रीय उत्पादनाची विक्री ग्राहकांना करणे सुलभ आणि नियमीत व्हावे असा आहे.

प्रमाणपत्रीकरण प्रक्रिया
एखादे शेत प्रमाणीत करुन घेण्यासाठी शेतक-यांला शेतीच्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त इतर अनेक कामे करावी लागतात.
सेंद्रीय मानकांचा अभ्यास  करावा लागतो. ज्यामध्ये शेत मालाचे साठवण, वाहतुक आणि विक्री अशा शेतीच्या प्रत्येक बाबतीत आवश्यकतांच्या तपशिलाने समावेश असतो.

  •   अनुपालन- शेतावरील सुविधा आणि उत्पादनाच्या पध्दतीनी मानकांचे अनुपालन करणे आवश्यक असते. ज्यामध्ये सुविधामध्ये बदल करणे, स्त्रोतामध्ये आणि पुरवठादारामध्ये बदल करणे वगैरे आवश्यक ठरु शकतो.
  •   लेख प्रविष्ठ करणे - व्यापक कागदोपत्री व्यवहार करावा लागतो. शेताच्या इतिहासाचा तपशिल, सद्याचा तपशिल आणि बहुदा मातीच्या व पाण्याच्या चाचण्याचे निष्कर्ष नोंदवावे लागतात.
  •   नियोजन- एक लेखी वार्षिक उत्पादन योजना सादर करावी लागते. त्यामध्ये बियाण्यापासून विक्रीपर्यत सर्व तपशिल द्यावा लागतो. बियाण्याचे स्त्रोत, शेताचे आणि पिकाचे स्थान, खते, आणि किटकनाशक, कापणीच्या पध्दती, साठवणाचे स्थान वगैरे.
  •   तपासणी - शेतातील वार्षिक तपासण्या प्रमाणपत्र देण्या-याकडून केल्या जातात. त्यामध्ये प्रत्यक्ष दौरा, नोंदीची तपासणी आणि तोंडी मुलाखत यांचा समावेश असतो.
  •   शुल्क - वार्षिक तपासणीसाठी /प्रमाणपत्रासाठी शुल्क अकारण्यात येते ते वेगवेगळया देशामध्ये वेगवेगळे असतो.
  •   नोंदी ठेवणे- कोणत्याही वेळी सर्व कामाची नोंद करणा-या लेखी, दैनदिन कृषि आणि विपणन नोंदी तपासणीसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
या व्यतिरिक्त थोडीशी पुर्वसुचना देवून किंवा न देताही तपासण्या केल्या जातात  आणि ठराविक चाचण्या  (उदा ज़मिनीच्या पाण्याच्या किंवा रोपाच्या उतीच्या ) घेतल्या जातात. पाहिल्यांदा शेताला प्रमाणपत्र देताना जमिन निविष्ठा पदार्थापासून (कृत्रिम रसायने) काही ठराविक वर्षे मुक्त असणे ही प्राथमिक गरज असते. बहुदा तीन वर्षाच्या या कालावधीसाठी, पारंपारिक शेताने सेंद्रिय मानकांचे पालन करणे अत्यावश्यक असते य़ाला संक्रमण काल असे म्हणतात. संक्रमण कालातील पिकांना पुर्णतः सेंद्रीय समजले  जात नाही. ज्या शेतात अगोदरपासूनच कॅमिकलशिवाय पिके घेतली जातात त्याला सामान्यतः विनाविलंब प्रमाणपत्र मिळते.
शेता व्यतिरिक्त इतर परिचालनासाठीही प्रमाण पत्र अशाच रितीने देण्यात येते. तेथे घटक द्रव्यावर आणि इतर निविष्ठावर तसेच प्रक्रियेच्या हाताळणीच्या स्थितीवर भर दिला जातो.

जागतिक प्रमाणीकरण संस्था
बहुतेक देशामध्ये सेंद्रिय मानके शासनामार्फत तयार करण्यात येतात  आणि शासनाची त्यांच्यावर देखरेखही असते. युनायटेड स्टेटस,युरोपियन युनियन आणि जपान या तीन प्रमुख सेंद्रीय बाजारपेठामध्ये सेंद्रीय कायदे समावेशक स्वरुपाचे आहेत आणि सेंद्रिय ही संज्ञा वापरण्याची मुभा फक्त प्रमैंणीत उत्पादकांनाच आहे. सेंद्रीय कायदे नसलेल्या देशामध्ये शासकीय मार्गदर्शक तत्वे अस्तित्वात असतात ड्ढिंवा नसतातही आणि प्रमाणपत्रीकरणाचे काम गैर व्यापारी संस्था किंवा खाजगी कंपन्या करतात.

प्रमुख देशातील प्रमाणीकरण यंत्रणा
. क्र.
देश
प्रमाणीकरण यंत्रणा / संस्था
युरोपियन युनियन
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑरगॅनिक ऍग्रीकल्चर मुव्हमेटस (FOAM)
युनायटेड किंगडम
युके रजिस्ट्रर ऑफ ऑरगॅनिक फुड स्टॅर्डस (UKROFS)
युएसए
नॅशनल ऑरगॅनिक प्रोग्रॅम  (NOP)
जपान
जपानीज ऍग्रीकल्चर स्टॅडर्ड  (JAS)
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया क्वारंटाईन ऍन्ड इन्स्पेक्शन र्सव्हिस (AOIS)
भारत
नॅशनल प्रोग्रॅम फॉर ऑरगॅनिक प्रोडक्शन (NPOP)

भारतामध्ये शासनाने खालील सहा संस्था प्रमाणपत्रीकरण संस्था म्हणून अधिस्विकृत करण्यासाठी नेमस्त केलेल्या आहेत.
१.                  अपेडा
२.                 टी बोर्ड
३.                 स्पायसेस बोर्ड
४.                 कॉफी बोर्ड
५.                कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड
६.                  डायरेक्टोरेट ऑफ कॅश्यु आणि कोको

सेंद्रीय शेतीमालाला असलेली निर्यात बाजारपेठ ही भारतातील सेंद्रीय शेतीची मुख्य प्रेरणा आहे. भारतातुन ३१ सेंद्रीय उत्पादने निर्यात होतात. भारत सेंद्रीय चहाचा निर्यातदार म्हणून प्रसिध्द आहे. सेंद्रीय भात, भाज्या, कॉफी तेलबिया, गहु आणि कडधान्ये यांनाही चांगला प्रतिसाद आहे. फळाच्या पिकांपैकी केळी, आंबा आणि संत्री ही सर्वाधिक पसंतीची सेंद्रीय उत्पादने आहेत.

भारतातील सेंद्रीय उतपादनांची टक्केवारी

चहा
२४ टक्के
भात
२४ टक्के
फळे व भाजीपाल
१७ टक्के
गहु
१० टक्के
कापुस
८ टकके
मसाले
५ टक्के
कॉफी
४ टक्के
कडधान्य
३ टक्के
 काजू
३ टक्के
इतर
२ टक्के

सेंद्रीय माल आयात करणारे प्रमुख देश
जर्मनी      -    फळे व भाज्या, चहा कॉफी मसाले
युके         -    फळे व भाज्या
नेदरलँड      -    ताजी फळे व भाज्या, धान्य, तृणधान्य चहा व वनोऔषधी

भारतामध्ये सेंद्रीय माल प्रमाणपत्रीकरण करण्यासाठी NPOP अंतर्गत ११ संस्थाना अधिस्विकृत प्रमाणीकरणाचे काम करतात त्यामध्ये महाराष्ट्रातील संस्थाचा समावेश आहे.
1.                 BVQI (INDIA) PVT. LTD. MUMBAI
2.                 ECOCERT SA (INDIA BRANCH ) AURANGABAD
3.                 INTERNATIONAL RESOURCES FOR FALRER TRADE MUMBAI
4.                 NATIONAL ORGANIC CETIFICATION ASSOCIATION (NOCA) PUNE

भारतातुन ६४ निर्यातदारांमार्फत सेंद्रीय माल निर्यात केला जातो.त्यामध्ये ७ निर्यातदार महाराष्ट्रातील आहेत.
1                   Amit  green Auro P.Vt. Ltd.  MUMBAI
2                   Bheda Brothers Mumbai
3                   H Beda & Co. Mumbai
4                   Indway International Mumbai
5                   Mahesh Agri exim Pvt. Ltd. Mumbai
6                   Vidarbha organic farmers Association Yevatmal
7                   Weikfield Product Co. Pune
सेंद्रीय प्रमाणपत्रीकरणाबाबतची सविस्तर माहिती अपेडाच्या (www.apeda.com) वर उपलब्ध आहे.
सेंद्रीय कषि माल उत्पादन करण्याकरीता शेतक-यांनी अपेडाकडे अधिकृत संस्थेमार्फत प्रमाणीरण घेवूनच करणे आवश्यक आहे.

कृषि माल स्वच्छता व सुरक्षितता HACCP (हॅसेप) प्रमाणीकरणाची आवश्यकता

जागतिक बाजारपेठेत कृषि मालावर प्रक्रिया करण्याकरीता चांगल्या उत्पादन पध्दतीचा वापर करुन कृषि प्रक्रिया करीता हॅसेप प्रमाणीकरण करुन घेतलेल्या कृषि व कृषि प्रक्रिया मालाच्या वापरास ग्राहकाची मागणी वाढत आहे.
ग्राहकामध्ये आरोग्याच्या दृष्टिने जागरुकता निर्माण होत आहे. येथून पुढे ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातुन स्वच्छ व सुरक्षित कृषि प्रक्रिया माल उत्पादन व विक्री करीता हॅसेप प्रमाणीकरणाची मागणी वाढत आहे.

हॅसेप म्हणजे काय?
HACCP: Hazard Analysis Criticle Control Point.

हॅसेप प्रमाणीकरणाची आवश्यकता का निर्माण झाली?
 अन्न प्रक्रिया क्षेत्रात अनेक वेळा निषकाळजीपणा केल्यामुळे दरवर्षी अन्नाव्दारे विषबांधाची प्रकरणे आढळून येत आहेत. तसेच उत्पादनाच्या अनेक पातळीवर सुक्ष्म जंतुचा सर्जन्य झाल्यामुळे खाद्यपदार्थ सुरक्षित राहात नाहीत. त्यामुळे रोगजंतुचा सर्जन्य होतो. रोगजंतुचा प्रादुर्भाव प्रामुख्याने खालील नमुद केलेल्या बॅक्टेरीया,जिवाणू विषाणू, यांच्याव्दारे होतो त्या तपशिल खाली दिलेला आहे. त्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
बॅक्टेरीया :           Clotridium botulinum
                     Bacillus cereus
                     E.coli
                     Salmonella spp.
                     Shigella spp.
 
जिवाणू  :            Hepatitis A & E
                     Norwalk virus group
 
प्रोटोझा आणि पॅरासाईट : cryptosporidium Parvum
 
Rntamoeba histolytica
                          Giardia Lamblia
                     Toxoplasma gondii
                     Ascaris Lumbricoides
 
बुरशी आणि मोल्ड :   As pergillus flavus
                     As pergillus Parasiticus
                     As pergillus   ochraceus
                     Pencillum islandicum
                     Fusarium solani
                     Fusarium sporotrichoides
 
वरील सर्व बुरशी, जिवाणू, विषाणू इत्यादी रोगाचा प्रादुर्भाव पाणी, माती, वनस्पती, हाताळणी करणारे कामगार व साठवणुक, वाहतुकी या माध्यमातुन कृषि मालाव्दारे माणसाना व प्राण्याना होता. तो होवू नये म्हणून कृषि मालाचे उत्पादन, काढणी, हाताळणी, प्रक्रिया करण्याकरीता स्वच्छता व सुरक्षितेला अन्यन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. त्याची ग्राहकांना हमी देण्यासाठी हॅसेप प्रमाणीकरणास महत्व प्राप्त झाले आहे.

हॅसेप प्रमाणीकरणाचे मुख्य तत्वे.
१. विश्लेषण : अन्नपदार्थ निर्माण प्रक्रियेतील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन योग्य ती उपाययोजना साधने त्याचे प्राथमिक आवस्थेत योग्य ती  दक्षता घेण्याकरीता नियोजन करणे.
२.सुरक्षित नियंत्रण : नुकसान टाळण्यासाठी नेमके निर्णायक क्षण ठरविणे
 
३. विशेष मर्यादा : नेमक्या निर्णायक क्षणाच्या ठिकाणी योग्य ती सुविधा काळजी घेण्यासाठी सुविधा निर्माण करणे.
४. नियंत्रण : गुणवत्ता पुर्ततेसाठी देखरेख करणे त्याची प्रक्रिया निश्च्िात करणे.
 
५. सुधारणा : सुचित केलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे.
 
६. तपासणी : शिफारस केलेल्या उपाय योजना लागू पडतात किंवा नाही यासाठी तपासणी तथा चाचणी घेणे त्यानुसार त्याची अमलबजावणी करुन घेणे.
 ७. रेकॉर्ड : प्रक्रियाशी निगडीत इत्यंभुत गोष्टीची कागदोपत्री माहिती नोंद ठेवणे.
 
हॅसेप प्रमाणीकरणाचे काम खालील प्रमाणे करण्यात येते.
१.      हॅसेप टिम तयार करणे
२.     प्रोडक्टसची निवड करणे
३.     अंतिम प्रोडक्टस कोण वापरणार याबाबतची खात्री करुन घेणे
४.     उत्पादनाचा आराखडा तयार करणे
५.    प्रत्यक्ष उत्पादनाच्या ठिकाणी भेट देवून आराखडयाप्रमाणे खात्री करुन घेणे
६.      उत्पादन प्रकियेतील घातक बाबीवर योग्य ते व्यवस्थापन करण्याकरीता नियोजन करणे
७.    क्षण नियंत्रीत करण्यासाठी सीमा ठरविणे
८.     प्रत्येक क्षण नियमीत ठिकाणाकरीता योग्य त्या सुविधा निर्माण करणे.
९.      सुचित केलेल्या पध्दतीचा संनियंत्रण करणे.
१०.  योग्य त्या सुधारणा करण्याकरीता नियोजन करणे.
११.   सर्व पध्दतीचा तपासणी सुविधा निर्माण करणे
१२.  कागदपत्रे व नोंदणी संदर्भात मार्गदर्शन करणे.

हॅसेप प्रमाणीकरण कोणास करता येते.
१.      उत्पादक
२.     पॅक हाउस व्यवस्थापन
३.     प्रक्रिया उद्योजक
४.     किचन

हॅसेप प्रमाणीकरण करण्याकरीता अपेडा मार्फत खालील एजन्सीना प्राधिकृत केलेले आहे.
1.       Quality Management Services A-42,Swasthya Vihar, New Delhi
 
2.     Food Sefety Solutions Internation  M/10/32, Changam purna Nagar, Cochin, Kerala
 
3.     The Quality Contalist Flat No.26,Sector-12, Dwarka,New Delhi
 
4.     Puradigm Services Pvt.Ltd. 1st floor,Anurag, 27, Jawahar Nagar, University Road, Pune
 
5.     Quali Tech India Solutions, Madhura Nagar colony, Padmarao Nagar, Secunderabad.
 
6.      TUV South Asia Pvt. Ltd. 321,Solitaire corporate Parle Chakale,Andheri (E),Mumbai
 
7.     Det Norske Veritas As India (DNV) certification Services,Worli, Mumbai
 
8.      International Certification Services (Asia) Pvt.Ltd. Santacruz, Mumbai
 
9.      Food Cert India Pvt.Ltd. Himayatnagar, Hydrabad.

युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरीता फायटोसॅनिटरी प्रमाणीकरणाची आवश्यकता
एका देशातुन दुस-या देशास कृषि मालाची निर्यात करण्याकरिता जागतिक पिकसंरक्षण करार १९५१ (Internation Plant Protection Convertion, 1951) नुसार फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जागतिक पिकसंरक्षण कराराचे १६५ देश सदस्य असून भारत एक सदस्य देश आहे. केंद्र शासनाने अधिसुचना क्रमांक पीपीआय/९८/ दिनांक २९/१०/१९९३ अन्वये राज्यातील ११ अधिका-यांना फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देणारे अधिकारी म्हणून अधिसुचित केलेले आहे. त्यामध्ये पुणे,सांगली,नाशिक, सोलापूर, अमरावती, रत्नागिरी  व सिंधुदूर्ग  या जिल्हयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयातील अधिका-यांचा समावेश व सदर अधिका-यामार्फत  कृषि मालाच्या निर्यातीकरीता फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाते.

            राज्यातून द्राक्ष पिकांचे मोठया प्रमाणात युरोपियन देशांन निर्यात केली जाते य़ुरोपियन देशांने द्राक्षाचे निर्यातीकरीता किडनाशकांचा उर्वरीत अंश तपासणीचे कडक निकष तयार केलेले आहेत. त्यामध्ये ९० किटकनाशक औषधाची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या सर्व बाबीचा विचार करुन  युरोपियान देशांना जास्तीतजास्त द्राक्ष निर्यात होण्याकरीता सन २००६-०७ या वर्षात अपेडा यांच्या मार्गदर्शनाखाली युरोपियन देशांना द्राक्षाची निर्यात करण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत ट्रेड नोटीस क्रमांक क्युएमसी/०४९/२००५ दिनांक २६ ऑक्टोबर २००६ अन्वये सविस्तर मार्गदर्शन सुचना तयार करण्यात आलेले आहेत. त्याची अंमलबजावणी संचालक,कृषि प्रक्रिया व व्यापारक्षम शेती, साखर संकुल, पुणे-५ यांच्या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

युरोपियन युनियन मध्ये खालील प्रमुख देशांचा समावेश आहे.

क़्र.
युरोपियन युनियनमधील प्रमुख आयातदार देशांची नांवे
युनायटेड किंगडम (युके)
नैदरलँड
बेल्जियम
जर्मनी
फ्रान्स
इटली
पोलंड
स्पेन
स्विडन
१०
ग्रीस

सन २००६-०७ या वर्षामध्ये युरोपियन देशांना निर्यात होणा-या द्राक्षामधील उर्वरित अंश नियंत्रणाबाबत अपेडामार्फत तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये मागील वर्षी आढळून आलेल्या अडचणी व त्रुटींचा विचार करुन तसेच युरोपियन युनियनने  केलेल्या सुचना व इतर सर्व बाबींचा विचार करुन चालू वर्षाकरिता युरोपियन देशांना निर्यात होणा-या द्राक्षामधील किडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत खालीलप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येत आहेत.

निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याची पध्दत -
युरोपियन देशांना निर्यात करु इच्छिणा-या द्राक्ष बागायतदारांनी त्यांच्या द्राक्ष बागेची नोंदणी संबंधित जिल्हयाचे नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  यांच्याकडे दि. २५ डिसेंबर २००६ पुर्वी करणे आवश्यक आहे. तसेच निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर, बीड, बुलढाणा, जळगांव व नांदेड यांना निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे.

निर्यातक्षम द्राक्ष बागाची नोंदणी करण्याकरीता प्रती प्लॉट (१ हैक्टर क्षेत्र) करिता रु. ५०/- फी विहित करण्यात आलेली आहे. निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी व नुतणीकरण चालू वर्षी अपेडाच्या वेबसाईटवर ऑन लाईनव्दारे करण्यात आलेली आहे (www.apeda.com)

निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांना युरोपियन देशांना निर्यात करु इच्छिणा-या द्राक्ष बागायतदारांना त्यांचे बागेची नोंदणी / नुतनीकरण संबधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत अपेडाच्या ऑन लाईन साईटवरुन  प्रपत्र २-अ मध्ये संबधित द्राक्ष बागायतदारांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
युरोपियन देशांना निर्यात करण्याकरिता नोंदणी केलेल्या द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष बागेवरील किडी व रोगांचे नियंत्रण करण्याकरिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी यांनी प्रपत्र ७ मध्ये  शिफारस केल्यानुसार वापरण्याबाबत व त्याचा रकॉर्ड प्रपत्र-४ मध्ये ठेवण्याबाबत बंधनकारक करण्यात आलेले आहे.

नोंदणीकृत द्राक्ष बागांची तपासणी व मार्गदर्शन करण्याकरिता अनुसरावयाची कार्यपध्दती-
युरोपियन देशांना निर्यात करण्याकरिता नोंदणी करण्यात आलेल्या द्राक्ष बागांची तपासणी करण्याकरिता संबंधित मंडल कृषि अधिकारी / कृषि पर्यवेक्षक यांना तपासणी अधिकारी म्हणून ३०० अधिका-यांना  प्राधिकृत करण्यात आले आहे.

निर्यातक्षम द्राक्ष बागांमधील उर्वरित अंश नियंत्रणाकरिता शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन तपासण्या विहित करण्यात आलेल्या आहेत. पहिली तपासणी द्राक्ष बागेचे नुतनीकरण / नवीन नोंदणी प्रमाणपत्र देण्यापुर्वी करावयाची आहे. दुसरी तपासणी अनुक्रमे ४० ते ६० दिवसांच्या फरकाने करावयाची आहे.

निर्यातक्षम द्राक्ष बागांची तपासणी करण्याकरिता प्रपत्र ६-अ व ब विहित करण्यात आलेले आहे.  त्या विहित केलेल्या प्रपत्रामध्ये संबंधित नोंदणीकृत द्राक्ष बागांची तपासणी अधिका-याने तपासणी करुन तपासणीचा अहवाल संबंधित नोंदणीकृत द्राक्ष बागायतदार व नोंदणी अधिकारी यांना द्यावयाचा आहे.

तपासणी अधिका-याने त्याच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत सर्व द्राक्ष बागायतदारांना वेळोवेळी निर्यातक्षम द्राक्ष बागेमधील उर्वरित किडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाकरिता अपेडा यांनी तयार केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार संबंधित शेतक-यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. तपासणी अधिका-याने तपासणी अहवालामध्ये त्याचे पुर्ण नाव, हुद्दा, कार्यालयाचा पत्ता व दुरध्वनी क्रमांक    नमुद करणे आवश्यक आहे तसेच जेवढया क्षेत्राची नोंदणी करण्यात आलेली आहे तेवढया क्षेत्राकरिता तपासणी अहवाल देणे आवश्यक आहे.

तपासणीचे वेळी नोंदणी करण्यात आलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र आढळून आले तर वाढीव क्षेत्राची नोंद नोंदणी प्रमाणपत्रात करुन घेण्याकरिता संबंधित शेतक-यांनी संबधित शेतक-यांकडे नोंदणी करणेकरीता कळविणे आवश्यक आहे. नोदणींकृत द्राक्ष बागायतदारंने तपासणी अधिका-यांच्या मार्गदर्शना नुसार तपासणी ठेवणे आवश्यक आहे.
तपासणी अहवालाच्या प्रती संबंधित शेतक-यांनी तपासणी अधिका-याकडून वेळोवेळी उपलब्ध करुन घेणे आवश्यक आहे.

निर्यातक्षम नोंदणीकृत द्राक्ष बागेमधील उर्वरित अंश नियंत्रणाकरिता नमुने घेण्याची विहित पध्दत
निर्यातक्षम नोंदणीकृत द्राक्ष बागेमधील उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता चालू वर्षी एकूण ७ प्रयोगशाळांना अपेडा यांनी अधिसुचित केलेले आहेत त्याची नांवे खालीलप्रमाणे आहेत.

. क़्र.
प्रयोग शाळेचे नांव
किडनाशक उर्वरीत अंश प्रयोगशाळा ,पुणे-५
विमटा लॅबस लि.हैद्राबाद
रिलायबल ऍनालिटीकल लॅबोरेटरी, ठाणे
जिओक लॅब लिमिटेड,मुंबई
श्रीराम इन्स्टीटयुट लॅब बगलोर
एसजीएस इंडीया लि.चैन्नई
एनएचआरडीएफ नाशिक

निर्यातक्षम द्राक्ष बागेमधील उर्वरित अंश तपासणीकरिता द्राक्षाचे नमुने घेण्यासाठी अपेडा यानी प्रपत्र-८ मध्ये अधिसुचित केलेल्या उर्वरित अंश प्रयोगशाळेच्या प्रतिनिधीव्दारेच द्राक्षाचे नमुने  घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता द्राक्षाचे नमुने घेण्यासाठी लागणारे पॅकिंग मटेरियल व इतर साहित्त्य व नमुना स्लीप विहित करण्यात आली आहे त्यानुसार व प्रपत्र ९ मध्ये विहित केलेल्या पध्दतीचा वापर करुन नमुने घेणे बंधनकारक आहे.

उर्वरित अंश तपासणीकरिता घेण्यात आलेल्या द्राक्षांचे नमुने दोन पॅकिंगमध्ये २ किलो व ३ किलोमध्ये दोन नमुने घेवुन २४ तासांचे आत संबंधित किडनाशक उर्वरित अंश प्रयोगशाळेस पाठविणे आवश्यक आहे. नमुन्यासोबत प्रपत्र ४, प्रपत्र ५ व प्रपत्र ६-ब जोडणे आवश्यक आहे.

द्राक्ष बागायतदारांनी  निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन विक्रीकरिता प्रामुख्याने खालील बाबीची पुर्तता/नियोजन करणे आवश्यक आहे.
१.      निर्यातक्षम द्राक्ष बागेची नोंदणी विहित मुदतीत संबधीत जिअकृअ यांचेकडे अर्ज करुन घेणे तसेच नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध करुन घेणे व नोंदणी प्रमाणपत्रातील मजकूर बरोबर असल्याचे खात्री करुन घेण.
२.     द्राक्षावरील किडी व रोगांचे नियंत्रणाकरिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी यांनी प्रपत्र-७ मध्ये शिफारस केलेल्याच औषधाची फवारणी करणे. एकाच औषधाची सलग फवारणी न करणे.
३.     किडी व रोगाचे नियंत्रणाकरिता वापरण्यात आलेल्या औषधाची नोंद प्रपत्र ४ मध्ये सविस्तर ठेवून ते तपासणी अधिका-याकडून स्वाक्षरीत करुन घेणे.
४.     निर्यातक्षम द्राक्ष बागाची २ वेळा तपासणी अधिका-याकडून तपासणी करुन घेणे तसेच तपासणी अहवालाचा प्रती प्राप्त करुन घेवून स्वतंत्र नस्तीस ठेवणे.
५.    द्राक्ष काढणीच्या अगोदर एक महिना फवारणी बंद करणे. औषधाची फवारणी करण्याची गरज पडल्यास तशी नोंद प्रपत्र-४ मध्ये करणे.
६.      उर्वरीत अंश तपासणी करण्याकरिता अपेडा यांनी अधिसुचित केलेल्या उर्वरीत अंश प्रयोगशाळेचा प्रतिनिधी व्दारे द्राक्षाचे नमुना घेवून नमुण्यासोबत ,नमुना स्लीप, प्रपत्र-४ द्यावे.
७.    युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता द्राक्षाचे घड, बेरीचा एकसारखा आकार १६ ते १८ (एमएक) गडद हिरवा रंग व १६ दिवस असणे आवश्यक आहे . तसेच रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

१.      द्राक्षाची निर्यात निर्यातदारामार्फत करावयाची झाल्यास द्राक्ष निर्यातदारांची  सविस्तर माहिती करुन घेणे.
२.     निवड केलेल्या द्राक्ष निर्यातदारांला प्रपत्र-५ मध्ये उर्वरीत अंश चाचणी प्रयोगशाळेत नमुना प्रमाणीत असल्याचे अहवालाची प्रत तसेच तोच माल पुरवठा केल्याबाबत हमीपत्र देणे.
३.     द्राक्ष बागायतदारानी द्राक्षाचा  निर्यातदाराना पुरवठा करण्यापूर्वी भाव ठरवून घेणे व मालाचा  
       पुरवठा व किमतीबाबत करार करुन घेणे बागायतदाराच्या दृष्टिने आवश्यक आहे.

उर्वरीत अंश तपासणी करण्याकरीता  प्राधिकृत केलेल्या प्रयोगशाळांची जबाबदारी :-
१.      प्राधिकृत प्रयोगशाळेने निर्यातक्षम द्राक्षामधील औषधाचे उर्वरित अंश मर्यादा प्रपत्र ११ मध्ये दिल्या- प्रमाणे सर्व औषधांकरिता ए ओ ए सी किंवा कोडेक्स पध्दतीचा अवलंब करुन तपासणी करणे आवश्यक आहे.
२.     प्राधिकृत प्रयोगशाळेने निर्यातक्षम द्राक्षामधील उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता प्रपत्र ९ मध्ये विहित केलेल्या पध्दतीचा अवलंब करुन नमुने घेण्यासाठी प्रयोगशाळेच्या वतीने योग्य त्या       
३.     प्रतिनिधीची नियुक्ती करणे आवश्यक आहे व नियुक्त केलेल्या प्रतिनिधींची नावे , पुर्ण पत्ता व दुरध्वनी क्रमांक अपेडा , एनआरसी व संचालक कृषि प्रक्रिया व व्यापारक्षम शेती यांना कळविणे आवश्यक आहे.
४.     निर्यातक्षम द्राक्षामधील उर्वरित अंश तपासणीचा अहवाल प्रपत्र-१२ मध्ये विहित केलेल्या नमुन्यात द्यावयाचा आहे.
५.    प्रयोगशाळेने उर्वरित अंश तपासणीचा अहवाल चार प्रतीत तयार करावयाचा असून पहिल्या दोन प्रती संबंधित द्राक्ष उत्पादक / निर्यातदार यांना द्यावयाची आहे, तिसरी प्रत संबंधित तपासणी अधिकारी तथा मंडळ कृषि अधिकारी यांना द्यावयाची आहे व चौथी प्रत प्रयोगशाळेत कार्यालयीन प्रत म्हणून ठेवावयाची आहे. प्राधिकृत प्रयोगशाळेने उर्वरित अंश तपासणी गोषवारा प्रपत्र १३ मध्ये राष्ट्रीय रेफरल प्रयोगशाळा व अपेडा यांना आउनलाईन सुविधाव्दारे  पाठवावयाचा आहे.

फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र मिळण्याकरीता द्राक्ष निर्यातदारांने खालील कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक आहे
द्राक्ष निर्यातदारांनी युरोपियन देशांना द्राक्षाची निर्यात सुरु करण्यापूर्वी खालील बाबीबाबत माहिती करुन घेणे आवश्यक आहे.
१.      नोंदणीकृत द्राक्ष बागाची निवड करुन संबधित शेतक-याकडून द्राक्ष बागाची संपूर्ण माहिती घेणे (नोंदणी प्रमाणपत्र,प्रपत्र-४ व प्रपत्र-५)
२.     ज्या देशांना द्राक्षाची निर्यात करावयाची आहे. त्या देशातील आयातदाराकडून द्राक्षाची गुणवत्ता , प्रतवारी, पॅकींग इत्यादीबाबत सविस्तर माहिती घेणे
३.     उर्वरीत अंश तपासणी करण्यासाठी अपेडा यांनी प्रमाणीत केलेल्या उर्वरीत अंश प्रयोगशाळेकडून ९० औषधाची तपासणी करुन घेणे.
४.     द्राक्षाची पॅकींग,ग्रेडींग,प्रिकुलींग व  स्टफोग अपेडा यांनी मान्यता दिलेल्या कोल्डस्टोरेजमध्ये करावेत
५.    युरोपियन देशांना द्राक्षाची निर्यातीकरीता निर्यातदारांनी डायरेक्टोरेट ऑफ मार्केटींग अँड इन्स्पेक्शन मुंबई यांचेकडून एगमार्कसाठी नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे . तसेच द्राक्षाचे ग्रेडींगकरीता एगमार्क पुणे, नाशिक व सांगली येथील कार्यालयातुन देण्यात येते. चालू वर्षी ऍगमार्क तपासणीचे काम किडनाशक उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळेच्या प्राधिकृत व्यक्तिकडून तपासणी केल्यानंतर ऍगमार्क ऍथोरिटीकडून ऑनलाईन ऍगमार्क ग्रेडींग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
६. निर्यातक्षम द्राक्षाची पॅलेट बनविण्याकरीता लाकडाचे पॅलेटचा वापर केला जातो. लाकडाच्या पॅलेटकरिता इटरनॅशनल स्टडर्ड फॉर फायटोसॅनिटरी मेजर्स (ISPM-15) -१५ अन्वये केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या पेस्ट कंट्रोल प्युमिगेंटर्स कडून लाकडी पॅलेटचे धुरीकरण करुन घेउुन त्यावर स्टॅम्प मारुन घेणे आवश्यक आहे . घुरीकरणाकरिता केंद्र शासनाने राज्यातील २१ पेस्ट कट्रोल ऑपरेटर्ससना मान्यता दिलेली आहे. त्याची नांवे (plant quarantine india.org) या वेबसाईटवर उपलब्ध आहे युरोपियन देंशांना द्राक्षाचे निर्यातीकरीता फायटोचे प्रमाणपत्र देण्यासाठी संचालक कृषि प्रक्रिया व व्यापारक्षमक शेतीयांच्या कार्यालयातील कृषि उपसंचालक तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नाशिक सांगली व सोलापूर व सांगली यांच्या कार्यालयातील कृषि उपसंचालक व कृषि अधिकारी यांना फायटोसॅनिटरी इंश्युइंग ऍथोरिटी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

द्राक्ष निर्यातदारांनी युरोपियन देशांना द्राक्षाची निर्यातीकरीता फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र मिळण्याकरीता खालील कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक आहे .
१.      प्रपत्र अ मध्ये २ प्रतीत अर्ज
२.     प्रोफार्मा  इन्वाईसची प्रत
३.     आयातदार व निर्यातदार यांच्यामध्ये करण्यात आलेल्या करारनामाची प्रत
४.     आयात व निर्यात कोड नंबरची प्रत
५.    उर्वरीत अंश तपासणी अहवालाची पांढरी व हिरव्या रंगाची मुळ प्रत.    
६.      कंटेनर लोडींग / पँकीग लिस्ट
७.    निर्यातक्षम द्राक्ष बांगेच्या नोंदणी प्रमाणपत्रांची प्रत
८.     नोंदणीकृत द्राक्ष बागांयतदारांचे प्रपत्र ५ मध्ये हमी पत्र
९.      नोंदणीकृत द्राक्ष बागेचे प्रपत्र ६-ब मध्ये तपासणी अधिका-यामार्फत केलेल्या तपासणी अहवालाची प्रत
१०.  प्रपत्र १५ मध्ये नोंदणीकृत द्राक्ष बांायतदाराकडूनच माल खरेदी केलेबाबत निर्यातदारांचे हमी पत्र
११.   ज्या ठिकाणी द्राक्षाची स्टपिंग करण्यात येणार आहेत. त्या शित गृहास अपेडाच्या मान्यतेची प्रत
१२.  निर्यातक्षम द्राक्षाचे एगमार्क प्रमाणीकरण करण्याकरीता डायरेक्टर ऑफ माकेाटींग ऍन्ड इन्स्पेक्शन यांच्याकडे नोंदणी केलेल्या प्रमाणपत्र तसेच सर्टिफिकेट ऑफ एगमार्क  ग्रीडीची प्रत
१३.  द्राक्षाचे पॅलेटापरण्यात येणा-या लाकडी पॅलेटचे केंद्र शासन मान्यता पेस्ट कंट्रोल ऑपरेटरकडून फयुमिगेशन केल्याचे प्रमाणपत्र
१४. विहित केलेली फी चलनाव्दारे कोषागारात भरल्याची चलनांची मुळ प्रत

            वरील सर्व मुद्याबाबतची माहिती सादर केल्यानंतर फायटोसॅनिटरी सर्टीफिकेट ऍथोरिटीव्दारे निर्यातीकरिता तयार करण्यात आलेल्या द्राक्षाची तपासणी करुन त्यातून नमुना घेवून सदरची द्राक्षे किड व रोगमुक्त तसेच उर्वरीत अंश मध्ये प्रमाणीत असल्याचे तसेच आयातदार देशाच्या मागणीप्रमाणे असल्याची खात्री करुन सदर द्राक्षाच्या निर्यातीकरिता संबधीत देशाच्या प्लॅन्ट प्रोटेक्शन ऍथोरिटीच्या नावाने फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र अपेडाच्या साईटवर आउन लाईनव्दारे तयार करुन दिले जाणार आहे.चालू वर्षी युरेपियान देशांना द्राक्ष निर्यातीकरीता द्राक्ष बागाची नोंदणी,नोदणी केलेल्या द्राक्ष बागायाची तपासणी, उर्वरीत अंश तपासणी अहवाल, ऍगमार्क प्रमाणीकरण तसेच फाटोसॅनिटरी प्रमाणीकरणाचे काम अपेडाच्या वेबसाईटवरुन ऑनलाईनव्दारे करण्यात येणार आहे. द्राक्ष बागायतदार/निर्यातदारांनी वरील बाबीची पुर्तता करण्याकरिता योग्य ते नियोजन करण्याची आवश्यकता आहे .

अधिक माहिती मार्गदर्शनासाठी कृषि प्रक्रिया व्यापारक्षम शेती, साखर संकुल, पुणे४११००५ कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घ्यावी. (फोन नं. २०-२५५३४३४९, ९४२३५७५९५६)