Thursday, 18 April 2013

शेळी पालन एक उत्कृष्ट व्यवसाय     अलीकडे शेळीपालन व्यवसायास बरेच महत्व येत असून तो एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे हा व्यवसाय करणा-या पशुपालकांची संख्या मोठया प्रमाणावर वाढते आहे. त्याचप्रमाणे इतर व्यावसायिक मंडळी देखील या व्यवसायात पडू पाहत आहेत शासनही या व्यवसायाला आर्थिक सहाय देत आहे त्याचप्रमाणे शेळीच्या मांसाची मागणीही दिवसेंदिवस वाढतच आहे काही ठराविक जातीच्या शेळया दर दिवशी सरासरी दोन ते अडीच लिटर दूध देतात त्यामुळे हा व्यवसाय अधिकच लोकप्रिय होत चालला आहे.

शेळी पालनाचे फायदे-

1) अल्प गुंतवणुकीने हा व्यवसाय केल्या जाऊ शकतो
2) शेळया या शेतक-यांसाठी बचत बॅकेचे कार्य करीत असतात आवश्यकता पडल्यास त्वरीत  काही शेळया विकून पैसा उभा केला जाऊ शकतो.
3) शेतक-यास दूध विकत घेणे शक्य नसल्यामुळे शेळीचा दुधाचा वापर करणारे ग्रामीण लोक  मोठया प्रमाणावर आढळतात.
4) शेळया काटक असून विपरीत हवामानाशी जुळवून घेतात.
5) शेळया निकृष्ट प्रतिच्या चा-याचे मांसात किंवा दुधात रूपांतर करतात.
6) शेळयांचे दोन पिढीतील अंतर कमी असून लवकर उत्पादन मिळते.
7) त्यांना जागा कमी लागते यामुळे निवा-याकरिता खर्च कमी होतो.
8) काही जातीच्या शेळयापासून लोकर (मोहोर) मिळते.
9) शेळयांचे खत उत्तम असते.
10) आपल्या देशात गोमांस कुणी खात नाही म्हणून शेळीच्या मांसाला जास्त मागणी आहे.
11) शेळयांच्या शिंगापासून डिंकयुक्त पदार्थ बनवितात.
12) शाकाहारी अन्नात कमी असणारे अमिनो आम्ल उदा लायसिन, मिथिओन व ट्रिप्टोफॅन
    शेळीच्या मासांत अधिक असते.
13) शेळीपालन व्यवसाय हा महिलांमार्फत सहज केल्या जावू शकतो.

     भारतीय अर्थव्यवस्थेत शेळयांचे महत्व जगात एकंदर 620 दशलक्ष शेळया असून त्यापैकी 123 दशलक्ष शेळया भारतात आहे शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी 3 टक्के दुध 45 ते 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते. भारतात शेळयांचे 50 टक्के मांस तर 45 टक्के कातडी शेळयापासून मिळते भारतात शेळयांचे सरासरी वार्षिक दूध उत्पादन फक्त 58 लिटर आहे व शेळीच्या दुधाला मागणी नाही खरं तर शेळीचा विकास दुध उत्पादनाकरीता झालाच नाही आपल्या कडील निवडक जातीच्या शेळया एका वेतात 200 ते 250 लिटर दुध देतात तर विदेशी जातीच्या शेळया 1200 ते 1700 लिटर दुध देतात.
     आपल्या देशात शेळयापासून वर्षाकाठी 2.2 दशलक्ष टन मांस मिळते तर पश्मिना जातीच्या शेळीपासून लोकरही मिळते.

शेळयांच्या जाती 
 
            भारतात शेळयांच्या प्रमुख 25 जाती आढळतात आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती दुध उत्पादनाकरिता तर बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल,उस्मानाबादी, सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात. या सर्व जातींची वाढ मंद गतीने होते साधारणपणे एका वर्षात सरासरी वजन 20 किलो होते या उलट विदेषी जातीच्या शेळया उदा सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन 100 ते 125 किलो तर मादीचे सरासरी वजन 90 ते 100 किलो असते आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.बंदीस्त शेळीपालनाची आवश्यकता -
       शेळयांची चरण्याची पध्दत इतर गुरांप्रमाणे म्हणजे गाय, म्हैस मेंढी, यापेक्षा वेगळी असून त्या प्रत्येक झाडाचे झुडपाचे कोवळे शेंडे खातात त्यामुळे झाडांची वाढ खुंटते या प्राण्यामुळे जंगलांचा -हास होत आहे असा सर्व साधारण समज आहे व तो काही प्रमाणात खराही आहे जर आपण शेळयांना जंगलात चरण्याकरीता न सोडता त्यांचे बंदिस्त संगोपन केले तर त्यांची झपाटयाने वाढ होते.
बंदीस्त शेळीचे व्यवस्थापन -
1) शेळीकरीता कमी गुंतवणुकीचे वाडे (गाळे) असावे हेवाडे बास, बल्ली, तट्टे तु-हाटया 
   प-हाटया यांच्या सहायाने करावे
2) प्रती शेळी किमान 100 ग्रॅम खुराक दयावा प्रत्येक शेळीला किमान दिड ते 2 किलो हिरवा चारा दयावा झाडांची पाने दिल्यास उत्तम विविध झाडांची पाने उदा चिंच, बाभुळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कंदब, निंब इत्यादी
3) शेळयांना मोकळया जागेत ठेवावे
4) कळपात 20 ते 25 शेळयामागे एक नर असावा
5) गाभळ शेळयाची व दुभत्या शेळयाची विशेष काळजी ध्यावी
6) करडांची जोपासना काळजीपुर्वक करावी
7) दिवसभरात किमान एक वेळा तरी शेळयांचे निरीक्षण करावे आजारी शेळयांना अगक करून शुवैदयकांच्या सल्यानुसार औषधे दयावीत          
8) शेळयाबांबत नोंदी ठेवाव्या व्याल्याची तारीख, शेळया फळल्याची तारीख मृत्यूच्या नोंदी इत्यादी

उत्‍तम जातीच्‍या शेळ्‍यां

मांसासाठी व दूधासाठी उत्‍तम जातीच्‍या शेळ्‍या खालीलप्रमाणे
उस्‍मानाबादी- अर्धबंदीस्‍त शेळीपालनासाठी उपयुक्‍त[मांसासाठी]
संगमनेरी - अर्धबंदीस्‍त शेळीपालनासाठी उपयुक्‍त[मांसासाठी व दूधासाठी]
सिरोही - अर्धबंदीस्‍त शेळीपालनासाठी उपयुक्‍त[मांसासाठी व दूधासाठी]
बोएर - बंदीस्‍त शेळीपालनासाठी उपयुक्‍त[मांसासाठी]
सानेन- बंदीस्‍त शेळीपालनासाठी उपयुक्‍त[दूधासाठी]
कोकण कन्‍याळ: अर्धबंदीस्‍त शेळीपालनासाठी उपयुक्‍त[मांसासाठी कोकणामध्‍ये]
 उस्‍मानाबादी शेळया मूखेड[नांदेड],रेणापूर[लातूर],कोण[कल्‍याण],लोणंद[सातारा],म्‍हसवड[सातारा],च्‍या आठवडी बाजारात या शेळया विकत मिळू शकतात.
कृपया शेळयांसाठी खालील पत्‍यावर संर्पक साधावा
उस्‍मानाबादी :
#
महात्‍मा फूले कृषि विदयापीठ,राहूरी जि.अहमदनगर ०२४२६-२४३२३०२४३८६१
#
कृषि विज्ञान केंद्र बारामती जि.पूणे ०२११२-२५५२०७/ ९९२२४१५१३५
#
पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी शेळी मेंढी विकास संस्‍था गोखलेनगर,पूणे
संगमनेरी
#
महात्‍मा फूले कृषि विदयापीठ,राहूरी जि.अहमदनगर ०२४२६-२४३२३०२४३८६१
सिरोही
#
केद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्‍था,अविकानगर राजस्‍थानकोकण कन्‍याळ:बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली जि.रत्‍नागिरी ०२३५२-२३२१६९/०२३५८-२८२४१७
बोएर
#
कृषि विज्ञान केंद्र बारामती जि.पूणे ०२११२-२५५२०७/ ९९२२४१५१३५
#
निरा व्‍हॅली जेनेटीक्‍स लि.विंचूर्णी,ता.फलटण,जि.सातारा -Ph-०२१६६ २०५१२५/ #निमकर शेळी मेंढी संशोधन संस्‍था,वडजल,ता.फलटण,जि.सातारा Ph-०२१६६ 221095सानेन
#
सानेन शेळी फार्म ,नारायणगाव जि.पूणे

दुर्लक्ष नको शेळ्यांच्या आरोग्याकडे...

शेळ्यांचे कमी खर्चात चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येते. शेळी व्यवस्थापन करताना सकस चारा, गाभण शेळ्यांची - करडांची काळजी घ्यावी. आरोग्याच्यादृष्टीने वेळच्या वेळी लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होऊन अपेक्षित फायदा शेळीपालकाला मिळू शकतो.

साधारणपणे शेळ्यांना ...........दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला आवश्‍यक आहे. यामध्ये मुख्यतः शेवरी, बोर, बाभूळ, आंबा, चिंच, तुती, केळीच्या पानांचा समावेश होतो. त्याचबरोबर गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या बोकडासाठी पूरक आहाराची आवश्‍यकता असते. शेळ्यांचे ऊन - पावसापासून संरक्षण करता येईल, अशा पद्धतीने गोठा बांधावा. शेळ्यांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत. मल-मूत्राची रोजच्या रोज विल्हेवाट लावावी. गोठ्यात स्वच्छ पाणी उपलब्ध असावे. गोठ्यात हवा खेळती असावी. ............मुक्त गोठा पद्धतीने शेळीपालनात शेळ्या दिवसभर चरण्यासाठी सोडल्यामुळे अतिरिक्त आहाराची तितकीशी आवश्‍यकता भासत नाही; मात्र बंदिस्त शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक नियोजन करणे आवश्‍यक आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूणघास, मका इ. एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी. त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा, उडदाच्या भुश्‍श्‍याचा वापर करावा.

शेळ्यांची जोपासना
1) गाभण शेळीची जोपासना -
गाभण शेळीची व्यवस्था स्वतंत्ररीत्या करावी. तिला ओला व सुका चारा आणि मुबलक स्वच्छ पाणी यांची योग्य प्रमाणात व्यवस्था करावी. शेवटच्या दोन - तीन महिन्यांत 200 ते 250 ग्रॅम पोषण आहार द्यावा. शेळी नैसर्गिकपणे विते; मात्र काही घटनांमध्ये वैद्यकीय मदत आवश्‍यक असते.

2) दुभत्या शेळीची जोपासना
दुभत्या शेळ्यांना शारीरिक गरजेसाठी लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा अतिरिक्त ऊर्जेची आवश्‍यकता भासते. म्हणून त्यांना ओल्या व सुक्‍या चाऱ्यासोबतच 100 ग्रॅम खुराक प्रति लिटर दुधामागे जास्त द्यावा. चारा देताना त्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ व खनिजद्रव्ये मिसळून द्यावीत.

3) करडांची जोपासना -
करडाच्या जन्मानंतर शेळी त्या पिल्लाला चाटू लागते; मात्र असे न घडल्यास कपड्याने करडास स्वच्छ पुसून घ्यावे. नाका-तोंडातील चिकट द्रव स्वच्छ करून घ्यावा. नाळ स्वच्छ ब्लेडने कापून टिंक्‍चर आयोडीन लावावे. करडास एक - दोन तासांतच शेळीचा चीक पाजावा. करडाने नैसर्गिकरीत्या चीक न प्यायल्यास त्याला तो काढून पाजावा. दोन - तीन आठवड्यांनंतर त्याला कोवळा पाला द्यावा. पहिले तीन - चार महिने दूध पाजावे. त्यानंतर मात्र त्याला शेळीपासून तोडून चरण्यास सोडावे.

4) पैदाशीच्या बोकडाची जोपासना
पैदाशीकरिता योग्य शारीरिक व वांशिक गुण असणाऱ्या निरोगी बोकडाची निवड करावी. निवड करताना त्याचे वय एक वर्षापेक्षा जास्त असावे, तो मारका नसावा. अशा बोकडास योग्य प्रमाणात हिरवा, वाळलेला चारा, खुराक व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.

शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्‍यता असते.

1) घटसर्प - हा अतिशय वेगाने पसरणारा साथीचा रोग आहे. सांसर्गिक प्राण्याची विष्ठा, लाळ, चारा, पाणी यांच्याशी संपर्कात आल्याने या रोगाची लागण होते. या रोगात जनावराचे तापमान अचानक खूप वाढते. शेळी चारा खाणे बंद करते. रवंथ न करता नाक व तोंडातून स्राव बाहेर पडतो.

2) संसर्गजन्य फुफ्फुसदाह - हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचे लक्षण म्हणजे कोरडा खोकला, नाकातून पाण्यासारखा द्रव येतो.

3) फऱ्या - हा रोग तीव्रपणे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. या रोगामध्ये खूप ताप येतो, पाय व सांधे यांना सूज येते, या सुजेवर दाबले असता दुखते व गरम लागते. या रोगामुळे जनावरास नीट चालवतही नाही, त्यामुळे ते लंगडते, म्हणूनच या रोगास "एकटांग्या' असेही म्हणतात.

4) लाळ्या खुरकूत - हा एक झपाट्याने वाढणारा संसर्गजन्य रोग आहे. याचा प्रसार हवा, पाणी व रोगी प्राण्याच्या संपर्कात आलेला चारा यामुळे होतो. यामध्ये शेळ्यांची भूक मंदावून त्या अशक्त बनतात. दुभत्या शेळ्यांचे दूध कमी होते, खूप ताप येतो व तोंडातून स्राव वाहतो. तोंडात पांढऱ्या रंगाचे फोड येतात, खुरांतही फोड येऊन जखमा होतात, त्यामुळे खाणे आणि चालणे अशक्‍य होते. शेळ्या दगावण्याचीही शक्‍यता असते.

5) धनुर्वात - या रोगामुळे शेळ्यांचे स्नायू ताठरतात, सर्वांगाला कंप सुटतो, शेळ्यांना चालताना त्रास होतो. त्यासाठी वेळेवर लसीकरण, वैद्यकीय सल्ला व निदान करून घ्यावे.

शेळ्या आणि बोकडांची निवड शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात. एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते. तिची आई जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले असते. दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे. दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी, टवटवीत व चपळ असावी. शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे, म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी. शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचे लक्षण आहे. केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. भरपूर छाती असावी. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल. शेळीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत. शक्‍यतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्यावी. पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी. तिला कासदाह तर नाही ना, याची तपासणी करावी. दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे. करडे रोगमुक्त, तसेच परोपजीवी कीटकांपासून मुक्त असावीत.

बोकडाची निवड कळपात जन्मणाऱ्या शेळ्यांचे 50 टक्के गुणधर्म बोकडांवर अवलंबून असतात, म्हणून कळपाची सुधारणा बऱ्याच प्रमाणात पैदाशीच्या बोकडांवर अवलंबून असते. शुद्ध जातीचाच बोकड शक्‍यतो विकत घ्यावा. ते न जमल्यास निदान सुधारित जातीचा बोकड घ्यावा. विकायला आलेल्या बोकडांपैकी सर्वांत मोठा डौलदार व निरोगी बोकड निवडावा. त्याची छाती भरदार असावी व पायांत भरपूर अंतर असावे. शरीराचा मागील भाग जास्त मोठा व उंच असावा. पाय मजबूत व खूर उंच असावेत. बोकड मारका नसावा. तो चपळ व माजावर आलेल्या शेळीकडे चटकन आकर्षित होणारा असावा. डोके व खांद्याचा भाग दणकट, थोराड व नराची लक्षणे दाखवणारा असावा. या लक्षणांवरून पुढील पिढीत चांगले गुणधर्म संक्रमित होण्याची शक्‍यता कळते.

संपर्क ः 02426 - 243455
संगमनेरी शेळी संशोधन योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
2) संपर्क ः 02169 - 244214
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,
शिरवळ, जि. सातारा

गरीबाची गाय

शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतात आणि कोरड्या जमिनीवर शेती करणाÚयांसाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. किरकोळ किंवा चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या जमिनी ह्या गाय किंवा इतर प्रकारच्या जनावरांसाठी चांगल्या नसतील, पण शेळी हा उत्तम पर्याय आहे. फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा किरकोळ आणि लहान शेतकÚयांसाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो.
हे कोण सुरू करू शकते?
 • लघु आणि मध्यम शेतकरी
 • ज्यांच्याकडे जमीन नाही असे श्रमिक
 • सामान्य कुरणांची उपलब्धता


सुरू करण्याची कारणे
 • कमी भांडवल निवेश आणि लवकर प्राप्ती होणे
 • साधे आणि लहान शेड पुरेसे आहे
 • स्टॉल (एका जनावरास बांधण्याची जागा) फेड स्थितीत ठेवल्यास नफा देणारे
 • शेळ्यांचा उच्च प्रजोत्पादन दर
 • वर्षभराचे काम
 • चर्बी नसलेले मांस आणि कमी वसा असलेले व सर्व लोकांना आवडणारे
 • केव्हां ही विकून पैसे मिळविता येतात


तुमच्यासाठी कोणती प्रजाति चांगली आहे?
जमनापरी
 • चांगली उंची असलेले जनावर
 • प्रौढ जमनापरीमध्ये चांगले सुबक बाकदार रोमन नाक आणि किमान 12 इंच लांबीचे हेलकावे घेणारे कान
 • बोकडाचे वजन सुमारे 65 ते 85 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 45 ते 60 किलोग्राम असते
 • प्रत्येक विण्याच्या वेळी एकच करडू
 • सहा महिन्यांच्या करड्याचे वजन सुमारे 15 किलोग्राम असते
 • दर रोज किमान 2-2.5 लिटर दुधाचे उत्पादन
तेलीचेरी
 • शेळ्यांचा रंग पांढरा, भुरा किंवा काळा असतो
 • एका विण्यात 2-3 करडी 
 • बोकडाचे वजन सुमारे 40 ते 50 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 30 किलोग्राम असते
बोअर
 • संपूर्ण विश्वभरात मांसाकरीता पाळतात
 • वाढीचा दर तीव्र आहे
 • बोकडाचे वजन सुमारे 110 ते 135 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 90 ते 100 किलोग्राम असते
 • 90 दिवसांच्या करड्याचे वजन 20-30 किलोग्राम असते


आहार प्रबंधन
 • चरण्याच्या जोडीला घन आहार दिल्यास उच्चतम वाढ दर मिळतो
 • प्रोटीनयुक्त हिरवा चारा जसे अकेसिया, ल्यूसर्न आणि कसावा तसेच आहारात नायट्रोजन स्त्रोत असणे महत्वपूर्ण आहे.
 • शेतकरी शेताच्या कडेने अगाथी, सबाबुल आणि ग्लॅरिसिडियाची झाडे लावू शकतात आणि हिरवा चारा म्हणून देऊ शकतात.
 • एक एकराच्या जमिनीच्या क्षेत्रात उगविलेली झाडे आणि चारा 15 ते 30 शेळ्यांना पोसण्यासाठी पुरेसा आहे.
घन आहार खाली दिल्याप्रमाणे तयार करता येऊ शकतो:

 घटक
करड्याचा आहार
वृध्दि आहार
स्तनपान
देणाऱ्या शेळीचा
 आहार
गर्भारशेळीचा आहार
 
ज्वारी
37
15
52
35
डाळी
15
37
---
---
तेलवड्या
25
10
8
20
गवताचा भुसा
20
35
37
42
खनिज मिश्रण
2.5
2
2
2
सामान्य मीठ
0.5
1
1
1
एकूण
100
100
100
100
 • करड्यांना पहिल्या 10 आठवड्यांत 50-100 ग्राम घन/सांद्रित आहार द्यायला पाहिजे.
 • वाढत्या वयाच्या करड्यांना 3-10 महिन्यांपर्यंत दररोज 100-150 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.
 • गाभण असलेल्या शेळीला दररोज 200 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.
 • 1 लिटर दूध देणाऱ्या दुधारू शेळ्यांना दररोज 300 ग्राम घन/सांद्रित आहार देण्यात आला पाहिजे.
 • शेळ्यांच्या स्टॉलमध्ये उत्तम प्रकारच्या तांब्याने युक्त (950-1250 पीपीएम) असलेले मिनरल ब्लॉक्स पुरविण्यात यायला हवे.


प्रजोत्पादन प्रबंधन
लाभदायक शेळी पालनासाठी 2 वर्षांमध्ये शेळीने 3 वेळा व्यायला (किडिंग) हवे.
 • तीव्र वाढीच्या व मोठ्या आकाराच्या शेळ्यांचा वापर प्रजोत्पादनासाठी करावा.
 • प्रजोत्पादनासाठी एक वर्ष वयाच्या मादीचा उपयोग करावा.
 • मादींनी एका किडिंग नंतर 3 महिन्यांतच पुन्हां गर्भ धारण केल्यासच 2 वर्षांत 3 वेळा प्रजोत्पादन होऊ शकते.
 • शेळ्या सुमारे 18 ते 21 दिवसांच्या अंतराने माजावर येतात आणि ही अवस्था 24-72 तास टिकते.
 • माद्या माजावर आल्यावर काहीतरी दुखत असल्यासारखे जोराने ओरडतात. माजावर आल्याचे आणखी एक लक्षण म्हणजे शेपटी जोर-जोराने इकडे-तिकडे हलविणे. त्याच्या जोडीला, त्यांचे बाह्य जननेंद्रिय थोडे-से सुजल्यासारखे आणि योनिमार्गातील स्त्रावामुळे ओले व घाणेरडे दिसते. त्यांची भूक मंदावते आणि मूत्रत्यागाची वारंवारता वाढते. माजावर आलेली मादी स्वत: नर असल्यासारखी इतर मादीच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करते किंवा इतर मादीस अंगावर चढू देते.
 • माजावर येण्याची लक्षणे सुरू झाल्यावर 12 ते 18 तासांच्या काळांत मादीचा समागम घडविण्यात येतो.
 • काही माद्यांमध्ये माज 2-3 दिवस टिकतो. त्यामुळे त्यांचा समागम पुन्हां दुसऱ्या दिवशी घडवायला हवा.
 • गर्भावस्था काळ सुमारे 145 ते 150 दिवसांचा असतो, पण एक आठवडा पुढे-मागे होऊ शकतो. आधीच तयार राहिलेले बरे.


कृमि नष्ट करणे (पोटातील जंत नष्ट करणे)
 • समागमाच्या आधी माद्यांचे डीवर्मिंग करून पोटातील कृमि नष्ट करायला पाहिजे. ज्या शेळ्यांना जंत असतील त्या कमकुवत आणि संथ असतात.
 • करड्यांचे डीवर्मिंग ते एक महिन्याचे झाल्यावर करावे. कृमि किंवा जंतांचे जीवनचक्र तीन आठवड्यांचे असते, म्हणून करडी दोन महिन्यांची झाल्यावर पुन्हा एकदा डीवर्मिंग करण्याची शिफारस केलेली आहे.  
 • विण्यापूर्वी 2 ते 3 आठवडे गाभण माद्यांचे डीवर्मिंग करण्यात यायला हवे.
 • गर्भारपणाच्या आरंभिक काळात (2 ते 3 महिने) गर्भपात होवू नये म्हणून माद्यांचे डीवर्मिंग करू नये.


लसीकरण
 • करड्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा प्रथम डोज 8 महिन्यांच्या वयात आणि पुन्हां 12 आठवड्याची झाल्यावर द्यावा.
 • माद्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज समागम काळाच्या 4 ते 6 आठवडे आधी आणि विण्याच्या 4 ते 6 आठवडे आधी द्यावा.
 • नरांना वर्षातून एकदा एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाचा डोज द्यावा.


शेळ्यांसाठी गोठा (मेषगृहे)
1.डीप लिटर सिस्टम (जनावरांसाठी तृण शय्या)ి
 • लहानसा कळप ठेवण्यासाठी पुरेशा आकाराचे शेड ज्यांमध्ये चांगले वातायन (Cross ventilation) असावे.
 • लिटरची (गवताच्या गादीची) उंची कमीत कमी 6 सें.मी. असावी.
 • लिटर तयार करण्यासाठी लाकडाचा भुगा, धान्याचा भुसा आणि शेंगांच्या सालपटांचा वापर करावा.
 • लिटरला थोड्या दिवसांनी वरखाली आलट-पालट करीत राहावे ज्याने घाण वास येत नाही.
 • दर दोन आठवड्यांनी लिटर सामग्री बदलावी.
 • प्रत्येक शेळीला सुमारे 15 चौरस फुट जागा हवी असते.
 • बाह्य-परान्नपुष्ट उपद्रव कमी होईल ह्याबाबत काळजी घेण्यात यायला हवी.
 • एक प्रौढ शेळी एका वर्षांत सुमारे एक टन खत टाकते.
2. रेझ्ड प्लॅटफॉर्म सिस्टम (उंचीवर असलेला मंच)
 • जमिनीपासून 3 ते 4 फुटांवर लाकडी तख्त किंवा तारांची जाळी यांचा वापर ह्या पध्दतीत केला जातो.
 • ह्या पध्दतीत बाह्य-परान्नपुष्ट उपद्रव पुष्कळ कमी होण्याची शक्यता असते.
       

                  


संगोपनाच्या पध्दती
 • सेमी इंटेन्सिव्ह सिस्टम (अर्ध-गहन पध्दती)
 • कमी कुरणे असतील अशा जागा, शेळ्यांना मुबलक हिरवा चारा देणे शक्य असेल आणि चरल्या नंतर घन आहार देता येईल.
 • इंटेन्सिव्ह सिस्टम
 • शेडमध्ये शेळ्यांना हिरवा चारा आणि घन आहार देण्यात येतो.
 • कुरणात चारणे नाही.
 • शेळ्यांसाठी गोठा (किंवा आश्रयस्थाने) डीप लिटर किंवा रेझ्ड प्लॅटफॉर्म सिस्टमची असावीत.


शेळ्यांचा विमा
 • 4 महिने वयापासून शेळ्यांचा विमा जनरल इन्शुअरन्स कंपनीज् मार्फत काढला जाऊ शकतो.  
 • अपघात किंवा रोगामुळे शेळीला मरण आल्यास विम्याचा दावा केला जाऊ शकतो.


भारतामध्ये शेळ्यांचे फार्म
 • नादूर शेळी फार्म
 • शिवाजी पार्क शेळी फार्म

Tuesday, 16 April 2013

सेंद्रिय खत :-

वनस्पती व प्राणी यांच्या .अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात .
सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे शेणखत ,कंपोस्ट ,हिरवळीची खते ,गांडूळ खते ,माश्यांचे खत ,खाटिक खाण्याचे खत ,हाडांछे खत ,तेलबियांची पेंड इत्यादी.
१) शेणखत :- शेण ,मुत्र ,गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकापासून तयार होणा-या खताला शेणखत म्हणतात .त्यामध्ये नत्र ०.५ टक्के ,स्फूरद ० .२ टक्के व पालाश ०.५ टक्के असते .शेणाचा महत्त्वाचा उपयोग म्हण्जे बायोगँसमध्ये उर्जा निर्मितीसाठी होतो .आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणुन वापरले जाते.
२) कंपोस्ट खत :- शेतातील गवत , पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष ,भुसा ,उसाचे पाचट ,कापसाची धसकटे इ .सेंद्रिय पदार्थाचे सुक्ष्मजीवजंतु मुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात .यामध्ये नत्राचे प्रमाण ०.५ % स्फुरद ०.१५ % आणि पालाश ०.५ % अशी असते.
३) हिरवळीची खते :- लवकर वाढणा-या पीकांची निवड करून ,त्यांची दाट पेरणी करुन पीक फुलो-यावर येण्याच्या आधी ते नागराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात त्यापासून जमीनीला नत्र मिळतो .जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते .अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात .
नत्राचे प्रमाण – ०.०३ % ते २ . ४ %
गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो.
हिरवळीच्या खतांसाठी वापरण्यत येंणारी पीके -
१) ताग , २) धैच्या , ३) मूग , ४) चवळी , ५) गवार , ६) शेवरी , ७) बरसीम ,८) ग्लीरीसिडीया तागापासून हेक्टरी ४० ते ५० किलो नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो .
मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात ४० % वाढ होते.
४) गाडूळ खत - ह्या खतात गांडूळाची विष्ठा ,नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ , गांडूळाची अंडीपूंज ,बाल्यावस्था आणी अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.
५) माशाचे खत - समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला माशाचे खत म्हणतात.
नत्राचे प्रमाण ५ . ९५ %
स्फुरद प्रमाण ५ . २० %
पालाश प्रमाण ९ . ३६ %
६) खाटीकखान्याचे खत - खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात .
नत्र : १० ते १२ %
स्फुरद : १ ते १.५ %
पालाश : ०.६ ते ०.८ %
हाडांचे खत -हाडे दळून बारीक करतात किंवा हाडांवर पाण्याची वाफ दाबाने सोडतात, वाफेतील उष्णतेमुळॆ स्निगध पदार्थ वेगळे होऊन हाडे मऊ ,ठिसूळ बनतात ,दळून बारीक करतात .अशा खतांना हाडाचे खत म्हणतात.
नत्र ३ .८८ %
स्फुरद : २१ .५६ %
८) तेलबियांची पेंड तेल काढल्यानंतर जी पेंड राहते तिचा खत म्हणून वापर करता येतो .उदा .एरंडी ,निंब,करंज.
९) द्रव खते (Liquid fertilizer) - ही खते गोमुत्र ,वनस्पतीचा अर्क ,ताक,गुळ ह्यापासून तयार करतात .जरी ह्या खतांच्या द्वारे जमीनीला अन्नद्रव्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत नसला तरी ,ह्या खतामुळे मातीत फायदेशीर सुक्ष्म जीवाणूंचा संचय व त्याची कार्यक्षमता वाढते .
१०) घन स्वरुपातील सेंद्रिय खते- ही खते तयार करताना तादंळाचे पाणी ,तेलबियांचे पेंड व माशाचे खत १०:१:१ प्रमाणात घेवून त्याला चांगले सडवावे .सडविण्याची क्रिया नियंत्रित असायला वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू वापरतात .

सेंद्रिय पशू संवर्धन

मनुष्य आणि पाळीव पशूचा संबंध फार पूर्वी पासून आहे .विशेषत : गायी ,म्हशी व बैल ,पुर्वी असे एकही कुटुंब नव्हते की जिथे पशू नसायचे याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोकुळ होय .तसेच पुर्वीचे लोक पशूंची निगा घरातील एखाद्या सदस्यासारखी घ्यायचे व त्याच प्रमाणे त्यांना घरातील सदस्याप्रमाणे नावे देवून संबोधायचे ,त्याच्यासोबत घरातील सदस्याप्रमाणे वागणूक करायचे ते कधीच त्याच्याकडे व्यावसायिक दुष्टीने बघायचे नाही .कारण मानवाने ३३ कोटि देवतांच्या पुजेचे पुण्य एका गायीची पूजा करून मिळविलेले आहे . म्हणुनच आपण पोळ्यासारखा सण मोठ्या उत्सवात साजरा करतो व त्यामुळे हे पशू सेंद्रिय शेतीतील अविभाज्य घटक आहे.पाळीव पशूशिवाय सेंद्रिय शेती अपूर्ण आहे सर्वसामान्य शेतक-याच्यादुष्टीने पशुपालन दुग्धव्यवसाय म्हणून समजल्या जातो .परतू सेंद्रिय शेतक-यांनी पशूंची निगा त्याच्या कुटूबातील सदस्यप्रमाणे घेतली पाहिजे .
मानवाच्या आहारात विशेषत : बालकांकरिता गायीचे दुध हा एक सर्वोत्तम नैसर्गिक आहार आहे .मातेच्या दुधानंतर गायीचा दुधाचा क्रमांक प्रथम लागतो .गायीच्या सर्वागिण उपयुक्ततेमुळे तिला भारतात गोमाता संबोधण्यात येते .म्हणून शेतीला पुरक म्हणून पशूसंवर्धन करायला पाहिजे कारण पशुसंवर्धन हे सेंद्रिय शेतीचाच एक भाग आहे जर सेंद्रिय शेतक-याने सेंद्रिय पशुसंवर्धन हे अतिशय महत्त्वाचे आहे तसेच सेंद्रिय शेती पशुशिवाय केले नाही तर त्या शेतक-याची सेंद्रिय शेती ही अर्धवट राहिल त्यासाठी सेंद्रिय पशूसंवर्धन हे अतिशय महत्त्वाचे आहे तसेच सेंद्रिय शेती पशूशिवाय होवून शकत नाही कारण शेतीला सर्वात महत्त्वाचे पुरक घटक म्हणजे शेण ,गोमुत्र ,दुध हे जनावरापासूनच मिळते ,तेव्हा सेंद्रिय शेतात खताचे माध्यम म्हणून जनावर आहेत .त्याचप्रमाणे शेतीतील मनुष्याला उपयोग न पडणारे पीकाचे अवशेष आपण जनावरांना खाऊ घालू शकतो व नंतर शेण म्गोमुत्र ,याचा वापर आपण शेतीमध्ये करतो ही अशीच साखळी सुरु असते.त्यामुळॆच सेंद्रिय शेती ही सर्वच गोष्टीनी एकत्रित असलेली शेती आहे .तसेच गायीच्या शिगाचा उपयोग करून बायाडायनँमीक पध्दतीने खते तयार करतात .या खतामुळॆ निकूष्ट दर्जाच्या जमिनीची सुपीकता वाढते त्यामुळॆ ‘गाय ’ ही खरी कामधेनुच आहे.
सेंद्रिय पशूसंवर्धनातील महत्त्वाच्या गोष्टी
सेंद्रिय पशूसंवर्धन करतांना खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत :-
1. आपल्याकडील पशू देशी (स्थानिक) जातीचे असावेत.
2. सेंद्रिय शेतीचा पशू हा विभाजन न करु शकणारा भाग आहे.
3. ज्याठिकाणी आपण पशू बांधतो तेथील माती सुपीक बनते त्यामुळॆ पशूना एका जागेवर न बांधता फॆरपालट करावा.
4. पशूंचा आहार हा सेंद्रिय म्हणजे शेतीतील असावा व पिण्यांचे पाणी हे स्वच्छ असावे.
5. पशूंची निगा कुटुंबातील सदस्याप्रमाणे घ्यावी .
6. पशूनी संबोधण्यासाठी त्यांना नावे द्यावी .
7. पशूंना गोठयात मुक्तपणे राहता येईल अशी व्यवस्था करावी .
8. शेतक-याने आपल्या शेतीतील एक भाग चारा-पीकांसाठी ठेवावा.
9. शेण व गोमुत्र जमा करण्यासाठी गोठ्यात एका बाजुला व्यवस्था करावी .
10. पशूंचे प्रजनन हे नैसर्गिक पध्दतीनेच करावे .
11. प्रजननसाठी कुत्रीम रेतन पध्दत सेंद्रिय पशूसंवर्धनात वापरु शकतो परंतु बिज रोपण पध्दत वापरु शकत नाही .
12. सेंद्रिय पशूसंवर्धनामध्ये पशूंना पारंपारिक व आयुर्वेदिक पध्दतीनेच औढधोपचार करावा जर जनावराचा आजार फारच गंभीर असेल तर त्याला पशुवैद्यकाला दाखवावे.
13. सेंद्रिय पशूसंवर्धनामध्ये पशूला लसीकरण करून घ्यावे.
14. सेंद्रिय पशूसंवर्धनामध्ये आजारी पशूसाठी दुप्पट वेळ द्यावा (withdrawal period). म्हणजे जर पशूला आपण वैद्यकीय़ उपचार केला असेल तर साधारणात : त्या गायी ,म्हशीचे दुध आठ दिवस वापरत नाही तसेच सेंद्रिय पशुसंवर्धनामध्ये हेच दुध १६ दिवसापर्यत वापरू शकत नाही .म्हणजेच withdrawal period हा दुप्पट ठेवावा.
15. सेंद्रिय पशूसंवर्धनामध्ये गाईच्या दुधावर पहिला हक्का हा वासराचा असायला पाहिजे .
16. गाय व्याल्यानंतर एक दोन दिवसात वासरु वारल असेल तर त्या वासराला व्यवस्थितरित्या जमीनीत पुरावे ते मेलेले वासरु गायीसमोर ठेवू नये.
17. सेंद्रिय पशू संवर्धनामध्ये पशुला व्यावसाआयिक दुष्टया न पाहता त्यांच्यापासून मिळणा-या शेण ,गोमूत्र व दुध या सर्व सेंद्रिय शेतीला आवश्यक घटक पुरवणारे कुटुंबातील एक सदस्य आहे, असे वागवावे.
18. गायीच्या शिंगाचा उपयोग करून बायोडायनँमीक पध्दतीने खत तयार करता येते.
पशुव्यवस्थापन
भारत हा कूषीप्रधन देश आहे .आपल्या देशात फार काळापासून पशूंचे संगोपन केले जाते. शेती व्यवसायात कामासाठी बैल मिळावे या उद्देशाने गायी साभाळल्या जात आहेत .त्याप्रमाणे काही लोक शेतीला जोडधंदा म्हणून दुध उत्पादनासाठी पशू पाळतात .परंतू सेंद्रिय शेतीमध्ये पशू हे व्यवसायदूष्टीने न पाळता त्यांचा आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये काय उपयोग आहेयाचा विचार .करून सेंद्रिय पशूसंवर्धन करावे,त्यासाठी पशूव्यवस्थापन हे फार महत्त्वाचे आहे .पशुव्यवस्थापन करतांना पशू हे आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहेत याप्रमाणे त्यांच्याशी वर्तवणूक करावी पशूव्यवस्थापामध्ये पशुंचा आहार ,संगोपन ,आरोग्य या अतिश्य महत्त्वाच्या गोष्टी आहे .तेव्हा वासराच्या जन्मल्यापासून त्याची काळजी घ्यावी.
सेंद्रिय पशूसंवर्धनामध्ये व्यवस्थापनाला फार महत्व आहे .व्यवस्थापनाच्या दूष्टीकोनातून खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत
1. पूरक मोकळी जागा.
2. पशूच्या आवश्यकतेनुसार पूरक ताजी हवा आणि नैसर्गिक प्रकाश.
3. गोठयातील पशूंना ताज्या व स्वच्छ पाण्याचा मुबलक पुरवठा.
4. उन्हापासून ,पावसापासून ,उष्णतेपासून व वाहत्या वा-यापासून आणि अति आवाजापासून पशूंचे संरक्षण करणे.
5. गोठयातील खालची जमीन गुळगुळीत नसावी
6. गोठा बांधतांना खालील जमीन ही नैसर्गिक वस्तुंची बाधावी
7. पशूच्या गरजेनुसार समतोल सेंद्रिय आहार द्यावा.
8. पशूपालकाने जबाबदरीने पशूंना लागणा-या दैनदिन गरजा पुरवाव्यात 
9. गोठा बाधणीसाठी वापरण्यात येणारे साहित्य हे पशूला व माणसाला हानी पोचवणारे नसावे
10. जनावरे बाधून ठेवणेही पध्द्त जरी चांगली असली तरीही मोकळ्या कुरणात पशुला चरायला पाठविणे ही पध्दत सेंद्रिय पशूसंवर्धनात योग्य आहे.
11. गोठयामध्ये मोकळी हवा भरपूर येईल व त्यायोगे गोठयामध्ये उष्णता निर्माण होणार नाही व प्राणवायुचा पुरवठा भरपूर प्रमाणात पशुना होईल.
12. धार काढण्याच्या अर्धातास आधी पशूंना रोज खरारा करावा व हवामानानुसार धुवावे.
13. सकस वैरण स्वत:च्या सेंद्रिय शेतात तयार करावी .ती बाराही महिने दुभत्या पशूना पुरेल अशी तयार ठेवावी. त्यासाठी पशूपालकाने आपल्या सेंद्रिय शेतीचा एक भाग पशूच्या चारापिकसाठी ठेवावा व पशूंना वर्षभर चारा पुरेल अशी व्यवस्था करावी.
14. पशूवर सतत लक्ष ठेवून आजारी जनावरांवर त्वरीत पारंपारिक उपचार करावे व जखमा वगैरे झालेल्या असल्यास त्यावरही त्वरीत योग्य पारंपारिक उपचार करावा.
15. पशूंना वेळोवेळी संसर्गजन्य रोगाविरुध्द लस टोचून घ्यावी .सेंद्रिय पशूसंवर्धनामध्ये लसीकरण पध्दती वापरता येते.
पशूची योग्य निगा घेणे हे सेंद्रिय पशूसंवर्धनातील यशाचे रहस्य आहे.
१) गाभण पशूंची निगा :-
गाभण गाई सातव्या व म्हशी आठव्या महिन्यानंतर कळपासून वेगळया कराव्यात .वेगळया केलेल्या गाईना स्वतंत्र हवेशीर ,कोरडया व स्वच्छ गोठयातून खाऊ घालावे चराईसाठी जवळच सेंद्रिय कुरणाची व्यव्स्था असेल तरच न्यावे ते जास्त लांब असेल तर पशूंना नेवू नये. रोजच्या आहाराचे नियंत्रण पुढील तक्त्यात दिल्याप्रमाणे करावे,जेणेकरून गर्भाचे आणि आईच्या शरीराचे पोषण उत्तम होईल.
गर्भकाल (महिने) - गाय- म्हैस
खुराक(किलो)- हिरवाचारा(किलो) खुराक - हिरवाचारा(किलो)-
७ - १.५ - १० २.०- १२
८- २.० - १२- २.५- १५
१०- - - ३.५ - २०
पिण्यास स्वच्छ व मुबकल पाणी द्या व खाईल तेवढा कडबा द्या.
२) विणा-या पशूंची काळजी :-
विण्यासाठी म्हशीस भादरुन घ्या . सर्वसाधारणपणे दर ६ महिन्यांनी म्हशीना भादरावे .पशू विण्या आधी एक दिवस योनीतून पांढरा चिकट द्रव वाह्तो. जनावरास गोठयात मोकळे सोडा .त्यास तनस किवा गवताची बिछायत करा स्वच्छ पाण्याची सोय करा.पशूना कळा येतात ,ते उठबस करते .पाण्याची पिशवी योनीतून बाहेर येते ,ती फुटते आणि वासरु डोके पुढच्या पायाकडुन बाहेर येते नैसर्गिकरित्या साधारणपणे अर्धा ते एक तासात पशू विते.जास्त वेळ लागल्यास जवळच्या पशूवैद्यकास बोलवावे.
प्रसुतीनंतर जार एक दीड तासात पडतो .तसे न झाल्यास पशूवैद्यकाची मदत घ्यावी .पशूच्या पाठीमागचा भाग गरम पाण्याने स्वच्छ करावा.योनीच्या बाह्यांगास गोडेतेल लावावे.कण्या किंवा घुग-या लवकरात लवकर द्याव्यात ज्वारी /बाजरी / गहु/ मका १किलो शिजवावे,त्यात अर्धा किलो गुळ व मुठभर मीठ ,१ ओला नारळ (खोबरे),१००ग्रँम मेथी ,१०० ग्रँम शेपु टाकुन ३-४ दिवस सकाळ संध्याकाळ खाऊ घालावे .या काळात दुध कच्चे असते,त्यालाचिक म्हणतात ,हा चिक वासरास लवकारात लवकर पाजावा.
३) दुभती गाय / म्हशीची काळजी
1. दुभत्या गायीचा /म्हशीचा चाराउत्कूष्ट व सकस असल्यास खुराकाचा खर्च कमी येतो.
2. बरसीम ,लुसर्न ,सुबाभुळ इत्यादी द्विदल चारा दिल्यास खुराक कमी लागतो. 
3. द्विदल चा-यात पचनीय प्रथिनाचे प्रमाण जास्त असल्यामुळॆत्यांचा वापर करावा.
4. एका गायीस दररोज आठते दहा किलो सेंद्रिय चारा द्यावा
5. हिरवा चारा असल्यास एक किलो वाळलेल्या चा-यासाठी तीन किलो हिरवा चारा द्याव
6. शरीरा पोषणासाठी एका गायीस अंदाजे एक ते दीड किलो खुराक द्यावा पण द्विदल चारा भरपूर दिल्यास शरीर पोषणास खुराकाची आवश्यकता नसते.
7. दुध उत्पादकांनाकरिता गायीस दररोज दुध उत्पादकांनाच्या ४० ते ५० टक्के खुराक द्यावा.
8. म्हशीमध्ये दुध उत्पादकांनाकरिता दुधाच्या ५० ते ६० टक्के खुराक द्यावा.
9. गर्भवस्थेतील शेवटच्या तीन महिन्यात दररोज एक ते दीड किलो जास्तीचा खुराक द्यावा ,म्हणजे गर्भाची वाढ नीट हॊईल .
10. खुराक मिश्नण बनवितांना सेंद्रिय मका,ज्वारी ,जव ,बाजरी ,गव्हाचा कोडा इ. यांचा ऊर्जा पुरविण्यासाठी उपयोग होतो.
11. भुईमुगाची ,सरकीची ,जवसाची व सोयाबीनची ढेप यांचा प्रथिनासाठी उपयोग होतो परतू सर्व वापरलेली पीके ही सेंद्रिय शेतीतील असायला पहिजे.
12. खुराकात दोन टक्के मीठ घालावअ
४) उन्हाळयामध्ये जनावरांची घ्यावयाची काळजी
गाई व म्हशीपासून उन्हाळायत जास्त उत्पादन घेण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात.
1. पशूंना शक्यतो थंड जागी बांधून ठेवावे .त्यासाठी गोठयाच्या भोवती झाडे लावण्याची व्यवस्था करावी.
2. शरीराचे तापमान सरासरी ठेवण्यासाठी दुपारी १२ ते २ च्या दरम्यान जनावरांच्या अंगावर बादलीने थंड पाणी टाकावे .ही क्रिया दोन ते तीन वेळा करावी.
3. पशूंना उन्हाच्या वेळात चरण्यासाठी फिरवू नये.
4. पशूंना सकाळया थंड वेळी व संध्याकाळच्या वेळी चारा द्यावा.
5. थंड पाण्याची व्यवस्था करावी .
५) वासराचे संगोपन :-
आजची वासरे ही उद्याची दुध देणारी व शेतीकाम करणारी भावी पिढी होय. वासरांच्या सर्वांगिण विकासासाठी व वाढीसाठी उत्तम् संगोपन आवश्यक आहे वासरु जन्मल्यानंतर त्याचे अंग आईस चाटू द्या. नाक ,तोड व कानातील चिकट पदार्थ चाटून स्वच्छ करु द्या .कोरड्या स्वच्छ फडक्याने किंवा बारदाण्याने अंग पुसुन काढा .पिवळे नरम खुर काढून टाका .नाळ पिळून कापून टाका आणि त्या ठिकाणी तुरटीचे द्रावण लावा .सशक्त वासरु आपोआप उभे राहिल. नवजात वासरांला श्वासोच्छवास घेणे अवघड होत असल्यास त्यास कोरड्या बारदाण्यावर आडवे झोपवून छाती हळूवार चोळा .दाब द्या व सोडा.वासरू श्वासोच्छवास चांगले करू लागेल वासरास पहिल्या अर्ध्या तासात चिक पाजा .त्यामुळे त्यास रोगप्रतिबंधक शक्ती मिळेल .वासराचे जन्मत :वजन २०ते २५ किलो असते. जर वासरास आई पाजत नसेल तर वासराच्या वजनाच्या १० % दुध तापवून कोमट करून दोन भागात सकाळ संध्याकाळ स्वच्छ पाण्यातूण पाजवावे.वासरास दर तीन महिन्यांनी जंताचे औषध घ्यावे. 
पशूंना गोठा
ऊन ,पाऊस ,थंडी ,वारा यांपासून संरक्षण मिळविण्यासाठी आपल्या पशूंना योग्य निवारा दिला गेला पाहिजे व त्यांना मोकाट पशूंना त्रास नये याची काळजी घेतली पाहिजे ,तसेच पशूंनी शेतीतील पिकांचे नुकसान करू नये याची काळजी पशूपालकांनी घ्यायला पाहिजे.
गुरांना पुढे दिलेल्या कारणांकरिता निवा-याची आवश्यकता असते.
१) अतिथंड ,अतिउष्ण व पाऊस अशा प्रतिकुल हवामानापासून बचाव करणे ,कारण प्रतिकुल हवामानामुळॆ गुरांचे दुध उत्पादन कमी होते.
२) खाद्यतून मिळालेल्या उर्जेचा उत्पादनासाठी जास्ती जास्त उपयोग होणॆ,प्रतिकुल हवामानात खाद्यातील काही उर्जा वाया जाते व आर्थिक नुकसान होते.
३) इतर प्राण्यांपासूण सरंक्षण
४) चारापाणी ,दुध काढणे व मलमुत्र काढणे .इ. कामे सुलभ होण्याकरिता आणि गुरांना एकंदरित वातावरण आरामदायक होण्यासाठी.
५) दुभती जनावरे मोकळ्या,पध्दतीच्या गोठयात ठेवली असता त्याच्या दुध उत्पन्नावर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही.
पशूंचा गोठा कसा असावा
१) पशूंना उभे रहायला व त्यांच्या नैसर्गिक वागण्याला पुरेशी जागा असावी.
२)पुरेशी सुर्यप्रकाश गोठयामध्ये पडेल अशी रचना असावी.
३)पशूंचे ऊन,पावसापासून व वाहत्या वा-यापासूण ,थंडीपासून संरक्षण होईल असा गोठा असावा.
४)गोठयामध्ये पशूंना पुरेशी स्वच्छ हवा मिळावी .
५) गोठयातील खालची जमीन जनावराचे पाय घसणार नाही अशी योग्य असायला हवी.
६)पशूंना रोज योग्य व्यायाम झाला पाहिजे याची काळजी घ्यावी.
७) गोठयात एका बाजूला शेण व गोमुत्रासाठी खड्डा खोदावा व ते जमा करावे.
गुरांच्या गोठयाचा नकाशा तयार करण्याआधी त्याच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घ्याव्या लागतात.या व्यतिरिक्त मजुरीवरील खर्चातील काटकसर व सेंद्रिय चारा ,सेंद्रिय खाद्य ,पाणी मलमुत्रविसर्जन इ.सोईस्कार व्यवस्था या बाबीचा पण विचार करावा लागतो. याशिवाय गोठयामध्ये रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास तो कसा कमी करता येईल ? याचाही विचार करावा लागतो.
गोठयाकरिता जागेची निवड :-
पशूंना गोठयासाठी योग्य जागेची निवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे. जागा निवडतांना गोठयात भरपूर प्रकाश येईल ,भरपूर हवा येत राहिल ,परंतू वादळाच्या किंवा वाहत्या वा-याचा त्रास होणार नाही याचा सविस्तर विचार प्रथम केला पाहिजे .पशूंना गोठा माणसाच्या राहत्या ठिकाणापासून दुर असावा. परंतु गोठयात काम करणा-या कामगारांची घरे गोठयाच्या जवळ असावीत .ज्या योगे रात्रीच्या वेळी अथवा पावसाळयात जनावरांची योग्य काळजी घेतली जाईल.
गुरांच्या गोठयाकरिता जागा निवडतांना त्या भागातील हवमानाचा विचार करावा .गुरांच्या गोठयाची जागा मोकळी,जमीन मुरमाड व पाणी निचरा होणारी असावी .जमीनीस थोडा उतार
असल्यास पाण्याचा निचरा चांगला होतो.जागेच्या आसपास मोठी झाडॆ असल्यास अतिउष्ण किंवा थंड वा-यापासून बचाव होतो. गोठा रस्त्यापासून ८० ते १०० फुट अंतरावर असावा.म्हणजे येणा-या गुरांपासून रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते
गुरांच्या गोठयाची बांधणी  
गुरांच्या गोठयाची बांधणी करतांना ब-याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. गोठयाची बांधणी करतांना पुढे दिलेल्या गोष्टी लक्षात घ्याव्यात -
गोठयाच्या भिंती - भिती बांधतांना पुढील सहित्याचा वापर करावा.
विटा ,सिमेंट ,लाकुड ,टिनाचे पत्रे ,पाढरी माती ,विटांची जाळी (सर्व रासायनिक प्रक्रिया केलेले)
यापैकी कोणतेही वापरावयाचे असल्यास काही महत्त्वाच्या बाबीचा विचार करावा लागतो.तो असा-
१) पक्केपणा :- मोठया गुरांचा ज्या ठिकाणी भिंतीशी संपर्क येतो अशा ठिकाणी भिंती ,विटा ,माती किंवा सिमेंट काँक्रीटच्या पक्क्या बांधणीच्या असाव्यात .गोठयाचा पाया भिंतीच्या जाडीच्या चारपाट फिट रुंद असावा व भरपूर खोल असावा .तो शक्यतो सिमेंट काँक्रीटने भरून घ्यावा. त्यामुळॆ जमिनीतील पाण्याचा पायव्याच्या भिंतीस व पर्यायाने संपूर्ण इमारतीस धोका होणार नाही .गुरांच्या उंचीच्या वरील भिंतीचा भाग साधरण हलक्या सामानापासून बनविलेला असावा.
२)उष्णताप्रतिबंधक उपाय :- मोठया गुरांकरिता भिंतीना उष्णताप्रतिबंधक उपाय असण्याची आवश्यकता नसते.परंतु लहान वासरांकरीता मात्र गोठयांच्या भिंती उष्णताप्रतिबंधक असाव्यात.
३) स्वच्छता :- गुरांच्या गोठयांच्या भिंतीत, भितीच्या फटी ,जोडकोपरे इ .मध्ये रोग जंतूच्या किंवा कीटकांचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता असते म्हणून भिंती वारंवार जंतंतुविरहित कराव्या लागतात. भिंती शक्यतो चोपडया ,फटी नसलेल्या व कमी जोड असलेल्या असाव्यात ,म्हणजे त्यात घाण साचत नाही .
गोठयातील जमीन
गोठयातील जमीन पुढे दिल्याप्रमाणे असावी.
टिकाऊ ,खडबडीत ,पाणी किंवा मुत्र न शोषणारी ,सहज स्वच्छ होणारी ,ओल नसणारी ,उष्णता प्रतिबंधक आणि गुरांना आरामदायक .
गोठयाचे छप्पर -
छप्पराचे प्रमुख गुणधर्म पुढे दिल्याप्रमाणे असावेत -
१) छप्पारामुळॆ गोठयातील गुरांचे ऊन ,थंडी व पाऊस यांपासून संरक्षण व्हावे.
२) छप्पर गुरांना आरामदायक असावे.
३) छप्पर दीर्घकाळ टिकाऊ असावे.
४) सहजरित्या बनविता यावे.
५) कमीत कमी खर्चाचे असावे.
६)गोठयाचे छप्पर मध्यभागी १५ फुट व बाजुस ६ ते ८ फुट उंच असावे.
गोठयाचे छप्पर पुढील साहित्याचे असावे.
कौल, लाकूड ,गवत किंवा तुराटया,टिनाचे पत्रे (रासायनिक प्रक्रिया न केलेले )
गोठे कसे असावेत -
गोठयाची आखणी करतांना पुढील गोष्टीचा विचार करावा लागतो.
• प्रक्षेत्राचे आकारमान 
• जमिनीचा प्रकार व हवामान
• गोठे वापरण्याचा काळ
• मजुरांची उपलब्धता
५) गोठयांची बांधणी
गोठयाच्या आतील रचना :- गोठा बांधतांना आपण किती जनावरे आत बांधणार आहोत त्या संख्येचा , आत बांधलेल्या जनावरांच्या वैरणीच्या सोईचा ,मलमुत्र सुलभपणे गोठयाच्या बाहेर पडण्याची आणि संपुर्ण गोठा सतत कमी त्रासात व कष्टात स्वच्छ होईल अशा पध्दतीने बांधण्याचा विचार करावा. गोठयात बांधण्याच्या जनावरांची संख्या १६ पेक्षा कमी असेल तर सर्व जनावरे एकाच ओळीत बांधता येतील व त्याचप्रमाणे रचना करावी .शक्यतो पुच्छते पुच्छ पध्दरी वापरावी .
गोण पध्दत :- या पध्दतीत गायी बहुतेक काळ गोठयातच राहतात व दुध गोठ्यातच काढत असल्यामुळॆ निर्मळ दुध उत्पादनासाठी स्वच्छता ,गायीचे आरोग्य व त्यांना आराम याकडे विशेष लक्ष पुरावावे लागते.ही पध्दत गायीची संख्या कमी असल्यास कळपाचा विस्तार करावयाचा नसल्यास व मजुरी कमी असेल तेथे उपयोग असते.याकरिता लागनारी इमारत सहज स्वच्छ करता येण्यासारखी ,मलमुत्र सुलभरितीने वाहुन नेता येतील अशी ,भरपूर हवेचा पुरवठा असणारी व प्रकाशाचा पुरवठा असणारी ,मुबलक पाणीपुरवठा असणारी व सहज ये - जा करता येईल अशी असावी लागते.
कमी खर्चाचे गोठे :- ग्रामीण भागात आर्थिक अडचणीमुळॆ गोठयावरील खर्च कमी करावा लागतो .अशा वेळी भरण मार्ग व दुध मार्ग न ठेवल्यास चालते.गव्हाण पक्की बांधता येण्यासारखी नसल्यास बांबूची किंवा लाकडाची बांधावी .गायीना उभे राहण्याची जागा व मागील नाली शक्यतो सिमॆंट काँक्रिटची बांधवी म्हणजे स्वच्छ धुता येते. हे ही शक्य नसल्यास ही जागा दगड भरून त्यावर मुरुम टाकून धुम्मस करावी व शक्यतो कोरड्डी ठेवण्याचा प्रयत्न करावा .छपराकरिता शक्य असल्यास देशी कौल वापरावे म्हणजे आगीचे भय कमी होते. गोठा तीन बाजुने तरी उघडा ठेवावा .हवेचा भरपुर पुरवठा होईल .मात्र गोठयाजवळ शक्यतो पाणी साचू देऊ नये.
गोठयाची लांबी दर गायीकरिता ३ १/२ ते ४ फुट ठेवावी .गायीच्या उभॆ राहण्याच्या जागेची लांबी गायीच्या जातीवर अवलंबून राहिल .लहान जातीकरिता ४ फुट ९ इंच ,मोठया जातीकरिता ५ फुट ३ इंच लांबी ठेवावी .एका जनावरास १ मीटर रूंद व २ मीटर लांब जागा लागते.
पशूंना आहार
पशूसंवर्धनामध्ये उपलब्ध असलेला चारा हा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे.आधुनिक शेतीमध्ये चारापिकांसाठी जमीन नसणे ही वेगळी बाबसुन सेंद्रिय पशूसंवर्धनामध्ये पशुंसाठी सेंद्रिय शेतीतलाच चारा पशुला द्यावा लागतो तेव्हा सेंद्रिय पशुसंवर्धनामध्ये पशुपालकाकडीलसेंद्रिय जमीनीचा काही भाग हा चारापिकांसाठी ठेवावा.
जर पशू हे उत्पादन देणारे म्हणजे दुध ,अंडी ,मटन इ ,असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पशूला समतोल व पुरक आहार मोठया प्रमाणात द्यावा .दुध उत्पादनामध्ये उदा.- दुध उत्पादित गायीला ताजे गवत द्यावे आणि पुरक प्रमाणात प्रथिने दिले गेले पाहिजे .त्यासाठी दुसरे खाद्य द्यावे, याचप्रमाणे काम करणा-या पशुलाही समतोल आहार द्यावा.
गुरांकरिता विविध प्रकारचा सेंद्रिय चारा व खाद्ये वापरतात .कुठलाही एकाच प्रकारचा चारा किंवा एकाच प्रकारचे खाद्य गुरांना खाऊ घालून त्यांच्या शरीराला लागणारी सर्व पोषकद्रव्ये योग्य प्रमाणात पुरविल्या जाऊ शकत नाही ,तेव्हा ३ ते ४ किंवा अधिक खाद्यघटकांचा समावेश असणारा खुराक किंवा २ ते ३ प्रकारच चारा खाऊ घातल्यास त्यांना लागणारी सर्व पोषकद्रव्ये योग्य त्या प्रमाणात पुरविल्या जावू शकतात. ही खाद्ये त्यांच्यातील वैशिष्टयानुसार निरनिराळया गटांमध्ये विभागल्या जातात. ही विभागणी मुख्यत : त्यातील पाण्याचे प्रमाण ,प्रथिनांचे प्रमाण ,दुढतंतुचे प्रमाण ,खाद्याची किंमत व उपलब्धतेनुसार करण्यात येते .एखाद्या गटतील एखादा खाद्यघटक जर उपलब्ध नसेल ,तर त्याच गटतील दुसरे खाद्य वापरल्या जावू शक्ते.याकरिता या खाद्यघटकांचे वर्गीकरण आणि खाद्यपदार्थाचे गुणधर्म माहित असणे आवश्यक असते.
खाद्याचे प्रामुख्याने चारा व खूराक खाद्ये असे वर्गीकरण केले जाते
चारा व खुराकखाद्ये :- चारा व खुराक ही वर्गवारी त्यामध्ये असणा-या दुढ तंतुच्या प्रमाणावर केली जाते.वाळलेल्या चा-यामध्ये दुढ तंतुचे प्रमाण ५८ % किंवा अधिक असून पोषकद्रव्याचे प्रमाण कमी असते. निकूष्ट प्रतीच्या चा-यामध्ये लिगनीन नावाच्या न पचणा-या पदार्थाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळॆ इतर खाद्याची पाचकतासुध्दा कमी होते. खुराकात दूढ तंतुचे प्रमाण १८ टक्क्यांपेक्षा कमी असून त्यात उर्जा किंवा प्रथिने जास्त प्रमाणात असतात.
अ) चारा (वैरण ) - चारा हे गुरांचे प्रमुख खाद्य असून तो हिरवा किंवा वाळलेला असतो .चा-यांचे वर्गीकरण त्यामध्ये असणा-या पचनिय प्रथिनांच्या प्रमाणावर केले जाते.
१) शरीरपोषणास उपयोग चारा - या चा-यात प्रथिनांचे प्रमाण ३ ते ५ टक्के असुन असा चारा गुरांना नुसता (खुराकाव्यतिरिक्त ) खाऊ घातला असता त्यांच्या शरीरास लागणारी पोषणद्रव्ये मिळतात .त्यामुळॆ त्याचे वजन कमी किंवा जास्त न होता स्थिर राहते.उदा - हिरवा ज्वारी ,हिरवा मका ,ओट्स इत्यादी .
२) शरीरपोषणास उपयोग न पडणारा चारा - या चा-यामध्ये पचनीय प्रथिनांचे प्रमाण ३ टक्क्यापेक्षा कमी असते .त्यामुळॆ गुरांना जर असा चारा खुराकाव्यतिरिक्त खाऊ घातला असता गुरांचे वजन हळुहळि कमी होते कारण या चा-यामधून शरीराला लागणारी पोषकद्रव्ये पुरेशी प्रमाणात उपलब्ध होत नाहीत.
उदा - तणस ,गव्हांडा ,कडबा ,कुटार इ. 
३) उत्पादनास उपयोगी चारा -
ज्या चा-यात पचनीय प्रथिनांचे प्रमाण ५ टक्क्यापेक्षा जास्त असते आणि असा चारा खुरका व्यतिरिक्त विपुल प्रमाणात खाऊ घातला असता जी गुरे ५ ते ८ लिटर दुध देतात त्यांचे उत्पादन टिकून राहते.
उदा . - बरसीम ,ल्युसर्न ,सुबाभुळ इ .हिरवा चारा असल्यास त्याचे मुल्य तुलनेकरीता वाळलेल्या चा-याच्या आधारावर ठरवतात .
ब) खुराक खाद्य - खुराक खाद्य पुढील गटात विभागतात-
१) धान्ये - धान्यामध्ये पिष्टमय पदार्थ जास्त असल्यामुळे उर्जेचे प्रमाण अधिक असते व प्रथिने कमी असतात.
उदा. मका, ज्वारी ,गहु,तांदुळ ,बाजरी इ.
२) द्विदल धान्य - यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते .उदा .तुर , हरबरा ,मुग ,उडीद इ .
३) गाळिताची धान्ये ( तेलबिया ) - यात तेलाचे व प्रथिनांचे प्रमाण जास्त असते उदा जवस ,भुईमुग ,सोयाबीन ,तीळ ,सुर्यफुल ,करडी ,सरकी इत्यादी .
४) वरील खाद्यांपासून मिळणारी उपउत्पादने - उदा . कोडा ,चुरी ,विविध प्रकारची ढेप इत्यादी .
चा-याची गरज - पशूंना दोन करणासाठी वैरणीची गरज असते.
१) स्वत :चे शरीरासाठी
२) उत्पादनासाठी किंवा कार्यशक्तीसाठी
पशूंना स्वत:च्या शरीरासाठी म्हणजे जीवमान सांभाळणयासाठी खाद्य लागते .खाद्यामुळॆ शरीराचे तापमान राखले जाते. जनावरांना कार्यशकती मिळते दैनंदिन जीवनात शरीराच्या पेशीची होणारी झीज भरून निघते आणि शरीरिक गरजा पु-या होतात. उत्पादनासाठी म्हणजे दुध ,मांस उत्पादन ,लोकर ,अंडी उत्पादन इत्यादीसाठी वैरणीची गरज असते.
पशूंचे प्रमुख अन्न म्हणजे झाडपाला ,वैरण इत्यादी म्हणजे वनस्पतीजन्य पदार्थ होय .गाय हे सजीव यंत्र आहे. माणासाला आहार म्हणुन उपयोग नसलेले पदार्थ खाऊन मानवाच्या आहारासाठी उपयुक्त पदार्थ तयार करणारे यंत्र आहे.
पशूंच्या खाद्यात वैरणीचा व खुराकाचा समावेश होतो.वैरण कोरडी (सुकी ) व ओली वैरण असते .वैरण या सदरात मका,ज्वारी,ल्युसर्न ,बर्सिम ,गजराज ,सुबाभूळ ,स्टायलो इ .ओली व कोरडी वैरण येते.
खुराकात डाळी ,कडधान्ये तेलबिया ,पेडीचा समावेश होतो.
१) वैरण – वैरण दोन प्रकारची असते.
अ) कडधान्याची
ब) तूणधान्याची
अ) कडधान्याची वैरण दोन प्रकारची असते.
१)वाळलेली वैरण
२)हिरवीवैरण
अ) कडधान्याची वैरण 
वाळलेली वैरण – यामध्ये कडधान्याच्या पिकाची वाळलेली पाने ,पाचोळा,खोडे यांचा समावेश होता उदा. तूर ,हरभ-याची व वाटाण्याची वैरण ,दाणे काढुन घेतल्यानंतर रहिलेला भाग गुरांना खाऊ घालता येतो.
हिरवी वैरण – कडधान्याच्या हिरव्या वैरणीत ल्युसर्न घास ,बर्सिम ,चवळी ,गवार ही पिके येतात .ही वैरण गुरांना अतिशय पोषक असते.यामुळॆ दुध उत्पादन वाढते .या वैरणीमध्ये प्रथिनांचे व एकूण अन्न घटकांचे प्रमाण अनुक्रमे ३.५ ते १२ .५ टक्के असते.जनावरांच्या आहारामध्ये या वैरणीचा जरुर समावेश असावा.
ब) तूणधान्याची वैरण - तूणधान्याची वैरण दोन प्रकारची असते.१)वाळलेली २)हिरवी
१) वाळलेली वैरण – ज्वारी,बारजी ,गहू ,तांदुळ ,ओट अशा पिकांपासुन धान्य मिळाल्यानंतर राहिलेल्या वाळलेल्या भागाचा वैरण म्हणून वापर केला जातो .यामध्ये ज्वारी ,बाजरी ,ओट ही वैरण आहे .पण गहू ,तांदुळ यांची वैरण खाऊ घालतांना तिच्यावर १ टक्का चुन्याचे द्रावण मारावे .अथवा ३० ग्रँमपर्यत खडूची पुड त्या वैरणीबरोबर खाऊ घालावी.
हिरवी वैरण -
मका ज्वारी व इतर गवतांचा यामध्ये समावेश होतो .हिरवा मका ,ओट ही सर्वात चांगली वैरण आहे.कारण यामध्ये प्रथिनांचे व एकूण अन्नघटकांचे प्रमाण १.२ टक्के व १.६ टक्के असते हीवैरण पशूंना अधिक आवडते.
याशिवाय नेपियर ,गजराज ,गिनी गवत ,सुदान गवत ,दिनानाथ ,दशरथ, पँराघास इत्यादी हिरवी वैरण दुभत्या पशूंना खाऊ घालतात पशूंना त्यांच्या वजनाच्या २.५ टक्के चारा लागतो.पशूंना चरावयास सोडणे अत्यंत चागले परंतु तयार केलेले कुरण हे सेंद्रिय पध्दतीने तयार केलेले असायला पाहिजे कुरणावर सोडयाल्यास जनावर मन लावून खातात व त्यांना पाहिजे तेवढा ताजा चारा मिळतो .उन्हाळ्यात गायीना पहाटे चरावयास सोडावे .यावेळी हवेतील उष्णतामान कमी असल्याने उष्णतेचा गुरांना त्रास होणार नाही व गुरे ४- ५ तास मन लावून चरतील .
कोरडया गवत खाद्यामुळॆ शरीरातील उष्णता वाढते. हवेतील उष्णता व या खाद्यामुळॆ निर्माण झालेली उष्णता शरीराबाहेर टाकणॆ गातीस त्रासाचे पडते .तिची भुक मंदावते व पर्यायाने दुध कमी होते .शक्य असल्यास संपूर्ण वर्षभरात लागणारा कोरडा चारा एकदम विकत घेवून व्यवस्थित रचून ठेवावा .परंतू दिर्घकाळ साठविलेले चा-याचा अंश कमी होतो हे लक्षात ठेवावे.
निसत्व वैरण पशूंना देऊ नये .कारण अशी वैरण पचनासाठी पहिल्या पोटात फार वेळ राह्ते.त्यामुळॆ पशुची भूक मंदावते .व त्याचा परिणाम गुरांच्या शरीरावर व दुध उत्पादनावर होतो .वैरण देतांना तिचे बारीक तुकडे करून द्यावेत .अशामुळॆ २५ ते ३० टक्के वैरणीची बचत होते .वैरण कुट्टी न करता दिल्यास वाया जाणा-या वैरणीचे प्रमाण वाढते व उत्पादन खर्च वाढते .कुट्टी केल्याने वाया जाणा-या वैरणीचे प्रमाण केवळ १ टक्का असते.
२) खुराक -ज्या खाद्यामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण १८ टक्कयाहुन कमी असते,प्रथिनांचे व अन्न घटकांचे प्रमाण जास्त असून त्याची पचनक्षमता जास्त असते.त्यास पौष्टिक खाद्य असे म्हणतात.
पौष्टिक खाद्ये खालीलप्रमाणे बनविली जातात .
धान्ये धान्याचा कोडा व पेंड
१) धान्य – यामध्ये ९ ते १० टक्के प्रथिने असतात. यात तूणधान्ये ,कडधान्ये व इतर धान्यांचा समावेश असतो .मका,ज्वारी ,हरभरा, मेथी इ.
२) धान्याचा कोंडा - धान्य मळणीनंतर अथवा पाँलीश केल्यानंतर जो कोंडा उरतो ,त्याचा खाद्यासाठी उपयोग केला जातो ,.गव्हाचा भुसा यात १० ते १५ टक्के प्रथिने व ६० ते ६५ टक्के एकूण अन्नघटक असतात हे सर्वात उत्तम खाद्य असून जनावरे चवीने खातात .आजारी जनावरांना हे खाद्य अवश्य द्यावे.
३) पेंड – तेलबिया घाण्यात घालून तेल काढण्यानंतर जो चोथा उरतो त्यास पेंड म्हणतात.
४) शेंगदाणा पेंड - सर्वात अधिक प्रथिने म्हणजे ५० टक्के पर्यत असूण चविष्ट असतात.
सरकी पेंड -प्रथिनांचे प्रमाण १८ ते २० टक्के असुन ७२ टक्के एकूण अन्नघटक असतात .ही पॆंड पैदाशीच्या वळूस खाऊ घालू नये.
जवस पेंड – ही पेंड पचनास हलकी असुन यात २५ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते. ही पेंड वासरांना खाऊ घालू नये.
खाद्य तयार करण्याच्या पध्दती :-
नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारी खाद्ये जशीच्या तशी जनावरांना खाऊ घालणॆ धोक्याचे असते.म्हणजे ती पचनास जश असल्याने अथवा जनावरांनी व्यवस्थितपणे न चावता खाल्ल्याने,जशीच्या तशी शेणातूण बाहेर पडतात .अपचन होऊ शकते .जनावरांचे पोट फुगते किंवा खाद्य चवदार नसल्याने जनावर खातसुध्दा नाही ,अशी वेळी त्यांच्यावर एका ठराविक पध्दतीने प्रक्रिया केल्यास हे दोष काढता येतात.
१) धान्याचा भरडा करणे - मका,हरभरा ,गहु ही धान्ये भरडुन खाऊ घातल्यास ही पध्दत मुख्यत: लहान ,म्हाता-या व आजारी जनावरांच्या बाबतीत अवलंबवावी . 
२) धान्य भिजविणॆ - ज्या धान्याची टरफले कठीण असतात अशी धान्ये सहजासहजी चावता येत नाहीत अशी धान्ये पाण्यामध्ये भिजवूण मऊ करावीत .म्हणजे ती सहजासहजी चावली जाऊन पचविली जातात .उदा. सरकी ,हरभरा ,चणॆ इत्यादी .
३) मोड आणंणे - कडधान्ये रात्रभर भिजवून ठेवल्यास त्यांना मोड येतात .त्यामुळे ती पचनास हलकी असतात .शिवाय यात ‘इ’ जीवनसत्व अधिक मिळते. इतर जीवनसत्वे उपलब्ध होतात.
४) वैरणीचे लहान लहान तुकडे करणे :-
हिरव्या अथवा वाळक्या वैरणीचे शेड्याकडील भाग व पाने मऊ असल्याने जनावरे तेवढाच भाग खाऊन टाकतात ,व कठीण बुडाकडील भाग तसाच टाकून देतात . यामुळे वैरणीचा जवळ जवळ ४० टक्के भाग वाया जातो .याकरिता वैरणीचे ४.५ सें .मी एवढे बारीक बारीक तुकडे केल्यास सर्व भाग चवीने खातात व फक्त १ टक्का वैरण वाया जाते .तसेच अशा कुट्टीवर गुळाचे ,मिठाचे पाणी शिपडल्यास वैरणीची सकसता वाढते.
चांगल्या खाद्याचे गुणधर्म -जनावरांच्या चांगल्या खाद्यात खालील गुणधर्म असतात.
१) खाद्य चवदार असावे .त्यामुळॆ जनावरे त्यांच्या क्षमतेनुसार खाद्य खाऊन त्यांचा पुरेपुरे फायदा होतो.
२) खाद्य तयार करतांना वापरात येणा-या पदार्थामध्ये विविधता असावी .म्हणजे ते अधिक चवदार बनून पौष्टिक बनते.
३) खाद्यामध्ये वापरात येणारे पदार्थ चांगले असावेत .ते कुजलेले ,वास येणारे असु नयेत.
४) खाद्यामध्ये खनिजांचे प्रमाण भरपूर असावे.
५) खाद्याचे आकारमान भरपूर असावे.त्यामुळॆ जनावरास त्याचे पोट भरल्याचे समाधान मिळते.
६) खाद्यामध्ये हिरव्या वैरणीचे प्रमाण भरपूर असावे.
७) खाद्य समतोल असावे . म्हणजे त्यामध्ये जनावरास आवश्यक असणारी सर्व पोषकमुल्ये त्यांच्या गरजेनुसार मिळू शकतील.
दुभत्या गायीकरिता खाद्य -
गाय व्याल्यानंतर पहिले चार दिवस साधरणपणॆ दोन किलो गव्हाचा कोंडा,दीड किलो गुळ, दोन औस मीठ व तेवढेच क्षारयुक्त मिश्नण द्यावे .याशिवाय गायीला अंदाजे पाच किलो हिरवी वैरण व पाच किलो कोरडी वैरण द्यावी .पाच ते दहा दिवसांपर्यत दीड किलो खुराक द्यावा व १० ते १५ कि .हिरवी वैरण द्यावी.
दुभत्या म्हशीसाठी खुराक :-
सर्व चारा गायीप्रमाणे द्यावा .फक्त खुराकाचे प्रमाण मात्र पुढील प्रमाणॆ असावे. शरीर पोषणासाठी दीड किलो आणि प्रत्यकी दोन लिटर दुधासाठी एक किलो खुराक द्यावा.
वळूकरिता खाद्य :-
सरासरी पाच ते सहा किलो वाळलेली वैरण व २२ ते ३० किलो वेळेवर अवलंबून असते.त्यासोबत दोन किलो खुराक द्यावा .त्यात नेहमी प्रमाणॆ क्षार मिश्नण टाकावे.
बैलाकरिता खाद्य -
बैलासाठी खुराक त्यांच्या काम करण्याच्या तासावर किंवा वेळेवर अवलंबून असते.विश्नांतीच्या किंवा काही कामाच्या मोसमात बैलांना एक किलो खुराकासोबत पाच ते सहा किलो वाळलेली वैरण आणि २२ ते ३० किलो हिरवी वैरण द्यावी साधारण कामासाठी २ किलो खुराक व १० किलो वाळलेली वैरण आणि १५ ते २० किलो हिरवी वैरण द्यावी .हंगामाच्या दिवसात जास्त कामे असतांना तीन किलो खुराकासोबत १२ ते १५ किलो वाळलेली वैरण व १२ ते १५ किलो हिरवी वैरण द्यावी.
कालवडी व गो-यासाठी खाद्य -
साधारणपणे दोन ते चारा महिन्यांच्या वयापर्यत पाव किलो ,चार ते नऊ महिनेपर्यत अर्धा किलो ,नऊ ते एकविस महिन्यांपर्यत एक किलो व त्यानंतर दिड किलो खुराक द्यावा. त्यात एक टक्का मीठ असावे .दोन ते नऊ महिन्यांच्या वयापर्यत वासरांना पाच किलो वैरण द्यावी.
खुराकासाठी प्रमाण -
खुराक खाली दिलेल्या मुळ पदार्थापासून तायार करावे.
१) गव्हाचा कोडा ४० %
२) तुर चुनी २० %
३)भुईमुग ढेप २० %
४) सरकी ढेप २० %
अशा रितीने तयार केलेला खुराक १२ तास पाण्यात भिजवून पशूंना खाऊ घालावा.
योग्य आहार संयोजनाव्दारे पशुउत्पादकता वाढविणॆ.
१) गुरांना कडबा नेहमी कुट्टी करूनच खाऊ घालावा. त्यामुळॆ उपलब्ध कडब्याचा साठा जास्त दिवस पुरुन मुल्यवान कडब्याची नासाडी होत नाही .
२) उन्हाळयात कोरडा चारा देतांना सोबत साधारणपणे ५० ग्रँम मीठ द्यावे.
३) ढेप अथवा भरडा देतांना ८- १० तास आधी पाण्याने थोडा ओलसर करून द्यावा .म्हणजे चविष्टपणा आणि पाचकता वाढते.
४) खनिजांच्या कमतरमुळॆ होणारे रोग टाळण्यासाठी आणि पशुउत्पादकता वाढविण्यासाठी खनिज मिश्नण जनावरांना दररोज २० ग्रँम खाद्यमिश्नणातुन द्यावे.
५) सुदूढ वासरे जन्मण्यासाठी गाभण जनावरांना गर्भारपणाच्या शेवटच्या ३ महिन्यात दररोज जादा खुराक द्यावा.
६) वारंवार पडणा-या चा-याच्या दुष्काळावर मात करणयासाठी आणि सतत हिरवा चारा मिळवण्यासाठी शक्य असल्यास चा-याची पिके घ्यावीत ,व मूरघास तयार करून ठेवावे.
जनावरांसाठी पोषक अन्नधान्य :-
प्रथिनांनीपरिपूर्णअसलेलेअन्न कार्बोहायड्रेटनीपरिपूर्णअसलेलेअन्न खनीजांनी परि्पूर्णअसलेलेअन्न
प्रथिनांमुळेजनावरांचीवाढ कार्बोहायड्रेहेउर्जापुरविण्याचेकामकरते खनिज हे गर्भवती गाईसाठीदुध
लवकर होतेआणिगाय दुध त्याप्रमाणॆ ते काम करणा-या जना देणा-या गाईसाठी आणि पशूच्या जास्त देते.त्याचप्रकारे काम वराला जास्त प्रमाणात आवश्यक वाढीसाठी फार महत्त्वाचे आहे.
करणा-या बैलांना व गर्भवती असते.
गायीला प्रथिनांची गरज फार
असते.
१) सुबाभूळची पाने तांदुळाची चुरी सुबाभूळच्या शेंगा
२) सुबाभूळच्या शेंगा एरंडीची पाने वाल ,जवस
३)वडाच्या झाडाची पाने मका मासोळयांची भुकटी
४) वाटाणा शेंगाचे टरफली मक्याचा चारा चुना
५) सरकीची ढेप नारळ तांदुळाचा भुसा
६)चवळी शेंगदाणा ढेप मीठ
७)हराळी तुरीची पाने आणिशेंगा
८) खायच्या तेलाची पेंड तांदुळाचा भुसा
९) चना ज्वारीचे धांडे
१०) अंब्याची पाने ज्वारी
११) शेंगदाण्याची ढेप ऊस
१२) तुर
१३) तांदूळ
१४) तीळाची ढेप
१५) सोयाबीन
१६) गव्हाचा भुसा