Wednesday, 29 May 2013

दूध उत्पादनावर परिणाम करणारे घटक

गाई-म्हशींपासून मिळणाऱ्या दुधाचे नमुने निरनिराळ्या ठिकाणी व वेळी गोळा करून त्यांचे रासायनिक पृथक्‍करण केल्यास, त्यातील घटक सारखेच असतात. परंतु घटकांचे प्रमाण हे वेगवेगळे आढळते. दूध व दुधाचे पदार्थ बनविताना व खाद्यान्न म्हणून त्यांचा वापर करताना हे फरक महत्त्वाचे ठरतात. दुधातील घटकांच्या प्रमाणावर परिणाम करणाऱ्या प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे -
1) जनावरांचा प्रकार - निरनिराळ्या प्राण्यांच्या दुधातील घटकांच्या प्रमाणात व दूध उत्पादनात प्राणीनिहाय फरक आढळतो. उदा. गाय, म्हैस, शेळी इ.
2) जनावरांची जात - एकाच प्रकारच्या जनावरांच्या अनेक जाती आढळतात. त्यांच्या जातीप्रमाणे दुधातील घटकांच्या प्रमाणात व दूध उत्पादनात प्राणीनिहाय फरक आढळतो. उदा. गाईमध्ये जर्सी, गौळाऊ; तर म्हशीमध्ये मुऱ्हा, जाफराबादी इ.
3) दुधाच्या काळाचा टप्पा - गाईच्या दुधाचा काळ जसजसा पुढे जातो, म्हणजे वाढतो तसतसे दुधात स्निग्धांशांचे प्रमाण थोडेसे वाढते. याउलट दूध तिसऱ्या महिन्यापर्यंत वाढून नंतर हळूहळू कमी होते व 9-10 महिन्यांत आटते.
4) गाईचे वय - पहिल्या वेतापासून तिसऱ्या वेतापर्यंत दूध व स्निग्धांशांचे प्रमाण थोडे थोडे वाढते. नंतर ते स्थिर राहून 12-14 वर्षे वयानंतर कमी होते.
5) वैयक्तिक फरक - एकाच जातीच्या गाईंना सारखेच खाद्य दिले व व्यवस्थापनदेखील सारखेच असले, तरीदेखील त्यांचे दूध उत्पादन व दुग्ध घटकांमध्ये फरक आढळतो. हा फरक आनुवंशिकतेच्या कारणामुळे होतो.
6) ऋतुमानानुसार फरक - दुधामध्ये स्निग्धांशांचे प्रमाण उन्हाळ्यात थोडे कमी व हिवाळ्यात थोडे अधिक असते. हाच फरक दूध उत्पादनातदेखील आढळतो.
7) दूध काढण्याच्या वेळांमधील अंतर - 24 तासांत दूध काढण्याच्या दोन वेळांमध्ये 12 तासांपेक्षा अधिक अंतर असेल, तर अधिक वेळानंतर काढलेल्या दुधाचे प्रमाण अधिक व स्निग्धांशांचे प्रमाण कमी राहील.
8) दोहनाच्या वेळचे, सुरवातीचे व अखेरचे दूध - गाईच्या एकाच वेळेच्या दोहनाच्या सुरवातीच्या धारांमध्ये स्निग्धांश कमी, तर शेवटच्या धारांमध्ये बराच अधिक असतो. हा फरक दोन-तीन टक्‍क्‍यांपर्यंत राहू शकतो.
9) विण्याच्यावेळी गाईची स्थिती - विण्याच्या काळात गाय धष्टपुष्ट असून अंगावर चरबी अधिक असेल, तर अशा गाईंमध्ये सुरवातीच्या काळातील दुधात स्निग्धांश अधिक राहून नंतर 15-20 दिवसांनंतर तो थोडा कमी होऊन स्थिर राहतो.
10) गाईचे खाद्य - खाद्याची कमतरता असल्यास, त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. मात्र दुधातील घटकांवर विशेष परिणाम होत नाही. त्यांना स्निग्ध पदार्थ खाऊ घातले तरी दुधातील स्निग्धांश 0.2 टक्‍क्‍यापेक्षा जास्त वाढणार नाही. त्याकरिता संतुलित आहार देणेच योग्य आहे.

आयुर्वेदिक/ वैदिक उपचार - आयुर्वेद/ वेदामध्ये खालीलप्रमाणे वनस्पतींचा उपयोग केला असता, दुधाचे फॅटचे प्रमाण वाढल्याचे दाखले सापडतात. थोड्या प्रमाणात हे प्रयोग करण्यास हरकत नाही.
अ) बरेच शेतकरी जनावरांना ढेपेऐवजी कापसाची सरकी खाऊ घालतात. ती तशीच न देता भरडून, भिजवून खाऊ घातल्यास दुधाचे/ फॅटचे प्रमाण वाढते.
ब) एरंडीची पाने जनावरास भरपूर खाऊ घातल्याने (एक महिना) दूध वाढते.
क) चवळीच्या ओल्या शेंगा अथवा बीज भिजू घालून ते भरपूर खाऊ घालावे, दूध वाढते.
ड) मेथी खाऊ घातल्यास दुधाबरोबरच जनावरांची आरोग्यशक्ती वाढते.
इ) अंबाडीचे बीज भरडून पाण्यात घट्ट शिजवून त्याचे गोळे खाऊ घातल्यास दूध वाढते.
ई) उडीद भिजवून भरपूर खाऊ घालावे (एक महिना).
फ) जनावरास भरपूर गाजरे खाऊ घातल्यानेही दूध वाढते.
ग) वासनवेल भरपूर खाऊ घातल्यानेही गाई-म्हशी भरपूर दूध देतात.

व्यवस्थापन - अ) दूध एकाच माणसाच्या हाताने ठराविक वेळेतच (सहा ते आठ मिनिटे) काढावे.
ब) दूध काढण्याच्या वेळा ठराविक व समान अंतराने नियमित असाव्यात.
क) दूध काढताना सुरवातीच्या पहिल्या दोन ते तीन धारा आपण न घेता, जमिनीवर सोडून वाया घालविणे आवश्‍यक असते. कारण जनावराच्या स्तनांमध्ये बाह्य रोग जिवाणू, विषाणू जातात ते यामुळे बाहेर जातात. त्यामुळे हे जरूर करावे. परंतु शेवटची धार मात्र निपचून पूर्णपणे काढावी. कारण शेवटच्या धारेमध्ये फॅटचे प्रमाण वाढत-वाढत जाऊन सर्वाधिक असते. वासरू पान्हा सोडण्यासाठी किंवा दूध पाजण्यासाठी सुरवातीलाच पाजावे; शेवटी नव्हे.
ड) म्हशींना गाईप्रमाणे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पोळ तसेच खांदा नसतो. त्यामुळे त्यांना पाण्याने दोन ते तीन वेळा ओले करावे किंवा थंड जागी बांधावे.
इ) जनावरांच्या आरोग्याची काळजी व निगा घ्या. ते आजारी असेल तर लागलीच उपचार करावेत. जनावरांच्या नाकासमोरील काळी रखरखीत त्वचा ओली दवबिंदूमुक्त नसून कोरडी झाल्यास हे लगेच कळेल.
ई) उत्तम दूध व फॅट देणाऱ्या जातीचे जनावर जवळ बाळगावे. त्यांचे व त्यांच्या पुढील पिढीचे योग्य संगोपन व व्यवस्थापनाने करावे.

संपर्क -
प्रा. आर. आर. शेळके, 9850285442
डॉ. एस. डी. चव्हाण, 7588961086
(लेखक पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत.)

घटसर्प, फऱ्या नियंत्रणासाठी करा लसीकरण

जनावरांना घटसर्प, फऱ्या हे रोग प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरवातीला आढळतात. या रोगांपासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी आपल्या जनावरांना वेळीच लसीकरणाची आवश्‍यकता असते.
घटसर्प : पावसाळ्यात होणारा हा रोग हवामानातील तीव्र बदलांमुळे किंवा लांबच्या प्रवासाअंती येणाऱ्या त्रासामुळे, उद्‌भवतो. या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या दगावण्याचे प्रमाण हे अधिक असते. यामुळे या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण राबविण्यात येते. सर्वच वयोगटातील जनावरांमध्ये हे लसीकरण करण्यात येते. हे लसीकरण दरवर्षी पावसाळ्याआधी मे किंवा जून महिन्यात घेण्यात येते. सातत्याने घटसर्प हा रोग आढळणाऱ्या भागात हे लसीकरण वर्षात दोन वेळेस घेण्यात येते.

3) फऱ्या - हा रोग मोठी जनावरे आणि शेळ्या-मेंढ्यांनादेखील होतो. सहा ते 24 महिन्यांची चांगल्या वाढीतील लहान जनावरे या रोगाने आजारी पडतात. फऱ्या हा रोग साधारणतः पावसाळ्यात आढळतो. जनावरांमध्ये प्राणघातक असणाऱ्या या रोगापासून बचावाकरिता या रोगांवरील प्रतिबंधक लस ही पावसाळा सुरू होण्याआधी देण्यात येते. या रोगाचा प्रादुर्भाव असणाऱ्या ठिकाणी ही लस सर्व वयोगटातील जनावरांना देण्यात येते. प्रथम लसीकरणानंतर सहा महिन्यांनी आणि त्यानंतर दरवर्षी या प्रकारे ही लस देण्यात येते.

काळपुळी : हा जनावरांतील अत्यंत घातक रोग आहे. या रोगासाठी लसीकरण हे फेब्रुवारी ते मे महिन्यात पावसाळ्याआधी घेण्यात येते. कारण साधारणतः पावसाळ्याच्या सुरवातीस या रोगांची लागण होते. सर्व वयोगटांतील जनावरांना ही लस देण्यात येते व दरवर्षी याच कालावधीत ही लस पुन्हा देण्यात येते.
2) गोचीड ज्वर - विदेश आणि संकरित जनावरांमध्ये महत्त्वाचा असा हा रोग साधारणतः उन्हाळा आणि पावसाळ्यादरम्यान होतो. जनावरांवर असणाऱ्या गोचिडांमुळे हा रोग पसरतो. गोचीड नियंत्रणासोबतच या रोगावरील प्रतिबंधात्मक लस ही हा रोग प्रामुख्याने आढळणाऱ्या भागात देण्यात येते. सर्व वयोगटांतील जनावरांना दरवर्षी ही लस जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात देण्यात येते.

लसीकरण करताना... * लसीकरण शक्‍यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावे.
* लसीकरण हे फक्त निरोगी जनावरांमध्ये करण्यात येते.
* लसीची मात्रा आणि लस देण्याची पद्धती ही लस उत्पादन करणाऱ्या कंपनीने ठरवलेलीच वापरावी.
* शक्‍यतो एका ठिकाणच्या जनावरांचे लसीकरण हे एकाच दिवशी करावे.
* गाभण जनावरांत लसीकरण करू नये.

1) संपर्क - 02169 - 244687
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा
2) संपर्क - 02426- 243361
गो संशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
3) संपर्क फोन नं. - 022- 24131180, 24137030
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई

शेळ्या, मेंढ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या..

आंत्रविषार : प्रामुख्याने हा आजार चांगल्या पोषित, पौष्टिक चाऱ्यावर चरणाऱ्या, मांसाने भरीव असणाऱ्या मेंढ्यांना व शेळ्यांना बाधित करतो. कोकरांनी आजारास बळी पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे जास्त प्रमाणात प्यायलेले दूध होय. प्रादुर्भाव झालेली नवजात कोकरे हवेमध्ये उडी घेऊन जमिनीवर कोसळतात, थरथर कापतात व काही मिनिटांतच गतप्राण होतात.
उपाययोजना - शेळ्या, मेंढ्यांना पावसाळ्याच्या सुरवातीला लस टोचून घ्यावी. कोकरांना लस दिल्यानंतर तीन आठवड्यांनी बूस्टर डोस द्यावा. लस टोचल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती तयार होण्याकरिता 21 दिवसांचा कालावधी लागतो. प्रादुर्भावादरम्यान दीर्घक्रियाशील प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत.

फाशी : हवामानातील अचानक बदल, मुसळधार पाऊस व दुष्काळ परिस्थितीमुळे फाशीचा रोग पसरतो. यात खूप ताप येतो, जनावर थरथरते, तोल जातो, नाकातोंडातून काळपट रक्तस्राव होतो. श्‍वास घेण्यास त्रास होतो व शेळी-मेंढी ताबडतोब मरते.
उपाययोजना - पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधक लसीकरण करावे. मेलेल्या शेळ्या-मेंढ्या वर-खाली चुनखडी (चुना) टाकून खोल खड्ड्यात पुराव्यात. त्यांची कातडी विकू नये. शवचिकित्सा करून नये.
जरबा :
याचा प्रसार चावणाऱ्या चिलटांपासून म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या होतो. जास्त पाऊस व ढगाळ वातावरणामध्ये चिलटांची उत्पत्ती डबक्‍यात पाणी साठल्यामुळे अधिक प्रमाणात होते. याची लक्षणे म्हणजे तोंडाला गरे पडतात, तोंडातील आतील भाग लालसर पडतो, काही वेळा लाळ येते, शेळ्या-मेंढ्या कुचंबतात, डोळे लाल होतात, जनावर लंगडू लागते, छातीला व जबड्याखाली जखमा होतात.
उपाययोजना - पावसाळ्यात सायंकाळी वाडग्यात करंज, कडुनिंब, निरगुडीच्या पाल्याची धुरी करावी. डबकी व साचलेल्या पाण्यावर रॉकेल फवारणी करावी. असे केल्याने चिलटांचे प्रजनन कमी होऊन संख्या वाढत नाही. बाधित मेंढीस पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविके योग्य मात्रेत द्यावीत. कोमट पाण्यात मीठ टाकून तोंड धुवावे.
बुळकांडी :
या आजारात शेळ्या-मेंढ्यांमध्ये ताप येणे, नाकातून पाणी येणे, चिकट व रक्तमिश्रित जुलाब होणे इत्यादी प्रमुख लक्षणे दिसून येतात.
उपाययोजना - पशुतज्ज्ञांकडून नियमित पी.पी.आर. लस टोचून घेणे. वाडग्यात स्वच्छता पाळावी. आजारी शेळ्या, मेंढ्यांना वेगळे ठेवावे.

संपर्क-
02426- 233455
संगमनेरी शेळी संशोधन योजना,
02426- 243350
सर्व समावेशक दख्खनी मेंढी सुधार प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

तपासून घ्या बियाण्यांची उगवण क्षमता

आपल्या घरचे बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता तपासून घेणे आवश्‍यक आहे. उगवणक्षमता तपासण्याच्या पद्धती आणि उगवलेल्या रोपांच्या योग्य वर्गीकरणाची माहिती घेऊ.

बियाण्याची उगवणक्षमता कशी तपासावी?

- बियाण्याची एखाद्या लॉटची उगवणक्षमता तपासण्यासाठी त्याच्या प्रतिकात्मक नमुन्यातील कमीत कमी 400 बी तपासावे लागते.
- ज्या बियाण्याची उगवणक्षमता तपासावयाची आहे, त्यास कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी आणि ते शुद्ध बियाण्यातूनच घेतलेले असावे.
- प्रयोगशाळेत उगवणक्षमता तपासण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या साहित्यामध्ये उगवण कक्ष (जर्मिनेटर) हे मुख्य उपकरण आहे. यामध्ये बियाण्याच्या उगवणीसाठी आवश्‍यक लागणारे तापमान आणि आर्द्रता राखता येते, तसेच बियाणे उगवणीस ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कागद वापरतात. याला "टॉवेल पेपर' असे म्हणतात. ज्यामध्ये ओलावा राखला जातो आणि त्यामुळे बियाण्याची उगवण व वाढ होण्यास मदत होते.

उगवणक्षमता तपासण्याच्या पद्धती :
1) शोषकागदाच्या वरती ः लहान आकाराच्या बियाण्यांची उगवणक्षमता याप्रकारे तपासली जाते. यामध्ये एका काचेच्या प्लेटमध्ये खाली कापसाचा पातळ थर ठेवून त्यावर शोषकागद ठेवला जातो. त्यावर पाणी टाकून ओले करावे. पाणी जास्त झाले असेल तर ते निथळून घ्यावे. अशा प्लेटमध्ये बी मोजून ठेवावे. त्यावर झाकण ठेवून ओलावा टिकून राहील याची काळजी घ्यावी. या प्लेट उगवण कक्षामध्ये (जर्मिनेटरमध्ये) उगवणीसाठी ठेवाव्यात किंवा चांगल्याप्रकारे आर्द्रता (70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त) असलेल्या बंद खोलीत ठेवल्या तरी उगवण होण्यास पुरेसे होते.

2) कागदाच्या मध्ये बियाणे ठेवून उगवणक्षमता तपासणे ः उगवणक्षमता तपासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या दोन ओल्या केलेल्या कागदांमध्ये (टॉवेल पेपर) बी मोजून ठेवावेत. असे कागद गोल गुंडाळी करून त्यावर मेणकागद (वॅक्‍स पेपर) खालच्या 3/4 भागास गुंडाळून ती उगवणीसाठी आवश्‍यक असणाऱ्या तापमान आणि आर्द्रता असलेल्या जर्मिनेटरमध्ये ठेवतात. ओला कागद बोटाने दाबला असता बोटाभोवती पाणी दिसू नये इतपतच कागद ओला असावा.

3) वाळूमध्ये उगवणक्षमता पाहणे ः कुंडी किंवा ट्रेमध्ये असलेल्या ओल्या वाळूत एक ते दोन सें.मी. खोलीवर सारख्या अंतरावर मोजून बी ठेवावेत. बियांच्या आकारमानावर वाळूचा ओलेपणा ठरवतात. अशा कुंड्या जर्मिनेटरमध्ये उगवणीसाठी ठेवतात.
बियाणे उगवणीसाठी ठेवताना ते एकसारख्या अंतरावर ठेवावे. त्यासाठी ओलावा प्रमाणातच ठेवावा. तसेच बियाण्यास आवश्‍यक असणारे तापमान आणि आर्द्रता राखण्याचा प्रयत्न करावा. साधारण आठ-10 दिवसांत बियाण्यांची उगवण होते.

उगवलेल्या रोपांचे वर्गीकरण :
उगवणक्षमता चाचणीत आठ-10 दिवसांत बियाणे उगवणे. या उगवलेल्या रोपांच्या वाढीवरून त्याचे वर्गीकरण केले जाते.
साधारण किंवा चांगली रोपे :
ज्या रोपांची चांगली वाढ झालेली असते आणि ज्यांची अनुकूल परिस्थितीत चांगल्या झाडामध्ये रूपांतर होण्याची क्षमता असते, त्यांना साधारण किंवा चांगली रोपे असे संबोधले जाते.
या रोपांच्या सर्व भागांची वाढ व्यवस्थित झालेली असते. मुळांची वाढ चांगली होऊन त्यावर तंतूमुळे वाढलेली असतात. व्यवस्थित वाढलेली रोपे परंतु थोडी मुळांची खुरटलेली वाढ अशी रोपेसुद्धा साधारण किंवा चांगल्या प्रकारात मोडतात. तसेच व्यवस्थित वाढलेली रोपे, परंतु त्यांना बाहेरील बुरशीचा संसर्ग झाला असला तरी अशी रोपेसुद्धा चांगल्या प्रकारात मोडतात.

विकृत रोपे :
दुसऱ्या प्रकारची रोपे ही विकृत असतात आणि अशी रोपे अनुकूल परिस्थितीतसुद्धा व्यवस्थित वाढू शकत नाहीत. पूर्ण झाडांमध्ये वाढ होण्याची क्षमता त्यांच्यात नसते. त्यांच्या कोंब आणि मुळांना इजा पोचलेली असते, तसेच बियाण्यांशी निगडित असलेल्या बुरशीमुळे रोपे कुजण्याच्या अवस्थेत असतात.

कठीण बी :
तिसरा प्रकार हा न उगवलेल्या बियाण्याचा असतो. असे बी उगवणीला ठेवल्यानंतर आठ-10 दिवस अजिबात उगवत नाहीत. ज्यामध्ये काही बियाणे पाणी न शोषल्यामुळे उगवत नाहीत. यांनाच कुचर किंवा कठीण बी म्हणतात; परंतु काही बी हे त्याच्या सुप्त अवस्थेत असल्यामुळे उगवत नाहीत. काही बी हे मेलेले असते. पोकळ बियाणे, किडलेले बियाणे, गर्भ नसलेले बियाणे हे सर्व याच प्रकारात मोडतात.

अशा प्रकारे उगवलेल्या बियाण्यांची वर्गवारी करून साधारण किंवा चांगल्या उगवलेल्या बियांची टक्केवारी काढतात. प्रत्येक पिकामध्ये प्रमाणीकरण यंत्रणेने उगवणीची टक्केवारी प्रमाणित केलेली आहे. प्रमाणकापेक्षा जास्त उगवण असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे.
- उगवणीच्या टक्केवारीमध्ये 10 टक्‍क्‍यांपर्यंत कमी उगवण असल्यास एकरी ठरवून दिलेल्या बियाण्यापेक्षा 10 टक्के जास्त बियाणे वापरावे. परंतु त्यापेक्षा कमी उगवणक्षमता असल्यास असे बियाणे वापरू नये.

-पेरणीसाठी वापरावयाच्या बियाण्यांचे शेतकऱ्यांनी परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जवळील बीज प्रयोगशाळा, कृषी महाविद्यालये, कृषी विद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे व कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधून वापरण्यात येणाऱ्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून घ्यावी.
- घरच्या घरी ओल्या पोत्यामध्ये वाळू (बारीक रेती), शोष कागदामध्ये अशा प्रकारची उगवण परीक्षा घेऊन बियाण्यांची उगवणक्षमता तपासून पाहू शकता. ज्या बियाण्यांची उगवणक्षमता प्रमाणित प्रमाणकापेक्षा जास्त आहे तसेच बियाणे पेरणीसाठी वापरावे.

संपर्क : डॉ. मुंडे, 9423297952 (लेखक कृषी विज्ञान केंद्र, परभणी येथे कार्यरत आहेत.)

केशर आंब्यांच्या सुगंधाने समृद्धीचा दरवळ

डहाणू तालुक्‍यातील चिंचणी येथील काशिनाथ पाटील हे मूलतः शिक्षक. वीस वर्षे शिक्षकी पेशात काढल्यानंतर शेतीच्या ओढीने 1989 मध्ये मुदतपूर्व सेवानिवृत्ती स्वीकारली. वडिलोपार्जित शेती होती फक्त एक एकर. मात्र स्वस्तात मिळाली म्हणून 25 वर्षांपूर्वी चिंचणी शेजारील ओसारवाडीत 14 एकर माळरानाची जमीन खरेदी केली होती. आज ओसाड असलेल्या या जमिनीचे रूपांतर काशिनाथ पाटील यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळे सुंदर अशा आमराईत झाले आहे. ते गेल्या 25 वर्षांपासून रासायनिक घटकांचा वापर न करता केशर आंब्याच्या झाडांची जोपासना करत आहेत.

सुरवातीला ते मिरचीचे उत्पादन घेत असत. 1991 मध्ये मिरचीचे चांगले उत्पादन मिळाले. या उत्पन्नातून 22 एकर शेती खरेदी केली. शिक्षकी पेशात काम केल्यामुळे शेतीविषयक माहिती वाचनाद्वारे मिळवत असत. त्यातून सेंद्रिय शेती पद्धतीची माहिती होत गेली. त्यांनी दशपर्णी अर्क, विविध प्रकारच्या पेंडी, निंबोळी अर्क यांचा शेतामध्ये वापर सुरू केला. हळूहळू रासायनिक कीडनाशकांचा व खताचा वापर कमी करत 1995 पासून पूर्णपणे बंद केला. रासायनिक कीडनाशकांचा वापर असलेले अन्नधान्य स्वतःही खायचे नाही, तसेच समाजालाही विकायचे नाही, हा मूलमंत्र काशिनाथ पाटील यांनी अंगी बाणवला आहे.

सुरवातीला चिकूची लागवड होती. मात्र एप्रिल आणि मे महिन्यांत पाणी कमी पडत असल्याने काही झाडे वाळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आंबा लागवडीचा निर्णय घेतला. चिकूच्या बागेतच 10 मीटर x 10 मीटर अंतरावर केशर आंबा लागवड केली. अलीकडच्या नऊ-दहा वर्षांत केशर आंब्याच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे.

...अशी आहे आंबा लागवड - सुरवातीला पाटील यांनी 33 फूट x 33 फुटाच्या अंतराने केशरची लागवड केली. या अंतराने एकरी 40 रोपे बसत होती.
- अलीकडे त्यांनी सघन पद्धतीवर भर दिला असून 16 फूट x 16 फूट अंतराप्रमाणे एकरी 160 रोपे बसवली आहेत. झाडांच्या योग्य वाढीसाठी उंची व फांद्यांची छाटणी वेळोवेळी करत आकार मर्यादित ठेवला जातो.
- आज त्यांच्या चौदा एकरांच्या वाडीत सुमारे चौदाशे "केशर'ची रोपे वाढताहेत. तर काही प्रमाणात हापूस आणि पायरीचीही रोपे आहेत.

सेंद्रिय खतांचे नियोजन असे केले... आंबा हे बहुवार्षिक पीक असल्याने सेंद्रिय खतांचाच वापर करण्याविषयी पाटील यांचा आग्रह असतो. रासायनिक खतांच्या तुलनेत सेंद्रिय खतांचा खर्च दहा ते वीस टक्के अधिक आहे. तरीही पिकात सातत्य आणि वाढीसाठी अधिक उपयुक्त ठरत असल्याचे ते आवर्जून सांगतात.
1) वर्षातून एकदा पावसाळ्यापूर्वी कोंबडी खताचा वापर करतात. साधारणपणे मे महिन्यात आंब्याच्या रोपांच्या चारी बाजूला चार खड्डे खणून प्रति झाड पाच ते सात किलो कोंबडी खत टाकतात. वर्षभरात त्यांना किमान पाच टन कोंबडी खत लागते.
2) सेंद्रिय खतासोबत साधारण आठ ते दहा दिवसांच्या अंतराने ते ईएमचा एक डोस देतात. एक लिटर ईएम द्रावण, दोन किलो काळा गूळ, वीस लिटर पाण्यात मिसळून आठ ते दहा दिवस एका ड्रममध्ये कुजवत ठेवतात. हे ईएम ठिबकच्या माध्यमातून बागेत सोडले जाते. ईएमच्या मदतीने जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते.
3) पावसाळ्यानंतर झाडांना एकरी साधारण पाचशे किलो गांडूळ खत टाकले जाते. त्यासाठी बागेत गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. गांडूळ खत निर्मितीमध्येही ते ईएम द्रावणांचा वापर करतात. दीड महिन्यातच चांगले गांडूळ खत तयार होते. गेली 15 वर्षे त्यांचा हा दिनक्रम बनला आहे.

मोहोराच्या नियोजनासाठी झाला "ऍग्रोवन'चा फायदा - दरवर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये आंब्यांना मोहोर येत असे. त्याची फळे जून महिन्याच्या पाच ते 10 तारखेपर्यंत येत असत. मात्र पाऊस व अन्य नैसर्गिक घटकांमुळे फळांचा दर्जा चांगला मिळण्यात अडचण येई. तसेच दरही कमी मिळत. "ऍग्रोवन'मध्ये प्रकाशित झालेला मोहोराच्या नियोजनाविषयीचा लेख वाचला. त्यात पॅक्‍लोब्युट्राझॉलचा उल्लेख होता. रसायनमुक्त फळ पिकवताना त्याचा वापर करावा की करू नये, असा संघर्ष मनात झाला. मात्र अनेक तज्ज्ञांशी बोलल्यानंतर या रसायनांचे अवशेष फळामध्ये राहत नसल्याचे समजल्याने या वर्षी त्याचा वापर केला. त्यामुळे आंब्यांना डिसेंबरमध्ये मोहोर येऊन फळे एप्रिलमध्ये मिळाली. आता दुसरा टप्पा नेहमीप्रमाणे मेअखेर ते जून या कालावधीत मिळेल.

"केशर'चे अर्थकारण - लागवडीनंतर साधारण पाच वर्षांनी फळ मिळायला सुरवात होते. आंब्याचा हंगाम अंदाजे दीड ते दोन महिने चालतो.
- आकारानुसार मोठे, मध्यम आंबे व लहान आंबे वेगळे केले जाते. प्रतवारीमध्ये डागाळलेले आंबे वेगळे करून व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे आंब्याचे डझन अथवा किलोनुसार पॅक केले जातात.
- बागेवर होणारा खर्च काही प्रमाणात भागवण्यासाठी हिरवी मिरची, तूर, भेंडी, पपई, तोंडली, गवार अशी आंतरपिके ते घेतात. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. या वर्षी नत्र स्थिरीकरण आणि आंतरपीक म्हणून तूर लावली होती. त्यातून दुहेरी फायदा झाला. तुरीच्या पाल्याचा थर जमिनीवर पडलेला आहे. त्याचाही जिवाणू वाढीसाठी लाभ होणार आहे.

आंबा बागेवरचा खर्च - सेंद्रिय खते - एक लाख रु.
फवारणी खर्च - 80 हजार रु.
मशागत, रखवाली व अन्य देखभाल, तण काढणी- 90 हजार रु.
विजेचे बिल -25 हजार
आंबे काढणी - 55 हजार रु. (प्रति किलो 1.25 रुपया
बॉक्‍स आणि पॅकिंगचे साहित्य - 55 हजार रु. (प्रति किलो 1.25 रुपया)
--------------
एकूण खर्च - 4 लाख 5 हजार रुपये.

गेल्या दोन वर्षांतील दर (प्रति किलो)- वर्ष--कमीत कमी---सर्वाधिक--सरासरी--उत्पादन--उत्पन्न
2013--15 रु.--50 रु.---25 रु.---42 टन अपेक्षित--10 लाख 50 हजार रुपये
2012--20 रु.--35 रु.---25 रु.--- 17.5 टन-- 4 लाख 37 हजार पाचशे रुपये

बागेवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव आणि घ्यायची काळजी - - केशरवर साधारणपणे तुडतुडे, मावा, फुलकिडे, मिलीबग या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळतो.
- मोहोराची बोंडे दिसू लागतानाच्या काळात व्हर्टिसिलियम लेकॅनी या जैविक बुरशीची (दोनशे लिटर पाण्यामागे एक लिटर) पहिली फवारणी घेतली जाते.
-तुडतुड्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मोहोर फुटल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी दुसरी फवारणी केली जाते.
- कोवळ्या मोहोरावर भुरी हा रोग येतो. त्यासाठी ट्रायकोडर्मा आणि सूडोमोनॉस यांच्या (दोनशे लिटर पाण्यामागे एकत्रित प्रत्येकी एक लिटर) मिश्रणाची फवारणी केली जाते. पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी घेतो. गरज वाटल्यास तिसरीही फवारणी घेतली जाते.

पाणीपुरवठ्याचे नियोजन - बागेत तीन बोअर आहेत.
- संपूर्ण बागेला ठिबकद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
- प्रत्येक तीन दिवसांनी एक ते दीड तास असा गरजेनुसार सिंचन केले जाते.

काशिनाथ भाई पाटील, 9923050446

आधुनिक तंत्रातून ढोबळी मिरची झाली फायद्याची

विरवडे (ता. कराड, जि. सातारा) येथील महेश माणिक शिंदे यांनी आयटीआय कोर्स केल्यानंतर काही वर्षे पुणे येथे नोकरी केली. त्यादरम्यान वडिलार्जित शेतीकडे लक्ष देणारे कुणीच नसल्यामुळे ते पूर्णवेळ शेतीकडे वळले. त्यांना वडिलोपार्जित सहा एकर शेती असून, ती पाच एकर क्षेत्र गावामध्ये व एक एकर क्षेत्र शेजारच्या सैदापूर गावामध्ये अशी विभागलेली आहे. या एक एकर क्षेत्राजवळील पवार यांची पाच एकर शेती ते सहा वर्षांपूर्वीपासून कसत आहेत. या शेतीमध्ये एकत्रित सहा एकरांत फळभाज्या व फुलपिके घेतली जातात. स्वतःच्या व पवार यांच्या शेतातील बोअरद्वारे क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात येतो. या क्षेत्रातील पिकात झालेला फायदा किंवा तोटा दोघांमध्ये विभागला जातो. गावाकडील शेतातही पूर्वी भाजीपाला पिके महेश घेत असत; मात्र अलीकडे त्यांनी त्या पाच एकरांमध्ये ऊस पिकाची लागवड केली आहे. सध्या सहा एकरमध्ये ढोबळी मिरचीचे पीक आहे.

लागवड तंत्रज्ञान - रोपवाटिकेतून सशक्त रोपांची खरेदी करतात. या वर्षी लागवडीसाठी रोपवाटिकेतून रोपे विकत घेतली.
- सरीतील अंतर चार फूट व दोन रोपांमध्ये एक फूट अंतर ठेवून आठ मार्चला 65 हजार रोपांची लागवड केली.
- लागवडीपूर्वी डीएपी, एमओपी, निंबोळी पेंड व ह्युमिक ऍसिड मिसळून प्रमाणित बेसल डोस दिला जातो.
- दोन वर्षांतून एकवेळ एकरी 15 ते 20 ट्रेलर शेणखताचा वापर करतात.
- या संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन केले आहे. ठिबकमुळे कमी मजुरांत व कमी पाण्यामध्ये पिकांचे नियोजन करणे शक्‍य होत असल्याचे महेश शिंदे यांनी सांगितले.
- रोप लागवडीबरोबरच एकरी 30 ते 35 पिवळे चिकट सापळे लावतात, त्यामुळे किडी व फळे खाणाऱ्या माशीचा प्रार्दुभाव कमी प्रमाणात होतो.
- पालापाचोळ्याची कुट्टी अथवा गहू, हरभरा व सोयाबीनच्या भुश्‍श्‍याचा सरीमध्ये आच्छादनासाठी वापर केल्याने शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- फळांची वाढ, फुटवे, फळांची संख्या, पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी पीक असेपर्यंत विद्राव्य खतांचा वापर सुरू ठेवतात.
- दरवर्षी किडीमध्ये फुलकिडे, अळी, कोळी आणि रोगामध्ये करप्याचा प्रार्दुभाव अधिक प्रमाणात जाणवतो. यासाठी गरजेनुसार कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातात.

"ऍग्रोवन'मुळे कळतात शेतकऱ्यांचे प्रयोग अन्य शेतकऱ्यांचे प्रयोग पाहून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करत असतो. शेतीच्या नव्या प्रयोगांची माहिती होण्यासाठी "ऍग्रोवन'चा फायदा होतो. आपल्या शेतीमागे घरच्या लोकांचे सहकार्य मोठे आहे. सुरवातीला शेतीचा अनुभव नसताना परिसरातील कृषी विभागातील लोक आणि अनुभवी शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन मिळाल्याचे महेश यांनी आवर्जून सांगितले.

ेशेतीतील धडपड - या वर्षी त्यांनी ऊस पिकामध्ये दोन सरींतील अंतर सहा फूट ठेवण्याचा प्रयोग केला आहे. पिकांच्या वाढीसाठी अधिक जागा ठेवल्यास उसाची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होईल, असे महेश शिंदे यांनी सांगितले.
- गेल्या तीन वर्षांत त्यांनी झेंडू, टोमॅटो, काकडी व ढोबळी मिरची ही पिके घेतली असून 60 गुंठ्यांमधील झेंडूमधून चांगला फायदा मिळाला होता.
- त्यानंतर सहा एकरांवर टोमॅटोचे पीक घेतले होते. सुरवातीस गारपीट झाली. यातून सावरून माल हाती आल्यानंतर दर पडल्याने साडेपाच ते सहा लाखांचे नुकसान झाले.
- त्यानंतर संपूर्ण क्षेत्रावर काकडी केली होती. त्यातून एकरी 20 टन उत्पादन मिळाले. प्रति किलोस सरासरी 13 रुपये दर मिळाल्याने चांगला फायदा शिल्लक राहिला.
- तीन वर्षांत दोन वेळा ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले. पहिल्या प्लॉटमधून एकरी 20 टनांपर्यंत सरासरी उत्पादन मिळाले, त्यास प्रति किलो 20 रुपये दर मिळाला. दुसऱ्या बहरावेळी जास्त पाऊस व बाजारपेठेत दर नसल्याने उत्पन्नातून झालेला खर्च भागवता झाला.

उत्पादन खर्च (सहा एकर क्षेत्रासाठी) सध्या त्यांनी सहा एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीचे पीक घेतले आहे. त्याचा जमा-खर्च खालीलप्रमाणे
- मशागत - एक लाख रुपये
- 65 हजार रोपांचा खर्च 1.5 रुपये प्रति रोपप्रमाणे - 97 हजार 500 रु.
- शेणखत 100 ब्रास प्रति ब्रास 2500 प्रमाणे - दोन लाख 50 हजार रु.
- ठिबक सिंचन - दोन लाख 25 हजार रु.
- खते - (वरखते एक लाख व विद्राव्य खते 1,45,000 रु.) - एकूण दोन लाख 45 हजार रु.
- कीडनाशके - एक लाख रु.
- मजुरी (आतापर्यंत) - दोन लाख 25 हजार रु.
- प्रतवारी, पॅकिंग खर्च एक रुपया प्रति किलोप्रमाणे (आतापर्यंत) ः 75 हजार रु.
- एकूण खर्च - 13 लाख 17 हजार 500 रुपये

- आतापर्यंत पहिल्या तोड्यामध्ये 24 टन माल निघाला असून, त्याला 16 रुपये दर मिळाला. दुसऱ्या तोड्यामध्ये 20 टन माल निघाला असून, त्याला 23 रुपये दर मिळाला. तिसऱ्या तोड्यात 30 टन मिरची निघाली असून त्याला 26 रुपये दर मिळाला आहे. तीन तोड्यांतून मिळालेल्या 74 टन उत्पादनातून 16 लाख 24 हजार रुपये मिळाले आहेत. आणखी साधारणपणे पाऊसमानानुसार 15 ते 18 तोडे होतील.

विक्री व्यवस्थापन - पुणे व मुंबई येथे उत्पादित मालाची ते विक्री करतात; परंतु आता व्यापारी शेतावरून माल नेत आहेत. दरात खूप चढ- उतार राहत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
- सध्या मजुरी व खतांवरील खर्च न झेपणारा आहे. शेतीत व्यावसायिकता आणत ते मजुरांवरील खर्च कमी ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याकडे कल आहे.
- कऱ्हाड येथील बाजारपेठेत काही प्रमाणात मालाची ते विक्री करतात.
- पूर्वी पोत्यात माल भरून विक्रीसाठी न्यायचे. त्यात बदल केला असून मालासाठी स्वतंत्र पॅकिंग करण्यास सुरवात केली आहे. माल चांगला राहिल्याने चांगला दर मिळतो. शेतालगत पॅकिंग हाऊसचीही उभारणी केली आहे. त्याठिकाणी प्रतवारी, मालाची साठवणूक, पॅकिंग व वजन करण्याची स्वतंत्र सोय केली आहे.

शेतीसाठी खेळते भांडवल आवश्‍यकच शेतीसाठी खेळत्या भांडवलाची आवश्‍यकता असते, त्याचे नियोजन पूर्ण पिकांचा हिशेब लक्षात घेऊन केले जाते. त्यामुळे योग्य वेळी खते, कीडनाशके आणि अन्य आपत्‌कालीन खर्चामुळे नियोजित कामामध्ये अडचणी येत नाहीत. सहा एकर क्षेत्राचा विचार करून ते दरवर्षी सुमारे दहा लाख रुपयांचे खेळते भांडवल ठेवतात; मात्र भाजीपाल्याच्या शेतीसाठी कष्टाशिवाय पर्याय नसल्याचेही ते आवर्जून सांगतात.

शेतकऱ्याकडून शिकण्यासारखे... - सशक्त रोपांची निवड
- मजुरांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
- जैविक आच्छादन पद्धतीचा वापर
- कीड- रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चिकट सापळे आणि जाळ्यांचा वापर
- प्रतवारी करून चांगले पॅकिंग

श्री. महेश शिंदे, मो. 9604110793

Friday, 24 May 2013

आंब्यावर निर्यातपूर्व प्रक्रिया

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने ग्राहकांच्या जिभेवर अधिराज्य गाजविणाऱ्या "हापूस' आणि "केसर'च्या चवीने जगभरातील ग्राहकांना भुरळ घातली आहे. विविध देशांमधून हापूस आणि केसरला मागणी वाढत आहे. 2007 पासून पणन मंडळाच्या माध्यमातून भारतातून आंबा निर्यातीला सुरवात झाली. दरवर्षी आखाती देशांबरोबरच अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान इ. देशांमध्ये आंबा निर्यात होत आहे. निर्यातीच्या पहिल्या वर्षी अवघा 157 टन आंबा विविध देशांमध्ये निर्यात झाला होता. दिवसेंदिवस विविध देशांमधून मागणी वाढत असून, गेल्यावर्षी 210 टन आंबा निर्यात झाली होती. यंदा निर्यातदारांनी सुमारे सहाशे टन आंब्याची नोंदणी केली असून, 300 टनांपर्यंत निर्यात होण्याचा अंदाज आहे.


शेतकऱ्यांच्या बागेतून तयार झालेल्या आंब्यावर निर्यातीपूर्वी काही प्रक्रिया करण्याची आवश्‍यकता असते.
या प्रक्रियांमध्ये व्हेपर हीट ट्रीटमेंट आणि विकिरण प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत. या प्रक्रियेला प्रति दीड टनाला सुमारे 16 हजार रुपये खर्च येतो. आंब्यावर करण्यात येणाऱ्या विविध प्रक्रियांचा हा सचित्र आढावा.

सर्व छायाचित्रे - प्रशांत चव्हाण, मुंबई

2007 पासून विविध देशांत झालेली निर्यात. 2007 - 157 (टन)
2008 - 259
2009 - 121.25
2010 - 95.12
2011 - 84.48
2012 - 210
2013 - एप्रिल अखेर 58 टन निर्यात झाली, 300 टन अपेक्षित.

स्रोत - पणन मंडळ, महाराष्ट्र राज्य
पणन मंडळाच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी आंबा निर्यात केंद्रे उभारण्यात आली आहेत. केंद्रांचा संपर्क क्रमांक,
अधिक माहितीसाठी संपर्क
निर्यात सुविधा केंद्र, वाशी नवी मुंबई
निर्यात भवन, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती,
भाजीपाला बाजार आवार, सेक्‍टर नं. 19, वाशी, नवी मुंबई
दूरध्वनी (022) 27840211,
जिल्हा कृषी पणन अधिकारी - 8879465453

हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्र, नाचणे
शांतिनगर, नाचणे रोड, ता. जि. रत्नागिरी
(02352) 228377,
जिल्हा कृषी पणन अधिकारी - 9850408686

केसर आंबा निर्यात सुविधा केंद्र, जालना
कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना
(02482) 242626
जिल्हा कृषी पणन अधिकारी - 9420697033, 9767655011

केसर आंबा व डाळिंब निर्यात सुविधा केंद्र, लातूर
एम.आय.डी.सी., लातूर
संपर्क जिल्हा कृषी पणन अधिकारी - 9960627130, 9975466669.

ओळखा चांगल्या प्रतीचे बियाणे

चांगल्या प्रतीचे बियाणे कसे ओळखावे? - चांगल्या प्रतीच्या बियाण्यासाठी भौतिक आणि आनुवंशिक शुद्धता राखून बीजोत्पादन करावे लागते. यासाठी बीजोत्पादन, बीजप्रक्रिया, बीज परीक्षण, प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण, साठवण, पॅकिंग आणि विक्री यामध्ये योग्य ती काळजी घ्यावी लागते.
- बियाण्याची पेरणीसाठी उपयुक्तता पाहणे यालाच "बीज परीक्षण' असे म्हणतात.
यामध्ये बियाण्याची उगवणक्षमता, बियाण्याचा जोम, बियाण्याचे आरोग्य, बियाण्यातील भेसळ म्हणजेच भौतिक शुद्धता, बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण अशा विविध बाबींची तपासणी करतात. यांच्या परीक्षणावरूनच बियाणे पेरणीसाठी योग्य किंवा अयोग्य ते ठरवितात.

बियाण्याचे प्रकार - - विविध पीक पैदासकारांनी विकसित केलेले नवीन संकरित अथवा सुधारित वाण / जाती शेतकऱ्यांपर्यंत शुद्ध आणि चांगल्या स्थितीत पोचाव्यात यासाठी त्यांचे बीजोत्पादन शास्त्रीयदृष्ट्या चार टप्प्यांत घेतले जाते.
- बीजोत्पादनामध्ये (1) मूलभूत बीजोत्पादन, (2) पायाभूत बीजोत्पादन, (3) प्रमाणित बीजोत्पादन आणि (4) सत्यप्रत बीजोत्पादन असे टप्पे आहेत. यालाच बियाण्याचे प्रकार असेही म्हणता येईल.

अ) मूलभूत बियाणे - पीक पैदासकाराने नवीन वाण विकसित केल्यानंतर त्यांच्याच देखरेखीखाली मूलभूत बीजोत्पादन घेतले जाते.
- यामुळे बियाण्यात आनुवंशिक अथवा भौतिक प्रकारची भेसळ होत नाही.
- मूलभूत बियाण्याची शुद्धता 100 टक्के असते.
- मूलभूत बीजोत्पादन कृषी विद्यापीठे, शासकीय संस्था या ठिकाणीच घेतले जाते.
- मूलभूत बियाणे प्रक्रिया करून तयार झाल्यानंतर या बियाण्याच्या पिशव्यांना पिवळ्या रंगाची खूणचिठ्ठी (टॅग) लावतात. या टॅगवर बियाण्याची उगवणक्षमता, भौतिक शुद्धता, बियाणे उत्पादनाचा हंगाम / वर्ष याबद्दल माहिती दिलेली असते. तसेच, त्यावर रोप पैदासकाराची सही असते. मूलभूत बियाणे हे पायाभूत बीजोत्पादनासाठी वापरतात.

ब) पायाभूत बियाणे - - पायाभूत बियाणे हे मूलभूत बियाण्यापासून तयार केले जाते.
- पायाभूत बीजोत्पादन हे प्रामुख्याने कृषी विद्यापीठ अथवा सहकारी प्रक्षेत्रावर अथवा बियाणे महामंडळातर्फे प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर घेतले जाते.
- पायाभूत बीजोत्पादनाची पाहणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेने गठित केलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीच्या देखरेखीखाली केली जाते. यामध्ये कृषी विद्यापीठाचे पीक पैदासकार, बियाणे महामंडळाचे प्रतिनिधी, बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे अधिकारी यांचा समावेश असतो.
- प्रक्रिया करून तयार झालेल्या पायाभूत बियाण्याच्या पिशव्यांना पांढऱ्या रंगाची खूणचिठ्ठी (टॅग) लावतात. यावर बियाण्याची उगवणक्षमता, आनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता याची माहिती दिलेली असते. या टॅगवर बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही असते.

क) प्रमाणित बियाणे - - प्रमाणित बियाणे हे पायाभूत बियाण्यापासून तयार करतात.
- प्रमाणित बियाण्यामध्ये प्रमाणीकरण यंत्रणेच्या निर्धारित प्रमाणकानुसार आनुवंशिक आणि भौतिक शुद्धता राखली जाते.
- या प्रकारचे बीजोत्पादन शेतकरी स्वतःच्या शेतावर घेऊ शकतात. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून शेतकऱ्यांना हे बियाणे प्रमाणित करून घ्यावे लागते. यासाठी पेरणीनंतर 15 दिवसांच्या आत जिल्हा प्रमाणीकरण यंत्रणेकडे बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी करणे आवश्‍यक असते. बीजोत्पादन निर्धारित प्रमाणकानुसार घ्यावे लागते.
- प्रमाणीकरण यंत्रणेकडून या बीजोत्पादन क्षेत्राची पाहणी केली जाते.
- प्रक्रिया करून तयार झालेल्या प्रमाणित बियाण्याच्या पिशव्यांना निळ्या रंगाची खूणचिठ्ठी (टॅग) लावतात. यावर बियाण्याची आनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता, उगवणक्षमता, तपासणी तारीख इत्यादी माहिती दिलेली असते. यावर बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्यांची सही असते.

ड) सत्यप्रत बियाणे -
- सत्यप्रत बियाण्याची आनुवंशिक शुद्धता, उगवणक्षमता, भौतिक शुद्धता प्रमाणित बियाण्याइतकीच असते. याचे उत्पादनसुद्धा प्रमाणित बियाण्यासाठी जी प्रमाणके / मापदंड आहेत त्याचप्रमाणे केले जाते; परंतु याची पाहणी ही बीजप्रमाणीकरण यंत्रणेकडून केली जात नाही.
- या प्रकारच्या बियाण्याच्या गुणवत्तेची खात्री ही उत्पादकानेच घ्यावयाची असते.
- प्रक्रिया करून तयार झालेल्या बियाण्याच्या पिशव्यांना हिरव्या रंगाची खूणचिठ्ठी (टॅग) लावतात.

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, परभणी येथे कार्यरत आहेत.)

अशा आहेत हळदीच्या वाढीच्या अवस्था

1) आपल्याकडे हळदीची काढणी जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात होते. काढणीनंतर मिळणारे बेणे लागवडीसाठी वापरलेले जाते. हे बियाणे उत्तम मानले जाते, कारण काढणीनंतर लागवड करेपर्यंत अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये बियाण्याची सुप्तावस्था संपलेली असते. बेण्याचे डोळे फुगलेले असतात. न कुजलेले बियाणे लागवडीस वापरावे.
2) सरी-वरंबा पद्धतीने वरंब्याच्या दोन्ही बाजूस 30 सेंटिमीटर अंतरावर कुदळीने आगऱ्या घेऊन गड्डे लावावेत किंवा वाकोरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात तीन पाच सें.मी. खोल दाबून घ्यावेत.
3) रुंद वरंबा पद्धतीने पहिले पाणी देऊन जमीन वाफशावर आल्यानंतर 30 x 30 सें.मी. अंतरावर गड्डे लावून घ्यावेत, गड्डे पूर्ण झाकले जातील आणि लागवड करताना डोळे बाहेरच्या बाजूला राहतील याची दक्षता घ्यावी.
4) कंदाची निमुळती बाजू वरती राहील या पद्धतीने कंदाची लागवड करावी.

वाढीच्या अवस्था - हळदीची शेती यशस्वी करण्याकरिता हळदीच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य त्या अवस्थेमध्ये खतांची मात्रा देणे किंवा कीड व रोग व्यवस्थापन करण्यास फायदेशीर ठरते. हळदीच्या वाढीच्या प्रमुख चार अवस्था आहेत.

अ. नं. हळदीचे वय वाढीची अवस्था तपशील तापमान (अंश सेल्सिअस)
1) 0 ते 45 दिवस उगवणीची अवस्था या अवस्थेमध्ये हळदीची उगवण पूर्ण होऊन हळदीस एका किंवा दोन पाने येतात. 35 ते 40
2) 46 ते 150 दिवस शाकीय वाढ या अवस्थेमध्ये हळदीला फुटवे येतात. हळदीच्या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या या अवस्थेमध्ये निश्‍चित होते. 25 ते 35
3) 150 ते 210 दिवस हळकुंड फुटणे फुटव्यांपासून हळकुंडे फुटण्यास सुरवात होते. 20 ते 25
4) 210 ते 270 दिवस हळकुंडे भरणे हळकुंडाची जाडी आणि वजन या दिवसांमध्ये वाढते... 18 ते 20

मध्यम पाऊस व चांगल्या प्रकारच्या जमिनीत हळदीची चांगली वाढ होते. पाण्याचा ताण अगर जास्त पाऊसमान हे पीक काही काळ सहन करू शकते. परंतु जास्त वेळ पाणी साचून राहणे या पिकास हानिकारक आहे. हळदीच्या लागवडीसाठी मे ते जून महिन्यांतील उष्ण व दमट हवामान अनुकूल असते. हळदीच्या वाढीसाठी उष्ण, दमट आणि हिवाळ्यातील थंड हवामान उपयुक्त ठरते. थंडीमुळे हळदीची पालेवाढ काही अंशी थांबते व जमिनीत कंदाची (फण्याची वाढ) वाढ होते. कोरडी व थंड हवा कंद पोषणास अनुकूल असते. पावसाळी हंगामातही हळदीच्या खोडांची, फुटव्यांची वाढ भरपूर होते. दमटपणा हा हळदीच्या पिकास अनुकूल असतो. शिवाय हळदीची लागवड जेथे कायमस्वरूपी सातत्याने केली जात नाही, तेथे कंदमाशीसारख्या किडीचा उपद्रव नगण्य असतो.

डॉ. कदम - 9404366141
(लेखक हळद संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे कार्यरत आहेत.)

Monday, 20 May 2013

योग्य कांदा साठवणुकीतून मिळवा "मार्केट'

कांद्याची योग्य वेळी काढणी करून तो चांगला सुकविल्यास कांद्याची प्रत आणि आकर्षकपणा टिकून राहू शकतो. कांदा सुकविल्यानंतर साठवणुकीपूर्वी कांद्याची प्रतवारी करणे खूप महत्त्वाचे असते. शास्त्रोक्त पद्धतीने कांदा साठवण केल्यास साठवणुकीतील नुकसान कमी होते. कांदा चांगला सुकवून कांदाचाळीत भरला की तो पाच महिने चांगला टिकतो. डी. एम. साबळे
देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी अंदाजे 30 ते 40 लाख टन कांद्याची आवश्‍यकता असते. खराब वातावरणामुळे खरीप हंगाम वाया गेल्यास रब्बी हंगामात तयार झालेला व साठवणुकीत असलेला हा कांदा फेब्रुवारीपर्यंत पुरवून वापरावा लागतो. अशा वेळेस कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होते. या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. मागील वर्षी देशात 29 लाख टन कांद्याची साठवण झालेली होती, त्यापैकी राज्यात एकूण 15.5 लाख मे. टन कांदा साठविला होता. शास्त्रोक्त पद्धतीच्या कांदाचाळीत 10 लाख टन, तर पाच लाख टन पारंपरिक कांदाचाळीत साठविला होता. खरीप 2012 मध्ये अपुऱ्या पावसामुळे राज्यात खरीप हंगामातील कांद्याच्या क्षेत्रात व उत्पादनात घट झालेली होती; परंतु राज्यात शेतकऱ्यांच्या स्तरावर उभारण्यात आलेल्या शास्त्रोक्त पद्धतीच्या कांदाचाळींमुळे कांद्याची पुरेशी उपलब्धता झाली.

खरीप व लेट खरीप हंगामात उत्पादन होणाऱ्या कांद्याची साठवणूक क्षमता कमी असते, तसेच कांदा सुकविण्यासाठी योग्य परिस्थिती नसल्याने खरिपाचा कांदा साठविला जात नाही, तसेच साठवणुकीतील कांदासाठा संपुष्टात आलेला असल्यामुळे बरेचदा चांगले बाजारभाव खरीप हंगामातील कांद्याला मिळत असतात, त्यामुळे शेतकरी हा कांदा काढणीनंतर त्वरित बाजारात विक्रीला आणतात. रब्बी हंगामातील कांदा हा साठवणुकीस योग्य असतो. तो पाच महिने टिकू शकतो, त्यामुळे हा कांदा साठवणूक करणे योग्य असते.

योग्यवेळी काढणी आणि सुकवणी महत्त्वाची : राज्यात एकूण उत्पादनापैकी रब्बी हंगामाचा हिस्सा 25 ते 30 लाख टन (60 टक्के) इतका आहे. शेतकऱ्यांनी हा कांदा साठवणूक न करता बाजारपेठेत एप्रिल ते मेमध्ये काढणीनंतर विक्रीला आणल्यास बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाही. बाजारभावात स्थिरता आणण्यासाठी व देशांतर्गत बाजारपेठेसाठी व निर्यातीसाठी मालाची उपलब्धता वाढविण्यासाठी कांदा साठवण आवश्‍यक आहे.
1) कांद्याची योग्य वेळी काढणी करून तो चांगला सुकविल्यास कांद्याची प्रत आणि आकर्षकपणा टिकून राहू शकतो. साठवणुकीसाठी उत्पादित होत असलेल्या कांद्यास जास्तीत जास्त शेणखताचा अथवा हिरवळीच्या खताचा वापर करावा.
2) अति नत्राचा वापर केल्यास त्याचे आकारमान वाढते; परंतु तो जास्त काळ टिकत नाही, त्यामुळे साठवणुकीतील कांद्यास लागवडीनंतर 60 दिवसांच्या आत नत्र द्यावे. उशिरा नत्र दिल्यास माना जाड होतात, कांदा टिकत नाही. यासाठी कांद्याची लागवड करताना कांदा साठवायचा की काढणीनंतर त्वरित विक्री करावयाचा याचे नियोजन करावे.
3) रब्बी/ उन्हाळी हंगामातील कांदा काढणीपूर्वी दोन ते तीन आठवडे आधीपासून पाणी तोडावे, त्यामुळे कांदा पक्व व घट्ट होतो आणि मान पडण्यास सुरवात होते. 50 टक्के माना मोडल्यानंतर लगेच कांद्याची काढणी करावी. कांदे पात व मुळासकट शेतात ओळीने पसरवून सुकवावेत. मागच्या ओळीतील कांद्याच्या पातीने पुढच्या ओळीतील कांदे झाकून जातील अशा बेताने कांदे एकसारखे शेतात पसरावेत, त्यामुळे उघड्या रानात कांदे उन्हाने खराब न होता त्यातील पाण्याचा अंश कमी होतो.
4) काढणीनंतर कांदा शेतात तीन ते पाच दिवस पातीसकट व्यवस्थित सुकवावा, त्यानंतर मानेची ठराविक लांबी ठेवून (तीन- पाच सें.मी.) पीळ देऊन पात कापावी. ही प्रक्रिया साठवणुकीच्या कांद्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. पीळ देऊन मान कापल्यास त्यामध्ये रोगजंतूंचा शिरकाव होण्यास प्रतिबंध होतो.
5) मान कापलेला कांदा झाडाखाली सावलीत पसरून चांगला सुकवावा. सावलीमध्ये सुकविलेल्या कांद्यास दुहेरी पापुद्रा येऊन आकर्षक रंग प्राप्त होतो.
6) कांदा पूर्ण सुकलेला आहे किंवा नाही याची खूण म्हणजे त्यातील तीन ते पाच टक्के पाण्याचा अंश कमी झाला पाहिजे.
7) मान बारीक होऊन पूर्णपणे मिटलेली असावी. कांदा घट्ट आणि वरचा पापुद्रा सुकून त्याचा रंग आकर्षक झाला पाहिजे.

साठवणुकीपूर्वीची प्रतवारी व हाताळणी : 1) कांदा सुकविल्यानंतर साठवणुकीपूर्वी कांद्याची प्रतवारी करणे खूप महत्त्वाचे असते. रोगट व इजा झालेले कांदे साठवणुकीत इतर कांद्यांचे नुकसान करतात, त्यामुळे कांदा साठवणुकीत प्रतवारी करावी.
2) रोगट व इजा झालेले, जाड मानेचे, चिंगळी, जोड कांदे आणि डेंगळे असलेले कांदे बाजूला करावेत, ते त्वरित बाजारात विक्री करावेत.
3) सर्वसाधारण काढलेल्या कांद्याची मोठा (सहा सें.मी. व्यास आणि वरचे), मध्यम (चार ते सहा सें.मी. व्यासाचे) व लहान (दोन ते चार सें.मी. व्यासाचे) अशा रीतीने तीन गटांत प्रतवारी करावी.
4) लहान तसेच मोठ्या आकाराच्या कांद्यामध्ये जास्त प्रमाणात वजनात घट येते, त्यामुळे मध्यम आकाराचे कांदे साठवणुकीसाठी वापरणे योग्य असते, तर उर्वरित आकारमानाचे कांदे जुलै- ऑगस्टपर्यंत विक्रीचे नियोजन करावे.

सुधारित चाळीमध्येच कांदा साठवणूक - 1) शास्त्रोक्त पद्धतीने कांदा साठवण केल्यास साठवणुकीतील नुकसान 25 टक्‍क्‍यांवरून पाच टक्‍क्‍यांपर्यंत कमी करता येते. कांदा चांगला सुकवून कांदाचाळीत भरला की तो पाच महिने चांगला टिकतो.
2) कांदा साठवणुकीसाठी शास्त्रोक्त पद्धतीने उभारलेल्या कांदाचाळीचा वापर करावा, ज्यामध्ये नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून कांदाचाळीतील तापमान 25 ते 30 अंश व आर्द्रता 65 ते 70 टक्के या मर्यादेत ठेवून साठवणुकीतील नुकसान कमी करता येते.
3) कांदाचाळीची आतील रुंदी जास्तीत जास्त चार फूट असावी. रुंदी वाढली तर वायुविजन नीट होत नाही. थरातील मध्यावरील कांदे सडतात.
4) जमिनीपासून 1.5 ते दोन फूट मोकळी जागा ठेवून कांदा साठवण ठेवावी. तळासाठी अर्धगोल बांबू वापरावा. तळासाठी कॉंक्रिटचा वापर करू नये. तळाशी दोन ते तीन फूट माती काढून रेतीचा थर द्यावा. खालच्या मोकळ्या जागेतून रात्री थंड हवा चाळीत शिरते व गरम झालेली हवा चाळीच्या वरच्या त्रिकोणी भागात जमा होऊन बाहेर जाते.
5) कांदाचाळीच्या दोन्ही बाजूस उभ्या भिंतीसाठी बांबू, जंगली लाकूड किंवा पऱ्हाट्या इत्यादी साहित्याचा वापर करावा, तर छतासाठी सिमेंट पत्रे किंवा मंगलोरी कौले यांचा वापर करावा. शक्‍यतोवर टीन पत्र्यांचा वापर करू नये.
6) कांदाचाळीच्या छतावर उन्हाळ्यात आच्छादनासाठी गवत, उसाचे पाचट अथवा ज्वारीचा कडबा यासारख्या उष्णतारोधक साहित्याचा वापर करावा, जेणेकरून आतील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.
7) कांदाचाळीची उभारणी करताना उंच व मोकळ्या जागेवर करावी, तसेच पत्र्यांना पुरेसा ढाळ देऊन दोन मीटरपर्यंत पत्रे बाहेर काढावेत, त्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या ओसांड्यापासून बचाव होतो.
8) कांदाचाळीस मध्यभागी अधिक उंची व जास्त उतार दिल्यास चाळीमध्ये हवा जास्तीत जास्त खेळती राहून पावसाळ्यात आतमध्ये आर्द्रता साठत नाही.
9) कांद्यावर सरळ सूर्यप्रकाश येण्याचे टाळावे, त्यामुळे कांद्याचा रंग फिका पडतो व गुणवत्ता खालावते, त्यामुळे दुपाखी कांदाचाळीची उभारणी पूर्व-पश्‍चिम, तर एकपाखी कांदाचाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. शक्‍यतोवर बाहेरील बाजूस शेडनेटचा वापर करावा.
10) साठवणुकीपूर्वी, साठवणुकीनंतर तसेच मधून-मधून कांदाचाळी व परिसर निर्जंतुक करून घ्यावा, म्हणजे सड कमी होते.
11) कांदाचाळीमध्ये कांद्याची साठवणूक उंची चार ते पाच फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते, हवा खेळती राहत नाही, त्यामुळे विशेषतः खालील थरातील कांद्याचे नुकसान होते.
12) साठवणुकीसाठी निवड केलेला कांदा, साठवणूकगृहाची रचना या दोन्ही बाबी शास्त्रोक्त पद्धतीने अमलात आणल्यास कांदा चार- पाच महिने चांगल्या रीतीने सुरक्षित राहू शकतो. ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या महिन्यांत त्यांच्या विक्रीचे नियोजन केल्यास शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक उत्पन्न या साठवणूक केलेल्या कांद्यापासून मिळू शकते.

कांद्याची उपलब्धता - 1) देशात मागील वर्षी अंदाजे 150 लाख टन कांद्याचे उत्पादन, त्यापैकी महाराष्ट्रात अंदाजे 50 लाख टन उत्पादन.
2) राज्यात खरीप, लेट खरीप व रब्बी या तीन हंगामांत कांद्याचे उत्पादन होते. त्याची सप्टेंबर- ऑक्‍टोबरमध्ये 20 टक्के, फेब्रुवारी- मार्चमध्ये 20 टक्के आणि एप्रिल- मे मध्ये 60 टक्के याप्रमाणे काढणी होते.
3) जून ते सप्टेंबर वगळता संपूर्ण आठ महिने ताजा कांदाच बाजारात उपलब्ध असतो.

जांभळापासून पेये बनविण्याची पद्धत

जांभळाच्या फळांना व बियांना औषधी महत्त्व प्राप्त झाले असल्याने त्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यास फार चांगला वाव आहे. जांभळाच्या फळांमध्ये जातीपरत्वे 50 ते 90 टक्‍क्‍यांपर्यंत खाण्यायोग्य गराचे प्रमाण असते. ही फळे अतिशय नाजूक व नाशवंत असल्याने एक ते दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवता येत नाहीत. यासाठी फळांपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यास औषधी गुणधर्माचा उपयोग होईल, हंगाम नसताना फळांचा आस्वाद घेता येईल. अशा प्रक्रिया उद्योगातून रोजगारनिर्मिती होऊ शकेल.

जांभळापासून पुढील प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात -रस, सरबत, स्क्वॅश, सिरप, वाइन, कार्बोनेटेड शीतपेये, जॅम, जेली, बर्फी, टॉफी, जांभूळपोळी, गराची पावडर, बियांची पावडर, कच्च्या फळांपासून व्हिनेगार इत्यादी पदार्थ तयार करता येतात.

जांभळापासून विविध प्रकारची पेये तयार करण्याची पद्धत 1) सरबत, नेक्‍टर, स्क्वॅश, सिरप - जांभळाच्या पिकलेल्या फळांना गर्द जांभळा रंग असल्याने त्यांच्यापासून तयार केलेल्या पेयांना आकर्षक रंग येतो. जांभळापासून विविध प्रकारची पेये तयार करता येतात. उदा. सरबत, नेक्‍टर, स्क्वॅश, सिरप इत्यादी व त्यांना बाजारपेठेतदेखील मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
वरील पेये तयार करण्यासाठी एफपीओच्या कायद्यानुसार पुढील घटकांचे प्रमाण असावे -
चौकट आहे.

अ.क्र. + पेयाचे नाव + रसाचे (%) + टीएसएसचे (%) + आम्लता (%) + सोडिअम बेन्झोएटचे प्रमाण (पीपीएम)
1. +रस +85 +10 +-- +610
2. +सरबत +10 +13 +0.30 +100 - 125
3. +नेक्‍टर +20 +15 +0.30 +100 - 125
4. +स्क्वॅश +25 +45 - 55 +1.00 - 1.50 +610
5. +सिरप +25 - 45 +65 - 68 +1.50 - 2.00 +610

जांभळापासून पेये तयार करण्यासाठी फळातील रसाच्या टीएसएसचे प्रमाण व आम्लता लक्षात घेऊन योग्य प्रमाणात साखर, सायट्रिक आम्ल, पाणी व परिरक्षक घेऊन पेये तयार केली जातात.

- जांभळापासून पेये तयार करण्यासाठी प्रथम पिकलेल्या, निरोगी, चांगल्या फळांची निवड करावी.
- नंतर फळे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत.
- स्वच्छ धुतलेली फळे ब्रश टाइप पल्परमधून काढून घ्यावीत. यामध्ये बिया वेगळ्या होतात व फळांचा एकजीव झालेला गर वेगळा होतो.
- हा एकजीव झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन 60 ते 70 अंश सेल्सिअस तापमानाला 15 ते 20 मिनिटे गरम करावा. यामुळे रसामधील रंगद्रव्याचे प्रमाण जास्त मिळते.
- हा लगदा थंड झाल्यावर हायड्रॉलिक बास्केट प्रेसमधून काढून घ्यावा किंवा मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. या रसाचा टीएसएस, आम्लता लक्षात घेऊन साखर, सायट्रिक आम्ल, पाणी व परिरक्षक योग्य प्रमाणात घेऊन रसामध्ये मिसळून ते मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे.
- नंतर हे मिश्रण थोडा वेळ गरम करून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांत भरून, बाटल्या हवाबंद करून, लेबल लावून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात.
- सरबत व नेक्‍टरमध्ये पाणी न घालता थंड झाल्यावर प्यावे, तर स्क्वॅश व सिरपमध्ये 1ः3 व 1ः4/5 पट पाणी मिसळावे. चवीनुसार जिऱ्याची पावडर व मीठ वापरल्यास पेयाला चांगला स्वाद प्राप्त होतो.
- अशा प्रकारे तयार केलेला स्क्वॅश व सिरप एक वर्षापर्यंत चांगला टिकवून ठेवता येतो.

2) जांभळापासून मद्य (जामून वाइन) - भारतामध्ये इतर अल्कोहोलयुक्त मद्यांच्या तुलनेने फळांपासून तयार केलेल्या वाइनचे उत्पादन फारच कमी आहे. जांभळाचा रस मधुमेहावर फार गुणकारी असल्याने जांभळाची वाइनसुद्धा आरोग्यासाठी पोषक असते. वाइन उद्योगाला चालना देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात विंचूर व सांगली जिल्ह्यात पलूस या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने वाइन पार्क्‍स स्थापन केलेले आहेत. या उद्योगास शासनातर्फे विविध सवलती जाहीर केलेल्या आहेत.

संपर्क - डॉ. गरंडे, 9850028986
(लेखक शाहू कृषी तंत्र विद्यालय, कोल्हापूर येथे प्राचार्य आहेत.)

हिरवळीची पिके वाढवितात जलधारण क्षमता

हिरवळीच्या खतांमुळे जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात सुधारणा होते. हिरवळीची खते हलक्‍या जमिनीची जलधारण क्षमता वाढवितात. समस्यायुक्त जमिनीची सुधारणा करण्यासाठी उपयोगी पडतात.
ताग ः
ताग (बोरू) हे सर्व प्रकारच्या जमिनीत उत्तम वाढणारे हिरवळीचे पीक आहे. पेरणी झाल्यानंतर पाच ते सहा आठवड्यांनी गाडल्यानंतर हेक्‍टरी सर्वसाधारणपणे 17.5 ते 20 टन सेंद्रिय खत मिळते. त्यापासून 60 ते 100 किलो प्रतिहेक्‍टरी नत्र प्राप्त होते. त्याचबरोबर इतर मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्येही पुढील पिकांना उपलब्ध होतात. पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत तागाची योग्य वाढ होत नाही.

धैंचा ः
हे तागापेक्षा काटक हिरवळीचे पीक आहे. या वनस्पतीच्या मुळावर तसेच खोडावरही गाठी निर्माण होतात. त्यामध्ये रायझोबियम जिवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण करतात. या वनस्पतीच्या मुळावर गाठी निर्माण होण्याची क्षमता इतर द्विदल वनस्पतींपेक्षा 5 ते 10 टक्के जास्त आहे. पाणी साचून राहणाऱ्या दलदलीच्या, कोरड्या किंवा क्षारयुक्त चोपण जमिनीतसुद्धा धैंचा पीक वाढू शकते. पावसाळ्याच्या सुरवातीला हेक्‍टरी 25 ते 40 किलो बियाणे पेरावे. पीक सहा ते सात आठवड्यांत 90 ते 100 सें.मी. उंचीचे वाढल्यानंतर जमिनीत नांगराने गाडावे. या कालावधीत धैंचापासून 18 ते 20 टन इतके हिरव्या वनस्पतीचे उत्पादन मिळते. या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण 0.46 इतके असून, मुळावरील व खोडावरील गाठींतील जिवाणूंमुळे प्रतिहेक्‍टरी 150 कि. ग्रॅ.पर्यंत स्थिर केले जाते.

द्विदलवर्गीय पिके ः

मूग, चवळी, उडीद, सोयाबीन, मटकी, कुळीथ, गवार ही पिके फुलोऱ्याआधीसुद्धा गाडून चांगला फायदा मिळू शकतो. मात्र या पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर सर्व अवशेष जमिनीत गाडल्यास त्याचा चांगला फायदा होतो. या पिकांचे अवशेष जमिनीत लवकर कुजतात.

हिरव्या कोवळ्या पानांची खते ः
शेतात बांधावर किंवा पडीक जागेवर गिरिपुष्प, शेवरी, करंज, सुबाभूळ, मोगली, एरंड पिकांची लागवड करून त्यांची कोवळी पाने अथवा कोवळ्या फांद्या तोडून जमिनीत मिसळावीत. या हिरवळीच्या पिकांचा एक मुख्य फायदा म्हणजे या पिकांसाठी ज्या जमिनीत मुख्य पीक घ्यावयाचे आहे, तेथे हिरवळीच्या पिकाच्या लागवडीसाठी वाट बघावी लागत नाही. केवळ बांधावर या पिकांची लागवड करून त्यांच्या कोवळ्या फांद्या, पाने तोडून ते मुख्य पिकातील जमिनीवर मिसळता येतात. त्यामुळे हंगाम वाया जाण्याची शक्‍यता नसते.

गिरिपुष्प ः
गिरिपुष्प हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत आणि हवामानात वाढणारे हिरवळीचे पीक आहे. या झाडाच्या पानांमध्ये 8.5 टक्के कर्ब, 0.40 टक्का नत्र असते. या वनस्पतीची बांधावर लागवड करून त्याची पाने वरचेवर जमिनीत मिसळता येतात. याशिवाय इतर वनस्पतींच्या तुलनेत या पिकाच्या पानात नत्राचे प्रमाण भरपूर असते.

हिरवळीचे पीक घेताना तागाची लागवड फायदेशीर ठरते. त्याखालोखाल धैंचा, शेवरी, उडीद, मूग, मटकी, चवळी ही पिके आहेत. याशिवाय गिरिपुष्प, करंज, सुबाभळीचा पाला, मोगली, एरंड इत्यादी पानांचा हिरवळीचे खत म्हणून वापर करता येईल. धैंचा व शेवरी ही पिके क्षारयुक्त जमिनी सुधारण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. विशेषकरून विदर्भातील पूर्णा खोऱ्याच्या खारपाण पट्ट्यात ही पिके वापरण्यास चांगला वाव आहे. मूग, सोयाबीन, चवळी ही बेवडाकरिता लावावीत. कारण या पिकांच्या मुळावरील गाठी हवेतील नत्र शोषून तो जमिनीत स्थिर करतात.

प्रमुख हिरवळीच्या पिकामधील अन्नद्रव्यांचे प्रमाण ः
अ.क्र. +हिरवळीचे पीक +नत्र +स्फुरद +पालाश +जस्त +लोह +तांबे +मॅंगेनीज
+ +टक्‍क्‍यांमध्ये +मिलिग्रॅम/किलोमध्ये
1 +शेवरी +2.62 +0.30 +1.25 +40 +1968 +36 +210
2 +जंगली धैंचा +3.98 +0.24 +1.30 +50 +480 +44 +110
3 +गिरिपुष्प +3.49 +0.22 +1.30 +30 +550 +19 +150
4 +चवळी +1.70 +0.28 +1.25 +--
5 +मूग +2.29 +0.26 +1.26 +--

हिरवळीच्या खतांमुळे होणारे फायदे ः 1) हिरवळीच्या खतांमुळे जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात सुधारणा होते.
2) जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते.
3) हिरवळीच्या खतामुळे जमिनीत सूक्ष्म जिवांना अन्न व ऊर्जा मिळते. त्यामुळे त्यांची संख्या व कार्यशक्तीत वाढ होते. परिणामी, जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारतात.
4) जमिनीत सूक्ष्म जिवांची वाढती संख्या व कार्यशक्तीमुळे हिरवळीच्या पिकांचे विघटन चांगले होते. या खतांमधून पिकांना पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून ती पिकांना सहज प्राप्त होतात.
5) या खतामुळे सूक्ष्म जिवाणूंची कार्यक्षमता वाढून जमिनीत हवा खेळती राहते. मातीची जडणघडण, संरचना आणि जमिनीचे फूल सुधारते.
6) ही खते भारी जमिनीत मातीच्या रवाळ घडणीस मदत करतात. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून निचरा सुधारतो.
7) हिरवळीची खते हलक्‍या जमिनीची जलधारण क्षमता वाढवितात.
8) ही पिके जमिनीवर आच्छादन तयार करतात. त्यामुळे जमिनीतील तापमान नियंत्रित राहते. याशिवाय पावसाचे थेंब आणि पाण्याच्या प्रवाहाने होणारी जमिनीची धूप थांबते.
9) लवकर कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश तसेच इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची विद्राव्यता वाढवून ते पिकांना उपलब्ध होतात.
10) जमिनीत स्फुरद, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि लोह इत्यादींची उपलब्धता वाढते.
11) हिरवळीच्या खतांमुळे अन्नद्रव्ये वरच्या थरातून खालच्या थरात वाहून जाण्यास प्रतिबंध होतो.
12) द्विदलवर्गीय हिरवळीची पिके हवेतील नत्र जमिनीत स्थिर करतात व या नत्राची हिरवळीच्या पिकाचे विघटन होत असताना भर पडून पुढील पिकास त्याची उपलब्धता वाढते.
13) हिरवळीच्या खतांमुळे जमिनीतील सूक्ष्म जिवांद्वारे व विघटन होत असताना निर्माण होणाऱ्या आम्लामुळे चुनखडी आणि स्फुरद (फॉस्फेट) तसेच इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची द्राव्यता वाढते.
14) हिरवळीचे पीक योग्य वातावरणात एका हंगामात जवळपास प्रतिहेक्‍टरी 60 ते 100 किलो नत्राची भर घालते.
15) तणांची वाढ हिरवळीच्या पिकांमुळे खुंटली जाते. त्यामुळे मुख्य पिकावाटे अन्नद्रव्यांचे शोषण वाढते.
16) हिरवळीची खते समस्यायुक्त जमिनीची सुधारणा करण्यासाठी उपयोगी पडतात. धैंचा या हिरवळीच्या पिकाची क्षारयुक्त चोपण जमिनीत लागवड केल्यास जमिनीच्या निचऱ्यामध्ये वाढ होते. पिकांना अपायकारक क्षार कमी होऊन जमिनीची सुधारणा होते.
17) हिरवळीच्या खतांमुळे मुख्य पिकाच्या उत्पादनात जवळपास 15 ते 20 टक्के वाढ होते.

संपर्क ः डॉ. खर्चे - 8275013940
(लेखक मृद्विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कार्यरत आहेत.)

जैविक खताच्या वापरासाठी करा योग्य पद्धतीचा वापर -

विविध पिकांसाठी जैविक खते वापरण्याच्या पद्धती जाणून घेतानाच जैविक खतांचा वापर करताना कशी काळजी घ्यावयाची याविषयी आजच्या लेखात माहिती घेऊ. योग्य प्रकारे जैविक खते वापरल्यास पिकांच्या उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते. डॉ. सरिता मोवाडे, डॉ. ऋषिपाल सिंह, डॉ. अजयसिंग राजपूत, रमेश चंद्र
फळबागांसाठी जैविक खते - दोन- चार किलो नत्रयुक्त जैविक खत (ऍझोटोबॅक्‍टर) व दोन- चार किलो स्फुरदयुक्त जैविक खत + 40-100 किलो कंपोस्ट + दोन लिटर पाणी + शेणखत (दोन किलो) + माती (एक किलो) + मायकोरायझा दोन किलो याप्रमाणे मिश्रण करून घ्यावे. या मिश्रणाचा 50 ग्रॅमचा एक गोळा याप्रमाणे गोळे तयार करावेत. फळबागेत प्रत्येक झाडाच्या आळ्यात चार गोळे समोरासमोर ठेवून, मातीने झाकावेत. नंतर पाणी द्यावे.

- कडधान्य पिकांसाठी त्यांच्या गटानुसार योग्य ती रायझोबियम जैविक खते वापरावीत.
- तृणधान्ये व अन्य पिकांसाठी (उदा. गहू, ज्वारी, मका, तीळ, कापूस, संत्रा, मोहरी, कांदा, बटाटा, भाजीपाला व फळबागांसाठी) ऍझोटोबॅक्‍टरचा वापर करावा.
- ऊस, ज्वारी व भातासाठी ऍझोस्पीरिलम जैविक खत वापरावे.
- पिकांची स्फुरदाची गरज भागविण्यासाठी स्फुरदयुक्त जैविक खत वापरावे. जैविक खताच्या वापराचा पूर्णपणे फायदा होण्यासाठी त्याच्या वापरण्याच्या पद्धती योग्य असणे आवश्‍यक आहे.

जैविक खतांचा वापर करण्याची पद्धती - 1) बीज उपचार पद्धती - ही पद्धती मुख्यतः बी पेरून घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी वापरतात. या पद्धतीत 10 ते 15 किलो बियाण्यासाठी 200 ग्रॅम जैविक खत पुरेसे असते. 200 ग्रॅम जैविक खत प्रति 500 मि.लि. पाण्यात मिसळून घ्यावे. हे मिश्रण एका भांड्यात 10-15 किलो बियाण्यावर योग्य पद्धतीने लेप बसेल या पद्धतीने चोळावे, जेणेकरून प्रत्येक बी वर जैविक खताचा थर येईल. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत थोडा वेळ (पाच मिनिटे) वाळवून लगेच पेरणी करावी. जर माती आम्लधर्मी असेल तर चुन्याच्या निवळीचा वापर आपण करू शकतो.

2) मुळावरील उपचार पद्धती - - रोपाची लागवड होणाऱ्या पिकांसाठी ही पद्धती वापरतात. उदा. भात, टोमॅटो, मिरची इत्यादी.
एका बादलीत एक किलो नत्रयुक्त जैविक खत आणि पुरेसे पाणी घ्यावे (एक एकरमध्ये किती रोपांची लागवड करायची आहे, त्यानुसार पाच ते दहा लिटर पाणी घ्यावे), या जैविक खताच्या मिश्रणात रोपांची मुळे बुडवून ठेवावीत. या प्रक्रियेमुळे रोपांची चांगली वाढ होते.

- भात रोपांसाठी जैविक खताचा वापर - लागवडीपूर्वी जैविक खतांच्या मिश्रणात रोपांची मुळे 25 ते 30 मिनिटे बुडवून ठेवावीत. भाताच्या लागवडीसाठी पुरेशा आकाराचे वाफे (2 मी. x 1.5 मी. x 0.15 मी.) शेतात तयार करावेत. त्यामध्ये दोन इंच पाणी टाकून, दोन किलो प्रत्येकी ऍझोस्पीरिलम व स्फुरदयुक्त जैविक खते मिसळावीत. या मिश्रणात भाताचे रोपटे सहा ते दहा तास बुडवून ठेवावे, त्यानंतर लागवड करावी.

3) मृदा उपचार पद्धती - स्फुरदयुक्त जैविक खते नेहमीच मृदा उपचार पद्धतीनेच वापरावी. दोन ते चार किलो स्फुरदयुक्त जैविक खत 40 ते 50 किलो मातीत किंवा कंपोस्टमध्ये मिसळून एक एकर जमिनीत पेरणीपूर्वी सकाळी जमिनीत मिसळून द्यावे.

फायदे - 1) नत्रयुक्त ऍझोटोबॅक्‍टर जैविक खतातील जिवाणू नत्र स्थिर करण्यासोबत विशिष्ट प्रकारचे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे घटक तयार करतात, त्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून पिके निरोगी होतात.
2) जमिनीत पिकांच्या वाढीला आवश्‍यक इंडाल ऍसिटिक ऍसिड, जिब्रॅलिक ऍसिड हे जिवाणू तयार करतात. जमिनीचा पोत सुधारतात.
3) सेंद्रिय पदार्थाचे लवकर विघटन होते. जैविक खताच्या वापराने त्या जिवाणूशिवाय अन्य फायदेशीर जिवाणूंची संख्या जमिनीत वाढते. माती जिवंत राहण्यास मदत होते.
4) मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पिकांच्या उत्पादनात 10-15 टक्के वाढ होते.
5) मायकोरायझा खताच्या वापराने पिकांची चांगली वाढ होते. पिकांना रोग निर्माण करणाऱ्या बुरशीची लागण होत नाही. तसेच, सूत्रकृमींपासून मुळांचे रक्षण करते.

जैविक खतांचा वापर करताना घ्यावयाची काळजी - 1) वेगवेगळ्या पिकांसाठी विशिष्ट जैविक खत कार्यक्षम असते. पिकांच्या वाढीला नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नघटकांची गरज असते. म्हणून नत्रयुक्त, स्फुरदयुक्त, पालाशयुक्त व मायकोरायझा जैविक खते वापरणे आवश्‍यक आहे.
2) नत्रयुक्त जैविक खते वापरताना पिके कोणत्या वर्गात येतात हे बघून जैविक खत निवडावे. उदा. डाळवर्गीय पिकासाठी योग्य ते रायझोबियम जैविक खत निवडावे.
3) शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीचे जैविक खत वापरणे आवश्‍यक आहे. जैविक खत विकत घेतल्यानंतर वापर होईपर्यंत थंड ठिकाणी साठा करावा, त्यासाठी मडके, रांजणाचा वापर करावा.
4) जैविक खते विकत घेताना त्यावरील पिकांचे नाव, उत्पादन तिथी व वापरण्याची अंतिम तिथी, बॅच नंबर, वापरण्याच्या पद्धती या गोष्टी वाचाव्यात.संपर्क - डॉ. सविता मोवाडे - 09423636052
(लेखक क्षेत्रीय जैविक शेती केंद्र, जबलपूर येथे कार्यरत आहेत.)

विविध जैविक खतांची करून घेऊ या ओळख

ऍझोटोबॅक्‍टर जैविक खतातील जिवाणू नत्र स्थिर करण्याबरोबर विशिष्ट प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे पदार्थ तयार करतात. त्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून पिके निरोगी होतात. सेंद्रिय पदार्थांचे लवकर विघटन होते. जमिनीत फायदेशीर जिवाणूंची संख्या वाढते. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पिकांच्या उत्पादनात 10-15 टक्के वाढ होते. डॉ. सरिता मोवाडे, डॉ. ऋषिपाल सिंह, डॉ. अजयसिंग राजपूत, रमेश चंद्र
निसर्गतःच जमिनीमध्ये असंख्य सूक्ष्मजीव वास्तव्य करीत असतात. त्यामध्ये जिवाणू, बुरशी आदींचा समावेश असतो. हे जिवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्ये व अन्न घटक वितरणाचे व उपलब्ध करण्याचे कार्य करतात. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवायची असेल तर जमिनीतील फायदेशीर जिवाणूंची संख्या वाढविणे गरजेचे असते. फायदेशीर जिवाणूंमध्ये रायझोबियम, ऍझोटोबॅक्‍टर, ऍझोस्पिरिलम, निळे, हिरवे शेवाळे वातावरणातील निसर्गतः उपलब्ध असलेला नत्र स्थिर करतात. त्याच प्रमाणे स्फुरद विरघळविणारे जिवाणू उदा. बॅसिलस मेगॅथेरियम, बॅसिलस पॉलिमिक्‍झा पेनिसिलियम, ऍस्परजिलस, स्युडोमोनास स्पे. इत्यादी जमिनीमध्ये नैसर्गिकता उपलब्ध असलेल्या घट्ट स्वरूपातील स्फुरदाचे विघटन करून द्राव्य स्वरूपातील स्फुरदात रूपांतर करतात. सध्याच्या काळात मायकोरायझा जिवाणूला बरेच महत्त्व आले आहे. त्याच्या वापरामुळे पिकांना जास्तीत जास्त किंवा पुरेशा प्रमाणात स्फुरदाचा, तसेच पाण्याचा, अन्य सूक्ष्म अन्नघटकांचा पुरवठा होत असतो.

जैविक खते - ही खते म्हणजे माध्यमाच्या आधारे तयार केलेले सूक्ष्म जिवाणूच असतात. ही जैविक खते पावडर किंवा भुकटीमध्ये किंवा द्रवरूपात देखील तयार केलेली असतात. ही खते तयार करण्याच्या वेळी एक ग्रॅम जैविक खतामध्ये कमीत कमी 5 x 10-7 जिवाणू त्यात असणे आवश्‍यक आहे. तसेच द्रवरूपी जैविक खत असल्यास 1 x 10-8 जिवाणू प्रति मि.लि. असणे आवश्‍यक आहे. हे जैविक खत शुद्ध स्थितीत असायला हवे.

जैविक खतांचे मुख्य प्रकार - 1) नत्रयुक्त जैविक खते, 2) स्फुरद युक्त जैविक खते, 3) मायकोरायझा, 4) पालाश जैविक खते, 5) झिंकयुक्त जैविक खते

नत्रयुक्त जैविक खते - संपूर्ण पृथ्वीतलावर जवळपास 150 लक्ष टन नत्र स्थिर होते. त्यापैकी 50 लक्ष टन औद्योगिक कारखान्याद्वारे स्थिर होते. 30 लक्ष टन नत्र नैसर्गिक विजेमार्फत स्थिर केले जाते. साधारणपणे 170 लक्ष टन नत्र मातीच्या व पाण्यातील सूक्ष्म जिवाणूंद्वारे स्थिर केले जाते. नत्रयुक्त जैविकखते तयार करताना जास्तीत जास्त नत्र स्थिर करणारे कार्यक्षम जिवाणू वापरले जातात. त्या खतांमध्ये पिकाच्या प्रकाराप्रमाणे जिवाणू वापरले जातात. उदा. डाळवर्गीय पिकांसाठी वेगवेगळे रायझोबियम जिवाणू व अन्य पिकांसाठी ऍझोटोबॅक्‍टर, ऍझोस्पिरिलम, ऍसिटोबॅक्‍टर यांचा वापर होतो. त्यापैकी ऍझोस्पिरिलम जिवाणू ऊस आणि भाताच्या पिकांसाठी वापरतात. ऍसिटोबॅक्‍टर हा केवळ उसासाठीच वापरतात.

स्फुरदयुक्त जैविक खते - निसर्गतःच जमीन, पाणी, सेंद्रिय खते, प्राण्यांच्या व पिकांच्या अवशेषांमध्ये स्फुरद असतो. परंतु प्रत्येक वेळी हा स्फुरद पिकांना त्यांच्या वाढीसाठी उपलब्ध होतोच असे नाही. स्फुरदाची उपलब्धता जमिनीच्या सामूवर (पीएच) अवलंबून असते. अशा वेळी निसर्गात काही जिवाणू असे आहेत की जे या अविद्राव्य स्फुरदावर प्रक्रिया करतात. या जिवाणूंमध्ये बॅसिलस पोलिमिक्‍सा बॅसिलस मेगॅथेरियम,  सुडोमोनास स्ट्रायेटा आदींचा समावेश होतो. हे जिवाणू मातीत विशिष्ट प्रकारच्या आम्लांची निर्मिती करतात व स्फुरदाचे विघटन करून त्याला द्राव्य स्थितीत आणतात. जेणे करून पिके सहजपणे हा द्राव्य स्फुरद घेऊ शकतात. स्फुरदयुक्त जैविक खते याच कार्यक्षम जिवाणूंपासून तयार केलेले असतात.

मायकोरायझा - मायकोरायझा जैविक खते स्फुरदयुक्त जैविक खतात मोडतात. पिकांच्या मुळात वास्तव्य करणाऱ्या फायदेशीर बुरशींना मायकोरायझा म्हणतात. एक्‍टोमायकोरायझा व एन्डोमायकोरायझा असे याचे दोन प्रकार आहेत. ही बुरशी मुळाच्या वरच्या थरात शिरून कार्य करते. एकदा मुळात शिरकाव झाल्यानंतर त्याचे तंतुमय धागे मुळांच्या पेशीत आपले जाळे पसरवितात. त्यालाच "अरबसल्स' म्हणतात. या तंतुमय धाग्यांद्वारे मायकोरायझा जमिनीतील विखुरलेली आवश्‍यक अन्नघटके व सूक्ष्म अन्नघटके, स्फुरद, पाणी शोषून मुळांच्या पेशीत आणतात. अरबसल्समधून ती पिकांना पुरवली जातात. या प्रक्रियेनंतर मुळांच्या पेशीत लहान लहान गोलाकार ग्रंथी तयार होतात. यात पिकांना पुरविल्यानंतर उरलेले अन्नघटके साठवून ठेवले जातात. हीच अन्नघटके दुष्काळी परिस्थितीत पिकांना पुरविली जातात. मायकोरायझा खते सर्वच पिकांसाठी, मृद्‌ उपचार पद्धतीने वापरली जातात.

(उद्याच्या भागात- जैविक खते वापरण्याचे फायदे)
(लेखक क्षेत्रीय जैविक शेती केंद्र, जबलपूर (मध्य प्रदेश) येथे कार्यरत आहेत.)

संपर्क - डॉ. सविता मोवाडे, 09423636052

हिरवळीच्या खतातून सुधारा जमिनीची सुपीकता

हिरवळीच्या पिकांमुळे जमिनीत नत्राची वाढ होते. कडधान्ये वर्गीय पिकांची मुख्य पिकांच्या दोन ओळींत पेरणी करावी. यामुळे मुख्य पिकासाठी नत्राची उपलब्धता वाढते. आच्छादनाद्वारे जमिनीतील ओलावा टिकतो. फळबागांमध्ये आच्छादन आणि तणांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात. डॉ. बी. ए. सोनुने, डॉ. व्ही. के. खर्चे
सेंद्रिय खतातील अन्नद्रव्ये जमिनीत मिसळल्यानंतर पुढील दोन ते तीन हंगामांपर्यंत पिकांना त्यातील अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो कारण ही खते जमिनीतून पिकांना हळूहळू उपलब्ध होतात. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारून जमिनीची सुपीकताही वाढते. कमी खर्चात जास्तीत जास्त पीक उत्पादनासोबत जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी काही प्रमाणात रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर आवश्‍यक आहे. हिरवळीच्या खतांचा रासायनिक खताबरोबर अथवा शेणखताबरोबर पूरक म्हणून वापर केल्यास हा चांगला पर्याय होऊ शकतो.

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी द्विदल वनस्पतींची शेतात लागवड करून जमिनीत गाडावे. सर्वसाधारणपणे द्विदल वनस्पतींच्या पानांत 2.5 ते तीन टक्के नत्र असते. साधारणपणे कर्ब (10) - नत्र (1) गुणोत्तर असणाऱ्या लवकर कुजणाऱ्या आणि भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ जमिनीला मिळवून देणाऱ्या वनस्पतींची निवड हिरवळीच्या पिकांसाठी करावी. हिरवळीच्या पिकांमुळे जमिनीत नत्राची मात्रा वाढते. कडधान्ये वर्गीय पिकांची मुख्य पिकांच्या दोन ओळींत पेरणी करावी. यामुळे मुख्य पिकासाठी नत्राची उपलब्धता वाढते. आच्छादनाद्वारे जमिनीतील ओलावा टिकतो. फळबागांमध्ये आच्छादन आणि तणांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात.

हिरवळीच्या खतांचे प्रकार - अ) जागच्या जागी गाडावयाचे हिरवळीचे खत -
ज्या शेतात हिरवळीचे खत घ्यावयाचे आहे त्याच ठिकाणी सलग अथवा एखाद्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून पेरणी करून ते पूर्ण शाखीय वाढ झाल्यावर व पीक फुलोऱ्यात येण्याआधी नांगराच्या साह्याने गाडावीत. ही पद्धत खोल जमिनीत भरपूर पाऊस अथवा सिंचनाची सोय असल्यास उपयुक्त आहे. या पद्धतीमध्ये हिरवळीचे पीक म्हणून ताग, (बोरू), धैंचा, चवळी, मूग, सोयाबीन, गवार, वाटाणा, उडीद, शेवरी या पिकांची लागवड करावी.

हिरवळीचे पीक गाडावयाची अवस्था -
हिरवळीचे पीक लागवडीनंतर त्याच ठिकाणी फुलोऱ्याच्या आधी गाडावे. हिरवळीच्या पिकाची पालवी कोवळी असतानाच जमिनीत गाडणे फायदेशीर ठरते. हिरवळीचे पीक अतिशय कोवळ्या अवस्थेत जमिनीत गाडू नये. कारण त्याद्वारे मिळणारे हरित वनस्पतीचे उत्पादन हे कमी असते. त्याचे लवकर विघटन होऊन जमिनीत अतिशय कमी अवशेष मिळतात. याउलट हिरवळीचे पीक पक्व झाल्यानंतर गाडल्यास त्यांचे विघटन होण्यास बराच उशीर लागतो. त्यामुळे हिरवळीची पिके गाडण्याची योग्य अवस्था म्हणजे फुलोऱ्याआधी किंवा पक्व होण्याअगोदर गाडणे.

हिरवळीच्या खतासाठी पिकाची निवड - - हिरवळीच्या खतासाठी वापरण्यात येणारी पिके ही बहुउद्देशीय असावीत.
- कमी कालावधीची, जोरात वाढणारी व जास्तीत जास्त अन्नद्रव्ये धरून ठेवणारी असावीत.
- लवकर वाढणारे भरपूर पालेदार व हिरवेगार असावे म्हणजे त्यापासून भरपूर हरितद्रव्य मिळेल.
- अशी पिके वेगवेगळ्या वातावरणात व हवामानात वाढणारी असावीत.
- कमी पाण्यात येणारी तसेच हलक्‍या जमिनीतसुद्धा जोमाने वाढणारी असावीत.
- जास्तीत जास्त बीजोत्पादन करणारी असावीत.
- सूर्यप्रकाशासाठी सहनशील तसेच रोग व कीड प्रतिबंधक असावी.
- पिकास कोवळेपणा व लुसलुशीतपणा असावा जेणेकरून ही पिके जमिनीत गाडल्यानंतर त्यांचे लवकरात लवकर विघटन होईल.
- जमिनीत जास्त नत्र स्थिर करण्यासाठी ही पिके द्विदलवर्गीय असावीत.
- या पिकांची मुळे जमिनीत खोलवर जाणारी असावीत म्हणजे ती पिके जमिनीतील खालच्या थरातूनसुद्धा अन्नद्रव्ये घेतील.

हिरवळीचे पीक गाडण्याची वेळ - हिरवळीच्या खतापासून जास्तीत जास्त फायदा मिळविण्यासाठी हिरवळीचे पीक योग्य वेळी गाडणे व पुढील पिकाच्या पेरणीस पुरेसा वेळ असणे आवश्‍यक असते. कोणतेही सेंद्रिय खत त्यामध्ये अन्नद्रव्यांचे शेकडा प्रमाण कमी असल्यामुळे त्याची लागणारी मात्रा ही भरपूर असते. त्यामुळेच सेंद्रिय खतांचा वापर हा पिकाच्या सुरवातीस पेरणीला करतात. मुख्य पिकामध्ये हिरवळीची खते सुरवातीस पेरणीला गाडतात. त्यानंतर विघटनासाठी योग्य वेळ दिल्यानंतर व पूर्ण विघटन झाल्यानंतर मुख्य पिकाची पेरणी करतात. कपाशी लागवड करताना कपाशीसोबत दोन ओळींच्या मध्ये एक ओळ बोरू किंवा धैंचाची पेरणी करून त्याची 30 ते 35 दिवसांनी कापणी करून तिथेच जमिनीत गाडावे.

वेगवेगळ्या हिरवळीच्या पिकांचा हंगाम, त्यांचे उत्पादन व त्यापासून मिळणारे नत्राचे शेकडा प्रमाण पुढीलप्रमाणे दिले आहे -

अ.क्र. +पिकाचे नाव +हंगाम +हरित वनस्पतीचे उत्पादन (टन/हे.) +नत्राचे शेकडा प्रमाण +जमिनीत मिळणारे नत्र (किलो/हे.)
1 +बोरू (ताग) +खरीप, रब्बी +21.20 +0.45 +85
2 +धैंचा +खरीप, रब्बी +20.0 +0.42 +80
3 +चवळी +खरीप, रब्बी +23.0 +0.49 +65
4 +मूग +खरीप +8.00 +0.53 +40
5 +शेवरी +बारमाही +20.0 +0.48 +86
6 +गवार +खरीप, रब्बी +20.0 +0.34 +50

निवड हळदीच्या बेण्याची...

वळवाच्या पावसाच्या पहिल्या सरी पडल्यानंतर धूळ वाफ भिजून शांत झाल्यावर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागवड करावी. लागवडीसाठी दर्जेदार बेण्याची निवड करावी. लागवडीपूर्वी बेणेप्रक्रिया करावी. हळद लागवडीसाठी मजुरांची बचत करण्यासाठी यंत्राने लागवड करणे फायदेशीर ठरते. डॉ. जितेंद्र कदम, रघुनाथ वाघमोडे, प्रतापसिंह पाटील
बेण्याचे प्रकार - 1) जेठा गड्डा बेणे -
आकाराने मोठा, भवऱ्यासारखा दणकट कंदाच्या मध्यभागी असतो. याचा वापर प्रामुख्याने बियाण्यांसाठी केला जातो. जेठे गड्डे लावण्यापूर्वी त्यावरील मुळ्या काढून बेणे साफ करावे. त्यामुळे मुळ्यांमार्फत होणाऱ्या बुरशींचा प्रादुर्भाव रोखता येतो.
2) बगल गड्डा बेणे -
आकाराने मध्यम, जेठा गड्ड्याला चारी बाजूंनी येतात. याला अंगठा गड्डा असेही म्हटले जाते. या गड्ड्यांची निवड बेण्यासाठी करावयाची झाल्यास 40 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे कंद निवडावेत.
3) हळकुंडे बेणे -
बगल गड्ड्याच्या बाजूला लहान मोठ्या हळकुंडाच्या फण्या येतात. हळकुंडे बेणे म्हणून वापरावयाची असल्यास त्याचे वजन 30 ग्रॅमपेक्षा जास्त असावे. हळकुंडे प्रामुख्याने पुढील वर्षी गड्डे बियाणे तयार करावयाचे असल्यास वापरावे. जेठे गड्डे लावून केलेल्या लागवडीपासून हळकुंडे लावून केलेल्या लागवडीपेक्षा 10 ते 15 टक्के उत्पादन जास्त मिळते.

बेणे प्रक्रिया करूनच करा लागवड - हळदीमध्ये कंदमाशी आणि कंदकूज प्रादुर्भावामुळे 50 ते 75 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते. यासाठी बेणेप्रक्रिया महत्त्वाची आहे.
रासायनिक बेणेप्रक्रिया - बेणेप्रक्रियेसाठी दोन मि.लि. क्विनॉलफॉस प्रति लिटर पाण्यात मिसळावे. तसेच दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम (50 टक्के पाण्यात मिसळणारे) प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणामध्ये बेणे 10 ते 15 मिनिटे बुडून ठेवावे. हळद लागवडीपूर्वी दोन ते तीन दिवस अगोदर रासायनिक बेणेप्रक्रिया करून बियाणे सावलीमध्ये सुकवावे. त्यानंतर बेणे लागवडीसाठी वापरावे.

जैविक बेणेप्रक्रिया - जैविक बेणेप्रक्रिया प्रामुख्याने हळद लागवड करतेवेळी करावी. यामध्ये ऍझोस्पिरीलियम 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळावे. तसेच व्ही. ए. मायकोरायझा (व्हॅम) 25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणामध्ये बियाणे 10 ते 15 मिनिटे बुडवून लगेच लागवडीसाठी वापरावे. ही बेणेप्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत रासायनिक बेणेप्रक्रियेअगोदर करू नये. अगोदर रासायनिक बेणेप्रक्रिया करून बेणे सावलीमध्ये दोन ते तीन दिवस सुकवावे. त्यानंतरच जैविक बीजप्रक्रिया करावी. या बेणेप्रक्रियेमुळे हवेतील नत्र पिकाला मिळण्यास मदत होते, तर स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकामुळे जमिनीतील स्फुरद पिकास उपलब्ध होण्यास मदत होते.

यांत्रिक पद्धतीने लागवड - 1) हळद लागवडीसाठी मजुरांची बचत करण्यासाठी यंत्राने लागवड करणे फायदेशीर ठरते. यासाठी जमिनीची चांगली मशागत करून घ्यावी. त्यानंतर ठिबकच्या नळ्या योग्य त्या अंतरावर अंथरून घ्याव्यात.
2) लागवडीसाठी ट्रॅक्‍टरच्या दोन रिजरमधील अंतर 135 ते 150 सें.मी. ठेवावे. या यंत्राद्वारे गादीवाफे तयार केले जातात, बियाणे लावून त्यावर माती टाकता येते.
3) या यंत्राद्वारे एका दिवसामध्ये चार एकर क्षेत्रावर लागवड करता येते. यंत्रावरती असलेल्या चकतीच्या फिरण्याच्या वेगानुसार दोन कंदामधील अंतर ठरविता येते.
4) एक एकर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी यंत्राला अंदाजे 10 लिटर डिझेलची आवश्‍यकता असते.

डॉ. कदम - 9404366141
(लेखक हळद संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे कार्यरत आहेत.)

हळदीच्या जाती

आपल्या देशात लागवडीखाली मोठ्या प्रमाणावर असलेली हळद ही कुरकुमा लोंगा या प्रकारात मोडते. हळद ज्या भागात पिकविली जाते किंवा विकली जाते, त्या भागाच्या नावावरून हळदीच्या जाती प्रचलित झालेल्या आहेत. राज्यातील हवामान आणि बाजारपेठेतील मागणीचा विचार करता सेलम हळदीची लागवड फायदेशीर ठरते. डॉ. जितेंद्र कदम, रघुनाथ वाघमोडे, प्रतापसिंह पाटील
राज्यातील प्रमुख जाती - 1) फुले स्वरूपा (डी.टी.एस. - 222) - - ही जात मध्यम उंच वाढणारी आहे. सरळ वाढीची सवय, पानांचा रंग हिरवा असून, पानांची संख्या अकरा ते तेरा असते. या जातीच्या पक्वतेचा काळ हा क्रियाशील 255 दिवसांचा असून, फुटव्यांची संख्या दोन ते तीन प्रति झाड असते.
- या जातीचे गड्डे मध्यम आकाराचे असून, वजनाने 50 ते 55 ग्रॅमपर्यंत असतात. हळकुंडे वजनाने 35 ते 40 ग्रॅम असून, प्रत्येक कंदात सात-आठ हळकुंडे असतात. त्यानंतर त्यावर उप-हळकुंडांची वाढ होत असते.
- मुख्य हळकुंडाची लांबी सात ते आठ सें.मी. असते. बियाणे उत्पादनाचे प्रमाण 1.5 असे आहे. हळकुंडे सरळ व लांब वाढतात. हळकुंडाच्या गाभ्याचा रंग पिवळसर असा आहे.
- या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जास्त (5.19 टक्के इतके) असून, उतारा 22 टक्के इतका मिळतो. या जातीचे ओल्या हळदीचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन हेक्‍टरी 358.30 क्विंटल प्रति हेक्‍टर व वाळलेल्या हळदीचे उत्पादन 78.82 हेक्‍टर क्विंटल प्रति हेक्‍टर मिळते.
- ही जात पानावरील करपा रोग तसेच कंदमाशी या किडीस प्रतिकारक आहे.

2) सेलम - - या जातीची पाने रुंद, हिरवी असून, झाडास 12 ते 15 पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात.
- हळकुंडे, उप-हळकुंडे जाड व ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून, गाभ्याचा रंग गर्द पिवळा असतो.
- कच्च्या हळदीचे उत्पादन 350 ते 400 क्विंटल प्रति हेक्‍टरी तर वाळलेल्या हळदीचे उत्पादन 70 ते 80 क्विंटल येते.
- ही हळद परिपक्व होण्यास 270 दिवस लागतात.
- ही जात करपा रोगास बळी पडते. झाडाची उंची कडप्पा जातीपेक्षा कमी असते.

3) राजापुरी - - या जातीची पाने रुंद, फिकट हिरवट व सपाट असून, झाडास 10 ते 14 पाने येतात. झाडास फुले क्वचित येतात.
- हळकुंडे व उपहळकुंडे आखूड, जाड व अंगठ्यासारखी ठसठशीत असतात. हळकुंडाची साल पातळ असून, गाभ्याचा रंग पिवळा, गर्द पिवळा असतो.
- उतारा 18 ते 20 टक्के पडतो. कच्च्या हळदीचे उत्पादन 240 ते 250 क्विंटल, तर वाळलेल्या हळदीचे 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्‍टर इतके येते.
- ही जात करपा रोगास बळी पडते.

4) कृष्णा - - या जातीचे सर्व गुणधर्म कडप्पा जातीसारखे असून, या जातीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण 2.5 टक्के असते.
- वाळलेल्या हळदीचे उत्पादन प्रति हेक्‍टरी 75 ते 80 क्विंटल इतके येते.
- ही जात करपा रोगास बळी पडते.

5) वायगाव - - ही जात 210-225 दिवसांत तयार होते. या जातीच्या 10 टक्के झाडास फुले येतात.
- पानांचा रंग गर्द हिरवा व चकाकणारा असून, झाडास आठ ते दहा पाने येतात. या जातीला हळकुंडे येतात. पानांना तीव्र सुवास असतो. या जातीचा उतारा 20 ते 21 टक्के असतो.
- हळकुंडे लांब व प्रमाणबद्ध असतात. गाभा गर्द पिवळा असतो. या जातीच्या कच्च्या हळदीचे उत्पादन 265 ते 270 क्विंटल व वाळलेल्या हळकुंडाचे उत्पादन 52 ते 55 क्विंटल प्रति हेक्‍टरी येते.
-
हळदीच्या इतर जाती - 1) टेकुरपेटा - - आंध्र प्रदेशमध्ये या जातीच्या मोठ्या प्रमाणात लागवड आहे. ही जात इतर जातींपेक्षा उत्पादनात सरस आहे.
- या जातीची हळकुंडे लांब, जाड प्रमाणबद्ध असतात. हळकुंडाचा गाभा फिकट पिवळा असतो.
- पानांचा रंगही फिकट पिवळा असतो. पाने रुंद-सपाट असतात. झाडाला 10 ते 12 पाने असतात.
- कच्च्या हळदीचे उत्पादन 380 ते 400 क्विंटल व वाळलेल्या हळदीचे 65 ते 70 क्विंटल प्रति हेक्‍टर इतके येते.

2) आंबे हळद - (Curcuma amada) -या प्रकारच्या हळदीला कच्च्या आंब्यासारखा सुवास असतो. ही हळद दिसायला इतर जातीप्रमाणेच असते. परंतु आतील रंग एकदम फिकट पिवळा, पांढरट असतो. -ही हळद हळव्या प्रकारात मोडत असून, ती 7 ते 7.5 महिन्यांत काढणीस तयार होते.
- ही हळद प्रामुख्याने कोकण, तमिळनाडू, आसाम, बंगाल इ. भागांत रानटी अवस्थेत जंगलामध्ये आढळते.
- आंबे हळदीचा मुख्य वापर लोणच्यामध्ये करतात.
- मुका मार लागल्यास शरीरावरील सूज कमी होण्यासाठी, अंगावरील जुने व्रण किंवा जखमा भरून येण्यासाठी, डोकेदुखी, खरूज, देवीसारख्या तापाच्या रोगावरही आंबे हळदीचा वापर करतात.

4) काळी हळद - (Curcuma caesia) - हळदीच्या कंदाचा रंग गडद निळा असतो. त्यामुळे यास काळी हळद असे संबोधले जाते.
- या जातीच्या रोपांची पाने मध्यशिरेवर गडद निळसर असून, बाजूला तांबूस पट्टे असतात.
-आयुर्वेदामध्ये या हळदीचा वापर प्रामुख्याने दमा, कॅन्सर, ताप, लेप्रसी, ब्रॉन्कायटीस इ. रोगांवरील उपचारामध्ये करतात.

5) दारू हळद - (Berberis aristara) - हे एक काटेरी झुडूप असून, ते हळदीच्या कुळातील नाही. परंतु याच्या लाकडाचा रंग हळदीसारखा असल्यामुळे त्यास दारू हळद असे म्हणतात. या झुडपाची फळे आणि फुलेही पिवळसर असतात.
- या झुडपात वाळलेल्या मुळ्यांचा वापर प्रामुख्याने औषधांमध्ये केला जातो. ही प्रामुख्याने हिमालय, नेपाळ, निलगिरी पर्वतावर आढळते. या वनस्पतीचा वापर मलेरिया, रक्ताची मूळव्याध, खोकला, सर्दी, प्रजनन संस्थेतील विकार, तसेच त्वचा रोगावरील नियंत्रण करणाऱ्या औषधांमध्ये करतात.
6) याशिवाय हळदीमध्ये कस्तुरी हळद, काचोटा, आरारूट, चोवार, कचोटी इत्यादी वेगवेगळे प्रकार आहेत.

देशातील हळदीच्या जाती - जातीचे नाव ओले उत्पादन (क्विंटल/ हे.) कालावधी (दिवस) उतारा (टक्के) कुरकुमीन (टक्के) सुगंधी तेल (टक्के) प्रसारित केलेल्या संस्थेचे नाव
सुवर्णा 274 200 20.0 4.3 13.5 7.0 भारतीय मसाला पिके संशोधन संस्था कालिकत, केरळ.
सुगुणा 293 190 12.0 7.3 13.5 6.0
सुदर्शना 288 190 12.0 5.3 15.0 7.0
IISR प्रभा 375 195 19.5 6.5 15.0 6.5
IISR प्रतिभा 391 188 18.5 6.2 16.2 6.2
IISR अल्लेपी सुप्रिम 354 210 19.3 6.0 16.0 4.0
IISR केदाराम 345 210 18.9 5.5 13.6 3.0
CO-1 300 285 19.5 3.2 6.7 3.2 तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कोइमतूर, तमिळनाडू
BSR-1 307 285 20.5 4.2 4.0 3.7
सुगंधम 150 210 23.3 3.1 11.0 2.7 गुजरात कृषी विद्यापीठ, जुनागड
रोमा 207 250 31.0 9.3 13.2 4.2 ओडिशा कृषी विद्यापीठ, पोटांगी, ओडिशा
सुरोमा 200 255 26.0 9.3 13.1 4.4
रंगा 290 250 24.8 6.3 13.5 4.4
रश्‍मी 313 240 23.0 6.4 13.4 4.4 राजेंद्र कृषी विद्यापीठ, ढोली, बिहार
राजेंद्र सोनिया 420 255 18.0 8.4 -- 5.0

संपर्क - डॉ. कदम - 9404366141
(लेखक हळद संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे कार्यरत आहेत.)

तीळ लागवडीविषयी माहिती द्यावी

तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली, भुसभुशीत तयार करावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून शेणखत मिसळून द्यावे. हे पीक खरीप, अर्धरब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये घेता येते. खरीप हंगामामध्ये जूनचा शेवटचा आठवडा ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तीळ लागवड करावी. हेक्‍टरी दीड ते दोन किलो बियाणे लागते. लागवडीसाठी एकेटी- 64 या जातीची निवड करावी. ही जात 90 दिवसांत तयार होते. हेक्‍टरी नऊ क्विंटल उत्पादन मिळते. यामध्ये तेलाचे प्रमाण 48 टक्के आहे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम, तसेच चार ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरीडीची बीजप्रक्रिया करावी.

बियाणे फार बारीक असल्यामुळे पेरताना समप्रमाणात वाळू किंवा गाळलेले शेणखत किंवा राख मिसळावी. तिफणीने 30 सें.मी.वर पेरणी करावी. तीळ हे आपत्कालीन पीक, आंतरपीक आणि मिश्रपीक म्हणून घेता येते. लागवड करताना तीळ + मूग (3ः3), तीळ + सोयाबीन (2 ः1) तीळ + कपाशी (3ः1) अशी आंतरपीक पद्धती वापरावी.

माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळेस अर्धे नत्र (12.5 किलो प्रति हेक्‍टरी) आणि पूर्ण स्फुरद (25 किलो प्रति हेक्‍टरी) देऊन दुसरा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी उरलेल्या नत्राचा (12.5 किलो प्रति हेक्‍टरी) द्यावा. माती परीक्षणानुसार कमतरता असेल तर पेरणीच्या वेळेस झिंक व सल्फर या खतांच्या मात्रा 20 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात दिल्या असता उत्पादनात वाढ होते.

पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर 15-20 दिवसांनी पहिली व आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून, दोन रोपांत दहा सें.मी. अंतर ठेवावे. आवश्‍यकतेनुसार दोन- तीन कोळपण्या, खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही, याची काळजी घ्यावी. उन्हाळी पिकास आवश्‍यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसांनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास सुरक्षित ओलित द्यावे. ओलित करताना पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
संपर्क - 02452 - 229000
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

नागकेशर झाडाबाबत माहिती द्यावी

नागकेशर हा अत्यंत देखणा, मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष आहे. या वृक्षाचे खोड एक ते दोन मीटरपर्यंत सरळ वाढते. खोडाची साल गुळगुळीत, राखाडी रंगाची असते. नवीन येणारी पालवी आणि फांद्या पांढऱ्या, मखमली केस असलेल्या असतात. पाने साधी, भाल्यासारखी, तीक्ष्ण टोक असलेली असतात. फुले छान सुगंधाची एक ते तीन इंच आकाराची असतात. फुले फांद्यांच्या शेंड्याला येतात. फुलांमध्ये चार पांढऱ्या रंगाच्या मोठ्या पाकळ्या असतात. फुलांमध्ये सोनेरी पिवळ्या रंगाचे अनेक पुंकेसर असतात. फळे शंकूसारखी लंबगोल, बाह्य दलाने वेढलेली असतात. एका फळात बदामी रंगाच्या एक ते चार बिया असतात. औषधे निर्मितीसाठी फुलांमधील वाळलेले पुंकेसर आणि बिया वापरल्या जातात.

या वृक्षांस फुले फेब्रुवारी- मार्च महिन्यात येतात आणि फळे एप्रिल- मे महिन्यात परिपक्व होतात. फळांतील बिया काढून दोन ते चार दिवस सावलीत सुकवून 12 तास कोमट पाण्यात ठेवल्यास रुजवा चांगला मिळतो. रोपे तयार करण्यासाठी पाच ते आठ सें.मी. आकाराच्या पिशवीमध्ये पोयटा किंवा गाळाची माती, वाळू, चांगले कुजलेले शेणखत 2-1-2 या प्रमाणात चांगले मिसळून भरावे. प्रत्येक पिशवीत दोन बिया दोन सें.मी. खोलीवर टाकून आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे. रुजवा 15 ते 21 दिवसांनी झाल्यानंतर प्रति पिशवीत एकच रोप ठेवून सेंद्रिय खतांची मात्रा आवश्‍यकतेनुसार द्यावी. रोपे 20-30 सें.मी. उंचीची झाल्यानंतर मोठ्या पिशवीत लावावीत.

लागवडीयोग्य रोपे एक वर्षाने तयार होतात. लागवडीसाठी शक्‍यतो दोन ते तीन फुटांची रोपे वापरावीत. मध्यम, भारी, निचरा होणाऱ्या जमिनीत 4 x 4 मीटर अंतराने 2 x 2 x 2 फूट आकाराचे खड्डे घेऊन लागवड केली जाते. रोपे लहान असताना तीव्र ऊन, अति थंडी, अति पाऊस यांपासून संरक्षण करावे. सुरवातीला या वृक्षाच्या वाढीचा वेग कमी असतो. लागवडीनंतर काळजी घेतल्यास पाच- सात वर्षांत फुले येण्यास सुरवात होते.
संपर्क - (02358) 282717

वनशेतीचे नियोजन कसे करावे?

वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड करावी. यामध्ये, माळरान व टेकड्या, शेतरस्त्याचा काढ, मध्यम व उथळ खोलीची जमीन, नाल्याच्या किनाऱ्यावर वनवृक्षांची लागवड केली जाते. या लागवडीमुळे जमिनीची धूप थांबविण्यास मदत होते. कृषी वनशेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यापासून पीक उत्पादनाबरोबर वृक्षांपासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो. वनशेती करताना इमारती लाकडासाठी साग, शिवण, सिसम व निलगिरीची लागवड करावी. अवजारांसाठी लाकूड उपलब्ध होण्यासाठी शिवण, बांबू, सागाची लागवड करावी. कागद व लगद्यासाठी सुबाभूळ, बांबू यांची, तर जैविक इंधनासाठी करंज, मोह या झाडांची लागवड करावी. शेताच्या बांधावर एक-दोन किंवा तीन ओळींत पिकांवर परिणाम होणार नाही अशा बेताने कमी झाकारा असणाऱ्या वृक्षजातींची लागवड करावी. रामकाठी, सुबाभूळ, निलगिरी, सुरू, बांबू, शेवरी यांसारख्या जलद वाढणाऱ्या, इंधन, चारा, फाटे, बांबू देणाऱ्या जातींचे मिश्रण केल्यास शेतकऱ्यांच्या निरनिराळ्या गरजा भागू शकतात. ज्या क्षेत्रावर विविध वृक्ष प्रजाती, पिके, गवते, फळझाडे लावावयाची असतील, त्या क्षेत्राची प्रथम झाडांच्या आकारमानानुसार म्हणजे झाडांच्या वाढीची पद्धत यानुसार वेगवेगळ्या अंतरावर आखणी करून खुणा कराव्यात. डोंगर-उतारावर झाडांची आणि गवतांची लागवड करावयाची असेल, तर सलग समपातळी चरांची आखणी करावी. सलग समपातळी चर 60 x 60 सें.मी. आकाराचा खोदावा व त्या बांधाची उंची 75-100 सें.मी. पर्यंत ठेवावी.
वनशेतीसाठी वृक्षांची निवड -
1) हिरवा चारा - सुबाभूळ, अंजन, शिवण, शिरस, खैर आपटा, कांचन, पांगारा, धावडा, नीम, पळस, शेवरी, हादगा, बाभूळ.
2) जळणासाठी लाकूड - निलगिरी बाभूळ, वेडीबाभूळ, सुरू, पळस, साग, नीम, आवळा, करंज, हादगा, शेवरी.
3) फळझाडे - आंबा, चिंच, बोर, आवळा, जांभूळ, सीताफळ, पेरू.
4) औद्योगिक उत्पादनाकरिता - नीम, बाभूळ, तुती, करंज, धावडा, निलगिरी, बांबू, पॉपलर.
5) लाकडासाठी झाडे - साग, नीम, बाभूळ, शिरस, सुरू, काशीद, करंज, शिवण.
6) जैविक इंधनाकरिता - करंज, वन एरंड, महुआ, जोजोबा, सीमारुबा.

विविध जमिनींसाठी उपयुक्त वृक्ष - 1) हलक्‍या व उथळ जमिनी - अंजन, सुबाभूळ, सिसू, बाभूळ, सिरस, शेवरी, कडुलिंब.
2) पाणथळ जमिनी - गिरिपुष्प, सुरू, भेंडी, करंज, शेवरी, निलगिरी.
3) क्षारयुक्त जमिनी - वेडी बाभूळ, बाभूळ, कडुलिंब, सिसू, निलगिरी, करंज, खैर.
4) डोंगराळ जमिनी - निलगिरी, बाभूळ, सुबाभूळ, सौंदड, कडुलिंब.

संपर्क -
1) 02358 -283655
वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी
2) 02426-243252
अखिल भारतीय समन्वित वनशेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

साग रोपांची लागवड कशी करावी?

साग लागवडीसाठी थोडीफार चढ-उताराची, पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन लागते. खडकाळ किंवा मुरमाड जमिनीत साग चांगल्या प्रकारे वाढतो. काळी चिकट माती असेल, तर सागाची वाढ समाधानकारक होत नाही. तसेच उथळ, निचरा न होणारी, फार दलदलीची जमीन साग लागवडीस अयोग्य आहे. सागाचे बियाणे पेरून, रोपांची लागवड करून किंवा खोडमूळ (स्टंप) लावून लागवड करता येते. सागाच्या बियांवरील कवच मऊ करून अंकुर येण्यास सुलभ करण्यासाठी पावसाळ्यात मोकळ्या जागेत सिमेंटच्या चबुतऱ्यावर किंवा टणक पृष्ठभागावर बियाणे पसरावे व दररोज दाताळ्याने खालीवर करावे. असे केल्याने सुमारे चार ते सहा आठवड्यांनंतर बियांवरील कवच मऊ होऊन बी रुजण्यास मदत होते. बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्यापासून सागाची रोपे पॉलिथिन पिशवीत अथवा गादीवाफ्यावर करावीत. पॉलिथिन पिशवीत रोपे तयार करण्यासाठी एक भाग माती, एक भाग वाळू व एक भाग शेणखत यांचे मिश्रण करून ते 10 x 20 सें.मी. पिशवीत बीजप्रक्रिया केलेले बी पेरावे. गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी 12 मी. x 1 मी. आकाराच्या वाफ्यावर दहा सें.मी. अंतरावर व पाच सें.मी. खोलीवर प्रक्रिया केलेले बियाणे पेरावे. खोडमूळ (स्टंप) बनविण्यासाठी एक वर्षानंतर रोपे गादीवाफ्यावरून उपटावीत. तीक्ष्ण धार असलेल्या चाकूने मुळाकडील 15 ते 20 सें.मी. भाग ठेवून बाकीचा भाग कापून टाकावा. तसेच मुळाचा खोडाकडील 1.5 ते 2 सें.मी. भाग ठेवून बाकीचा भाग कापावा. हे करताना तिरपा एकच घाव घालावा. पाने व छोट्या मुळ्या काढाव्यात. तयार केलेले खोडमूळ जितक्‍या लवकर रोपवनात लावले जाईल, तितके चांगले. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर 2 x 2 मीटर अंतरावर 30 x 30 x 30 सें.मी आकाराचे खड्डे घेऊन त्यामध्ये सागाची लागवड करावी. सागाचे स्टंप घट्ट लावावेत. लागवड केल्यानंतर स्टंपच्या शेजारी पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. सागाची वाढ जोमाने होण्यासाठी प्रति रोप दहा ग्रॅम नत्र व दहा ग्रॅम स्फुरद अळी पद्धतीने द्यावे. सागाची लागवड केल्यानंतर पावसाळ्यानंतर एक वर्षापर्यंत पाण्याची आवश्‍यकता असते. प्रति वर्षी सागाची उंची साधारणपणे 1 ते 1.5 मी. व घेर दोन ते पाच सें.मी.ने वाढतो.
संपर्क - 02358- 283655
वनशास्त्र महाविद्यालय, दापोली

Tuesday, 14 May 2013

मानवाप्रमाणेच प्राण्यांनाही विविध प्रकारचे आजार संभवतात, ब-याच आजारांवर पशुपालक घरच्याघरी उपचार करू शकतो व यासाठी प्रामुख्याने औषधी वनस्पतींचा वापर उपयुक्त ठरतो. असे उपचार करत असताना प्रत्यक्ष पशुवैद्यकाची गरज भासत नाही; परंतु अचूक रोगनिदान व औषधोपचार यासंबंधी पशुवैद्यकाचा सल्ला आवश्यक आहेच. याशिवाय विशिष्ट रोग व त्यावरील उपचार पशुवैद्यकाद्वारेच करावेत. काही प्राथमिक आजार व उपचार यांची माहिती पशुपालकास असणे आवश्यक आहे. जनावरांचे सर्वसाधारण आजार व त्यावरील प्राथमिक उपचार यासाठी डॉक्टर जसे स्वत:जवळ विविध औषधांचा साठा ठेवतात त्याचप्रमाणे पशुपालकानेदेखील एक प्राथमिक उपचार पेटी ठेवावी व यात जनावरांच्या विविध आजारांत उपयुक्त असलेल्या वनौषधींचा साठा ठेवावा यामुळे जनावरास अचानक उद्भवलेल्या आजाराच्या वेळी पशुपालकाची धावपळ होणार नाही. पशु आजारात औषधी वनस्पतींचा प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी पशुपालकाने खालील बाबींचा विचार करावा.

औषधी वनस्पतींचा वापर करण्यापूर्वी या लेखात सांगितलेल्या व आपण वापरत असलेली वनौषधी एकच आहे याची खात्री करावी. वनस्पतींची ओळख पटल्यानंतर औषधात वापरण्यापूर्वी ती स्वच्छ करावी. वाळलेली, किडलेली वनौषधी वापरू नये. या लेखात सांगितलेली मात्रा ही आजाराच्या तीव्रतेनुसार बदलू शकते.तोंडावाटे द्यावयाची औषधी विशेषत: जी औषधी पाण्यासोबत पाजावयाची आहे ती पाजताना कोमट पाणी वापरल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला होतो.या लेखात दिलेल्या औषधी १०० ग्रॅम च्या स्वरूपात दिलेल्या आहेत. प्राथमिक उपचार पेटीत साठा ठेवत असताना पशुपालकाने आवश्यतेनुसार साठा ठेवावा. या लेखात मोठे जनावर म्हणजे गाय, म्हैस व लहान जनावर म्हणजे शेळी- मेंढी हे होय.

पचनसंस्थेचे आजार

अ) तोंड येणे, तोंडखुरी : हळद - १५, कोरफळ - ५, जेष्ठमध - ४, अर्जुन साल - १०, कात - २, तुळस - ५, जखमजोडी - ५, कडुलिंब तेल - ४, गेरू - ५ सर्व औषधी बारीक करून त्यात पाणी मिसळून त्याचा लेप तोंडात द्यावा.

आ) पोट गच्च होणे : हिरडा - ३०, आवळा - २०, एरंडतेल - २०, मुरडशेंग - १५, सोनामुखी - १५. वरील सर्व वनस्पती बारीक करून जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

इ) पोटफुगी : ओवा - २०, धणे - १०, जिरे - १५, बडीसोप - १०, हळद - १५, काळे मीठ - ३०. या सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

ई) पोटदुखी : पिंपळी - ५, जिरे - १५, सुंठ/ अद्रक - २०, ओवा -३०, चित्रक - ५, काळेमिरे - ५, वावडिंग - १०, हिरडा- २०. वरील सर्व वनस्पती बारीक करून

मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम

दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

उ) अन्न न खाणे : चित्रक - ५, पिंपळी - ५, सुंठ/ अद्रक - १०, आवळा - २०, जिरे - १०, ओवा - १०, काळे मीठ - २५. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

ऊ) अतिसार (हगवण) : कुडा - ३०, बेल - २०, डाळिंबसाल - २०, कात - ५, बाभळीचा डिंक - २५.

वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

श्वसनसंस्थेचे आजार :

अ) सर्दी, खोकला, ठसकणे :

१) अडुळसा - ३०, तुळस - २०, कंटकरी - १०, काळे मिरे - १०, सुंठ / अद्रक - १०, कासणी - २०. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

२) कापूर -४, पुदिना - ५, निलगिरी तेल - २०, विंटरग्रीनतेल - २०. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात वरील तेलाचे ५-१० थेंब टाकून त्याची वाफ जनावरास द्यावी.

प्रजननसंस्थेचे आजार

अ) जनावर माजावर न येणे : कोरफड - २०, बांबू पाने - २०, गोखरू - १५, हिसबोळ -१०, अशोक - २०, तगर - ५, उलटकंटल - १०. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून एक वेळेस तीन दिवस द्यावी.

आ) गर्भ न राहणे : दुर्वा - २५, कमळ बी - २५, शिंगाडा - २५, पुत्रंजीव - २५ वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २० ग्रॅम जनावर लावल्यापासून दोन महिन्यांपर्यंत इ) मायांग बाहेर पडणे :

जटामासी - २०, रानहळद - १०, जेष्ठमध - १०, कुठ - ५, लोध्र - ३०, अश्वगंधा - १०, कंकोल - १५.वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

ई) जार न पडणे :

ईश्वरी -२०, कलोंजी - २०, तांब - १०, कळलावी मूळ - १०, कापूस ( मुळची साल ) - १५, सतापा - १०. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना ३०-४० ग्रॅम व लहान जनावरात १०-२० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्यावी.

इतर किरकोळ आजार

अ) मुका मार : निर्गुडी -१०, निलगिरी तेल -१५ मि. ली. कापूर - ४, लसूण-५.

आ) जनावर लंगडणे:

विंटरग्रिन तेल - २० मि. ली.

वरील औषधी ५०० मि. ली. तीळ तेलात मिसळून त्याने बाधित भागावर मालीश करावी.

त्वचा विकार - खरूज, केस गळणे, पुरळ :

करंज तेल- १० मि. ली. कडूलिंब तेल - १० मि. ली. अर्जुन - ५, हळद - ५, कन्हेर - ३ , तुळस तेल- ५ मि. ली. वरील औषधी एकत्र करून बाधित भागावर आवश्यकतेनुसार लावाव्या. - See more at: http://www.dainikekmat.com/detailnews?cat=Agriculture&id=60164&start=1#sthash.rvsefg6u.dpuf
मानवाप्रमाणेच प्राण्यांनाही विविध प्रकारचे आजार संभवतात, ब-याच आजारांवर पशुपालक घरच्याघरी उपचार करू शकतो व यासाठी प्रामुख्याने औषधी वनस्पतींचा वापर उपयुक्त ठरतो. असे उपचार करत असताना प्रत्यक्ष पशुवैद्यकाची गरज भासत नाही; परंतु अचूक रोगनिदान व औषधोपचार यासंबंधी पशुवैद्यकाचा सल्ला आवश्यक आहेच. याशिवाय विशिष्ट रोग व त्यावरील उपचार पशुवैद्यकाद्वारेच करावेत. काही प्राथमिक आजार व उपचार यांची माहिती पशुपालकास असणे आवश्यक आहे. जनावरांचे सर्वसाधारण आजार व त्यावरील प्राथमिक उपचार यासाठी डॉक्टर जसे स्वत:जवळ विविध औषधांचा साठा ठेवतात त्याचप्रमाणे पशुपालकानेदेखील एक प्राथमिक उपचार पेटी ठेवावी व यात जनावरांच्या विविध आजारांत उपयुक्त असलेल्या वनौषधींचा साठा ठेवावा यामुळे जनावरास अचानक उद्भवलेल्या आजाराच्या वेळी पशुपालकाची धावपळ होणार नाही. पशु आजारात औषधी वनस्पतींचा प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी पशुपालकाने खालील बाबींचा विचार करावा.

औषधी वनस्पतींचा वापर करण्यापूर्वी या लेखात सांगितलेल्या व आपण वापरत असलेली वनौषधी एकच आहे याची खात्री करावी. वनस्पतींची ओळख पटल्यानंतर औषधात वापरण्यापूर्वी ती स्वच्छ करावी. वाळलेली, किडलेली वनौषधी वापरू नये. या लेखात सांगितलेली मात्रा ही आजाराच्या तीव्रतेनुसार बदलू शकते.तोंडावाटे द्यावयाची औषधी विशेषत: जी औषधी पाण्यासोबत पाजावयाची आहे ती पाजताना कोमट पाणी वापरल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला होतो.या लेखात दिलेल्या औषधी १०० ग्रॅम च्या स्वरूपात दिलेल्या आहेत. प्राथमिक उपचार पेटीत साठा ठेवत असताना पशुपालकाने आवश्यतेनुसार साठा ठेवावा. या लेखात मोठे जनावर म्हणजे गाय, म्हैस व लहान जनावर म्हणजे शेळी- मेंढी हे होय.

पचनसंस्थेचे आजार

अ) तोंड येणे, तोंडखुरी : हळद - १५, कोरफळ - ५, जेष्ठमध - ४, अर्जुन साल - १०, कात - २, तुळस - ५, जखमजोडी - ५, कडुलिंब तेल - ४, गेरू - ५ सर्व औषधी बारीक करून त्यात पाणी मिसळून त्याचा लेप तोंडात द्यावा.

आ) पोट गच्च होणे : हिरडा - ३०, आवळा - २०, एरंडतेल - २०, मुरडशेंग - १५, सोनामुखी - १५. वरील सर्व वनस्पती बारीक करून जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

इ) पोटफुगी : ओवा - २०, धणे - १०, जिरे - १५, बडीसोप - १०, हळद - १५, काळे मीठ - ३०. या सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

ई) पोटदुखी : पिंपळी - ५, जिरे - १५, सुंठ/ अद्रक - २०, ओवा -३०, चित्रक - ५, काळेमिरे - ५, वावडिंग - १०, हिरडा- २०. वरील सर्व वनस्पती बारीक करून

मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम

दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

उ) अन्न न खाणे : चित्रक - ५, पिंपळी - ५, सुंठ/ अद्रक - १०, आवळा - २०, जिरे - १०, ओवा - १०, काळे मीठ - २५. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

ऊ) अतिसार (हगवण) : कुडा - ३०, बेल - २०, डाळिंबसाल - २०, कात - ५, बाभळीचा डिंक - २५.

वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

श्वसनसंस्थेचे आजार :

अ) सर्दी, खोकला, ठसकणे :

१) अडुळसा - ३०, तुळस - २०, कंटकरी - १०, काळे मिरे - १०, सुंठ / अद्रक - १०, कासणी - २०. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

२) कापूर -४, पुदिना - ५, निलगिरी तेल - २०, विंटरग्रीनतेल - २०. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात वरील तेलाचे ५-१० थेंब टाकून त्याची वाफ जनावरास द्यावी.

प्रजननसंस्थेचे आजार

अ) जनावर माजावर न येणे : कोरफड - २०, बांबू पाने - २०, गोखरू - १५, हिसबोळ -१०, अशोक - २०, तगर - ५, उलटकंटल - १०. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून एक वेळेस तीन दिवस द्यावी.

आ) गर्भ न राहणे : दुर्वा - २५, कमळ बी - २५, शिंगाडा - २५, पुत्रंजीव - २५ वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २० ग्रॅम जनावर लावल्यापासून दोन महिन्यांपर्यंत इ) मायांग बाहेर पडणे :

जटामासी - २०, रानहळद - १०, जेष्ठमध - १०, कुठ - ५, लोध्र - ३०, अश्वगंधा - १०, कंकोल - १५.वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

ई) जार न पडणे :

ईश्वरी -२०, कलोंजी - २०, तांब - १०, कळलावी मूळ - १०, कापूस ( मुळची साल ) - १५, सतापा - १०. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना ३०-४० ग्रॅम व लहान जनावरात १०-२० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्यावी.

इतर किरकोळ आजार

अ) मुका मार : निर्गुडी -१०, निलगिरी तेल -१५ मि. ली. कापूर - ४, लसूण-५.

आ) जनावर लंगडणे:

विंटरग्रिन तेल - २० मि. ली.

वरील औषधी ५०० मि. ली. तीळ तेलात मिसळून त्याने बाधित भागावर मालीश करावी.

त्वचा विकार - खरूज, केस गळणे, पुरळ :

करंज तेल- १० मि. ली. कडूलिंब तेल - १० मि. ली. अर्जुन - ५, हळद - ५, कन्हेर - ३ , तुळस तेल- ५ मि. ली. वरील औषधी एकत्र करून बाधित भागावर आवश्यकतेनुसार लावाव्या. - See more at: http://www.dainikekmat.com/detailnews?cat=Agriculture&id=60164&start=1#sthash.rvsefg6u.dpuf
मानवाप्रमाणेच प्राण्यांनाही विविध प्रकारचे आजार संभवतात, ब-याच आजारांवर पशुपालक घरच्याघरी उपचार करू शकतो व यासाठी प्रामुख्याने औषधी वनस्पतींचा वापर उपयुक्त ठरतो. असे उपचार करत असताना प्रत्यक्ष पशुवैद्यकाची गरज भासत नाही; परंतु अचूक रोगनिदान व औषधोपचार यासंबंधी पशुवैद्यकाचा सल्ला आवश्यक आहेच. याशिवाय विशिष्ट रोग व त्यावरील उपचार पशुवैद्यकाद्वारेच करावेत. काही प्राथमिक आजार व उपचार यांची माहिती पशुपालकास असणे आवश्यक आहे. जनावरांचे सर्वसाधारण आजार व त्यावरील प्राथमिक उपचार यासाठी डॉक्टर जसे स्वत:जवळ विविध औषधांचा साठा ठेवतात त्याचप्रमाणे पशुपालकानेदेखील एक प्राथमिक उपचार पेटी ठेवावी व यात जनावरांच्या विविध आजारांत उपयुक्त असलेल्या वनौषधींचा साठा ठेवावा यामुळे जनावरास अचानक उद्भवलेल्या आजाराच्या वेळी पशुपालकाची धावपळ होणार नाही. पशु आजारात औषधी वनस्पतींचा प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी पशुपालकाने खालील बाबींचा विचार करावा.

औषधी वनस्पतींचा वापर करण्यापूर्वी या लेखात सांगितलेल्या व आपण वापरत असलेली वनौषधी एकच आहे याची खात्री करावी. वनस्पतींची ओळख पटल्यानंतर औषधात वापरण्यापूर्वी ती स्वच्छ करावी. वाळलेली, किडलेली वनौषधी वापरू नये. या लेखात सांगितलेली मात्रा ही आजाराच्या तीव्रतेनुसार बदलू शकते.तोंडावाटे द्यावयाची औषधी विशेषत: जी औषधी पाण्यासोबत पाजावयाची आहे ती पाजताना कोमट पाणी वापरल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला होतो.या लेखात दिलेल्या औषधी १०० ग्रॅम च्या स्वरूपात दिलेल्या आहेत. प्राथमिक उपचार पेटीत साठा ठेवत असताना पशुपालकाने आवश्यतेनुसार साठा ठेवावा. या लेखात मोठे जनावर म्हणजे गाय, म्हैस व लहान जनावर म्हणजे शेळी- मेंढी हे होय.

पचनसंस्थेचे आजार

अ) तोंड येणे, तोंडखुरी : हळद - १५, कोरफळ - ५, जेष्ठमध - ४, अर्जुन साल - १०, कात - २, तुळस - ५, जखमजोडी - ५, कडुलिंब तेल - ४, गेरू - ५ सर्व औषधी बारीक करून त्यात पाणी मिसळून त्याचा लेप तोंडात द्यावा.

आ) पोट गच्च होणे : हिरडा - ३०, आवळा - २०, एरंडतेल - २०, मुरडशेंग - १५, सोनामुखी - १५. वरील सर्व वनस्पती बारीक करून जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

इ) पोटफुगी : ओवा - २०, धणे - १०, जिरे - १५, बडीसोप - १०, हळद - १५, काळे मीठ - ३०. या सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

ई) पोटदुखी : पिंपळी - ५, जिरे - १५, सुंठ/ अद्रक - २०, ओवा -३०, चित्रक - ५, काळेमिरे - ५, वावडिंग - १०, हिरडा- २०. वरील सर्व वनस्पती बारीक करून

मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम

दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

उ) अन्न न खाणे : चित्रक - ५, पिंपळी - ५, सुंठ/ अद्रक - १०, आवळा - २०, जिरे - १०, ओवा - १०, काळे मीठ - २५. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

ऊ) अतिसार (हगवण) : कुडा - ३०, बेल - २०, डाळिंबसाल - २०, कात - ५, बाभळीचा डिंक - २५.

वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

श्वसनसंस्थेचे आजार :

अ) सर्दी, खोकला, ठसकणे :

१) अडुळसा - ३०, तुळस - २०, कंटकरी - १०, काळे मिरे - १०, सुंठ / अद्रक - १०, कासणी - २०. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

२) कापूर -४, पुदिना - ५, निलगिरी तेल - २०, विंटरग्रीनतेल - २०. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात वरील तेलाचे ५-१० थेंब टाकून त्याची वाफ जनावरास द्यावी.

प्रजननसंस्थेचे आजार

अ) जनावर माजावर न येणे : कोरफड - २०, बांबू पाने - २०, गोखरू - १५, हिसबोळ -१०, अशोक - २०, तगर - ५, उलटकंटल - १०. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून एक वेळेस तीन दिवस द्यावी.

आ) गर्भ न राहणे : दुर्वा - २५, कमळ बी - २५, शिंगाडा - २५, पुत्रंजीव - २५ वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २० ग्रॅम जनावर लावल्यापासून दोन महिन्यांपर्यंत इ) मायांग बाहेर पडणे :

जटामासी - २०, रानहळद - १०, जेष्ठमध - १०, कुठ - ५, लोध्र - ३०, अश्वगंधा - १०, कंकोल - १५.वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

ई) जार न पडणे :

ईश्वरी -२०, कलोंजी - २०, तांब - १०, कळलावी मूळ - १०, कापूस ( मुळची साल ) - १५, सतापा - १०. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना ३०-४० ग्रॅम व लहान जनावरात १०-२० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्यावी.

इतर किरकोळ आजार

अ) मुका मार : निर्गुडी -१०, निलगिरी तेल -१५ मि. ली. कापूर - ४, लसूण-५.

आ) जनावर लंगडणे:

विंटरग्रिन तेल - २० मि. ली.

वरील औषधी ५०० मि. ली. तीळ तेलात मिसळून त्याने बाधित भागावर मालीश करावी.

त्वचा विकार - खरूज, केस गळणे, पुरळ :

करंज तेल- १० मि. ली. कडूलिंब तेल - १० मि. ली. अर्जुन - ५, हळद - ५, कन्हेर - ३ , तुळस तेल- ५ मि. ली. वरील औषधी एकत्र करून बाधित भागावर आवश्यकतेनुसार लावाव्या. - See more at: http://www.dainikekmat.com/detailnews?cat=Agriculture&id=60164&start=1#sthash.rvsefg6u.dpuf
मानवाप्रमाणेच प्राण्यांनाही विविध प्रकारचे आजार संभवतात, ब-याच आजारांवर पशुपालक घरच्याघरी उपचार करू शकतो व यासाठी प्रामुख्याने औषधी वनस्पतींचा वापर उपयुक्त ठरतो. असे उपचार करत असताना प्रत्यक्ष पशुवैद्यकाची गरज भासत नाही; परंतु अचूक रोगनिदान व औषधोपचार यासंबंधी पशुवैद्यकाचा सल्ला आवश्यक आहेच. याशिवाय विशिष्ट रोग व त्यावरील उपचार पशुवैद्यकाद्वारेच करावेत. काही प्राथमिक आजार व उपचार यांची माहिती पशुपालकास असणे आवश्यक आहे. जनावरांचे सर्वसाधारण आजार व त्यावरील प्राथमिक उपचार यासाठी डॉक्टर जसे स्वत:जवळ विविध औषधांचा साठा ठेवतात त्याचप्रमाणे पशुपालकानेदेखील एक प्राथमिक उपचार पेटी ठेवावी व यात जनावरांच्या विविध आजारांत उपयुक्त असलेल्या वनौषधींचा साठा ठेवावा यामुळे जनावरास अचानक उद्भवलेल्या आजाराच्या वेळी पशुपालकाची धावपळ होणार नाही. पशु आजारात औषधी वनस्पतींचा प्रत्यक्ष वापर करण्यापूर्वी पशुपालकाने खालील बाबींचा विचार करावा.

औषधी वनस्पतींचा वापर करण्यापूर्वी या लेखात सांगितलेल्या व आपण वापरत असलेली वनौषधी एकच आहे याची खात्री करावी. वनस्पतींची ओळख पटल्यानंतर औषधात वापरण्यापूर्वी ती स्वच्छ करावी. वाळलेली, किडलेली वनौषधी वापरू नये. या लेखात सांगितलेली मात्रा ही आजाराच्या तीव्रतेनुसार बदलू शकते.तोंडावाटे द्यावयाची औषधी विशेषत: जी औषधी पाण्यासोबत पाजावयाची आहे ती पाजताना कोमट पाणी वापरल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला होतो.या लेखात दिलेल्या औषधी १०० ग्रॅम च्या स्वरूपात दिलेल्या आहेत. प्राथमिक उपचार पेटीत साठा ठेवत असताना पशुपालकाने आवश्यतेनुसार साठा ठेवावा. या लेखात मोठे जनावर म्हणजे गाय, म्हैस व लहान जनावर म्हणजे शेळी- मेंढी हे होय.

पचनसंस्थेचे आजार

अ) तोंड येणे, तोंडखुरी : हळद - १५, कोरफळ - ५, जेष्ठमध - ४, अर्जुन साल - १०, कात - २, तुळस - ५, जखमजोडी - ५, कडुलिंब तेल - ४, गेरू - ५ सर्व औषधी बारीक करून त्यात पाणी मिसळून त्याचा लेप तोंडात द्यावा.

आ) पोट गच्च होणे : हिरडा - ३०, आवळा - २०, एरंडतेल - २०, मुरडशेंग - १५, सोनामुखी - १५. वरील सर्व वनस्पती बारीक करून जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

इ) पोटफुगी : ओवा - २०, धणे - १०, जिरे - १५, बडीसोप - १०, हळद - १५, काळे मीठ - ३०. या सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

ई) पोटदुखी : पिंपळी - ५, जिरे - १५, सुंठ/ अद्रक - २०, ओवा -३०, चित्रक - ५, काळेमिरे - ५, वावडिंग - १०, हिरडा- २०. वरील सर्व वनस्पती बारीक करून

मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम

दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

उ) अन्न न खाणे : चित्रक - ५, पिंपळी - ५, सुंठ/ अद्रक - १०, आवळा - २०, जिरे - १०, ओवा - १०, काळे मीठ - २५. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

ऊ) अतिसार (हगवण) : कुडा - ३०, बेल - २०, डाळिंबसाल - २०, कात - ५, बाभळीचा डिंक - २५.

वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

श्वसनसंस्थेचे आजार :

अ) सर्दी, खोकला, ठसकणे :

१) अडुळसा - ३०, तुळस - २०, कंटकरी - १०, काळे मिरे - १०, सुंठ / अद्रक - १०, कासणी - २०. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

२) कापूर -४, पुदिना - ५, निलगिरी तेल - २०, विंटरग्रीनतेल - २०. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात वरील तेलाचे ५-१० थेंब टाकून त्याची वाफ जनावरास द्यावी.

प्रजननसंस्थेचे आजार

अ) जनावर माजावर न येणे : कोरफड - २०, बांबू पाने - २०, गोखरू - १५, हिसबोळ -१०, अशोक - २०, तगर - ५, उलटकंटल - १०. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून एक वेळेस तीन दिवस द्यावी.

आ) गर्भ न राहणे : दुर्वा - २५, कमळ बी - २५, शिंगाडा - २५, पुत्रंजीव - २५ वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २० ग्रॅम जनावर लावल्यापासून दोन महिन्यांपर्यंत इ) मायांग बाहेर पडणे :

जटामासी - २०, रानहळद - १०, जेष्ठमध - १०, कुठ - ५, लोध्र - ३०, अश्वगंधा - १०, कंकोल - १५.वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना २०-३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

ई) जार न पडणे :

ईश्वरी -२०, कलोंजी - २०, तांब - १०, कळलावी मूळ - १०, कापूस ( मुळची साल ) - १५, सतापा - १०. वरील सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांना ३०-४० ग्रॅम व लहान जनावरात १०-२० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्यावी.

इतर किरकोळ आजार

अ) मुका मार : निर्गुडी -१०, निलगिरी तेल -१५ मि. ली. कापूर - ४, लसूण-५.

आ) जनावर लंगडणे:

विंटरग्रिन तेल - २० मि. ली.

वरील औषधी ५०० मि. ली. तीळ तेलात मिसळून त्याने बाधित भागावर मालीश करावी.

त्वचा विकार - खरूज, केस गळणे, पुरळ :

करंज तेल- १० मि. ली. कडूलिंब तेल - १० मि. ली. अर्जुन - ५, हळद - ५, कन्हेर - ३ , तुळस तेल- ५ मि. ली. वरील औषधी एकत्र करून बाधित भागावर आवश्यकतेनुसार लावाव्या. - See more at: http://www.dainikekmat.com/detailnews?cat=Agriculture&id=60164&start=1#sthash.rvsefg6u.dpuf