Wednesday, 19 December 2012

डाळिंबावरील ‘तेल्या’ साठी प्रतिबंधक उपाय

डाळिंबावरील ‘तेल्या’ रोग खतरनाक आहे; पण शेतकर्यांनी त्याला भिण्याचे काहीच कारण नाही. ‘तेल्या’ नियंत्रणात राहण्यासाठी डाळिंब संशोधन केंद्राने केलेल्या शिङ्गारशीप्रमाणे शेतकर्यांनी औषधांची फवारणी (स्प्रे) केली तर ‘तेल्या’ निश्चितच नियंत्रणात राहू शकतो. ‘तेल्या’ अजून तरी पूर्णत: थांबू शकला नाही. त्यासाठी प्रतिबंधक उपाय करणे हेच सध्या महत्त्वाचे आहे, असा सल्ला सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे नूतन संचालक डॉ. आर. के. पाल यांनी डाळिंब उत्पादक शेतकर्यांना दिला.
सोलापूर जिल्ह्यातील हवामान डाळिंब पिकासाठी पोषक असल्यामुळे या भागात डाळिंबाचे क्षेत्र वाढविण्याबरोबरच शेतकर्यांना डाळिंब पिकातून ‘व्हॅल्यू ऍडिशन’ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी डाळिंबापासून वाईन व चहा पावडर बनविणार्या उद्योजकांना येथे आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून पाल म्हणाले की, डाळिंबावरील ‘तेल्या’ रोग ९० टक्क्यांपर्यंत नियंत्रणात राहण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. नर्सरीतून ‘तेल्या’युक्त कलमांचा पुरवठा होत असतो. त्यामुळेही ‘तेल्या’ चे प्रमाण वाढते म्हणून अशा नर्सरींची संबंधित विभागाने तपासणी करून दोषी आढळलेल्या नर्सरींचा परवाना रद्द केला पाहिजे. त्यासाठी नर्सरीची वारंवार तपासणी होण्याची गरज आहे.
सोलापुरात बाराव्या पंचवार्षिक योजनेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्यात देश व विदेशातील शेतकर्यांना डाळिंबाविषयी प्रशिक्षण घेता येईल. डाळिंब पिकावरील कीड व रोगाबद्दलची माहिती मराठीतून लवकरच इंटरनेटच्या माध्यमातून वेबसाईट, मोबाईल, एसएमएस व महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी टचस्क्रीन टी. व्ही. द्वारे शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम लवकरच सुरू करणार आहोत. यशस्वी डाळिंब उत्पादक शेतकर्यांच्या यशकथाही व्हिडीओच्या माध्यमातून प्रसारित करणार असून,सोलापूरचे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काढणीपश्चात तंत्रज्ञानात ‘एक्सलंट सेंटर’ बनू शकते, असा विश्वास डॉ. पाल यांनी व्यक्त केला.
डाळिंब रोपांचे संग्रहालय
इथल्या वातावरणात लागवडीसाठी योग्य अशी डाळिंबाची दर्जेदार टिश्यू कल्चर रोपे बनविण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी सुमारे दीड वर्ष लागेल. मी डाळिंब उत्पादक शेतकर्यांना चुकीच्या दिशेने जाऊ देणार नाही. त्यांचे नुकसानही होऊ देणार नाही. आपल्या देशात डाळिंबाला प्रचंड मागणी आहे. इथे भावही चांगला मिळत आहे. निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यातच शेतकर्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. अशा परिस्थितीत शेतकर्यांनी डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आमच्याकडे सुमारे ३५० विविध जातीच्या डाळिंबाच्या रोपांचा संग्रह आहे. एवढा संग्रह जगात कोठेच नाही. शेतकर्यांना याची माहिती व्हावी म्हणून येथे रोपांचे संग्रहालय उभारणार असून, सोलापुरात महाराष्ट्र डाळिंब बोर्ड विकसित करणार असल्याचे ते म्हणाले.
खत, पाणी व्यवस्थापन विकसित व्हावे
केवळ वातावरण बदलामुळे हिमाचल प्रदेशातील सोलन व राजस्थानातील भिलवाडा भागात डाळिंबाचे क्षेत्र वाढले आहे. डाळिंब ङ्गळावर आपल्या देशात ङ्गारसे काम झाले नसल्याची खंत व्यक्त करून पाकिस्तानात डाळिंबाचा ज्यूस तर टर्की देशात डाळिंबाची चहा पावडर बनवली जाते. खराब डाळिंबाचे मूल्य वाढविण्यासाठी तसेच डाळिंब पिकाच्या अन्नद्रव्याबाबत पाणी व खतांचे व्यवस्थापन विकसित करण्याची गरज आहे. काढणीपश्चात तंत्रज्ञानाला सूट होईल, अशा डाळिंबाचे वाण आपण शोधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- मोहन काळे/ सोलापूर
डॉ. पाल यांच्या विषयी अधिक…
डॉ. पाल यापूर्वी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान केंद्रात काढणीपश्चात तंत्रज्ञान प्रमुख होते. त्यांचे काढणीपश्चात तंत्रज्ञानाचे उच्चप्रशिक्षण अमेरिकेतील अरकंसासा विद्यापीठात झाले आहे. ते इंडियन हॉर्टीकल्चर सोसायटीच्या अन्न व कृषी ऑरगनायजेशनचे कन्सल्टंट आहेत. लिची ङ्गळाविषयी त्यांनी पॅक हाऊसचे तंत्रज्ञान शोधले. त्यामुळे या ङ्गळाची निर्यात होण्यास मदत झाली. ‘सार्क’चे ते तांत्रिक सल्लागार आहेत.
मंत्रालयाच्या ङ्गळप्रक्रिया विभागात प्रोजेक्ट बनविणार्या कंपनीचे ते सदस्य आहेत. भारत व आफ्रिकेत त्यांनी वीज न वापरता ङ्गळ व भाजीपाला थंड करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे ङ्गळे व भाजीपाला सडण्याची क्रिया थांबली. त्यांनी बारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एम.एस्सी. व पीएच.डी. साठी मार्गदर्शन केले आहे. त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे १०० शोधनिबंध सादर केले आहेत. ३ बुक चॅप्टर व तांत्रिक विषयातील १० पुस्तके लिहिली आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर काढणीपश्चात तंत्रज्ञान विषयात ते पहिले आले होते. यावेळी त्यांनी आपल्या सरकारने माझ्यावर शिक्षणासाठी खर्च केला, तर मी परदेशात जाऊन काय करणार, माझ्या ज्ञानाचा उपयोग मी माझ्या देशासाठी करणार आहे. म्हणून मी परदेशातील नोकरी स्वीकारली नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी हे जगातील शेतकर्यांपैक्षा वेगळे आहेत. त्यामुळे मी इथे पैसे मिळविण्यासाठी आलो नाही तर माझ्या ज्ञानाचा उपयोग इथल्या शेतकर्यांना करून देण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment