Tuesday, 9 April 2013

देशी गाईचे शेण, गोमुत्र वापरातुन एकरी 10 टन टोमॅटोपवनी रोडवर पहेला गावापासून 3 किलोमिटर अंतरावरील निमगांव येथे संजय एकापूरे यांची 10 एकर शेती आहे. त्यांनी केवळ देशी गाईचे शेण आणि गोमुत्राचा वापर करुन एकरी 10 टन टोमॅटोचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.
2008 मध्ये एका शेतकऱ्यांकडून त्यांनी ही शेती विकत घेतली त्यावेळी शेतीत फारसे उत्पादन निघत नव्हते. एकापूरे यांनी बांध्या फोडून शेतीचे सपाटीकरण केले. सुरुवातीला 2 वर्ष त्यांनी धानाचे उत्पादन घेतले. त्यावेळी बोरू, धैंचा, गिरीपुष्प या हिरवळीच्या खतासोबतच त्यांनी रासायनिक खताचा वापर केला होता. 2010 मध्ये सुभाष पाळेकर (अमरावती) या शेतीतज्ञाचे पुस्तक वाचून एकापूरे यांनी नैसर्गिक पध्दतीने शेती करण्याचा ध्यास घेतला. एकलव्याप्रमाणे सुभाष पाळेकर यांना गुरु मानून त्यांच्या झीरो बजेट शेतीची माहिती इंटरनेटवरुन घेवून त्यांनी ते तंत्रज्ञान शेतीत वापरायला सुरुवात केली. नैसर्गिक शेती करण्यासाठी त्यांनी दोन देशी भाकड गाई विकत घेतल्या. त्यांना पौष्टिक खुराक देवून धष्टपुष्ट बनवले. या दोन गाईचे शेण आणि गोमुत्राचा वापर करुन त्यां नी 10 एकर भाजीपाल्याची शेती फुलवली आहे. गाईचे गोमुत्र आणि पाणी एकत्र करुन ते झाडांना देतात. गोमुत्रामधून युरीया खताचा पुरवठा पिकांना केला जातो. तसेच देशी गाईचे 10 किलो शेण, 10 लिटर गोमुत्र, 2 किलो डाळीचे पिठ, 2 किलो गुळ, आणि मुठभर शेतीतील माती यांचे मिश्रण करुन ते 180 लिटर पाण्यात टाकून 72 तास आंबवतात. हे आंबवलेले द्रावण मगाने थोडे-थोडे झाडाच्या बुंध्याशी टाकतात. या जीवामृतामुळे जमीनीला अन्नघटकांचा पुरवठा तर होतोच शिवाय त्यातील डाळीच्या पिठामुळे हवेतील नायट्रोजन जमीनीत स्थिरावण्यास मदत होते. तसेच शेणामुळे जमीनीतील सुक्ष्म जिवाणूंची संख्या वाढून जमीन भुसभूसीत राहण्यास मदत होते. त्यामुळे मुळांना ऑक्सीजन मिळतो असे एकापूरे यांचे म्हणणे आहे. किडीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून त्यां नी शेतात 10 ते 15 झेंडूची झाडे लावली आहेत. पिकावर येणारी किड या झेंडूच्या फुलांकडे आकृष्ट होते.
नैसर्गिक ज्ञानाचा वापर करुन फुललेल्या टमाटरच्या शेतातून टोमॅटो बाजारात पाठवायला सुरुवात केली आहे. या टोमॅटोचा आकार, रंग, चव आणि टिकावूपणा ग्राहकांच्या नजरेत भरण्यासारखा आहे. दर आठवडयाला 1 टन माल ते बाजारात विक्रीला पाठवित आहेत. आतापर्यंत 5 टन माल त्यांखनी विकला आहे. एकरी 10 टन उत्पादन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या टोमॅटोला 12 रुपये दर मिळत असून उन्हाळयात तो 18 ते 20 रुपयांपर्यंत जावू शकतो. सरासरी 12 ते 13 रुपये दर मिळाला तरी 1 एकरात त्यांना 1 लाख 30 हजार रुपयांचे उत्पन्न होते. लागवड खर्च, मजूरांचा खर्च आणि पाणी व्यवस्थापन यासाठी 30 हजार रुपये खर्च वजा करुन त्यांाना 1 एकरात 1 लाख रुपयांचा नफा मिळतो.
साभार-'महान्यूज'

No comments:

Post a Comment